एम.एस.डब्लू. कोर्सची संपूर्ण माहिती M.S.W. Course Information In Marathi

M.S.W. Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आत्ताच्या काळात शिक्षणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. लहानपणापासूनच मुलांना चांगले शिक्षण मिळावे व त्यांचे भविष्य घडवणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते ते व त्यासाठी ते सतत झगडत असतात.आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा हे जसे जगण्यासाठी आवश्यक आहे. तसेच आपल्याला उच्च शिक्षणही सर्वात महत्वाचे आहे. मानवी जीवनात शिक्षणाला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे. आजच्या पिढीला पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजाशी जोडणाऱ्या ज्ञानाची ही अत्यंत गरज आहे.

M.s.w. Course Information In Marathi

एम.एस.डब्लू. कोर्सची संपूर्ण माहिती M.S.W. Course Information In Marathi

Table of Contents

आज आपण अशाच एका कोर्सची माहिती पाहणार आहोत. जो समाज कार्याशी निगडित कोर्स आहे. तो म्हणजे एम.एस.डब्लू. कोर्स !!ज्यांना समाजशास्त्रात रस आहे. त्यांनी जरूर हा कोर्स करावा. एम.एस.डब्लू. हा कोर्स केल्यानंतर आपल्याला समाज सेवा करण्याची एक प्रकारे चांगली संधी प्राप्त होत असते. एम.एस.डब्लू. ही एक ग्रॅज्युएशन पदवी आहे .एम.एस.डब्लू. चा फुल फॉर्म “मास्टर इन सोशल वर्क” असा आहे .

एम.एस.डब्लू. या कोर्समध्ये आपण सामाजिक विज्ञान व सामाजिक कार्य या विषयांचा अभ्यास करतो. समाजात अनेक समस्या असतात. त्या समस्या व्यवस्थित पणे सोडवुन समाजातील लोकांना चांगले जीवन कसे प्रदान करता येईल याचा अभ्यास या कोर्समध्ये केला जातो. म्हणजेच हा कोर्स समाजकार्याची निगडीत असा कोर्स आहे. या कोर्समध्ये एका प्रकारे समाजाचा अभ्यास केला जातो. समाजासाठी काम करणे समाजाच्या कल्याणासाठी काम करणे याला समाजकार्य म्हणतात.

हा कोर्स केल्यानंतर त्यांनी कोणतेही संस्थेच्या सहकार्याने सोशल करिअरची सुरुवात करू शकता. समाजसेवा करण्याबरोबर तुम्हाला उत्पन्नाचे एक साधनही उपलब्ध होते. बॅचलर डिग्री नंतर आपले भविष्य उज्वल करण्यासाठी आपण मास्टर डिग्री साठी एम.एस.डब्लू. हा एक उत्तम पर्याय आहे. समाजसेवेच्या भावनेने एक चांगला समाजसेवक होऊन समाजात आपली एक ओळख निर्माण करण्यासाठी ही पदवी आपण घेऊ शकतो. आपण समाजसेवा ही करू शकतो नंतर नोकरीच्या आधारे आपल्याला उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध होते.

आता आपण एम.एस.डब्लू.हा कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता लागते हे पाहुयात!!!

एम.एस.डब्लू. हा एक पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे. एम.एस.डब्लू. कोर्स करण्यासाठी तुम्हाला प्रथम कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि महाविद्यालयातील कोणत्याही शाखेची बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. मग ती कोणत्याही विषयाची डिग्री असो. फक्त या कोर्ससाठी ग्रॅज्युएशन पूर्ण लागते. कोणतीही पदवीधर डिग्री असावी .पदवी अभ्यासक्रम हा 50% गुणांनी उत्तीर्ण केलेला असावा.

एम.एस.डब्लू.या कोर्सचा कालावधी

दोन वर्षाचा असतो. तो 4 सेमिस्टरमध्ये विभागलेला असतो.

आता आपण एम.एस.डब्लू. या कोर्सची प्रवेश प्रक्रिया कशी असते ते पाहूयात!!!

काही कॉलेजमध्ये या कोर्सला प्रवेश देताना पदवीधर गुणांवर दिला जातो. तर काही कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा पास होणे अत्यंत महत्वाचे असते. प्रवेश परीक्षेचे मार्क व पदवी गुणांचे मार्ग एकत्रित करून मिरीट नुसार प्रवेश दिला जातो.

तर काही ठिकाणी कौशल्य मूल्यांकन चाचणी, वैयक्तिक मुलाखत यानुसार प्रवेश दिला जातो. प्रत्येक कॉलेजवर ही प्रवेश प्रक्रिया वेगवेगळी असते . त्या कॉलेजवर प्रवेश देण्याची प्रक्रिया अवलंबून असते .विद्यार्थी एम.एस.डब्लू.या कोर्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात .

एम.एस.डब्लू. या कोर्ससाठी पुढील प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.

DUET

ही एक दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा असून राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे घेतली जाते .दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत विविध पीजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे.

BHU PET

ही परीक्षा बनारस हिंदू विद्यापीठ तर्फे घेतली जाते .सामाजिक कार्यात सह विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची पदवी परीक्षेत 50 % गुण असणे आवश्यक आहे.

TISS NET

ही टाटा सामाजिक विज्ञान संस्थेद्वारे घेतली जाणारी प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा MCQ वर आधारित एक चाचणी असून ज्यात सामान्य ज्ञान व इंग्रजी इत्यादी ही संबंधित प्रश्न विचारले जातात. यात एकूण 100 प्रश्न असून या परीक्षेसाठी एक तास चाळीस मिनिटे असा वेळ असतो.

AMU

ही परीक्षा मुस्लिम विद्यापीठातर्फे आयोजित केलेली प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा MCQ वर आधारित आहे. या परीक्षेत विद्यार्थी क्षमता व तांत्रिक तर्क कौशल्य तपासले जातात. या परीक्षेला बसण्यासाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे.

आता आपण एम.एस.डब्लू. या कोर्सचे प्रकार पाहूयात!!

पूर्णवेळ एम एस डब्ल्यू

ही पदवी दोन वर्षाची शैक्षणिक अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात समाजाच्या विकासाची व कल्याणासाठी आवश्यक असे शिक्षण दिले जाते. या कोर्सची सरासरी फी 20000 ते 200000 पर्यंत असते. या कोर्सला गुणवत्तेवर आधारीत प्रवेश दिला जातो. तसेच काही महाविद्यालयातBHU PET, TISS NET या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. दिल्ली विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ व लोयोला कॉलेज चेन्नई इत्यादी ही विद्यापीठे एम.एस.डब्लू. अभ्यासक्रम देणारी महाविद्यालय आहेत.

अंतर

अंतर एम.एस.डब्लू. या कोर्सचा कालावधी अडीच वर्ष असतो. या कोर्सची सरासरी फी 11790 ते 32400 या दरम्यान असते. इग्नू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, द ग्लोबल ओपन युनिव्हर्सिटी हे विद्यालय हा अभ्यासक्रम देतात.

दुरुस्त शिक्षण एम.एस.डब्लू.

दुरुस्त शिक्षण एम.एस.डब्लू.या कोर्सचा कालावधी अडीच वर्षाच्या असतो. उमेदवारांनी दिलेल्या वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची वेळ अवलंबून असते. जे एम.एस.डब्लू. चे नियमित शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांच्यासाठी एम.एस.डब्लू. दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम अत्यंत फायदेशीर आहे .

बहुतेक महाविद्यालयात प्रवेश गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश दिला जातो. प्रवेशाच्या वेळी उमेदवाराला जात प्रमाणपत्र इतर कागदपत्रांसह सादर करावे लागते. हा अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षण मंडळ व युजीसी द्वारे मान्यताप्राप्त आहे. या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक असते. या अभ्यासक्रमाची फी एकूण 32400 आहे .या कोर्ससाठी वयोमर्यादा नसते. शिक्षणाची पद्धती इंग्रजी व हिंदी मध्ये आहे.

आता आपण एम.एस.डब्लू. या कोर्सच्या फी बद्दल माहिती पाहणार आहोत!!

या कोर्स साठी आपल्याला जवळपास 1ते 2 लाखांपर्यंत फीज द्यावी लागते. या कोर्सची फी ही आपण ज्या कॉलेजला प्रवेश घेत आहोत त्यावर अवलंबून असते.

एम.एस.डब्लू. हा कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी कोठे कोठे उपलब्ध होतात हे पाहुयात!!

  • महिला व बालकल्याण विभाग
  • सामाजिक न्याय आणि रोजगार विभाग
  • सहाय्यक शिक्षक

मानव संसाधन विभाग एन.जी.ओ.मध्ये प्रकल्प अधिकारी किंवा व्यवस्थापक सामाजिक कार्यकर्ता इत्यादी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
एम.एस.डब्लू. या क्षेत्रांमध्ये नोकरीसाठी निवड करताना विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य पाहिले जाते .विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तित्व विकास बघितला जातो.

