नरक चतुर्थी सणाची संपूर्ण माहिती Narak Chaturthi Information in Marathi

Narak Chaturthi Information in Marathi नरक चतुर्थी ही दिवाळीच्या नंतर येणारा सण असतो. नरक चतुर्थी या दिवशी सर्व लोक सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठतात व सुवासिक उटणे तसेच तेल लावून गरम पाण्याने आंघोळ करतात. म्हणजेच शरीरातील नरकरुपी सैतानाचा नाश आणि वाईट विचार नष्ट व्हावेत म्हणून देवीला प्रार्थना केली जाते.

Narak Chaturthi Information In Marathi

नरक चतुर्थी सणाची संपूर्ण माहिती Narak Chaturthi Information in Marathi

नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करतात. अभ्यंगस्नान झाल्यानंतर यमासाठी नरकात दीपदान करतात. आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृह हेच नरक आहे. त्यामुळे या स्वच्छता गृहाताच दीपदान करतात.

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्थी. नरकचतुर्थी हा दिवाळीच्या सणातील भाग आहे. अश्विन कृष्ण महिन्याच्या चौथ्या दिवशी नरक चतुर्थी येते. या दिवशी आपल्या शरीरातील नरक रुपी पाप वासनांचा नायनाट व्हावा व अहंकाराचे उच्चाटन व्हावे. यासाठी तसेच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होण्यासाठी आत्मज्योत प्रज्वलित केली जाते किंवा प्रकाशित केले जाते.

नरक चतुर्थी चे महत्व:

स्वर्ग आणि नर्क या दोन संकल्पना हिंदू धर्मात मानतात. म्हणून आयुष्य चांगल्या प्रकारे घालवले तर स्वर्ग मिळतो. पण वाईट वृत्ती जर केली, तर आपल्याला नरकात जावे लागते. अशी हिंदू धर्मातील लोकांची मान्यता आहे. म्हणून या नरकाच्या भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वत्र दिव्याची आरास करावी असे मानले जाते.

काही घरांमध्ये या दिवशी दीप प्रज्वलित करून वेगळ्या पणत्या लावल्या जातात. तसेच आणखी नरकचतुर्थीचे महत्व आपल्याला दिसते. की लोकांच्या मनातील भीती नष्ट व्हावी व सर्वांनी पापमुक्त रहावे. एकमेकांना सहाय्य करावे, ज्याप्रमाणे दिवे हे स्वतः जळतात व प्रकाश देतात. त्याचप्रमाणे आपणही दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. त्यामागे हा उद्देश आहे. ज्याप्रमाणे प्रकाश अंधाराला पळवून लावतो. त्याचप्रमाणे व्यक्ती अज्ञान, दुःख, दारिद्र्य दूर करण्यास इतर लोकांनी त्यांना मदत केली पाहिजे.

नरकचतुर्थी कशी साजरी करतात:

नरक चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी तेल आणि उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. आंघोळीनंतर पायाखाली करटुले किंवा चिरोटा नावाचे कडू फळ चिडण्याची पद्धत किंवा प्रथा असते. तर नरकासुराच्या वधाचे प्रतिक म्हणून ते मानले जाते. पहाटेचा अभ्यंगस्नान झाल्यानंतर नवीन वस्त्रे, दागिने परिधान करून देव दर्शन केले जाते. त्याच्यामुळे देवदर्शन करून आल्यानंतर फराळाचे पदार्थ खाल्ले जातात. रात्री दिव्यांची जगमगगाट असते. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते.

गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्येही काही ठिकाणी नरक चतुर्थीच्या दिवशी पोर्णिमेप्रमाणे हनुमान जयंती साजरी केली जाते. त्यामागची कथा सुद्धा आहे, की रामाचा राज्याभिषेक झाल्यावर अनेकांना भेटवस्तू दिल्या. सीतामाईच्या सूटकेस हनुमंताची खूप मदत झाल्याने तिने त्याला आपल्या गळ्यातील जड रत्नजडित हार दिला.

तेव्हा त्यातला प्रत्येक मणी फोडून त्यामध्ये राम नाही. म्हणून तो हार टाकून दिला तेव्हा तिने त्याला काय पाहिजे असे विचारले. तेव्हा त्याने सीतेला सर्वात प्रिय वस्तू मागितली. सितेने तिच्या कपाळावरच्या कुंकवाचा काही भाग काढून हनुमंताच्या कपाळावर लावला आणि त्याला आपला पुत्र मानले. तो दिवस नरक चतुर्थी होता.

अश्विन कृष्ण पक्ष चतुर्थी ला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासुर राक्षसाचा वध या दिवशी झाल्यामुळे हा दिवस साजरा केला जातो. यामागे एक कहाणी आहे. ती म्हणजे नरकासुर नावाचा असुर मानवांना खूप त्रास देत होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला.

मरताना नरकासुराने वर मागितला की आजच्या तिथीला मंगल स्नान करणाऱ्या नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने त्याला वर दिला त्यामुळे नरक चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची रीत पडलेली आहे. जे या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून लोक स्नान करत नाही. वर्षभर त्याच्या मागे दारिद्र्य आणि संकट यापासून त्याला मुक्ती मिळत नाही असे मानले जाते.

