पॅन कार्ड ला ऑनलाईन पद्दतीने Apply कसे करायचे? Pan Card Information In Marathi

Pan Card Information In Marathi पॅन कार्ड ला ऑनलाईन पद्दतीने apply कसे करायचे ? मित्रहो आज आपण या लेखात पाहणार आहोत कि घरबसल्या ऑनलाईन पद्दतीने पॅन कार्डला apply कसे करायचे. ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्डला apply करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असावे लागते. चला तर मग माहिती करून घेऊया कि पॅन कार्डसाठी कसे apply करायचे. मित्रहो पॅन कार्डला apply करण्यासाठी सर्वप्रथम आंपल्या मोबाईल किंव्हा लॅपटॉप मधील ब्राउसरमध्ये जाऊन तेथे सर्च एंजिन मध्ये pan card apply online असे शोधा, तुमच्या समोर येणाऱ्या प्रथम लिंकवर क्लिक करा.

Pan Card Information In Marathi

पॅन कार्ड ला ऑनलाईन पद्दतीने Apply कसे करायचे ? Pan Card Information In Marathi

प्रथम लिंक वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर NSDL ची वेबसाइट उघडेल आणि तुमच्या समोर online pan application येईल.

फॉर्म मध्ये तुम्हाला Application Type विचारलं जाईल तेथे New pan – Indian citizen (Form 49A) हे पर्याय निवडा व नंतर Category मध्ये जर तुम्ही स्वतःसाठी काढत असाल तर Individual हे पर्याय निवडा.

Application information मध्ये Title निवडा व नंतर तुमचे शेवटचे नाव, प्रथम नाव, मधले नाव, जन्मतारीख, तुमचे ई-मेल आयडी, मोबाईल नंबर टाका.

Application information टाकून झाल्यांनतर खाली असणाऱ्या सफेद रंगाच्या बॉक्स वर क्लिक करा व नंतर दाखवण्यात आलेला Capcha code जशाचा तसा खाली असणाऱ्या रिकाम्या बॉक्स मध्ये टाका व नंतर खाली असणाऱ्या Submit या पर्यायावर क्लिक करा.

Submit या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुम्ही pan card साठी करणारी request हि successfully रजिस्टर्ड असे दाखवण्यात येईल त्याचप्रमाणे तुम्हाला एक टोकन नंबर दाखवलं जाईल.

आता Pan card साठीच राहिलेलं Application form भरण्यासाठी खाली असणाऱ्या Continue with Pan application form या पर्यायावर क्लिक करा.

Pan application form या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर फॉर्म पूर्ण करण्यासाठी ५ वेगवेगळ्या स्टेप्स दाखवल्या जातील. त्यातील पहिली स्टेप्स मध्ये म्हणजेच Guidlines हि तुमची स्टेप पूर्ण झाली आहे आता second स्टेप मध्ये तुम्हाला विचारले जाईल कि तुम्हाला PAN अँप्लिकेशन documents कसे सबमिट करायचे आहेत, तेथे पहिल्या नंबर वर असणाऱ्या Submit digitally through e-KYC & e-sign (Paperless) या पर्यायाला निवडा कारण हि सोप्पी आणि वेगवान मेथड आहे.

नंतर तुम्हाला विचारण्यात येईल कि तुम्हाला Physical Pan कार्ड ची आवश्यकता आहे का? , तर तेथे Yes या पर्यायाला निवडा. आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार नंबर विचारण्यात येतील तिथे ते टाका,  त्याच खाली तुम्हाला विचारण्यात येईल कि तुम्हाला तुमचे आधार कार्ड वर जे फोटो आहे तेच पॅन कार्डवर हवे आहे का ? तर तिथे Yes हे पर्याय निवडा.

आता खाली या, तुम्हाला तुमच्या समोर तुम्ही भरललेली personal information येईल, नंतर तेथे तुमचं लिंग टाका. नंतर खाली तुम्हाला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते का, या बाबतीत विचारण्यात येईल तेथे तुमचं दुसरं नाव असेल तर Yes हे पर्याय निवडून टाकू शकता.

आता तुम्हाला विचारण्यात येईल तुम्हाला फक्त आईच आहे का आणि तुमच्या आईच नाव तुम्हाला पॅन कार्ड मध्ये वापरायचं आहे का, तर तेथे तुमचे वडील नसल्यास Yes वर क्लिक करू शकता नाहीतर No वर क्लिक करा.

