जाणून घ्या महाशिवरात्रीचे महत्त्व आणि माहिती Mahashivratri Information In Marathi

Mahashivratri Information In Marathi महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस असतो असे मानले जाते. शिवरात्रीच्या एका प्रहरी शिव विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हटले जाते. महाशिवरात्री हा हिंदूंचा एक सण आहे. तो माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्थीला असतो.

Mahashivratri Information In Marathi

महाशिवरात्रीचे महत्त्व आणि माहिती Mahashivratri Information In Marathi

प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्थीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शंकराची आराधना व प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यातील गणला जातो. तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.

महाशिवरात्रीचे महत्व:

संस्कृत पुराण साहित्य पैकी अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे. महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी शंकरपार्वती यांचा विवाह झाला होता, यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते, त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत समाप्त होते. दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप घेतात.

महादेवाच्या मंदिरा मध्ये शिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी दिसून येते. बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत, तेथे लाखोच्या संख्येने भाविक भक्त शिव दर्शनाला येतात. भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे, तेथे मोठ्या यात्रा भरतात. शिवशंकराला १०८ बेल वाहून शिव नामावली देखील उच्चारली जाते.

महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फुल शिवाला वाहण्याची परंपरा आहे. त्यामुळे शिवकृपा प्राप्त होते व ओम नमः शिवाय हा जप जास्तीत जास्त करावा. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक भक्त उपवास करून दूध आणि फळे कंदमुळे असा आहार घेतात. भारताच्या विविध राज्यात हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभर विविध तीर्थक्षेत्र तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगाचे स्थानी विशेष यात्रा भरतात.

महाशिवरात्री सण कशाप्रकारे साजरा केला जातो:

शिवरात्री हा सण शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण आहे. महाशिवरात्री उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे, शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे, याला शिवरात्री पूजा म्हटले जाते. प्रत्येक पूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा, शाळुंका  शिवपिंडीवर वाहाव्यात तसेच तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळनी घालतात.

महाशिवरात्रीची पूजा :

शिवस्मरणात जागरण करावे, पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी . महाशिवरात्रीची ही रात्रभर शंकरजीची पूजा करून सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो व शिवलोकांची प्राप्ती होते. शिवाची पूजा केल्याने तादात्म्य, मोक्ष इत्यादी फळे मिळतात. अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्थी शीत दोन दिवसात विभागलेली असेल तर त्या मध्यरात्री चतुर्थीची येत असेल तर ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिर्णय करतांना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे, हे स्पष्ट होते.

शिवरात्रीच्या कालनिर्णय याबाबत इतरही बरेच मतभेद आहेत. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध, तूप, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात.

भगवान शिव शंकराला भोळा शंकर असे देखील म्हटले जाते. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिव पुराणात अशा कथा सुद्धा आहेत. सर्व देवतांमध्ये भगवान शिवाचे महत्व अत्याधिक असल्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो. अतिशय मंगलमय दिवस म्हणून महाशिवरात्री सण साजरा केला जातो.

महाशिवरात्री विषयी पौराणिक कथा:

महाशिवरात्रीच्या अनेक पौरानिक कथा प्रचलित आहेत. त्यापैकीच ही एक कथा आहे. ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी सृष्टीशी निगडित सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली; परंतु त्याच वेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिव शंकरामध्येच होती. त्यामुळे शिवशंकराने हे विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले आहे.

पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिव यांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिव शंकराला बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे नाव पडले असे म्हटले जाते.

शिवशंकराच्या अंगाच्या होत असलेल्या दाहा मुळे भगवान शिवानी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात व भगवान शिवाचे शिवलीला अमृत, महारुद्र, गायन, भजन इत्यादींचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळविण्याकरिता आराधना केली जाते.

आणखीन एक पौराणिक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे एक पारधी एका जंगलात शिकार शोधण्यासाठी झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार सापडली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरिता आला. तिर बाण सोडणार तेवढ्यातच त्यातील एक हरीण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, “हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे. परंतु मी तुला एक विनंती करतो, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे, माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे.” हरणाने वचन दिल्याने त्याने त्याची विनंती मान्य केली.

दूर वरून मंदिरातील घंटाचे आवाज येत होते. ओम नमःशिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता, ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाचे पान पडत होते. नकळत का होईना पण त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की, “आता मला माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे.” तेव्हा लगेच हरणाची पत्नी पुढे आली आणि तिने म्हटले, “यांना नको, मला मार माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे.”

त्वरित हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली, “आईला नको, आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे.” आता त्याच्या मनात विचार आला. हे प्राणीमात्र असून देखील आपल्या कर्तव्याला चुकत नाही, तर मी माझा मानव धर्म, दया धर्म का सोडू? त्याने सर्वांना जीवनदान दिले.

देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि शिकाऱ्यावर वर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरणाला मृगनक्षत्र म्हणून व शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरिता स्थान दिले. हा प्रसंग ज्या दिवशी घडला, तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशाप्रकारे आपणही महाशिवरात्रीचा उपवास करावा हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे आपल्याला शिव शंकर प्रसन्न होईल व आपल्या संकटांचे निवारण होईल.

” तुम्हाला आमची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-


महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे?

जे लोक आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांच्यासाठी महाशिवरात्री खूप महत्त्वाची आहे. जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत त्यांच्यासाठी आणि जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठी देखील ती खूप महत्वाची आहे. जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत ते महाशिवरात्रीला शिवाच्या विवाहाचा उत्सव म्हणून पाहतात.


महाशिवरात्रीला आपण का जागृत राहावे?

भगवान शिवाचा तिसरा डोळा आहे जो सर्व वास्तविकतेचा आधार आहे. हे भौतिकाच्या पलीकडे आहे आणि एक मितीय समज प्रदान करते. महाशिवरात्री तुमचा तिसरा डोळा उघडण्याच्या दिशेने तुमचा आणि तुमच्या सभोवतालच्या सखोल आयामी आकलनासाठी प्रवास सुलभ करते .


शिवरात्रीला का झोपू नये?

महाशिवरात्री ही शिवाची रात्र म्हणून साजरी केली जाते ज्यामध्ये मानवी शक्ती नैसर्गिक ऊर्ध्वगामी वाढीचा अनुभव घेतात . म्हणूनच महाशिवरात्रीच्या त्या रात्री खोटे बोलू नका, तर पाठीचा कणा सरळ ठेवावा असा सल्ला दिला जातो.

Leave a Comment