नरक चतुर्थी पौरानिक विषयी कथा:

नरक चतुर्थी विषयी एक पौराणिक कथा आपल्याला दिसून येते. नरकासुर नावाचा एक प्रसिद्ध असुर होता. ज्याला पृथ्वीच्या गर्भातून उत्पन्न विष्णू पुत्र म्हणून ओळखल्या जात होते. हा वराह अवतार वेळी जन्माला होता. तेव्हा विष्णूने पृथ्वीचा उद्धार केला तेव्हाच याचाही उद्धार झालाच. परंतु जेव्हा लंकापती रावणाचा वध झाला, तेव्हा पृथ्वीच्या गर्भातून नरकासुराचा जन्म झाला नरकासुराचा जन्म याच स्थानी झाला होता. जिथे जानकी म्हणजेच सीतेचा जन्म झाला.

त्यामुळे राजा जनक यांनी नरकासुर सोळा वर्षाचा होईपर्यंत त्याचे पालनपोषण केले. त्यानंतर पृथ्वी त्याला विष्णू जवळ घेऊन गेली आणि मग विष्णूने त्याला प्राग्ज्योपूर या राज्याचा राजा बनविले. नरकासुर हा मथुरेचा राजा कंस याचा असुर मित्र होता. विदर्भाची राजकुमारी माया हिच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळी भगवान विष्णूने त्याला एक दिव्य रथ दिला. काही दिवसांपर्यंत नरकासुर व्यवस्थितपणे राज्याचा कारभार सांभाळत होता.

पण बाणासुराच्या संगतीत पडून तो दृष्ट झाला. त्यामुळे वशिष्ठ यांनी नरकासुराला विष्णूच्या हातुन मारले जाण्याचा शाप दिला. या श्रापासून वाचण्यासाठी एकदा नरकासुराने कठोर तप करुन ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व अवैध या तत्त्वाचा म्हणजेच कुणाकडूनही त्याचा वध होणार नाही. असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले.

नरकासुराने अशा एकूण 16100 स्त्रियांना पळवून नेल्या व मणी पर्वतावर एक नगर व असून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्र देखील बळकावले होते. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव गंधर्व व मानवांना सह सर्वांनाच त्रास देत होता. अनेक गिरिदुर्ग आणि वेढलेले प्राग्ज्योपूर हे नगर त्याची राजधानी होती.

ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासूर वधाने देवादिकांना आणि प्रजेला आनंदित केले.

नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांची कुटुंबे आता स्वीकारणार नाही, हे जाणून कृष्णाने त्या 16100 कन्या सोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात. असं म्हणतात की, नरकासुराचा वध करतांना कृष्णाच्या शरीरावर त्याचे रक्ताचे शिंतोडे उडाले होते.

हेच रक्त साफ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेलाने स्नान केले होते. तेव्हापासूनच त्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा किंवा प्रथा सुरु झाली. नरकासुराच्या वधानंतर त्याची आई भूदेवी म्हणजेच पृथ्वी हीने घोषणा केली, की त्याचा मृत्यूवर शोक करू नये. तर त्याच्या मृत्यूला एखाद्या उत्सवाप्रमाणे आनंदाने साजरे करावे. नरक चतुर्दशी हा सण आपल्याला हा संदेश देतो, की या संपूर्ण समाजाचा चांगुलपणा कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वार्थापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतो.

“तुम्हाला आमची माहिती नरकचतुर्दशी विषयी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

नरक चतुर्दशीची कथा काय आहे?

भारतातील काही प्रदेशांमध्ये, हा दिवस महाकाली किंवा शक्तीच्या उपासनेसाठी दिला जातो कारण ते मानतात की या दिवशी नरकासुराचा वध कालीने केला होता. म्हणून नरक-चतुर्दशी म्हणून देखील संबोधले जाते, काली चौदस हा आळशीपणा आणि वाईट गोष्टींचा नाश करण्याचा दिवस आहे ज्यामुळे पृथ्वीवरील मानवी जीवनात नरक निर्माण होतो.

नरक चतुर्दशी आपण का साजरी करतो?

दिवाळीच्या (याला दीपावली असेही म्हणतात) या पाच दिवसांच्या सणाचा हा दुसरा दिवस आहे. या दिवशी कृष्ण आणि सत्यभामा यांनी असुर (राक्षस) नरकासुराचा वध केल्याचे हिंदू साहित्यात म्हटले आहे . हा दिवस पहाटे धार्मिक विधींनी साजरा केला जातो आणि त्यानंतर सण साजरा केला जातो.

नरक चतुर्दशीला पूजा कशी करायची?

नरक चतुर्दशीच्या दिवशी पूजेसाठी तेल, फुले आणि चंदन लागते . तीळ, तांदूळ, तूप आणि साखर यांचे मिश्रण प्रसाद म्हणून वाटले जाते. पूजेच्या दिवशी लोक लवकर उठून आंघोळ करतात. आंघोळीपूर्वी तिळाचे तेल लावल्यास ते शुभ असते.

नरक चतुर्दशी हा शुभ दिवस आहे का?

नरक चतुर्दशी हा एक शुभ दिवस आहे जो धनत्रयोदशीनंतर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येतो. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो कारण या दिवशी दुष्ट राक्षस नरकासुराचा भगवान कृष्ण, त्याची पत्नी सत्यभामा आणि देवी काली यांनी पराभव केला आणि त्याचा वध केला.

नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे?

नरक चतुर्दशीच्या दिवशी स्नान व स्नान करणे शुभ मानले जाते. छोट्या दिवाळीच्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घराच्या दारात यमदेवाच्या नावाचा दिवा लावला जातो.

Leave a Comment