नवरात्र सणाचे महत्त्व आणि माहिती Navratri Information In Marathi

Navratri Information In Marathi भारतामध्ये नवरात्री उत्सवाला खूप महत्त्व आहे. गणपती उत्सव संपला म्हणजे नवरात्री उत्सव सुरू होतो. पितृपंधरवडा त्या तयारीत कधी संपतो हे आपल्याला कळत नाही. जागोजागी देवीच्या पूजेसाठी स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. त्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते.

Navratri Information In Marathi

नवरात्र सणाचे महत्त्व आणि माहिती Navratri Information In Marathi

मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंददीप लावला जातो. रोज फुलांची माळ सकाळ-संध्याकाळ आरती सार्वजनिक उत्सवातही हे सर्व करून घेतली जातात. घरोघरी ही नवरात्री उत्सवाचे किंवा घटस्थापना होत असते. प्रत्येक घराची पद्धत वेगवेगळी असते आणि प्रत्येक ठिकाणी देवीची वेगवेगळी रूपे व नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. देवीच्या घटस्थापनेच्या वेळी ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकडून ही घटस्थापना करून घेतली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन असते.

तसेच कुणाच्या घरी नऊ कन्या भोजनासाठी बोलावून त्यांची पूजा करून त्यांना हलवा पुरी चुनरी दिली जाते. कुणी धान्य फराळ करतात, तर कोणी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. नऊ दिवस धावपळीचे असतात. त्यासाठीही गोंधळी सुद्धा बोलाविले जातात व संध्याकाळी गोंधळही घातला जातो. नवरात्रीच्या उत्सवाला म्हणजे लोकांमध्ये आनंदी व उत्साहाचे वातावरण आपोआप निर्माण होते. त्यांना उत्सुकता लागलेली असते, या दिवसात प्रत्येक जण देवीची पूजा आरती करण्यासाठी मंडळे स्थापन करून देवीच्या ठिकाणी जात असतात.

नवरात्री उत्सवाचे महत्व :

नवरात्रीचे महत्व आपल्याला देवीच्या विविध रूपांची आराधना करताना मनामध्ये भक्तिभाव उभारून आला पाहिजे. अशा प्रकारे लोकांच्या मनात होणारी म्हणून विकारांची भावना नष्ट करण्याच्या भावनेतून देवीची पूजा व चरणी विलीन होण्यासाठी घटस्थापना करण्यात येते. नवरात्री उत्सवात कोणत्याही प्रकारचा ताण तणाव व्यक्तींच्या मनात किंवा डोक्यावर चेहर्‍यावर दिसून येत नाही. त्यामुळे नवरात्रीच्या काळात आनंदी उत्साहाचे वातावरण निर्माण होण्यासाठी नवरात्री उत्सव महत्त्वाचा आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास केले, म्हणजे झाले असे नसून उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून मनोविकार पाप वासना दृष्ट बुद्धी या सर्वांपासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रीत होणे अपेक्षित आहे. ज्या शक्तीचे सामर्थ्याचे दर्शन देवीने दिले तशी शक्ती सामर्थ्य आपल्याला स्वतः मध्ये निर्माण करण्यासाठी या उत्सवाचा व या पवित्र नवरात्रीचा महत्त्वाचा फायदा असतो. नवरात्री उत्सवामध्ये देवी हे एक स्त्रीचीच रूप आहे.

त्यामुळे समाजामध्ये स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसण्यासाठी म्हणजेच त्यांची पूजा झाल्यामुळे लोकांच्या मनात स्त्रियांबद्दल आदर निर्माण होतो व नवरात्रीचे दिवसांमध्ये मुलींची पूजा केली जाते. हाही एक महत्वाचा फायदा आपल्याला दिसून येतो. बऱ्याच ठिकाणी मुली जन्माला येण्या अगोदरच त्यांची भ्रूणहत्या केली जाते. त्यामुळे मुलीं जन्माला येऊ द्या असाही संदेश आपल्याला नवरात्री उत्सवातून मिळतो. मुलगी किंवा स्त्री हे एक देवीचे स्वरूप आहे. असे म्हणून नवरात्री उत्सव साजरा केला जात असावा उद्देश आहे.

नवरात्री उत्सव कसा साजरा करतात :

नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंद व उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. नवरात्री हा सण खूप प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी देवीची घटस्थापना झाल्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा केली जाते व टाळ मृदुंगाच्या गजरात देवीच्या आरत्या म्हटल्या जातात. तसेच देवीच्या आरत्या म्हणण्यासाठी गावातील मंडळी आपले स्वतःचे मंडळ स्थापित करत असतात.

