पैनगंगा नदी विषयी संपूर्ण माहिती Painganga River Information In Marathi

Painganga River Information In Marathi पैनगंगा नदी ही महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे. ही नदी अजिंठा डोंगररांगेत बुलढाणा जिल्ह्यात मढ या गावाच्या शिवारात  बुद्नेश्र्वर महादेवाच्या मंदिरापासून उगम पावते. उगमानंतर ती आग्नेयकडे बुलढाणा वाशीम व  अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून, बुलढाणा व यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते. पुढे ती यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर  बल्लारपूर येथे वर्धा नदीस उजव्या तीराला येऊन मिळते. ही नदी वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांची दक्षिण सीमा आहे. या नदीचा उपयोग शेती कामासाठी केला जातो या नदीवर धरण बांधले आहेत. तर चला मग पाहूया या नदी विषयी सविस्तर माहिती.

Painganga River Information In Marathi

पैनगंगा नदी विषयी संपूर्ण माहिती Painganga River Information In Marathi

पैनगंगा नदीची लांबी व क्षेत्रफळ :

पैनगंगा नदीची लांबी 495 किमी आहे. सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहन क्षेत्र 23,898 चौ. किमी. पुढे वर्धा आणि पैनगंगा यांचा संयुक्त प्रवाह वैनगंगेला मिळतो.  पैनगंगेच्या उजव्या बाजूला येऊन मिळणारी एकमेव नदी कयाधू ही आहे, तर डाव्या बाजूला येऊन मिळणाऱ्या नद्यांपैकी पूस, अडाण, आरना, वाघाडी, खुनी या पैनगंगेच्या मुख्य उपनद्या आहेत.

नदीतील पाण्याचा उपयोग :

जलसिंचनाच्या दृष्टीने ही नदी उपयोगी असून, अप्पर पैनगंगा प्रकल्पानुसार या नदीवर इसापूर धरण  यवतमाळ  जिल्ह्यात इसापूरजवळ बांधले आहे. ते 1968 मध्ये बांधले. या धरणाची क्षमता 964 दशलक्ष घनमीटर इतकी आहे, या धरणाचा उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत.

या कालव्यामुळे नांदेड यवतमाळ हिंगोली या जिल्ह्याला जिल्ह्यातील शेती उपयोग झाला आहे. एवढेच नाही तर या कालव्याचे पाणी आंध्रप्रदेशापर्यंत पण गेलेली आहे. त्यापासून शेतीस पाणी पुरवठा होतो. देऊळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली, मेहकर ही पैनगंगा नदीखोऱ्यातील प्रमुख शहरे आहेत.

अभयारण्य :

पैनगंगा नदी वाशीम जिल्ह्यातील रिसोड  तालुक्याच्या अगदी मध्यभागातून वाहते.  पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा यांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य आहे.

पैनगंगा अभयारण्याची स्थापना 1 जानेवारी 1996 रोजी झाली. याचे क्षेत्रफळ सुमारे 325 चौ.कि.मी. इतके आहे. अभयारण्यात साग हा प्रमुख वृक्ष आहे. या नदीमुळे यवतमाळ जिल्ह्याला अलौकिक वनसंपदा लाभली आहे. पैनगंगा नदीच्या दुसऱ्या बाजूला नांदेड जिल्हा आणि त्यातले  किनवट अभयारण्य आहे.

अभयारण्यात आढळणारे वनस्पती, प्राणी व पक्षी :

पैनगंगा नदीच्या खोऱ्यांमध्ये घनदाट असे जंगल असल्यामुळे तसेच आजूबाजूला पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या जलाशयामुळे या अभयारण्यात प्राणी जीवन सर्वात जास्त आढळून येते.

पैनगंगा अभयारण्याच्या खरबी वनपरिक्षेत्रात कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल यांसारख्या गवताच्या जाती उगवत असल्याने येथे वाघ, बिबट्या, अस्वल, लांडगा, रानकुत्रे, तरस, चितळ, सांबर, चौसिंगा, खवले मांजर, मसण्या ऊद, भेकर, काळवीट इत्यादी सोबतच विविध पशु पक्षांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. पर्यटकांसाठी हे अभयारण्य खुले करावे, अशी वन्यप्रेमींची मागणी होती.

पर्यटन स्थळ :

किनवट तालुक्‍यात, पैनगंगा नदीवर  सहस्रकुंड नावाचा धबधबा आहे. नदीचा प्रवाह खडकांमधून विभागला आहे, त्यामुळे पाणी खाली कोसळताना दोन वेगवेगळ्या धारा पडतात.  सोनधाबी आणि सहस्रकुंड धबधबा हे पैनगंगा अभयारण्याचे प्रमुख आकर्षण आहे.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे पर्यटक तेथे गर्दी करीत असतात.

परंतु येणाऱ्या पर्यटकांसाठी तेथे पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणी दोन्ही तीरांवरून धबधबा पाहण्यासाठीचे प्लॅटफॉर्म, पर्यटकांसाठीचे उद्यान, पैलतीरी जाण्यासाठीचे पूल आणि उपहारगृहे, स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून त्यांची दुरुस्ती आणि देखभाल जास्त कसोशीने केली जाण्याची गरज आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हो इतरांना शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment