नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi

Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामध्ये वसलेले हे नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य विविध प्रकारच्या जैवविविधतेने नटलेले हे अभयारण्य आहे. आज आपण याच अभयारण्याची माहिती बघणार आहोत. चला तर मग बघुया नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य ची माहिती.

Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi
Image Source :-  Google Image

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची संपूर्ण माहिती Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi

नांदूर मध्यमेश्वर हे अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये वसलेले आहे. नांदूर मध्यमेश्वर जलाशयाचा एक मोठा परिसर आहे. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ हे १००.१२ चौरस किलो मीटर आहे.

गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर इ.स. १९११ च्या सुमारास एक दगडी धरण किंवा बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे इथे जलाशयाच्या एक मोठा परिसर निर्माण झाला. आणि याच परिसरात इ.स. १९८६ मध्ये अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आणि आज आपण याच अभयारण्याला नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य असे म्हटले जाते.
नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्यात विविध पक्ष्यांचा संचार असल्याने अभयारण्याला पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते.

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यातील वनसंपदा :

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात विरळ सदाहरित जंगल आणि माळरानाचा परिसर आढळतो. या अभयारण्यात ४०० पेक्षा अधिक प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य पुरेसी वनसंपदा आढळल्याने येथे वन्यजीवन आणि विविध प्रकारचे पक्षी येथे आढळतात.

नांदूर-मध्यमेश्वर अभयारण्यातील प्राणी जीवन :

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात आपल्याला विविध वन्य जीवन बघायला मिळेल. त्यामध्ये कोल्हे, लांडगे, बिबटे, मुंगूस, उदमांजर, चौशिंगा, नीलगाय, हरीण इत्यादी वन्य प्राणी नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्यात आढळतात. तसेच सरपटणारे प्राण्यांमध्ये विविध प्रकारचे साप, धामण, अजगर येथे बघायला मिळतात.

नीलगाय :

नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्यात आढळणारा एक प्राणी म्हणजे नीलगाय आहे. नीलगाय हा प्राणी साधारणता घोड्याप्रमाणेच दिसतो. पूर्ण वाढ झालेली नीलगाय हे जमिनीपासून साधारणता ४ फुटापर्यंत उंच असते तर मादी नीलगाय ही ३ ते ३.५ फूट येवढी असते.

नीलगायचा रंग हा राखाडी असतो. त्याच्या पायाच्या भागावर पांढऱ्या रंगाचा पट्टा दिसतो. नर आणि मादी या दोघांच्या मानेवर काळया रंगाची केसांची आयाळ दिसते.
ह्या नीलगायांना गवताळ तसेच खुरट्या झाडा- झुडुपांत राहायला आवडते. झाडा- झुडुपांचा पाला, गवत इत्यादी खाद्य ह्या नीलगाय आवडीने खातात. नीलगायीची विशेषता म्हणजे या नीलगाय पाण्याशिवाय चार दिवस सहज राहू शकतात. नीलगाय हा प्राणी शक्तिवान, चपळ आणि वेगवान आहे. या नीलगाय प्राण्याची श्रवणशक्ती ही खूप चांगली नसते असे म्हणतात.

नीलगाय हा प्राणी नेहमी कळपाने राहतो. एका कळपात साधारणता १० ते १५ नीलगाय असतात. नीलगायीचा गर्भधारणेचा काळ हा सर्वसाधारणता ८ ते ९ महिने असतो. मादी नीलगायी एकाच वेळेस दोन पिलांना जन्म देते आणि त्यांचे संगोपन ही करते.

नांदुर मध्यमेश्वर अभयारण्यातील पक्षीजीवन :

नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्यात विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. त्यामध्ये खंड्या, गाय, बगळे, पाणकावळा, मुग्धबलाक, चित्रबलक, जांभळी, पाणकोंबडी, राखी बगळा, हळद कुंकू बदक असे पक्षी आढळतात.

नांदूर मध्यमेश्वरच्या जलाशयाच्या परिसरात जांभळी कोंबडी मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे या कोंबडीला नांदूर मध्यमेश्वराची राणी असे म्हणतात. तसेच येते रोहित, तलवार बदक, लालसरी, चतुरंग, सूरय कादंब, तुतारी, क्रौंच, करकोच, कुरल, कादंब, खंड्या, कमळपक्षी, पाणकोंबडी, असे विविध प्रकारचे पक्षी आपल्याला या नांदूर मध्यमेश्वरच्या अभयारण्यात आढळतात.

पर्यटन :

नांदूर मध्यमेश्वरच्या अभयारण्यात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येतात. नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी १०० चौरस किलो मीटरचा भाग हा संरक्षित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पक्ष्यांची शिकार करण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे येथे पक्ष्यांचा वास मोठ्या प्रमाणात आढळते.

या अभयारण्याच्या आसपासच्या परिसरात निसर्ग, विविध प्राणी आणि पक्ष्यांचा किलबिलाट असल्याने हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. आणि नांदूर मध्यमेश्वर हे पर्यटनाचे मुख्य केंद्र बनले आहे. दिवसें दिवस या अभयारण्याच्या ठिकाणचे सौंदर्य वाढताना दिसत आहे. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये नांदूर मध्यमेश्वर चे सौंदर्य हे डोळ्यात साठवण्या सारखे दिसते. विविध ठिकाणचे स्थलांतरित पक्षी या ठिकाणी येतात. त्यामुळे ह्या अभयारण्याच्या आसपासचा निसर्ग हा पर्यटनाचा एक महत्त्वाचे भाग बनला आहे.

नांदुर मध्यमेश्वरचे सौंदर्य पाहण्यासाठी सप्टेंबर ते मार्च ह्या महिन्याचा कालावधी उत्तम आहे.

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यास कसे जावे :-

नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्यात जाण्यासाठी नाशिक पासून सव्वा तास लागतो, सिन्नर पासुन पाऊण तास तर निफाड पासून वीस मिनिटे लागतात. नांदुर मध्यमेश्वर या अभयारण्यास जाण्यासाठी खालील मार्गाचा आपण उपयोग करू शकतो.

१. जवळचे विमानतळ :

नांदुर मध्यमेश्वर अभयारण्यापासून जवळचे विमानतळ हे औरंगाबाद आणि मुंबई या ठिकाणी आहे ते अनुक्रमे १८० ते २२५ किलो मीटरवर आहे.

२. जवळचे रेल्वे स्थानक :

नांदुर मध्यमेश्वर अभयारण्यापासून जवळचे रेल्वे स्थानक हे निफाड या ठिकाणी आहे. ते या अभयारण्यापासून सुमारे १२ किलो मीटरच्या अंतरावर आहे.

३. रस्त्याचा मार्ग :

नांदुर मध्यमेश्वर या अभयारण्यापासून जवळचे शहर हे निफाड १२ किलो मीटरच्या अंतरावर आहे. सिग्नर हे २० किलो मीटरच्या अंतरावर आहे आणि नाशिक ५० किलो मीटर.

FAQ’s On Nandur Madhyameshwar Sanctuary Information In Marathi

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत?

नाशिक जिल्ह्यात

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याचे क्षेत्रफळ किती आहेत?

१००.१२ चौरस किलो मीटर

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment