Meesho अप्लिकेशनची संपूर्ण माहिती Meesho Application Information In Marathi

Meesho Application Information In Marathi मित्रानो Meesho हे Dropshipping साठीच अप्लिकेशनचा आहे. Meesho अप्लिकेशनचा वापर करून आपण आपल्यासाठी विविध वस्तू स्वस्त दरात शॉपिंग करू शकतो तसेच ह्या  एप्लीकेशन चा वापर करून आपण दर महिन्याला घरबसल्या तीस ते चाळीस हजार कमवू शकतो. Meesho या अप्लिकेशनचा वापर आज भरपूर resellers करत आहेत.

Meesho Application Information In Marathi

Meesho अप्लिकेशनची संपूर्ण माहिती Meesho Application Information In Marathi

Meesho application बद्दल माहिती आणि Meesho application  कसे वापरावे?

Meesho एप्लीकेशन वर  विक्रेता आपल्या वस्तू विकायला ठेवतो,  व त्यासाठी त्या विक्रेत्याने एक किंमत ठेवलेली असते, आपण जेव्हा Meesho वर  ठेवलेली त्या वस्तूना विक्रेत्यांनी ठेवलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीने विकतो,  तेव्हा  ते विक्रीत्यांनी ठेवलेल्या पैशापेक्षा वरचे असणारे पैसे आपल्याला कमिशन म्हणून Meesho कडून मिळतात.

अशाप्रकारे आपण Meesho वरील वस्तू विकून पैसे कमवू शकतो. यामध्ये आपल्याला फक्त वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवावी लागते बाकी सर्व काम Meesho करते जसे की वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवणे, त्याच्याकडून पैसे मिळवणे इत्यादी.

Meesho  वर Dropshipping  करण्याचे एक फायदा आहे की यात आपल्याला आपले प्रॉडक्ट असण्याची गरज लागत नाही,  त्याचप्रमाणे वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास असे काहीच काम आपल्याला करायला लागत नाही.  चला तर मग माहिती करून घेऊया कि meesho एप्लीकेशन कसे वापरावे.

Meesho एप्लीकेशन कसे सुरु करावे ?

मित्रहो Meesho हे मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये उपलब्ध आहे त्यामुळे जर तुम्ही अँड्रॉइड किंवा IOS  वापरकर्ते असाल तर आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या ऍप्लिकेशन स्टोर ला भेट द्या व तेथे जाऊन Meesho या नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा व नंतर ते अप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करा.

Meesho हे ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यांनतर एक महत्त्वाचे काम करावे लागते ते म्हणजे Meesho वर आपल्याला अकाऊंट तयार करावे लागते.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की Meesho  वर अकाउंट कसे तयार करायचे तर पुढे दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील इन्स्टॉल केलेले Meesho  हे एप्लीकेशन उघडा.
  2. Meesho हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुमच्या समोर Sign up for free असे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  3. Sign up for free  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला Meesho कडून मेसेज पाठविण्याचे आणि वाचल्याबद्दल परवानगी विचारले जाईल,  तेथे Allow  या पर्यायावर क्लिक करा.
  4. Meesho  कडून विचारल्या गेलेल्या परवानगीला होकार दिल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे मोबाईल नंबर विचारले जाईल तेथे तुमचे दहा अंकी मोबाईल नंबर टाईप करा.
  5. तुमचे मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर तेचे खाली असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.
  6. Next  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर Meesho  कडून  मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करण्यासाठी ओटीपी पाठवला जाईल,  तेथे मोबाईल मधील मॅसेजेस मधून तो ओटीपी पाहून Meesho ॲप्लिकेशन मध्ये टाईप करा.
  7. ओटीपी टाईप केल्यानंतर Continue या पर्यायावर क्लिक करा, जर तुम्हाला  ओटीपी नाही आले असल्यास,  तुम्ही तेथे खाली असणाऱ्या I didn’t get code या पर्यायावर क्लिक करून पुन्हा ओटीपी पाठवण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकता, व आलेला  ओटीपी टाकून Continue  या पर्यायावर क्लिक करा
  8. Continue या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर Meesho  कडून व्हेरिफाईड असे दाखवण्यात येईल व तुम्हाला एप्लीकेशन साठी कोणती भाषा वापरायची आहे याबाबतीत विचारण्यात येईल तेथे तुम्ही तुम्हाला हवी असणारी भाषा निवडा व खाली असणाऱ्या Continue  या पर्यायावर क्लिक करा.
  9. Continue  या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या समोर Meesho  एप्लीकेशन कसे वापरावे याबाबतीत Meesho कडून एक व्हिडिओ समोर  येईल तेथे तुम्ही तो पाहू शकता किंवा खाली असलेल्या No, I already know how Meesho works या पर्यायावर क्लिक करून पुढे जाऊ शकता.
  10. तुमच्यासमोर Meesho कडून तुमच्या  मोबाईल मधील कॉन्टॅक्टस ला पाहण्याची परमिशन विचारले जाईल तेथे तुम्ही हवे असल्यास allow करू शकता किंवा denny करू शकता व नंतर खाली असणाऱ्या कंटिन्यू पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो आपण Meesho ॲप्लिकेशन सुरू करून त्यावर आपले अकाऊंट तयार करू शकतो.

Meesho वरील प्रोडक्स कशा शेअर कराव्यात ?

मित्रहो आपल्याला Meesho वरील वस्तू विकण्यासाठी त्यावरील प्रॉडक्ट वेगवेगळ्या ठिकाणी शेअर करावी लागते त्यासाठी आपण Meesho वरील वस्तू विविध सोशल मीडिया वर शेअर करू शकतो,  यासाठी Meesho मध्ये प्रॉडक्ट ची माहिती आणि त्याचे फोटो शेअर करण्यासाठी फिचर ठेवले आहे.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि Meesho  वरील तुम्ही निवडलेले फोटो एखाद्याला कसे शेअर करावे,  तर पुढील दिलेल्या स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील Meesho हे एप्लीकेशन ओपन करा.
  2. Meesho  या अप्लिकेशन मध्ये आल्यानंतर  तुमच्यासमोर विविध कॅटेगरी मधील  वस्तू दिसतील जसे की कपडे,  इलेक्ट्रॉनिक्स,  शोच्या वस्तू,  तर तिथे तुम्ही तुम्हाला जी वस्तु शेअर करायची आहे त्या वस्तूवर क्लिक करा.
  3. वस्तू वर क्लिक केल्यावर मोबाइल स्क्रीन वर थोडे खाली स्क्रोल करा व समोर येणाऱ्या Share या पर्यायावर क्लिक करा.
  4. Share या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर तुम्हाला कोणत्या माध्यमाने  तुम्ही निवडलेल्या प्रॉडक्टचे फोटो आणि त्याची माहिती पाठवायची आहे,  हे  विचारण्यात येईल  जसे की व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तेथे तुम्ही ज्या माध्यमाने  तुम्हाला प्रॉडक्ट शेअर करायचा आहे त्यावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो आपण Meesho एप्लीकेशन वरून कोणतेही प्रॉडक्ट विषयी माहिती आणि त्याचे फोटो शेअर करू शकतो.

Meesho वर प्रॉडक्ट कसे ऑर्डर करावे ?

जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की Meesho वर आपण प्रॉडक्ट कसे ऑर्डर करावे  तर पुढील प्रमाणे दिल्या गेलेल्या स्टेप्स  करा  :-

  1. आपल्या मोबाईल मधील Meesho हे एप्लीकेशन ओपन करा.
  2. Meesho या अप्लिकेशन मध्ये आल्यानंतर तुमच्यासमोर विविध कॅटेगरी मधील  वस्तू दिसतील जसे की कपडे,  इलेक्ट्रॉनिक्स,  शोच्या वस्तू, तर तिथे तुम्ही तुम्हाला जी वस्तु ऑर्डर करायची आहे त्या वस्तूवर क्लिक करा.
  3. जी वस्तू ऑर्डर करायचे आहे त्या वस्तूवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर डाव्या बाजूने खालच्या भागात Add to cart असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. Add to cart  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला ते प्रॉडक्ट किती कॉन्टिटी मध्ये पाहिजे आणि त्या प्रॉडक्टची साईज कशी असावी याबाबतीत विचारण्यात येईल तेथे तुम्ही तुमच्या नुसार निवडू शकता व निवडल्यानंतर तेथे Done  या पर्यायावर क्लिक करा अशाप्रकारे तुमचे प्रोडक्ट cart मध्ये ऍड होऊन जाईल.
  5. Cart मध्ये प्रॉडक्ट add  झाल्यानंतर मोबाइल स्क्रीन वरील उजव्या बाजू तील वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या trolly सारख्या  दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
  6. वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुम्ही कोणत्या पर्यायाने पेमेंट करणार आहात याबाबतीत विचारण्यात येईल जसे की पेटीएम, कैश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड.  तेथे तुम्हाला जमेल त्या पर्यायावर क्लिक करा.
  7. पेमेंट method निवडल्यानंतर तुमच्या समोर प्रॉडक्टच्या किमती विषयी सर्व माहिती येईल, तेथे तुम्ही खालच्या भागात असणाऱ्या Proceed या पर्यायावर क्लिक करा.
  8. Proceed  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर Shipping adress विचारले जाईल तेथे जर तुम्ही  वस्तू तुमच्या स्वतःसाठी ऑर्डर करीत आहात तर तेथे तुमचा अड्रेस टाका किंवा जर तुम्ही तुमच्या ग्राहकासाठी ऑर्डर करत आहात तर  तुमच्या ग्राहकाचे एड्रेस टाका व खाली असणाऱ्या Save या पर्यायावर क्लिक करा.
  9. Save या पर्यायावर क्लिक केल्यावर खाली असणाऱ्या Proceed  या पर्यायावर क्लिक करा, तुमच्या समोर Sender details विचारण्यात येतील तर तेथे तुम्ही तुमच्यासाठी वस्तू मागवत असाल तर तेथे तुमचे नाव आणि फोन नंबर टाका  त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या ग्राहकासाठी वस्तू ऑर्डर करत आहात तर जेथे तुम्ही तुमच्या दुकानाचे किंवा तुमचे स्वतःचे नाव टाकू आणि फोन नंबर टाकू शकता.
  10. Sender details टाकल्यानंतर Submit या पर्यायावर क्लिक करा व नंतर Proceed या पर्यायावर क्लिक करा. Proceed या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तुम्हाला त्या ग्राहकाला ती वस्तू किती ला विकायची आहे यासाठी किंमत  टाकायची असते,  जर  प्रॉडक्टची Meesho वर असणारी किंमत 100 असेल तर तेथे तुम्ही 150 टाकून पन्नास रुपये कमवू शकता पण जर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वस्तू  ऑर्डर करत असाल तर  ते पर्याय तसेच रिकामे ठेवून खाली असणाऱ्या Place order या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो आपण Meesho  या ॲप्लिकेशनवर आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या ग्राहकासाठी वस्तू ऑर्डर करू शकतो.

Meesho वर जास्तीत जास्त ऑर्डर कसे मिळवावे ?

मित्रहो तुम्हाला Meesho  चा वापर करून पैसे कमवण्यासाठी खूप प्रमाणात वस्तू विकाव्या लागतील,  आम्ही पुढील प्रमाणे काही पर्याय सांगितले आहेत ज्या तुम्हाला Meesho वरील वस्तू जास्तीत जास्त विकून खूप पैसे कमी कमवण्यास नक्कीच मदत करतील.

  1. इंस्टाग्राम वर पेज बनवा व तेथे रोज विविध प्रॉडक्ट योग्य Hashtag चा वापर करून पोस्ट करा, त्या प्रॉडक्टच्या माहितीची रील बनवून शेअर करा, प्रॉडक्टचे फोटो स्टोरीला टाका,  अशाप्रकारे तुम्हाला  इंस्टाग्राम वर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पहचता येईल व तुमच्या वस्तू विकता येतील.
  2. फेसबुक वर ग्रुप तयार करा व तेथे तुमच्या Product ची फोटो आणि माहिती सतत टाकत रहा व त्यानंतर जसे जसे तुमच्या ग्रुपचे मेम्बर्स वाढू लागतील तसे तुम्हाला खूप  ऑर्डर मिळू लागतील.
  3. प्रॉडक्टच्या विविध कॅटेगरी नुसार  विविध व्हाट्सअप ग्रुप ओपन करा व तेथे त्या कॅटेगरी मधील वस्तू टाकत राहा  व त्या ग्रुपमध्ये त्या कॅटेगिरी मधील इंट्रेस्ट असणाऱ्या विविध व्यक्तींनी ॲड करा.  अशाप्रकारे ज्या ज्या लोकांना तुमच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट येतील आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या ऑर्डरी मिळतील.

अशाप्रकारे मित्रहो  आम्ही या लेखामध्ये Meesho या एप्लीकेशन बद्दल माहिती  सांगितले आहे,  जी तुम्हाला Meesho ॲप्लिकेशन तुमच्या स्वतःसाठी वापरण्यास किंवा त्याचा वापर करून पैसे कमी होण्यास नक्कीच मदत करेल जर तुम्हाला या माहितीबद्दल काही  विचारायचे असल्यास  तुम्ही खाली असणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता.

मीशो एक्झिक्युटिव्हशी कसे बोलू शकतो?

तुम्हाला योग्य रक्कम न मिळाल्यास, तुम्ही आम्हाला 080-61799600 वर कॉल करू शकता किंवा [email protected] वर ईमेल टाकू शकता आणि टीममधील कोणीतरी तुमच्याशी लवकरात लवकर संपर्क करेल

मीशो कशासाठी प्रसिद्ध आहे?

Meesho हे रिसेलर्ससाठी भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात विश्वासार्ह मार्केटप्लेस आहे, जे WhatsApp आणि Facebook द्वारे ऑनलाइन उत्पादने विकतात . 50,000 हून अधिक पुनर्विक्रेत्यांचा विश्वास असलेले, Meesho त्यांना सर्वात कमी किमतीत उत्पादने देऊन त्यांचा ऑनलाइन व्यवसाय वाढविण्यात मदत करते. सुलभ रिटर्न पॉलिसीसह सर्वोत्तम गुणवत्ता.

मीशो यूएसए मध्ये उपलब्ध आहे का?

 आंतरराष्ट्रीय शिपिंगला सपोर्ट करत नाही .


मीशो भारतीय कंपनी आहे का?

Meesho हे भारतीय कंपनी Fashnear Technologies Private Limited च्या मालकीचे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे. 


Meesho कंपनीचे वय किती आहे?

मीशोची स्थापना 2015 मध्ये बेंगळुरूमध्ये विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल यांनी केली होती. 

Leave a Comment