जाणून घ्या नागपंचमी सणाची संपूर्ण माहिती Nag Panchami Information In Marathi

Nag Panchami Information In Marathi नागपंचमी हा सण देखील इतर सण प्रमाणे हिंदु लोकांमधे साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा प्रचलित आहेत. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.

Nag Panchami Information In Marathi

जाणून घ्या नागपंचमी सणाची संपूर्ण माहिती Nag Panchami Information In Marathi

कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचलित आली असे मानले जाते.  दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा गौतमी संगमावर स्नान करतात.

नागपंचमी साजरी करण्यामागे आणखी एक कारण असू शकते. की नागदेवता हा शिव शंकराच्या गळ्यातील दागिना आहे किंवा शेतामध्ये शेतकरी काम करत असताना त्याचा सामना नागदेवतेशी कधीनाकधी होतोच. म्हणून नागदेवते पासून रक्षण व्हावे, यासाठी शेतकरी त्यांची पूजा, अर्चना करत असतात. असे म्हटले जाते की, एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिनीची तीन पिले मृत्युमुखी पडली त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला.

मात्र तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीच्या दिवशी सणाला गोडधोड पदार्थ करतात. तसेच नागदेवतेला अर्पण करण्यासाठी शेतकरी पूजा करत असतो. या दिवशी शेतामध्ये कोणत्याही प्रकारची कामे केली जात नाही. तसेच चुलीवर तवा आणि कोणत्याही प्रकारच्या भाज्या चिरल्या जात नाहीत. अशा प्रकारच्या आजही त्या गोष्टींचे पालन केले जाते. श्रद्धाळू लोक नागदेवतेला लाह्या व दुधाचा प्रसाद अर्पण करतात.

सापाची शेषनाग, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया, तक्षक, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय, असे वेगवेगळे नावे आहेत. या सर्वांची पूजा नागपंचमीला केली जाते.

नागपंचमीचे महत्त्व:

श्रावण शुद्ध पंचमीला भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले होते. त्या दिवसापासून नागपूजा करण्याची प्रथा प्रचलित झाली.

भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते.  नाग म्हणजे फणा असलेला साप होय. यामध्ये पाच फण असणारा साप सर्वश्रेष्ठ मानला जातो. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते. नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याची पूजा करण्यास सुरुवात केली.

या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो, अशी पद्धती भारतात रूढ आहे.  नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते. पूर्वी नागपंचमीच्या सण येण्याआधीच आठ-दहा दिवस गल्लीत सर्व लहान-मोठे मुलं, स्त्रिया एकत्र येवून फेर धरून गाणी म्हणायच्या. झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळं करायच्या. नागपंचमीच्या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्माफुगडी सारखे विद्या खेळ खेळत होते.

नागपंचमी कशी साजरी करतात:

नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करताना महिला या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते दूध- लाह्या ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.

स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. श्रावण महिन्यात नागपंचमी हा पहिला सण आहे. श्रावण मासात विविध सण येतात त्यापैकी नागपंचमी यानंतर रक्षाबंधन, गोपाळकाला, नारळी पोर्णिमा हे सण हिंदू धर्मानुसार येतात. महाराष्ट्रात नागपंचमी सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. नागपंचमीला नवविवाहित मुली माहेरी जाण्याची परंपरा आहे. श्रावण मासातील खेळ खेळण्याची परंपरा यात सणाला आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.

नागपंचमी विषयी पौराणिक कथा:

एकदा एक शेतकरी जमीन नांगरत होता. ती जमीन नांगरताना नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला आणि बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेर अन्नाच्या शोधत गेलेल्या नागिण परत आल्यानंतर आपली पिल्ले मेल्याचे कळले आणि तिने रागाच्या भरात त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको-मुलांसह आपला दंश मारून मारले. शेतकऱ्यावर बदला घेण्यासाठी नागिणीने शेतकऱ्याच्या लग्न झालेल्या मुलीलाही मारण्याची शपथ घेतली.

शेवटी शेतकऱ्याच्या मुलीला दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात मग्न होती. मनोभावे पूजा करून तिने दूध, लाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखवत होती. तिची मनोभावे भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध पिली आणि तिने त्या मुलीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिल आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.

नागपंचमी विषयी आणखी एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. सत्येश्वरी नावाची एक कनिष्ट देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता, त्यामुळे तिला भावाच खूप दुःख झालं होतं. त्या शोकात सत्येश्‍वरीने अन्नग्रहण केले नाही. सत्यश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी स्वतः करीन. त्यामुळेच नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

कालसर्प आणि सर्प दोष असणाऱ्यांनी नागदेवतेची पूजा केल्यास प्रभाव दूर होतो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने कुटुंबात सर्पभय राहत नाही.

असे भविष्य पुराणात सांगितले गेलेली आहे. पंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या शेणापासून नागाची मूर्ती तयार करून त्यावर दूर्वा आणि शेंदूर लावत चिटकावे. यामुळे सर्पभय राहत नाही. हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून हिंदू धर्मामध्ये किंवा भारतात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

“तुम्हाला आमची नागपंचमी विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.