पद्मिनी कोल्हापुरे यांचे जीवनचरित्र Padmini Kolhapure Information In Marathi

Padmini Kolhapure Information In Marathi :- पद्मिनी कोल्हापुरे हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री आहे. प्रेम रोग, आहिस्ता आहिस्ता, वो सात दिन, विधाता अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे 80 च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती. मात्र पद्मिनी कोल्हापूरे या अभिनयाच्या क्षेत्रात अपघातानेच आल्या.

Padmini Kolhapure Information In Marathi

पद्मिनी कोल्हापुरे यांचे जीवनचरित्र Padmini Kolhapure Information In Marathi

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याप्रमाणे गायिका बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. फक्त नशीब आजमावण्यासाठी त्या सिनेमात आल्या होत्या. मात्र नंतरच्या काळात सिनेमा आणि अभिनयच त्यांचं जणू आयुष्य बनलं.  हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी मराठी चित्रपटातही काम केले आहे आणि त्यांचे मराठी चित्रपट हे खूप प्रसिद्ध झाले आहेत. तर चला मग पाहूया त्यांच्या विषयी माहिती.

 नाव  पद्मिनी कोल्हापुरे 
 जन्म तारीख  1 नोव्हेंबर 1965
जन्म ठिकाण  मुंबई, महाराष्ट्र 
 आईचे नाव  निरुपमा कोल्हापुरे
 बाबाचे नाव  पंढरीनाथ कोल्हापुरे
 व्यवसाय  अभिनेत्री, गायिका 
 पतीचे नाव  प्रदीप शर्मा 
 मुलगा  प्रियांक शर्मा 
 आजोबा  पंडित कृष्णराव कोल्हापुरे 
 बहिणी  शिवांगी कपूर, तेजस्विनी कोल्हापुरे 

जन्म :-

पद्मिनीजींचा जन्म 1 नोव्हेंबर 1965 रोजी मुंबईत झाला. शास्त्रीय संगीत गुरू पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे पद्मिनीजींचे वडील आहेत. पद्मिनीची आई, निरुपमा कोल्हापुरे असून यांचा जन्म  कर्नाटकातील  मंगलोर येथील कोकणी बोलणाऱ्या कोकणी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना तीन मुली झाल्या आहेत पद्मिनी ही त्यातील दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आहे. तर अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी आहे.

चित्रपट कारकीर्द :-

पद्मिनी कोल्हापुरे जेव्हा चित्रपटसृष्टीत आल्या त्यावेळी बालकलाकारांची खूप मागणी होती. चित्रपटातील नायक किंवा नायिका यांचे बालपणापासूनची मैत्री दाखवून मग तरुणपणीचा रोमान्स दाखविण्याची पद्धत होती. पाच वर्षाची पद्मिनी ‘एक खिलाडी बावन पते’ या चित्रपटातून पडद्यावर आली.

गुलजार यांच्या किताब या बालचित्रपटात पद्मिनी आणि बहीण शिवांगी कोल्हापुरे यांनी ‘अ-आ-इ-ई, मास्टरजी की आ गई चिट्ठी…’ हे गाणे म्हटले होते. ‘यादों की बारात’ या चित्रपटाचे ‘टायटल सॉंग लता मंगेशकर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी गायले होते. पद्मिनीचा आवाज खूप छान होता आणि मंगेशकरांशी नाते असल्याने लता-आशा मंगेशकरांबरोबर कोरस गाण्यासाठी पद्मिनीला संधी मिळे.

पद्मिनीने वयाच्या 9 व्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.  त्यांनी 70 च्या दशकात बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले.  1982 साली प्रदर्शित झालेल्या प्रेम रोग ह्या चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार‎ मिळाला होता. ‘इश्क इश्क इश्क’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम’ या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय केला.

वयाच्या 15 व्या वर्षी ‘इंसाफ का तराजू’ या सिनेमासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. यानंतर पद्मिनी कोल्हापूरे अभिनय आणि सिनेमात रमल्या. विविध सिनेमात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. कारकिर्द ऐन भरात असताना त्यांना ‘राम तेरी गंगा मैली’, ‘एक दूजे के लिए’, ‘सिलसिला’ अशा सिनेमांच्या ऑफर्सही आल्या होत्या. मात्र तारखा नसल्याने त्यांनी या सिनेमात काम करण्यास नकार दिला. एका टीव्ही शो दरम्यान पद्मिनी कोल्हापूरे यांनी याबाबत खुलासा केला होता.

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा ‘गहराई’ हा हिंदी सिनेमा 1980 साली रीलिज झाला होता. या चित्रपटामध्ये त्यांनी दिलेल्या बोल्ड सीनमुळे त्या वादातही अडकल्या होत्या. करिअरच्या सुरुवातीच्याच काळात अशाप्रकारचा बोल्ड सीन देणं त्यांच्यासाठीही आव्हानात्मक होतं. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इन्साफ का तराजू’ या चित्रपटामध्येही त्यांनी बोल्ड सीन दिला होता. पद्मिनी अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.

सप्टेंबर 2013 मध्ये रिलीज झालेल्या शाहिद कपूरच्या ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या चित्रपटात पद्मिनी दिसली होती.  2020 मध्ये ती ‘प्रवास’ या मराठी चित्रपटात दिसली.  पद्मिनी कोल्हापुरे 2019 मध्ये रीलिज झालेल्या पानीपत या सिनेमामध्ये झळकल्या होत्या. आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण या चित्रपटाच्या निमित्ताने पद्मिनी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या.