गुजरातमध्ये नवरात्र उत्सव साजरा करताना गरबा आणि दांडिया असा रास नृत्याच्या माध्यमातून साजरा केला जातो. गरबा हा नृत्याचा मोह प्रकार असून त्यात स्त्रिया एक कलशात ठेवलेल्या दिव्या भोवती वर्तुळाकार फेर धरून आकर्षकरीत्या नृत्य करतात. तसेच पश्चिम बंगाल आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यात शरद नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस दुर्गापूजा म्हणून साजरे केले जातात. दुर्गादेवी हाती सारी शस्त्रे घेऊन सिंहावर आरूढ दाखविली जाते.

तर दक्षिण भारतात नवरात्रीमध्ये मित्र, नातेवाईक आणि शेजारच्यांना घरी वेगवेगळ्या बाहुल्या आणि छोटे पुतळे यांचे प्रदर्शन असलेला कुलू बघायला आमंत्रित केले जाते. उत्तर भारतात नवरात्री हा सणसाजरा करत असताना दृष्ट शक्तींवर, सुष्ट शक्तींचा विजय साजरा करण्यासाठी रावण आणि कुंभकर्ण यांच्या प्रतिमांचे दहन केले जातात. देवी माता तिची निर्मिती असलेल्या आपल्या जीवनातील सर्व रूपे सर्व कला-संगीत आणि ज्ञान या प्रति आपला परम आदर व्यक्त करण्यासाठी नऊ दिवस विशेष पूजा यज्ञ होऊन उपास ध्यान म्हणून गायन, नृत्य या सर्वांनी भरगच्च असतात.

समस्त मानवजातीला अज्ञान आणि सगळे दृष्ट प्रवृत्ती पासून वाचवणारी तारणहार रक्षण कर्ता म्हणून देवीला पूजले जाते. नवरात्री हा सण विविधतेत एकता निर्माण करून देणारा सण आहे. इथली प्रत्येक गोष्ट अनोखी आहे. मग ती भाषा असो आहार असो संस्कृती असो किंवा आपली वस्त्रे प्रावरणे देखील आपण देशाच्या कोणत्या भागात राहतो, त्यावर ती अवलंबून असते. प्रत्येक ठिकाणी नवरात्री उत्सव साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपापल्या प्रांतानुसार आहेत.

विदर्भात नवरात्रामध्ये आणखीन देवीचा एक प्रकार पाहायला मिळतो. तो म्हणजे भुलाबाई हा प्रकार आहे. भाद्रपद पौर्णिमेला शंकर पार्वतीच्या मुर्त्या बसून त्यांच्यासमोर शाळाकरी मुली टिपऱ्याच्या तालावर गाणी म्हणतात. शाळेतून मुली घरी आल्याबरोबर हातात टिपऱ्या घेऊन मैत्रिणींच्या घरोघरी जाण्याची त्यांची लगबग गंमतच आपल्याला पाहावीशी वाटते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी टिपूर चांदण्यात भूलाबाई मखरात बसवून त्यांची पूजा केली जाते. पंधरा वर्षांपूर्वी विदर्भात हे असेच घडत असे.

पण हल्ली शाळांच्या वेळा व क्लासेस यामधून मुलींना वेळ मिळेनासा झालेला आहे. आता केवळ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मुली भुलाबाई बसवत असतात. यामध्ये टिपऱ्याच्या तालावर वेगवेगळी गाणी म्हटली जातात. तसेच दररोज नवीन नवीन प्रसाद म्हणून भातकूल जिंकण्याची प्रथाही यामध्ये असते आणि प्रत्येकाच्या घरी मुली ह्या दररोज नवीन प्रसादाची निवड करत असतात. देवीला खिरापत ठेवले जाते आणि नंतर मुलींना हा प्रसाद वाटला जातो. नवरात्री सणाची अशीही गंमत पहायला मिळते.

नवरात्र उत्सवा निमित्त पौराणिक कथा:

नवरात्री या सणामध्ये माता दुर्गाचे नऊ रूपांची पूजा केली जाते. या बद्दल एक पौराणिक कथा आहे. देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला, म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव पडले आहे. तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते.

वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीत पुजली जाते. या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः असेच म्हटले जाते. तसेच “सर्व मंगल मांगल्ए शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते” अशीही तिची प्रार्थना केली जाते.

अशाप्रकारे नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने दरवर्षी पार पाडला जातो.

“तुम्हाला आमची माहिती नवरात्र उत्सवाबद्दल कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.