तुम्हाला तुमच्या वडिलांचे आणि आईचे पूर्ण नाव विचारले जाईल तेथे आईवडिलांचे प्रथम नाव, मधले नाव आणि आडनाव टाका व खाली तुम्हाला कोणाचे नाव पॅन कार्डवर पाहिजे आहे हे विचारण्यात येईल तेथे वडिलांचे नाव पाहिजे असल्यास Father’s name आणि आईचे नाव पाहिजे असल्यास Mother’s name या पर्यायावर क्लिक करा व खाली निळ्या रंगात असणाऱ्या Submit या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे दुसरी स्टेप म्हणजेच Personal इन्फॉर्मशन हि स्टेप पूर्ण झाली आहे.

आता तिसऱ्या स्टेप्स मध्ये म्हणजेच Contact & other details मध्ये तुम्हाला तुमचे source of income विचारण्यात येईल, तेथे जर तुम्ही नोकरी करीत असाल तर Salary हे पर्याय निवडू शकता, त्याचप्रमाणे जर तुम्ही कमवत नसाल तर No income हे पर्याय निवडू शकता आणि जर तुमचे income source टाकण्यासाठी तेथे पर्याय नसेल तर Income from other sources हे पर्याय निवडू शकता.

आता तुम्हाला पॅन कार्ड च्या कामासाठी कोणता ऍड्रेस द्यायचं आहे हे विचारण्यात येईल जसे कि Office आणि Residence. जर तुम्ही Residence हे पर्याय निवडले तर तुमचे आधार कार्ड वर दिले असणारे पत्ता हेच Residence ऍड्रेस म्हणून घेण्यात येईल म्हणून आपल्याला Residence ऍड्रेस टाकण्याची गरज लागणार नाही.

आता तुम्हाला तुमचे ऑफिसचे ऍड्रेस विचारण्यात येईल तेथे ऑफिसचे नाव, area, पिन कोड, टाउन, बिल्डिंग नाव, कंट्री कोड, तेथे ऑफिस बद्दल हि सर्व माहिती टाका.

आता तुम्हाला तुमचे कंट्री कोड, एरिया कोड, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी विचारण्यात येईल तेथे ती सर्व माहिती टाका आणि नन्तर खाली असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे तिसरी स्टेप म्हणजेच Contact & other details हि पूर्ण झाली आहे.

आता चौथ्या स्टेप मध्ये म्हणजेच AO Code, या टॅब मध्ये आपल्याला Area code, AO type, Range code आणि AO No. हि माहिती विचारण्यात येईल, आता हि माहिती आपल्याला ऐकल्यानंतर नवीनच वाटेल परंतु NSDL हि वेबसाइट आपल्याला area बद्दल हि माहिती मिळवण्यासाठी मदत करते, यासाठी खाली असणारे Indian citizen हे पर्याय तुम्ही भारतीय असाल तर निवडा, तुम्ही जेथे राहत आहेत तेथील राज्य, शहर निवडा.

तुमचे राज्य आणि शहर निवडल्यानंतर खाली येणाऱ्या लिस्ट मधील तुमच्या जवळच्या असणाऱ्या भागाला निवडा, निवड्यानंतर Area code, AO type, Range code आणि AO No. हि सर्व माहिती वेबसाइट कडून आपोआप भरली जाईल.

आणि नंतर खाली असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा. अशाप्रकारे आपली चौथी स्टेप पूर्ण होईल व आपण पाचव्या स्टेप मध्ये म्हणजेच Document details या पर्यायांमध्ये येऊ.

Document details या पर्यायांमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेल कि NSDL या वेबसाइट कडून आपल्या Proof of identity, Proof of address आणि Proof of death of birth या तिन्ही पुराव्या साठी आधारकार्ड हे निवडलेले असेल कारण आपण पॅन कार्डला apply करण्यासाठी अधार कार्डचा वापर करणार आहोत.

Documents नंतर खाली Declaration साठी काही पर्याय असतील तेथे तूमच नाव असेल आणि पहिल्या पर्यायामध्ये क्लिक करून Himself/Herself हे पर्याय निवडा.

आता place आणि date विचारण्यात येईल तेथे तुमचे ठिकाण आहे अँप्लिकेशन भरताना असणारी तारीख टाका आणि place आणि date टाकून झाल्यांनतर खाली निळ्या रंगात असणाऱ्या Submit या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपली पाचवी स्टेप देखील पूर्ण झाली आहे आणि आपले पॅन कार्ड साठीचे अँप्लिकेशन सबमिट झाले आहे. आता आपल्यासमोर काही गोष्टी कन्फर्म करण्यासाठी येईल तेथे आपले आधार क्रमांकाचे पहिले आठ क्रमांक विचारले असेल ते टाका.

आधार क्रमांकाचे पहिले आठ क्रमांक टाकल्यानंतर स्क्रोल करीत खाली या आणि तुम्ही पुढील प्रमाणे भरलेली सर्व माहिती तुमच्या समोर येईल ती बरोबर आहे का याची खात्री करा.

  1. Guidelines
  2. Personal information
  3. Contact & other details
  4. AO Code
  5. Document details

वरील प्रमाणे दिलेल्या सर्व माहितीची खात्री करून झाल्यांनतर खाली निळ्या रंगात असणाऱ्या Proceed या पर्यायावर क्लिक करा.

Proceed या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर Payment page येईल तेथे पॅन कार्डसाठीचे payment करण्यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या प्रमाणे तीन वेगवेगळे पर्याय दिलेले असतील, तेथे तुम्हाला ज्या पर्यायाने payment करायचे आहे ते पर्याय निवडा.

  1. डिमांड द्राफ्ट
  2. ऑनलाईन payment through Paytm
  3. ऑनलाईन payment through Bill desk

वरील प्रमाणे तुम्हाला ज्या पर्यायाने payment करायचे आहे ते पर्याय निवडल्यानन्तर तुमच्या समोर पॅन कार्ड साठी किती charges लागणार आहेत हि सर्व माहिती दाखविण्यात येईल ती माहिती वाचा व I agree to terms of service या पर्यायावर क्लिक करून नंतर Proceed to payment या पर्यायावर क्लिक करा.

Proceed to payment या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर payment करायची असणारी amount कन्फर्म करण्यासाठी विचारण्यात येईल तेथे असणाऱ्या Pay confirm या पर्यायावर क्लिक करा.

Pay confirm या पर्यायवर क्लिक केल्यावर जर तुम्ही payment करण्यासाठी “ऑनलाईन payment through Bill desk” हे पर्याय निवडले असल्यास तुमच्या समोर तुमच्या क्रेडिट किंव्हा डेबिट कार्डची डिटेलस टाकण्यासाठी येईल तेथे ती सर्व माहिती भरा आणि खाली असणाऱ्या Make payment या पर्यायावर क्लिक करा.

Make payment या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या क्रेडिट किंव्हा डेबिट कार्डसोबत जोडलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल तो स्क्रीन वर OTP टाकण्यासाठी येणाऱ्या पर्यायामध्ये टाका व पुन्हा आलेल्या Make payment या पर्यायावर क्लिक करा.

Payment Successful झाल्यांनतर payment receipt स्क्रिन वर येईल तेथे Proceed या पर्यायावर क्लिक करा.

Proceed या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स तुमच्या पॅन कार्डला वापरण्यासाठी permission विचारण्यात येईल तेथे बॉक्स वर टिक करा आणि खाली असणाऱ्या Authenticate या पर्यायावर क्लिक करा.

Authenticate या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमच्या समोर Continue with e-KYC असे एक पर्याय येईल त्यावर क्लिक करा. आता तुमच्या समोर तुमचे नाव आणि तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो OTP साठी टाकण्यासाठी स्क्रिनवर आलेल्या पर्यायांमध्ये टाका आणि खाली असणाऱ्या Submit या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्या समोर Confirm with e-sign हे पर्याय येईल त्यावर क्लिक करा, तुमच्या समोर NSDL electronic signature service कडून  दुसऱ्यांदा OTP verification साठी येईल, तेथे तुमच्या आधार कार्ड डिटेल्स वापरण्यासाठी परमिशन विचारण्यात येईल तेथे बॉक्स वर टिक करा आणि खाली आधार क्रमांक टाकण्यासाठी असणाऱ्या बॉक्सवर क्लिक करा आणि तेथे आपला आधार क्रमांक टाका व नन्तर खाली असणाऱ्या Send OTP या पर्यायावर क्लिक करा.

मोबाईल नंबर वर आलेला OTP टाका व बाजूला असणाऱ्या Verify OTP या पर्यायावर क्लिक करा.

OTP व्हेरिफाय झाल्यांनतर तुमच्या समोर acknowledgement स्क्रीन वर येईल आणि अँप्लिकेशन फॉर्मची कॉपी PDF फॉरमॅट मध्ये येईल, जी डाउनलोड करू शकतो.

आणि काही कालांनंतर तुम्हाला तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडी वर NSDL कडून डिजिटल फॉर्म मध्ये तुमचा पॅनकार्ड येईल, जो physical पॅनकार्ड मिळण्यापर्यन्त वापरू शकतो आणि काही दिवसातच आपण दिलेल्या ऍड्रेस वर आपला physical pan card येईल.

मित्रहो आम्ही या लेखात ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्डला कसे अप्लाय करायचे या बाबतीत अतिशय सविस्तर माहिती सांगितली आहे, जी तुम्हाला तुमच्यासाठी पॅन कार्डला अप्लाय करण्यात नक्कीच मदत करेल. या सांगितलेल्या माहितीबद्दल तुमच्याकडे काही शंका असल्यास खालील कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका.

Leave a Comment