लक्ष्मीपूजन हा सण का साजरा केला जातो ? Laxmi Pujan In Marathi

Laxmi pujan In Marathi हिंदू धर्मातील दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा आहे. लक्ष्मीपूजन आश्विन अमावास्येला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरात श्रीसूक्त पाठही केले जाते. तसेच व्यापारी लोक आपल्या हिशोबाचे पुस्तक याची सुद्धा पूजा करतात तसेच येथून नवीन वर्ष लक्ष्मी पूजनापासून सुरू होते.

Laxmi Pujan In Marathi

लक्ष्मीपूजन हा सण का साजरा केला जातो ? Laxmi Pujan In Marathi

पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तांदूळ ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवीन झाडू विकत घेतात तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मी पूजनाचा दिवस हा दिवाळीचा दिवस असतो. त्या दिवशी अमावस्या असते.

लक्ष्मीपूजन हे हिंदू धर्मातील स्त्रिया मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे लावून सर्व स्त्रिया मुले आनंदी असतात व त्या दिवशी दिपोत्सव साजरा केला जातो व लक्ष्मीचे पूजन करतात. एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून किंवा झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या ठेवून अक्षदांचे स्वस्तिक काढतात. या श्री लक्ष्मी व श्री कुबेराची मूर्ती यांची मनोभावाने पूजा करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे.

आपल्याला पैसा कमविण्याची कला साध्य असते. पण कमवलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर शिकवतो. म्हणून व्यापारी लोक या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेराची पूजा करतात. लक्ष्मीला घरात पसारा, अस्वच्छता आवडत नाही. जिथे टापटीप असते, तिथे तीला राहायला आवडते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ टापटीपपणा म्हणजेच सुंदर असे नाही. तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, मनात चालकपड किंवा मोह विकार व अवगुण नसतात, जो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने प्रामाणिकपणे करतो. ती व्यक्ती लक्ष्मी व कुबेरला प्रिय असते.

लक्ष्मीपूजनाचे महत्व :-

लक्ष्मीपूजनाचे व्यापारी वर्गातही खूप महत्त्व आहे. तसेच सामान्य मनुष्य सुद्धा हिंदू धर्मातील देवी-देवतांची पूजा करत असतो. परंतु दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. याच दिवसापासून व्यापारी वर्गाचे हिशोबाचे नवीन वर्ष सुरू होते. तसेच दुकानाची सजावटही करून लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन या दिवशी केली जाते. घरातील संपत्ती, लॉकर सर्व खुले केले जातात.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. नाशिकमध्ये वर्षानुवर्षे दिवाळीतील इतर विक्रीते त्याप्रमाणेच झाडू फळा विक्रीते देखील परराज्यातून दाखल होऊन विक्री करतात. आधीच्या काळात रात्री कुबेर पूजन करण्याची प्रथा होती. कुबेर हा खजिनदार आणि संपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजन हा मूळ संस्कृतिक कार्यक्रम होता.

परंतु गुप्तकाळात वैष्णव पण त्याला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेरा बरोबर लक्ष्मीची पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशान काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्यांची पत्नी सह दाखवला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नीची सुद्धा पूजा केली जात होती. कालांतराने इरीतीची जागा लक्ष्मी व कुबेरा जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.

लक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे. तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही म्हटले जाते. तिला जेष्ठा, षष्टी व सटवी, निऋत्ती या नावाने ओळखतात. निऋत्ती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून मान्य केले, तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशती मध्ये आहे. हेच महत्त्व आपल्याला दिसून येते.

लक्ष्मी पूजा कशी साजरी केली जाते :-

लक्ष्मीपूजन हे मोठ्या आनंदात व उत्साहाने करतात. लक्ष्मी पूजन करण्यामागे की, घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य व आरोग्य सतत नांदत राहो व अज्ञानाचा नाश होऊ अशी देवीला प्रार्थना करतात. लक्ष्मीपूजन दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी करत असतात. यामध्ये लक्ष्मीची पूजा करून घरासमोर सुशोभीत रांगोळी काढून दारी झेंडूच्या फुलांचे तोरण लावून फराळाला लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावस्या लक्ष्मीपूजन साजरे केले जाते.

लक्ष्मी पूजन कसे केले जाते, ते आपण पाहूया. बाजारामध्ये मातीची लक्ष्मीची मूर्ती मिळते. ती विकत आणून तसेच पाच मडके सुद्धा पूजनासाठी आणत असतात. त्या छोट्या मडक्‍यांमध्ये लाह्या व बत्ताशेचा प्रसाद आणि वर एक रुपया ठेवतात. असे पाच मडके भरून देवीसमोर ठेवतात. पूजेसाठी श्रीयंत्र गजलक्ष्मी किंवा नारळ-सुपारी खोबरं यांचा विडा असतो. तसेच पैसे आणि पूजेसाठी हळदीकुंकू, अक्षदा, कापूर अगरबत्ती आणि दिवा महत्त्वाचा असतो.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती, माता लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेला फोटोची सुद्धा पूजा केली जाते. आश्‍विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात. त्याच्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

अश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा सर्व वायूमंडलातील गतिमान होण्यास सुरुवात होताना. घरातील केर, कचरा काढल्यामुळे त्रासदायक घटक वायू मंडळात गतिमान असणाऱ्या त्रासदायक घटक घराच्या बाहेर फेकली जातात. त्यामुळे घराचे पवित्र टिकून राहते. म्हणून आश्‍विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी निस्सारण म्हणजेच रात्री बारा वाजता घरातून केर काढतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. म्हणून व्यापारी वर्गामध्ये लक्ष्मीपूजन मोठ्या थाटामाटाने व उत्साहाने साजरे केले जाते.

लक्ष्मीपूजन विषयी पौराणिक कथा :-

लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन बाबत एक पौराणिक कथा प्रचलित आहे. जेथे स्वच्छता सौंदर्य आनंद उत्साह आहे किंवा सकारात्मकता आहे. तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. अनेक घरांमध्ये श्री सूक्तपाठ केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या प्राचीन काळातील उपलब्ध असलेल्या संदर्भानुसार अगोदर रात्री कुबेर पूजन करण्याची पद्धत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार होता आणि धनसंपत्तीचा स्वामीसुद्धा मानला जातो.

दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्याचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पुजने हा संस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पण त्याला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेरा बरोबरच लक्ष्मीची ही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत.

काही मूर्ती कुबेर त्याची पत्नी दाखविण्यात आले आहे. यावरून प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरितिची पूजा केली जात असावी असे मानले जाते. कालांतराने तिचे स्थान लक्ष्मी घेते आणि पुढे गणपतीला केले गेले अशी ही कहाणी आहे.

“तुम्हाला आमची माहिती लक्ष्मीपूजन विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

प्रमोद तपासे

माझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझे आवडते शिक्षक वर १० ओळी 10 Lines On My Favourite Teacher In Marathi माझी शाळा वर १० ओळी 10 Lines On My School In Marathi