मानवी जीवनात विचारांचे महत्व मराठी निबंध Manvi Jeevnaat Vicharanche Mahattwa Marathi Nibandh

Manvi Jeevnaat Vicharanche Mahattwa Marathi Nibandh मानवी जीवनामध्ये विचारांना खूप अनन्यसाधारण स्थान आहे. विचारांच्या जोरावर मनुष्य जीवनात कुठली असते गोष्ट साध्य करू शकतो. चांगले विचार हे व्यक्तीला जीवनात नक्कीच यशस्वी करतात.

Manvi Jeevnaat Vicharanche Mahattwa Marathi Nibandh

मानवी जीवनात विचारांचे महत्व मराठी निबंध Manvi Jeevnaat Vicharanche Mahattwa Marathi Nibandh

आपल्या मानवामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे विचार करण्याची क्षमता होय. म्हणुनच मनुष्याला सर्वात बुद्धिमान प्राणी असेसुद्धा म्हणतात. कारण इतर प्राण्यांना चांगले वाईट गोष्टीचे विचार करण्याची क्षमता नसते परंतु ही क्षमता देवाने दिलेली मनुष्याला एक देणगीच आहे. ज्यासाठी आपण देवाचे नेहमी आभार मानतो आणि पुढेही देवाचे आभार असेल.

आपणास माहिती आहे की विचार करण्याच्या देखील बरेच मार्ग आहेस आपण ज्या गोष्टीचा विचार करतो त्यानुसार वागतो. एखाद्या व्यक्ती चांगले विचार करत असेल तर त्याचे व्यक्तिमत्त्व सांगा चांगलेच घडते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विचारांना खूप महत्त्वाचे स्थान आहे.

विचार हे सामान्यता चांगली विचार सरणी, वाईट विचार, सकारात्मक विचार किंवा नकारात्मक विचार असतात.

परंतु यापैकी आपण कुठल्या प्रकारचा विचार करतो यावर आपले पुढचे जीवन अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चांगली किंवा सकारात्मक विचार सारणी ही लोकसंख्येच्या केवळ काही टक्केच आढळून येते. त्यामुळे आपल्या समाजामध्ये चांगल्या व्यक्तिमत्वाचे लोके खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात.

केवळ विचारच मनुष्याला देव किंवा राक्षस बनवू शकतात. आपल्या इतिहासामध्ये डोकावून पाहिले असता आपल्याला विचारांचे महत्त्व कळून येईल. आपल्या इतिहासामध्ये अनेक महान पुरुष होऊन गेले ज्यांनी लोककल्याणासाठी, समाजसेवेसाठी आणि आपल्या देशासाठी स्वतःचे प्राण सुद्धा गमावले. थोडक्यात इतिहासातील सर्व महापुरुषांचे विचार चांगले व सकारात्मक होते म्हणून आज देखील त्यांचे नाव अमर आहे व त्यांच्या मुर्त्या समोर आपण वंदन करतो.

आपण आयुष्यात किती यशस्वी होतो किंवा आपण ठरवलेले एखादे साध्य करू शकतो की नाही हे पूर्णपणे आपल्या विचारांवर अवलंबून असते. वास्तविक सांगायचे एवढेच की, आपली विचारसरनी हे आपले वास्तविक व्यक्तिमत्व आणि वर्तन आहे जे शारीरिक स्वरूपात प्रकट होते.

आपण जसे विचार करतो त्याप्रमाणे आपली वागणूक असते आणि त्याच प्रकारे आपण लोकांच्या समोर येतो. यावरूनच समाज आपल्याला कितपत आदर किंवा सन्मान द्यायचा हे ठरवितो. आपण काय बोलतो, आपण काय बोलतो आणि आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतो व त्याच्या काय प्रतिक्रिया येतात हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

खरंतर! आपली विचारसरणी ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब दर्शवते.

विचारांचे प्रकार:

सर्वसाधारणतः आपण काय विचार करतो यावर विचाराचे प्रकार अवलंबून आहेत. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा चांगला विचार करीत असेल तर त्याला सकारात्मक विचार म्हणतात. याउलट एखाद्या गोष्टीचा आपण वाईट विचार करत असेल तर त्याला नकारात्मक विचार म्हणतात. म्हणूनच विचारांचे दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-

१. सकारात्मक विचार:

प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक विचार असणे खूप गरजेचे आहे. आपली सकारात्मक विचारसरणी ही एक विश्वास आहे की, आपण जीवनात अगदी कठीण परिस्थिती ही सोडवू शकतो.सकारात्मक विचार धारणेच्या जोरावर आपण जीवनात आलेल्या सर्व समस्यांना साहसाने तोंड देऊ शकतो.

अगदी कठीण काळातही धैर्य राखणे ही आपल्या सकारात्मक विचारसरणीची शक्ती आहे. केवळ आपल्या सकारात्मक विचार सरणी मुळेच कोणतेही कठीण कार्य करण्याचे धैर्य आपल्याला प्राप्त होते. कोणतेही कार्य आपण जितके सकारात्मकपणे करतो तितके कार्य अचूक आणि यशस्वी होते.

जीवनाच्या कठीण परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार न बाळगण्यामुळे अनेक लोक आपले नुकसान करून घेतात. आज पर्यंतच्या सर्व यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचे रहस्य म्हणजे सकारात्मक विचार हेच आहे. सकारात्मकता ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहेच त्यासोबत आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायद्याचे ठरते.

२. नकारात्मक विचार:

नकारात्मक विचार म्हणजे एखाद्या गोष्टीचा वाईट विचार करणे किंवा एखादी गोष्ट साध्य करण्या अगोदर “ती गोष्ट माझ्याकडून होणार नाही” असा समज बाळगणे होय.

नकारात्मक विचार असणाऱ्या लोकां द्वारे केलेले कार्य खराब होऊ लागते आणि नकारात्मक विचारसरणीचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. नकारात्मक विचार हे आपल्याला अपयशाच्या तळापाशी आणून ठेवतात. तसेच नकारात्मक विचार आपल्याला समाजामध्ये हरण्याचे उदाहरण देखील बनवते. जीवनातील अडचणींना धाडसाने तोंड न देता हताश येऊन बसणे हे नकारात्मक विचारांचे लक्षण आहे.

एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न न करता यश मिळणार नाही अशा वाईट कृत्यांचा निकाल लावणे हे नकारात्मक विचार धारणेचे उदाहरण आहे.

अशा प्रकारे मानवी जीवनात विचारांना महत्त्वाचे स्थान आहे.आपण कुठल्या प्रकारचा विचार करतो यावर आपले जीवन घडत असते. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार बाळगणे फायद्याची ठरते.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

विचार करणे म्हणजे काय?

बुद्धीला किंवा मनाला काही नियमांनुसार 'चालविणे' म्हणजे विचार करणे. "पुर्वानुभवाच्या मदतिने व्यक्तिच्या मनातल्या मनात होणारी प्रक्रिया म्हनजे विचार होय". विचार प्रक्रिया;-(THINKING PROCESS) - विचार ही मानवी मनाचि प्रक्रिया आहे. डोळ्यासमोर नसलेल्या कोणत्याहि गोष्टिबद्दल चालु असलेल्या मानसिक प्रक्रियेला आपण विचार म्हणतो.

विचार करण्याची कौशल्ये काय आहेत?

विचार कौशल्यांमध्ये सिद्धांत मांडणे, भविष्य सांगणे, मूल्यांकन करणे, स्मृती आठवणे आणि विचार संघटना यांचा समावेश होतो. ते प्रत्येकाकडे असतात, परंतु ते प्रभावीपणे कसे वापरावे हे प्रत्येकाला माहित नसते.

माणसात विचार करण्याची क्षमता कशी असते?

बुद्धिमत्तेद्वारे , मानवांमध्ये शिकण्याची, संकल्पना तयार करण्याची, समजून घेण्याची, तर्कशास्त्र आणि तर्क लागू करण्याची संज्ञानात्मक क्षमता असते, ज्यामध्ये पॅटर्न ओळखणे, योजना करणे, नाविन्य आणणे, समस्या सोडवणे, निर्णय घेणे, माहिती राखणे आणि संवाद साधण्यासाठी भाषा वापरणे या क्षमतांचा समावेश होतो.

विचाराचे प्रकार कोणते?

१. सकारात्मक विचार
२. नकारात्मक विचार

Leave a Comment