एम.एस.सी.आय.टी कोर्सची संपूर्ण माहिती MS-CIT Course Information In Marathi

MS-CIT Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या काळात लॅपटॉप फोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी झाल्या आहेत. इंटरनेटमुळे आजकाल सर्व काही घरबसल्या होऊ शकते त्यामुळे आजच्या कम्प्युटरच्या युगात कम्प्युटर येणे हे फार महत्त्वाचे आहे. व आजकाल वर्चुअल एज्युकेशन किंवा ऑनलाइन मीटिंग यांना सर्वात जास्त प्राधान्य मिळाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. बरेच विद्यार्थी कंप्युटर क्षेत्राकडे आकर्षित असल्याचे आपण पाहतो. त्या सर्वांसाठी एम.एस. सी. आय. टी हा कोर्स अगदी कामाचा ठरेल.

Ms-Cit Course Information In Marathi

एम.एस.सी.आय.टी कोर्सची संपूर्ण माहिती MS-CIT Course Information In Marathi

आज आपण एम.एस.सी.आय.टी ह्या कोर्स बदल माहिती पाहणार आहोत.एम.एस.सी.आय.टी चा फुल फॉर्म ‘महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ (MS-CIT) असा आहे. एम.एस.सी.आय.टी हा सर्वात प्रसिद्ध असा कम्प्युटर बदल माहिती देणारा कोर्स आहे.

हा कोर्स ज्यांना संगणक शिकायचा असेल म्हणजे बिगीनर साठी आहे. जो बरेचसे विद्यार्थी दहावी किंवा बारावी नंतर घेतात. हा एक सर्टिफिकेट कोर्स आहे व तो महाराष्ट्र शासना अंतर्गत घेतला जातो. काही लोक व विद्यार्थी हा कोर्स केल्यानंतर नोकरी देखील करतात व हे सर्टिफिकेट देखील फार फायद्याचे असते.

एम.एस.सी.आय.टी या कोर्सची सुरुवात 2001 साली ‘महाराष्ट्र नॉलेज कौन्सिल लिमिटेड’ (MKCL) द्वारे झाली. आयटी क्षेत्रातील ज्ञान व त्या क्षेत्राबद्दल लोकांना रुची वाटावी व लोकांना संगणकाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी हा कोर्स फार फायद्याचा आहे.
आयटी क्षेत्र जास्त व्यापक असल्याचे आपण पाहतो व या कोर्स पुढे जवळ जवळ सात दशलक्ष काहून अधिक लोक आयटी या क्षेत्रात साक्षर झाल्याचे आपण पाहतो.

एम.एस.सी.आय.टी या कोर्स अभ्यासक्रम पाहूया

एम.एस.सी.आय.टी ह्या कोर्स मध्ये तुम्हाला खाली दिलेले विषय शिकवले जातात-

• इंट्रोडक्शन टू कम्प्युटर अँड स्मार्टफोन –

या मध्ये आपल्याला कम्प्युटर चे बेसिक फंकशन शिकवले जातात जसे की पेंट, नोट्स, वर्डपॅड, नोटपॅड,विकिपीडिया या गोष्टींचा वापर करणे शीकवले जाते.

• कम्प्युटर अंड व्हॉइस टायपिंग –

कम्प्युटर टायपिंग व गूगल वॉइस टायपिंग ह्याचे शिक्षण देखील दिले जाते. टायपिंग स्पीड देखील वाढण्याचे शिक्षण दिले जाते.

• विंडोज टेन –

ह्या कोर्स चे सर्वात बेसिक म्हणजे विंडोज वापरण्याचे शिक्षण ही सर्वात आधी दिले जाते. ह्यामध्ये तुम्हाला विंडोज म्हणजेच तुमचे सॉफ्टवेअर कसे वापरावे व ते कसे मॅनेज करावे ही शिकवले जाते.

• क्रोम / इंटरनेट –

ह्या कोर्स द्वारे तुम्हाला सर्च इंजिन म्हणजेच गूगल क्रोम, ओपेरा ब्राऊजर, मोझिला फायर फॉक्स, ब्रेव ह्या सर्वांबदल माहिती दिली जाते व ते कसे वापरायचे हे देखील शिकवले जाते.

• एम.एस वर्ड –

एम.एस वर्ड ने आजकाल सर्वात जास्त प्रसिद्धी मिळावल्याच आपल्याला पाहायला मिळते.ऑनलाइन शिक्षण चालू झाल्यापसून एम.एस वर्ड ही बऱ्याच कामांसाठी वापरले गेले. ह्या कोर्स द्वारे एम.एस वर्ड यांचे विविध वैशिष्ट्य जसे की हेडर, फूटर, टेबल, चार्टस, ही सर्व शिकवले जाते.

• एम.एस एक्सेल –

एम.एस एक्सेल चा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या हिशोबासाठी व जवळ जवळ मोठ मोठ्या कंपनी रेकॉर्डस ठेवण्यासाठी वापरतात. ह्यामध्ये तुम्हाला ते कसे मेंटेन करावे हे संगितले जाते.

• एम.एस पावर पॉइंट –

एम.एस पावर पॉइंट ही आपण प्रेझेंटेशन करण्यासाठी वापरतो. ह्यामध्ये तुम्हाला स्लाइडस, डिझाईन, फोन्त्स, ट्रांजिशन, अॅनिमेशन, क्लिप आर्ट ही सर्व कसे वापरवे ही शिकवले जाते.

• एम.एस आउटलूक / जीमेल –

आजकाल जीमेल अकाऊंट नसल्यास बऱ्याचदा आपली कामे अडकून राहतात. ह्यामध्ये तुम्हाला जीमेल ची वैशिष्ट्य म्हणजेच इनबॉक्स,सीसी ,बीसीसी ही सर्व सांगितले जाते.

• ऑफिस 365 –

ऑफिस 365 हा एक क्लाऊड कम्प्यूटिंग अॅप्लिकेशन आहे जो आपल्याला आपला बिझनेस चालवण्यात व त्याची जाहिरात करण्यात मदत करते.ही आपल्याला फ्री क्लाऊड सर्विसेस देते ता आपल्याला डिवाइस मॅनेजमेंट देखील शिकवले जाते.

• जी सूट –

जी सूट हा तुम्हाला तुमचं व्यवसाय ,व्यावसायिक ईमेल आयडी ,तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स, मीटिंग्स, फाइलस हे सर्व तुमहाला एका पूर्ण उत्पादक अॅप्स च्या सेट द्वारे तुमच्यापर्यंत पोहचवते.

• ५० इम्पॉर्टंट मोबाईल ॲप.

• कोडींग-

जर तुम्हाला आयटी क्षेत्रात तुमचे करियर करायचे असेल तर कोडिंग शिकणे हे फार महत्वाचे आहे. एम.एस.सी.आय.टी. ह्या कोर्स मध्ये तुम्हाला C+ लॅंगवेज देखील शिकवली जाते जसे की जावा ह्या भाषेचे बसिक्स तुम्हाला शिकवले जाते.

एम. एस. सी. आय. टी या कोर्स साठी लागणारी पात्रता.

एम.एस.सी.आय.टी हा कोर्स करण्यासाठी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण असावे लागते किंवा दहावी व बारावी उत्तीर्ण असता किंवा पदवीधर असाल तरी हा कोर्स करता येतो. एमएससीआयटी हा कोर्स करण्यासाठी वयाची अट व नियम काहीही नसते. आयटी या क्षेत्रात आपले करिअर घडवायचे असल्यास हा कोर्स फार महत्त्वाचा ठरेल.

एम.एस.सी.आय.टी या कोर्सचा कालावधी

एम.एस.सी.आय.टी हा कोर्स साधारणपणे तीन ते चार महिन्यांमध्ये पूर्ण होतो. तुम्ही कुठली अकॅडमी व कोचिंग क्लास लावता यावर देखील या कोर्सचा कालावधी असतो. जर तुम्ही दररोज दोन ते तीन तास कम्प्युटर वापरत असाल तर तुमचा हा कोर्स तीन महिन्यांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एम.एस.सी.आय.टी या कोर्स साठी किती फी असते

या कोर्स ची साधारण फी ही दोन ते चार हजार एवढी असते मात्र तुम्ही एखाद्या नामांकित किंवा प्रसिद्ध अकॅडमी मध्ये हा कोर्स करायचे ठरवल्यास त्याची फी ही सहा हजारापर्यंत असते.

एम.एस.सी.आय.टी हा कोर्स केल्यानंतर कुठले जॉब मिळू शकतात.

  • बँकिंग क्षेत्रात नोकरी
  • ओ सी आर प्रोग्रामर
  • आयटी कौन्सिलर
  • डेटा अनालीतिक्स
  • डेटा ऑपरेटर

पगार

संगणक शिकल्याने तुम्ही घरबसल्या देखील पैसे कमावू शकता. ऑनलाइन मार्केटिंगच्या बऱ्याच संधी उपलब्ध होतात व ॲमेझॉन असोसिएट्स,गुगल एड्स, व ऑनलाइन शॉपिंग द्वारे जसे की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो याद्वारे देखील तुम्ही तुमचे प्रोडक्टस जगभर प्रसारित करू शकता. या द्वारे देखील आपण बरेच पैसे कमवू शकतो असेच बऱ्याच लोकांनी आतापर्यंत लाखो रुपये घरबसल्या कमवले आहेत.

एम.एस.सी.आय.टी हा कोर्स आपल्याला थेरी व प्रॅक्टिकल नॉलेज देतो.या कोर्स मध्ये आपल्याला ई-लर्निंग बेस्ड सेल्फ लर्निंग कोर्स थ्रू MKCL’s ई-लर्निंग रिवॉल्युशन फॉर ऑल हयाद्वारे शिकवले जाते.

एम.एस.सी.आय.टी ह्या कोर्स बद्दल काही तथ्य-

  • एम. एस. सी. आय. टी चा फुल फॉर्म महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असा आहे.
  • एम.एस.सी.आय.टी हा सर्वात प्रसिद्ध असा कम्प्युटर बदल माहिती देणारा कोर्स आहे.
  • एम.एस.सी.आय.टी या कोर्सची सुरुवात 2001 साली ‘महाराष्ट्र नॉलेज कौन्सिल लिमिटेड’ या संस्थे (MKCL) द्वारे झाली.
  • हा एक सर्टिफिकेट कोर्स आहे व तो महाराष्ट्र शासना अंतर्गत घेतला जातो. या कोर्स ची साधारण फी ही दोन ते चार हजार एवढी असते,
  • एम.एस.सी.आय.टी हा कोर्स करण्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश परीक्षा घेतली जात नाही.

FAQ’s :-

एम. एस. सी. आय. टी चे फुल फॉर्म काय आहे ?

एम. एस. सी. आय. टी चा फुल फॉर्म ‘महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ असा आहे.

एम. एस. सी. आय. टी चा उपयोग काय आहे ?

एम एस सी आय टी हा कोर्स हा संगणक शिकवण्यासाठी घेतला जातो. व तुम्हाला जर आयटी क्षेत्रात रुचि असेल तर हा कोर्स तुम्हाला फार फायद्याचा ठरू शकतो. व हा कोर्स केल्यानंतर तुम्ही जॉब देखील करू शकता.

एम. एस. सी. आय. टी हा कोर्स करण्यासाठी काय पात्रता हवी ?

एम. एस. सी. आय. टी हा कोर्स करण्यासाठी आपले माध्यमिक शिक्षण किंवा अकरावी व बारावी उत्तीर्ण असावी लागते या कोर्ससाठी कुठलीही वयाची अट व नियम काहीही नसते. तुम्ही पदवीधर असाल तरी तुम्ही हा कोर्स करू शकता.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment