Pandita Ramabai Information In Marathi आपल्या समाजात सुधारणेच्या माध्यमातून अनेक स्त्रियांसाठी आदर्श ठरलेल्या महिला म्हणजे पंडिता रमाबाई होय. त्या एक समाज सुधारक होत्या. त्यांनी अतिशय कष्टातून आणि आपल्या विचारातून महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी देखील झाल्या. आजच्या भागामध्ये आपण पंडिता रमाबाई यांच्या विषयी माहिती तर बघणारच आहोत, शिवाय त्यांनी समाज सुधारणा करताना भोगलेल्या हाल अपेष्टा आणि त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग या व्यक्तिरेखेच्या चरित्राबद्दल सुरू करूयात…
पंडिता रमाबाई यांची संपूर्ण माहिती Pandita Ramabai Information In Marathi
नाव | पंडिता रमाबाई |
संपूर्ण नाव | पंडिता रमाबाई गुणवंत |
जन्म दिनांक | २३ एप्रिल १८५८ रोजी |
जन्मस्थळ | म्हैसूर, कर्नाटक |
वडील | अनंत शास्त्री |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
म्हैसूरच्या संस्थांना मधील एका वकील कुटुंबामध्ये पंडिता रमाबाई यांचा २३ एप्रिल १८५८ या दिवशी जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंत शास्त्री होते. जे त्या काळचे प्रख्यात वकील होते. त्यांचे कुटुंब हे खूपच अध्यात्मिक होते. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये नेहमी साधुसंतांचा वावर असे.
यामुळे मात्र त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले. त्यामुळे पंडिता रमाबाईंच्या आईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी गावोगावी पौराणिक कथा सांगण्यास सुरुवात केली. आणि त्यातून मिळालेल्या पैशांवर ते आपल्या कुटुंबाचे पोट भरत असत.
पंडिता रमाबाई यांचे शैक्षणिक जीवन:
पंडिता रमाबाई बालपणी आपल्या वडिलांकडून संस्कृतचे शिक्षण घेऊन मोठ्या झाल्या, त्या बालपणापासूनच फार हुशार होत्या. याचे उदाहरण म्हणजे वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांना २००० पेक्षाही अधिक संस्कृत श्लोक पाठ होते. त्या मराठी भाषेसह हिंदी, बंगाली, आणि कन्नड भाषा देखील बोलत होत्या.
त्यांच्या संस्कृतमधील ज्ञानामुळे त्यांना विसाव्या वर्षी सरस्वती व पंडिता या दोन पदव्या देण्यात आल्या होत्या. आणि तेव्हापासूनच रमाबाई या पंडिता रमाबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. ज्यावेळी १९७६ चा दुष्काळ पडला होता, तेव्हा पंडिता रमाबाई यांचे आई-वडील मरण पावले, त्यामुळे त्या अनाथ झाल्या.
लग्न केल्यानंतर देखील रमाबाई आपल्या शिक्षणातच व्यस्त होत्या. मात्र वयाच्या ४०-४२ वर्षानंतर त्यांनी समाजातील विविध समस्यांवर भाष्य करायला सुरुवात केली. सर्वात प्रथम त्यांनी बालविवाह आणि विधवा यांच्या समस्या यावर भाष्य केले. त्यांनी वैद्यकीय पदवीदेखील मिळवलेली होती, त्यामुळे त्या या कामी युके मध्ये स्थायिक झाल्या.
ज्यावेळी त्यांच्या पतीचे निधन झाले, त्यानंतर त्यांनी आर्य महिला समाज या संस्थेची पुण्यामध्ये स्थापना केली. त्यांनी आयुष्यभर अनेक भूमिका वठवल्या, ज्यामध्ये कवयित्री आणि लेखिका या भूमिकांचाही समावेश होतो. त्यांनी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केल्यानंतर बायबलचे मराठी भाषेमध्ये भाषांतर केले होते.
एक समाज सुधारक म्हणून पंडिता रमाबाई:
वयाच्या २२ व्या वर्षी विवाह मुळे पंडिता रमाबाई कोलकत्ता येथे स्थायिक झाल्या. तेथे त्यांनी बालविवाह आणि विधवांची वाईट अवस्था हे चित्र बघितले, आणि या गोष्टींवर कार्य करायचे त्यांनी ठरवले. त्यांच्याकडे असलेले संस्कृतचे ज्ञान आणि त्यांनी केलेले भाषण यामुळे तेथे चांगलाच अनुयायी वर्ग तयार झाला होता.
रमाबाई रानडे यांनी अस्पृश्य वकिलाशी विवाह केल्यामुळे त्यांना बऱ्याच रोशाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांनी पुण्यामध्ये येऊन आपले कार्य सुरू केले. पुण्यामध्ये त्यांनी आर्य महिला समाजाला वेगळे वळण देऊन संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा विस्तार केला.
पंडिता रमाबाई यांचे गुणगौरव:
कुठल्याही प्रतिष्ठित व्यक्तीच्या आठवणीसाठी विविध स्थळांना किंवा घटकांना त्यांचे नाव दिले जाते. त्याचप्रमाणे पंडिता रबाबाई यांचे नाव देखील शुक्र ग्रहावरच्या एका विवराला देण्यात आलेले आहे. ज्याचे नाव मेधवी क्रेटर असे आहे, कारण लग्नानंतर पंडिता रमाबाई यांचे आडनाव मेधवी असे झाले होते.
पंडिता रमाबाई यांचे विधवा महिलांसाठी चे कार्य:
संस्कृतवर प्रभुत्व मिळवणाऱ्या रमाबाई इंग्रजी भाषेच्या ज्ञानासाठी १८८३ या वर्षी इंग्लंड मध्ये गेल्या. तिथे त्यांनी संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून देखील कार्य केले होते. तिथून त्या थेट अमेरिकेला गेल्या. अमेरिकेमध्ये त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे रमाबाई असोसिएशन या संघटनेची स्थापना करण्यात आली, ज्या संस्थेने दहा वर्ष भारतामध्ये विधवांसाठी आश्रम सुरू केला होता.
ज्यावेळी रमाबाई १८८९ यावर्षी भारतामध्ये परत आल्या तेव्हा त्यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना करून विधवांसाठी महत्त्वाचे कार्य केले. आणि हे कार्य अजून पुढे घेऊन जाण्यासाठी कृपा सदन नावाची आणखी एक संस्था स्थापन करून त्या अंतर्गत महिलांसाठी चा आश्रम सुरू केला.
पंडिता रमाबाई यांना मिळालेल्या पदव्या आणि मानसन्मान:
पंडिता रमाबाई यांचे कार्य फारच महान होते, त्यांच्या कार्याची आठवण राहावी म्हणून त्यांना विविध क्षेत्रांमधील पुरस्कार आणि मानसन्मान देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये १८७८ यावर्षी संस्कृत विभागाने त्यांना त्यांच्या ज्ञानासाठी व कार्यासाठी कलकत्ता विद्यापीठा अंतर्गत सरस्वती ही सर्वोच्च पदवी बहाल केली.
तसेच त्यांना येथेच पंडिता ही देखील पदवी देण्यात आली होती. तदनंतर १९१९ यावर्षी त्यांना ब्रिटिश सरकारने देखील कैसर ए हिंद या नावाची पदवी सुद्धा दिली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कार्याचे स्मरण राहावे म्हणून भारत सरकारने टपाल तिकीट सुरू केले, आणि मुंबईतील एका रस्त्याला त्यांचे नाव देखील दिलेले आहे.
निष्कर्ष:
आजच्या भागांमध्ये आपण स्वातंत्र्य चळवळीत हिरीहिरीने सहभाग नोंदवणाऱ्या पंडिता रमाबाई यांच्या विषयी माहिती पहिली, म्हैसूर संस्थांनामध्ये जन्म झालेल्या पंडित रमाबाई या एका वकील असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात जन्माला आल्यामुळे त्या आधीपासूनच मुक्त विचारांच्या होत्या. लहानपणापासून अतिशय सुसंस्कृत आणि हुशार असलेल्या पंडिता रमाबाई शाळेमध्ये देखील खूप हुशार होत्या. बाराव्या वर्षी त्यांच्या तोंडी सुमारे २० हजारांपेक्षाही अधिक संस्कृत भाषेतील श्लोक पाठ होते.
स्त्रिया या कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत, त्यादेखील अगदी स्वातंत्र्य चळवळी सारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात. असेच या पंडिता रमाबाई यांच्याकडे बघितले की लक्षात येते. पंडिता रमाबाई यांनी आपल्या आयुष्यातल्या सर्वच भूमिका अगदी उत्तमरीत्या पार पाडलेल्या आहेत.
FAQ
पंडिता रमाबाई यांचे लग्न वेळी वय किती होते?
मित्रांनो पूर्वीच्या काळी बालविवाह होत असत, मात्र पंडिता रमाबाई यांचे वडील उदारमतवादी विचारांचे असल्यामुळे त्यांनी पंडिता रमाबाई यांचे लग्नाचे कायदेशीर वय होईपर्यंत त्यांचे लग्न लावले नव्हते.
रमाबाई यांना पंडिता ही पदवी किंवा उपाधी कुठे व कशी मिळाली?
रमाबाई लहानपणापासून अतिशय हुशार व संस्कृत विषयांमध्ये पटाईत होत्या. त्याकाळी त्यांनी संस्कृत भाषेतून स्त्रियांच्या स्थितीवरील विषयावर भाषण दिले होते, त्यामुळे त्यांना ब्रिटनमध्ये डॉक्टर हंटर यांच्या प्रयत्नाने ही पंडिता पदवी मिळाली होती.
पंडिता रमाबाई यांचा विवाह केव्हा व कोणाशी झाला होता?
पंडिता रमाबाई यांचा विवाह १८८० यावर्षी एका दिवाणी समारंभामध्ये बंगालचे तत्कालीन वकील श्रीयुत बिपिन बिहारी मेधवी या व्यक्तीशी झाला होता.
पंडिता रमाबाई यांच्या विषयी काय वैशिष्ट्ये सांगता येईल?
मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी कलकत्ता विद्यापीठाकडून पदवी घेतली होती, तसेच त्यांनी संस्कृत सरस्वती आणि पंडिता इत्यादी पदव्या देखील मिळवल्या होत्या. आणि अशा पदव्या मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला ठरल्या होत्या, हे त्यांच्याबद्दल वैशिष्ट्य सांगता येईल.
पंडिता रमाबाई यांनी कोणत्या धर्मामध्ये धर्मांतरण केले होते?
पंडिता रमाबाई ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्मामधून ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केले होते.
आजच्या भागामध्ये आपण पंडिता रमाबाई या स्वतंत्र चळवळीतील अग्रणी असलेल्या महिलेबद्दल माहिती बघितली. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास कमेंट मध्ये आम्हाला तसे कळवा. आणि काही सूचना असतील तरी त्यादेखील पाठवा. आणि तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना वाचायला मिळावी यासाठी नक्की शेअर करा.
धन्यवाद…