बुध ग्रहाची संपूर्ण माहिती Mercury Planet Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Mercury Planet Information In Marathi लहानपणी भूगोलच्या पुस्तकामध्ये आपण अनेक ग्रहांची माहिती घेतलेली आहे. ज्यामध्ये आपण एक गोष्ट बघितली असेल ती म्हणजे बुध हा ग्रह. सूर्यापासून सर्वात जवळ असलेला हा ग्रह म्हणजे बुध ग्रह. मित्रांनो, वस्तुमानाच्या दृष्टीने आठवा असलेला हा ग्रह पृथ्वीच्या केवळ एक चतुर्यांशी इतक्याच गुरुत्वाकर्षणाचा आहे. याला कुठलाही उपग्रह नसून तो आपले सूर्याभोवतीचे परिभ्रमण केवळ ८८ दिवसातच पूर्ण करतो, जो एक सर्वात वेगवान कालावधी आहे.

Mercury Planet Information In Marathi

बुध ग्रहाची संपूर्ण माहिती Mercury Planet Information In Marathi

बुध या ग्रहाचा व्यास सुमारे ४८८० किलोमीटर असून, हा आकार गुरुच्या ग्यानीमिड आणि शनीच्या टायटन या दोन्हीही उपग्रहांपेक्षा लहान आहे. बुध हा ग्रह सूर्याच्या खूप जवळ असल्यामुळे यान पाठवून त्याचा अभ्यास करणे खरंच कठीण आहे. मित्रांनो तुम्हाला बुध ग्रह उघड्या डोळ्यांनी देखील दिसू शकतो, त्याकरिता सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वीचे दोन तास उत्तम समजले जातात.

आजच्या भागामध्ये आपण सूर्यमालेतील सर्वात पहिल्या आणि सूर्यापासून जवळच्या असलेल्या बुध या ग्रहाबद्दल माहिती घेणार आहोत…

नावबुध
प्रकारग्रह
सुर्यापासून अंतर५८ दशलक्ष किलोमीटर
व्यास४८८० किमी
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ७४.८ दशलक्ष चौरस किलोमीटर
वस्तुमान३.२८५×१०^२३ किलोग्राम
वैशिष्ट्य सूर्यमालेतील सर्वात लहान आणि सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह

मित्रांनो, सूर्यापासून अतिशय जवळ असलेल्या बुध या ग्रहावर पृथ्वीप्रमाणे कुठलेही ऋतू आढळून येत नाही. तो सूर्याभोवती सर्वात वेगवान पद्धतीने अर्थात केवळ ८८ दिवसांमध्ये परिभ्रमण पूर्ण करत असतो. तो दोन वेळा परिभ्रमण करताना स्वतःभोवती तीन वेळेस फिरत असतो.

सूर्यमालेतील चार पार्थिव ग्रहांमध्ये बुध या ग्रहाचा समावेश होतो, जो पृथ्वीप्रमाणे खडकाळ बनलेला आहे. ४८८० किलोमीटर इतका व्यास असलेला हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह म्हणून ओळखला तर जातोच, शिवाय तो सुमारे ७०% केवळ पारा या विषारी धातूपासून बनलेला आहे. आणि उर्वरित ३० टक्के भाग हा सिलिकेट पासून बनलेला आहे. बुध हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च घनता असलेला ग्रह असून, बुध या ग्रहावर पृथ्वीपैकी केवळ एक चतुर्थांश इतकीच गुरुत्वाकर्षण शक्ती आढळून येते.

बुध या ग्रहाचा प्रवास:

मित्रांनो, बुध या ग्रहाला इंग्रजी मध्ये मर्क्युरी असे नाव आहे. कारण या ग्रहावर फार मोठ्या प्रमाणात पारा हा धातू आढळून येतो. त्याचे प्रमाण सुमारे ७० टक्के इतके आहे. सुमात्रण लोक सुमारे पाच हजार वर्षांपासून या ग्रहाला ओळखत होते, आणि या ग्रहाच्या अस्तित्वाबद्दल इसवी सन पूर्व ५०० वर्षांपूर्वी ग्रीक खगोलशास्त्रज्ञांनी देखील पाठिंबा दर्शवला होता.

बुध या ग्रहाला रोमन देवता टॅक्सस याच्या नावावरून नाव देण्यात आलेले आहे, असे सांगितले जाते. बुध या ग्रहाला भारतामध्ये देखील धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले असून, सर्वप्रथम गॅलिलिओ गॅलिली या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी दुर्बीण द्वारे बुध ग्रह पाहिला होता.

बुध या ग्रहाचा आकार व सूर्यापासूनचे अंतर:

मित्रांनो हा ग्रह सर्वात लहान ग्रह आहे हे आपल्याला माहिती आहे जो २४४० किलोमीटर त्रिज्येचा किंवा ४८८० किलोमीटर व्यासाचा म्हणून ओळखला जातो. तसेच तो सूर्यापासून अगदी जवळ आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास पृथ्वीवर पोहोचण्यास आठ मिनिटे लागणारा सूर्यप्रकाश बुध या ग्रहावर केवळ तीन मिनिटे आणि दोन सेकंदांमध्येच पोहोचतो. आकाराने हा ग्रह आपल्या चंद्रापासून काहीसाच मोठा आहे.

बुध या ग्रहावरील वातावरण:

मित्रांनो, सूर्याच्या अगदी जवळ असल्यामुळे हा ग्रह उष्ण आहे, मात्र रात्रीच्या वेळी तो प्रचंड थंड होतो. या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती देखील फारच कमी असल्यामुळे गरम होण्याचे प्रमाण वाढते.

मूळ म्हणजे या बुध ग्रहावर वातावरण उपस्थित नाही, त्यामुळे तिथे पाऊस, वारा यांसारख्या नैसर्गिक घटना घडत नाहीत. शिवाय तेथे मानवी जीवन देखील शक्य नाही. बुध या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान किमान -१८० अंश सेल्सिअस तर कमाल ४३० अंश सेल्सिअस इतके असते, जे रात्री व दिवसा बदलत असते.

बुध या ग्रहाची परिभ्रमण कक्षा आणि वेळ:

मित्रांनो, बुध हा ग्रह सूर्याभोवती आपल्या अंडगोलाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतो, आणि यादरम्यान तो ४७ दशलक्ष किलोमीटरचे अंतर कापत असतो. या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी ८८ दिवस इतका वेळ लागत असल्यामुळे, त्याचा प्रतिसेकंद वेग ४७ किलोमीटर किंवा २९ मैल इतका समजला जातो. आणि याबरोबरच तो सूर्यमालेतील सर्वात वेगवानगृह देखील ठरतो.

सूर्याभोवती फिरत असतानाच बुध हा ग्रह स्वतःभोवती देखील फिरत असतो, मात्र त्याचा वेग अतिशय कमी असतो. त्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी सुमारे ५९ दिवस लागतात. म्हणजेच ज्यावेळी त्याच्या सूर्याभोवतीच्या दोन प्रदक्षिणा पूर्ण होतात, त्यावेळी स्वतःभोवती केवळ तीनच वेळा तो फिरलेला असतो. बुध या ग्रहाचा अक्ष हा केवळ दोन अंशांनीच झुकलेला आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, आपली सूर्यमाला अनेक ग्रहांपासून बनलेली असून, त्याचा केंद्र हा सूर्य समजला जातो. अनेक ग्रह या सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. त्यांचा आकार लहान किंवा मोठा असा असतो. आजच्या भागामध्ये आपण याच सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रहाबद्दल अर्थात बुध या ग्रहाबद्दल माहिती बघितली.

ज्यामध्ये तुम्हाला बुध ग्रहाच्या संबंधित महत्त्वाची माहिती, त्याचा इतिहास, त्याचा आकार, सूर्यापासूनचे अंतर, त्यावरील वातावरण, त्याचे परिभ्रमण कालावधी आणि परिभ्रमण कक्षा, तसेच त्याची रासायनिक रचना कशी आहे, तो केव्हा अस्तित्वात आला, त्याचा पृष्ठभाग कसा आहे, आणि इतरही माहिती पाहिली. सोबतच विविध प्रश्नोत्तरे देखील बघितलेली आहेत.

FAQ

बुध या ग्रहाचा रंग कसा आहे?

मित्रांनो, सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहांना विशेष असा रंग प्राप्त झालेला आहे. जसे की शुक्र हा ग्रह मोत्यासारखा पांढराशुभ्र दिसतो, तर आपली पृथ्वी निळीभोर दिसते. मंगळावर गडद लाल रंगाचे सावट आहे, त्याचप्रमाणे बुध हा ग्रह देखील स्लेट ग्रे अर्थात पाटी सारखा करड्या रंगाचा आहे.

बुध या ग्रहाचे वैशिष्ट्य काय सांगता येईल?

मित्रांनो, बुध हा ग्रह सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह आहे, हे आपल्याला माहितीच आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ग्रहावरील वर्ष सर्वात लहान असते जे ८८ दिवसांचे आहे. अर्थात बुध हा ग्रह सूर्याला केवळ ८८ दिवसातच फेरी मारतो.

पृथ्वीशी तुलनाकरता बुध या ग्रहाचे काय वेगळेपण सांगता येईल?

मित्रांनो, बुध हा ग्रह सूर्यमालेपासून सर्वात जवळचा असला तरी देखील तो आकाराने देखील लहान आहे. त्याचा आकार लहान म्हणजे किती तर पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या चंद्रापेक्षा तो किंचितसा मोठा आहे, मात्र सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या दोन उपग्रहापेक्षा देखील तो लहान आहे. हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असला तरी देखील तो उष्ण ग्रह नाही.

बुध या ग्रहाचा पृष्ठभाग कोणत्या गोष्टींनी भरलेला आहे?

मित्रांनो, बुध या ग्रहाचा पृष्ठभाग काही अंशी आपल्या चंद्राप्रमाणेच आहे, जेथे अनेक उल्कापात आणि धूमकेतू यांच्या टकरा नेहमी चाललेल्या असतात.

बुध या ग्रहाच्या तापमानाबद्दल काय सांगता येईल?

मित्रांनो, बुध या ग्रहाची दैनंदिन तापमान कक्षा अतिशय मोठी आहे, म्हणजे दिवसा तब्बल ४३० अंश सेल्सिअस तापमान असणारा हा ग्रह रात्री वजा -१८० अंश सेल्सिअस पर्यंत देखील खाली जाऊ शकतो. याचे कारण म्हणजे पृथ्वीप्रमाणे बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर उष्णतेचे नियंत्रण करण्यासाठी वातावरण उपलब्ध नाही.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बुध या ग्रहाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवण्याबरोबरच, तुम्ही तुमच्या जवळील इतर माहिती देखील आमच्यासोबत शेअर करा. आणि ही माहिती इतरांना वाचायला मिळावी म्हणून त्यांच्यापर्यंत ही माहिती देखील शेअर करा.

 धन्यवाद…

Leave a Comment