पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध Pahateche Saundary Marathi Nibandh

Pahateche Saundary Marathi Nibandh सकाळचे वातावरण मनाला प्रसन्न करणारे असते. सर्वत्र निरामय शांतता आणि पक्ष्यांचा किलबिलाट व वार्‍याची येणारी झुळूक मनाला मोहीत करणारे असते. माझे दहावीचे पेपर सुरू होणार होते. माय अभ्यासाचे ओझे पडलेले होते, त्यामुळे बाबांनी सांगितले की पहाटे केलेला अभ्यास हा कायमस्वरूपी लक्षात राहतो.

Pahateche Saundary Marathi Nibandh

पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध Pahateche Saundary Marathi Nibandh

परीक्षेला दोन महिन्यांची वेळ राहिले होती तेव्हा मी आजपासून अभ्यासाला सुरुवात करणार होतो त्यामुळे मी ठरवले की उद्यापासून पहाटे उठून अभ्यासाला सुरुवात करणार. ठरल्याप्रमाणे मी पहाटे साडेचार चा आलार्म लावला. असे म्हणतात की, जो सकाळी लवकर उठतो. त्याला आरोग्य संपदा मोठ्या प्रमाणात मिळते.

तसेच आजच्या आणि पूर्वीच्या काळाचाही विचार केला तर प्रत्येक यशस्वी लोकांच्या जीवनातील यशाची पायरी गाठण्याचे रहस्य म्हणजे पहाटे उठणे होय. त्यामुळे आजही बहुतांश लोकांमध्ये पहाटे उठण्याची सवय पहायला मिळते. म्हणून मी पहाटे उठलो पहाटेचे वातावरण करायच शांत आणि प्रसन्न वाटले.

पहाटेची वेळ खूपच प्रसन्न असते व रोमारोमांत चैतन्य फुलवणारी देखील असते. मनाला मोहनारे अल्हाददायक पहाट ही दिवसभरातील कामासाठी ऊर्जा निर्माण करते. पावसाळ्याचे दिवस नुकतेच चालू झाले होते. पावसाळ्यातील निसर्ग मी वातावरण मनाला आकर्षित करणारे असतेच त्यासोबत पावसाळ्यातील पहाट देखील खूप प्रसन्न असते. उन्हाळा तुझे सर्व दाहकता पावसाळा ऋतु मध्ये कमी होते.

पावसाळा ऋतु नुकताच चालू झालेला यावरील संपूर्ण आकाश निरभ्र झालेले. पहाट होताच सगळीकडे पसरलेला अंधकार हळूहळू दूर होऊ लागला. काळोखाचा पडदा हटवून त्या पडद्यामागे असलेली अस्पष्ट गोष्ट हळूहळू नजरेस पडायला लागली. त्याचवेळी आकाशामध्ये पांढरे ढगांची काहीतरी गडबड चालू होती. लहान मुलांसारखे एकमेकांना ढकलत युद्ध पुढे पुढे येऊ लागले पहाटेचे ते सौंदर्य पाहून मी थक्क झालो.

स्वच्छ निळे आकाश, त्यामध्ये पांढरे ढग जणू कापसासारखे दिसत होते. पहाटेचे ते सौंदर्य पाहून मला वाटले की, एखाद्या कुशल चित्रकाराने सहजपणे आपल्या कौशल्यातून रेखाटलेली ते निसर्गाचे चित्राच असावे. हळूहळू सूर्य नारायण वर येऊ लागला, तेवढ्यात पक्ष्यांचा किलबिलाट चालू झाला.

पक्ष्यांचा तू मधुर आवाज ऐकून माझे मन तृप्त झाले. मी दरवाजा उघडून घराबाहेर गेलो आणि पाहतो तर काय निसर्गाचे एवढे सुंदर दशमी यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हते. सर्वत्र धुके पसरले होते त्याला पाहून वाटले की, जणू ढगाच पृथ्वीवर उतरले. तेवढ्यात माझा पाय खाली गवतावर पडला पाहतो तर काय एवढ्या एवढ्या मखमलि गवता वर दवबिंदू जणू मोत्यां प्रमाणेच दिसत होते.

हिरवागार निसर्ग आणि हळुवारपणे वर येणारा सुर्यनारायण व त्याचा पडलेला केशरी प्रकाश तेच चित्र पाहून असे वाटले की धरती मातेने जणू हिरव्या आणि केसरी रंगाची शालच घातली आहे.

तेवढ्यात कुठून तरी अलवारपणे वाऱ्याची मंद लहर माझ्या गालाला स्पर्श केला. तो स्पर्श मला आजही मोहून टाकतो. त्या लहरीने मन सुखावून जाते. पहाटेच्या या निसर्गमय शांत सौंदर्याने माझे मन आजही नाचू लागते. अशा या सुंदर पहाटेचा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला होता. कदाचित त्यामुळेच बाबा मला म्हणाले की पहाटे केलेला अभ्यास हा लक्षात राहतो. कारण पहाटेचे वातावरण शांत आणि मनाला प्रसन्न करणारी असते. आणि आणि यशस्वी लोकांच्या जीवनाचे रहस्य देखील पहाटे उठणे का आहे हे मला आज कळले.

एवढेच नसून अनेक लेखक आणि कवी आपल्या लेखामध्ये व कवितांमध्ये पहाटेचे जे सुंदर वर्णन करतात त्याचे खरोखर चित्रण आज मी माझ्या डोळ्याने पाहिले होते. आज मी पाहिलेल्या पहाटेचे दृश्य पाहून मला वर्णन केलेल्या पहाटे पेक्षा खरोखर अनुभवलेली पहाट अधिकच सुंदर वाटली.

मला देखील मी पाहिलेल्या पहाटेचे सौंदर्य वर्णन एखादा कवितेमध्ये किंवा लेखामध्ये करण्याची इच्छा झाली. पहाटेचे सौंदर्य मी पहिल्यांदाच अनुभवले होते आणि यापुढेही रोजच असे सौंदर्य अनुभवाण्या ची माझी इच्छा झाली. या मी अशाच प्रकारच्या सुंदर आणि मनाला मोहित जाणारा पहाटेचा आनंद राहिल.

खरंच पहाटेचे सौंदर्य पाहण्यासारखे असते एकदा का पहाटेचे सौंदर्य अनुभवले तर तुम्ही सर्व जण पहाटेच्या प्रेमात पडाल. दिवसभरचा थकवा, जीवनात असलेली सर्व दुःख सर्वकाही विसरून आपण पहाटेच्या प्रेमामध्ये पडायला भाग पडतो कारण असते तेवढे अल्लाहदायक. उगवणारा सूर्य, पक्षांचा किलबिलाट, धुक्यांची पसलेली चादर आणि गवता वर मोत्यान प्रमाणे दरवळणारे दवबिंदू हे सर्व दृश्य पाहण्यासाठी पहाटेचा अनुभव घ्यावा लागतो.

मनाला मोहित करणारे पहाटेचा अनुभव सर्वांनी घ्यायलाच हवा. आणि जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर लवकर उठण्याची सवय ठेवलीच पाहिजे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment