माझी मातृभाषा मराठी निबंध Mazi Matrubhasha Marathi Nibandh

Mazi Matrubhasha Marathi Nibandh भारत देशामध्ये विविध भाषा बोलल्या जातात महाराष्ट्र राज्याचे प्रमुख भाषा म्हणून ओळखली जाणारी मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे. अमृताहून ही गोड असलेली मराठी भाषा आहे. माझ्या महाराष्ट्र राज्याची मातृभाषा आहे. मला आई सारखी प्रिय आणि जवळचे असलेली मराठी भाषेवर मला अभिमान आहे.

Mazi Matrubhasha Marathi Nibandh

माझी मातृभाषा मराठी निबंध Mazi Matrubhasha Marathi Nibandh

आज मराठी भाषा ही हिंदी आणि इंग्रजी भाषा प्रमाणे विकसित झालेली आहे. मराठी भाषेमध्ये उपलब्ध असलेले असंख्य मराठी साहित्य आणि सुरुवातीला आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ कादंबऱ्या या सर्वांमुळे मराठी भाषा मध्ये आणखीनच आमूलाग्र असा बदल घडत आला.आणि आज मराठी भाषा ही भारतात बोलणार या भाषांपैकी एक प्रसिद्ध भाषा बनली आहे.

मराठी भाषेचे आद्य कवी शंकराचार्य यांनी सर्वप्रथम मराठी भाषेचे गौरव करताना आपल्या विवेकसिंधु या ग्रंथामध्ये सांगितले आहे की आपल्या मराठी भाषेमध्ये ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी बहुतांश ग्रंथ उपलब्ध आहेत. मग आपण न्याय मिळवण्याकरता इतर भाषेचा वापर का करावा?

मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेवर आपल्याला गर्व असायला पाहिजे. मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे. म्हणून माझी मराठी मला खूप प्रिय आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान असलेली मराठी भाषा ही महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बोलली जाते.

म्हणूनच माझ्या मायबोलीचे वर्णन करताना संत कवी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, ” माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. ” आणि ज्ञानेश्वर महाराजांचा हाच आत्मविश्वास मराठी प्रेमींच्या बोलण्याने सार्थ ठरला आहे.

माझी मातृभाषा म्हणजेच माझी मराठी भाषा ही इतकी शक्तिशाली आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा बोलण्याचे आवश्यकता आहे. प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या भाषेला महत्त्वाचे स्थान दिले जाते त्याप्रमाणे माझ्या मराठी भाषेला माझ्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे स्थान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर माझी मातृभाषा बोलली जाते. एवढेच नसून पराक्रमाच्या आणि भादुरी च्या कथा बनवताना माझी मराठी भाषा अधिकच बाणदार बनते. तर मराठी भाषेचे प्रेम, माया व्यक्त करताना माझी मातृभाषा ही मृदू बनते.

जर माझ्या मातृभाषेचा विचार केला तर भारतात बोलल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या भाषण पैकी माझी मराठी भाषा एक आहे. भारतातील जवळपास सात कोटी लोकसंख्या मराठी भाषेला आपली मातृभाषा समजून दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करते.

मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने असा दावा केला की, किमान 2300 वर्षापूर्वी संस्कृत सोबत बहिणीचे भाषा म्हणून मराठी भाषा अस्तित्वात होती. म्हणूनच माझी मराठी भाषा ही खूप जुनी भाषा म्हणून देखील ओळखले जाते.

आज माझ्या मातृभाषेत देखील विविध क्षेत्रांमध्ये अतोनात प्रगती केलेली आहे. मराठी भाषेतून विज्ञानाचे कित्येक चमत्कार झालेले दिसतात. तसेच मराठी भाषेला प्राचीन परंपरा देखील लाभली आहे आज खेड्यापाड्यांमध्ये मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते.

माझ्या मातृभाशेला तिची शब्दसंपत्ती हि खूप विपुल आहे. आज आपण जे संतांचे ग्रंथ, चरित्र, व्यक्तिमत्व, त्यांचे विचार वाचतो हे सर्व माझ्या मातृभाषे मुळेच शक्य झाले. तसेच मराठी भाषेतून वेगवेगळ्या कवींचा, लेखकांचा देखील जन्म झाला व मराठीचे साहित्य भांडार वाढू लागले.

तरीसुद्धा सुद्धा महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये मराठी भाषेची कैफियत पाहायला मिळते कारण आजच्या जगामध्ये सर्वाधिक प्राधान्य हे इंग्रजी भाषेला दिले जाते. त्यामुळे मराठी माध्यमिक शाळांचे स्थान इंग्रजी माध्यमिक शाळा ने घेतले आहे.

मराठी ही ज्ञानभाषा समजून विद्यार्थ्यांना संपूर्ण ज्ञान हे मराठी भाषेमध्ये दिले जाते या उलट इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजी भाषा ज्ञानभाषा समजून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान दिले जाते. परंतु काही थोर विचारवंतांनी सांगितले आहे की, विद्यार्थ्यांनी ज्ञान प्राप्त करावे ते म्हणजे स्वतःच्या मातृभाषेतून. परंतु हे आपल्या जनतेला आणि पालकांना कधी समजणार?

आज शाळा महाविद्यालयांमध्ये तर शिक्षणाचा बाजार करून ठेवला आहे इंग्रजी भाषेला अग्रगण्य स्थान देऊन पैशाची लूट केली जात आहे. आपण ज्या भाषा मध्ये राहतो जी भाषा दैनंदिन जीवनामध्ये बोलतो त्या भाषेमध्ये शिक्षण घेणे हे सर्वाधिक उत्तम. त्यामुळे आजची तरुण पिढी आणि पालकांनी इंग्रजी भाषेच्या आहारी न जाता मराठी भाषेला ही तितकेच महत्वाचे स्थान देऊन आपल्या मुलांना मराठी भाषेमध्ये शिकवणे व मराठी भाषेचे ज्ञान देणे गरजेचे आहे.

ज्या वेळी आपण इंग्रजी शाळेची पायरी चढतो त्यावेळी मराठी भाषा हीच महाराष्ट्राच्या शिखरावरून हा खालच्या पायरीला येते त्यामुळे सर्वांनी विचार करायला पाहिजे की आपण आपल्या मातृभाषेला, माय बोली भाषेला आणि मराठी भाषेला किती खाली घेऊन येणार?

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

मराठी भाषा मध्ये आमूलाग्र  बदल का घडत आला?

आज मराठी भाषा ही हिंदी आणि इंग्रजी भाषा प्रमाणे विकसित झालेली आहे. मराठी भाषेमध्ये उपलब्ध असलेले असंख्य मराठी साहित्य आणि सुरुवातीला आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ कादंबऱ्या या सर्वांमुळे मराठी भाषा मध्ये आणखीनच आमूलाग्र असा बदल घडत आला.

आज  कोणती भाषा भारतात  एक प्रसिद्ध भाषा बनली आहे?

आज मराठी भाषा ही भारतात  एक प्रसिद्ध भाषा बनली आहे.

कोणत्या भाषेला अग्रगण्य स्थान देऊन पैशाची लूट केली जात आहे?

इंग्रजी भाषेला अग्रगण्य स्थान देऊन पैशाची लूट केली जात आहे.

आजची तरुण पिढी आणि पालकांनी इंग्रजी भाषेच्या हावी न जाता कोणत्या भाषेला  महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे?

आजची तरुण पिढी आणि पालकांनी इंग्रजी भाषेच्या हावी न जाता मराठी भाषेला ही तितकेच महत्वाचे स्थान देऊन आपल्या मुलांना मराठी भाषेमध्ये शिकवणे व मराठी भाषेचे ज्ञान देणे गरजेचे आहे.

कोणतीभाषा ही इतकी शक्तिशाली आहे ?

माझी मातृभाषा म्हणजेच माझी मराठी भाषा ही इतकी शक्तिशाली आहे.

Leave a Comment