तसेच समाजामध्ये कशा प्रकारे काम करू शकतो हे पाहिले जाते. भविष्यात एन.जी.ओ. मध्ये काम करायचे असेल तर त्यामध्ये व्यक्तिगत विचार न करता तुमच्यामधील कौशल्याचा विचार केला जातो. आपल्याला जे कार्य सोपवले गेले आहेत त्यामध्ये आपण कशाप्रकारे काम करतो हे पाहिले जाते.

आता आपण एम.एस.डब्लू.या कोर्स मध्ये कोणता अभ्यासक्रम आहे हे पाहूयात !!!

एम.एस.डब्लू या पदवीच्या अभ्यासक्रमात खाली दिलेले विषय शिकवले जातात-

• समाजकार्य,
• भारतीय समाजाचे विश्लेषण,
• सामाजिक कार्य आणि न्याय,
• महिला आणि बाल विकास,
• समुदाय संघटना

कामगार कल्याण आणि कायदेशीर प्रक्रिया

सोशल वर्क म्हणजे समाजकार्याशी निगडित अभ्यासक्रमाशी संबंधित असतो. समाजात खूप प्रकारच्या समस्या असतात व त्या समस्या कशा सोडवाव्यात याचा अभ्यास या कोर्समध्ये केला जातो .समाजात एखादा कार्यक्रम कसा घडवून आणायचा याबद्दल हा अभ्यासक्रम असतो .विद्यार्थ्यांना समाजात सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी व लोकांशी संवाद साधण्यास व कार्य करण्यास शिक्षित करतो.

एम.एस.डब्लू.हा कोर्स केल्यानंतर आपण पुढील शिक्षण सुद्धा घेऊ शकतो .आपण पीएचडी करू शकतो .त्यासाठी आपल्याला यूजीसी नेट, सी एस आय आर जे आर एफ, गेट व स्ले ट या परीक्षा देऊन पीएचडी करावी लागते. पीएचडी ही पदवी घेण्यासाठी आपल्याला 18000 ते 200000 पर्यंत खर्च येतो.

तसेच आपण सामाजिक कार्य विषयात एम फिल करण्याची संधी सुद्धा उपलब्ध होते. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा असतो .या साठी आपल्याला नेटची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. या अभ्यासक्रमासाठी आपल्याला 200000 पर्यंत खर्च येतो. तसेच आपण एम.बी.ए. हे शिक्षण सुद्धा पूर्ण करू शकतो.

विद्यार्थ्यानी खालील विषयांची तैयारी चांगली केली पाहिजे –

१) इंग्रजी: मूलभूत व्याकरण, आकलन, शब्दलेखन, प्रतिशब्द-समानार्थी इ.
२) तर्क: सादृश्य, वर्गीकरण, संख्या मालिका, कोडिंग-डीकोडिंग, दिशानिर्देश इ.
३) सामान्य जागरूकता: चालू घडामोडी व विविध सामान्य ज्ञान तसेच चालू बातम्या व घटना आणि अलीकडील घटना.

FAQ’s :-

एम.एस.डब्लू. म्हणजे काय ?

एम.एस.डब्लू. म्हणजे मास्टर्स ऑफ सोशल वर्क्स हा कोर्स समाजाशी निगडीत असतो. या कोर्स मुळे आपल्याला समाज सेवा करण्याची संधि मिळते.

एम.एस.डब्लू. किती वर्षाचा कोर्स आहे?

एम.एस.डब्लू. 2 वर्षाचा कोर्स असून 4 सेमिस्टर मध्ये विभागली गेली आहे.

मी 12वी झाल्यानंतर एम.एस.डब्लू. कोर्स करू शकते का?

नाही,तुम्ही 12 वी झाल्यानंतर हा कोर्स करू शकत नाही कारण तुम्हाला हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही मान्यतापात्र कॉलेज मधून ग्रॅजुएशन पूर्ण करावे लागते. तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी घेतली असली पाहिजे फक्त ग्रॅजुएशन पूर्ण हवे.

एम.एस.डब्लू. हा कोर्स करण्यासाठी कोणता देश उत्तम आहे?

तुम्हाला जर एम.एस.डब्लू. ही पदवी घ्यायची असेल तर UK हा देश सर्वात उत्तम पर्याय आहे. UK या देशातील विद्यापीठ व महाविद्यालय सर्वात चांगले शिक्षण दिले जाते तेथे जॉब मार्केट मध्ये सामाजिक कार्यकरतींना जास्त मागणी असल्यामुळे तेथेच आपल्याला चांगली मोकरी उपलब्ध होऊ शकते.

Leave a Comment