2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रवास या मराठी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. या सिनेमामध्ये त्यांच्या सोबतच अशोक सराफ, विक्रम गोखले, शशांक उदापूरकर हे कलाकारही झळकले आहेत. करिअरच्या सुरुवातीला बाल कलाकार म्हणून पद्मिनी यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं होतं. जिंदगी, ड्रिम गर्ल, साजन बिना सुहागन आणि सत्यम शिवम सुंदरम् या चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारलेले अनेक चित्रपटही चांगलेच गाजले.

लव्ह स्टोरी :-

पद्मिनी कोल्हापुरे जेव्हा घरातून पळून गेल्या तेव्हा त्यांचे वय एकवीस वर्ष होते आणि त्यांनी 21 व्या वर्षीच पळून आपल्या प्रियकरासोबत लग्न केले. असे घडले की एका चित्रपटात काम करताना ती निर्माता प्रदीप शर्माच्या प्रेमात पडली.  दोघांनाही लग्न करायचे होते पण घरच्यांना ते मान्य नव्हते आणि शेवटी त्यांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.  पूर्णपणे फिल्मी प्रेमकथा आहे. पद्मिनी आणि प्रदीपची प्रेमकथा एखाद्या फिल्मी प्रेमकथेपेक्षा कमी नाही. त्यांची भेट ‘ऐसा प्यार कहां’ 1986 मध्ये चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली.

या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती त्यांचा सहकलाकार होता.  दिग्दर्शक विजय सदनच्या चित्रपटाची निर्मिती प्रदीप शर्मा यांनी केली होती.  पद्मिनीच्या कुटुंबातील सदस्यांना प्रदीपसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आनंद नव्हता.  याचे कारण असे की दोघेही वेगवेगळ्या समाजातील होते. दोघांनी पद्मिनीच्या कुटुंबाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण अपयशी ठरले.  शेवटी एके दिवशी दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

14 ऑगस्ट 1986 रोजी दोघांनी लग्न केले.  त्यांना प्रियांक नावाचा मुलगाही आहे. वयाच्या 14 व्या वर्षापासून त्याला चित्रपटांची ऑफर देण्यात आली होती पण त्याने कोणताही चित्रपट स्वीकारला नाही.  प्रियांक शर्माने 4 फेब्रुवारी 2021 रोजी निर्माता करीम मोरानीची मुलगी शाजाशी लग्न केले.

चित्रपटांची नावे :-

प्यार झुकता नहीं, प्यारी बहना, प्रीती, प्रेम रोग, प्रोफेसर की पडोसन, फटा पोस्टर निकला हीरो, बेकरार, बेवफाई, बोलो राम, मजदूर, माई, मुद्दत, यह इश्क नही आसॉं, राही बदल गये, लव्हर्स, वफादार, विधाता, वो सात दिन, शीशे का घर, सड़क छाप, सत्यम्‌ शिवम्‌ सुन्दरम्‌, सागर संगम, साजन बनी सुहागन, सुहागन, सौतन, स्टार, स्वामी दादा, स्वर्ग से सुंदर, हम इंतजार करेंगे, हम हैं लाजवाब या व्यतिरिक्त आणखी व त्यांची चित्रपटांची नावे आहे.

पुरस्कार :-

1981 : इन्साफ का तराजू फिल्मफेअर पुरस्कार -सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री.

1982 : अहिस्ता अहिस्ता फिल्मफेअर विशेष कामगिरी पुरस्कार

1983 : प्रेम रोग फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

1984 : सौतन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन

1986 : प्यार झुकता नही फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

2003 : कलाकर पुरस्कार – अचीव्हर पुरस्कार .

2006 : चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार चिमणी पाखरे या मराठी चित्रपटासाठी मिळाला.

हे सुद्धा अवश्य वाचा  :-

FAQ

प्रेम रोग मध्ये पद्मिनी कोल्हापुरे किती वर्षांची होती?

पद्मिनी कोल्हापुरे फक्त 17 वर्षांची होती जेव्हा तिने चित्रपट केला तेव्हा ती 17 व्या वर्षी वैयक्तिकरित्या फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण अभिनेत्री राहिली, डिंपल कपाडियाने 17 व्या वर्षी बॉबी 1973 साठी जिंकली होती परंतु तिने ती जया बच्चन सोबत अभिमान 1973 साठी शेअर केली होती.

पद्मिनी कोण आहे?

पद्मिनी, ज्याला पद्मावती म्हणूनही ओळखले जाते, ती सध्याच्या भारतातील मेवाड राज्याची 13व्या-14व्या शतकातील राणी (राणी) होती. अनेक मध्ययुगीन ग्रंथांमध्ये तिचा उल्लेख आहे, जरी या आवृत्त्या भिन्न आहेत आणि अनेक आधुनिक इतिहासकार एकूणच सत्यतेच्या मर्यादेवर प्रश्नचिन्ह लावतात. पद्मिनीचे १८व्या शतकातील चित्र.

पद्मिनी कोल्हापुरे यांचा जन्म कुठे झाला ?

पद्मिनीजींचा जन्म  मुंबईत झाला.

पद्मिनी कोल्हापुरे यांचा जन्म केव्हा झाला ?

पद्मिनीजींचा जन्म 1 नोव्हेंबर 1965 रोजी मुंबईत झाला.

पद्मिनी कोल्हापुरे यांचा पुरस्कार कोणता ?

वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी पद्मिनीने इन्साफ का तराजू मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. तर वयाच्या सतराव्या वर्षी प्रेम रोग या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

पद्मिनी कोल्हापुरे यांचा लता मंगेशकरशी संबंध कसा आहे?

अशा प्रकारे, पद्मिनी ही दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि आशा भोंसले यांची भाची आहे. तिची आई पूर्वी एअर इंडियामध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करत होती.

Leave a Comment