लाख मोलाचा देह – मराठी बोधकथा Lakh Molacha Deh Story In Marathi

Lakh Molacha Deh Story In Marathi एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला.

Lakh Molacha Deh Story In Marathi

लाख मोलाचा देह – मराठी बोधकथा Lakh Molacha Deh Story In Marathi

मालकाने सेवकाला त्याला वर बोलवायला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनात आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल.

वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, ‘हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण बदल्यात तु मला तुझे डोळे दे.’
‘छे ! छे ! हे कसं शक्य आहे? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.’ भिकारी म्हणाला.

‘बरं मग असं कर हात तरी देतोस का?’ व्यापारी म्हणाला.
अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता.

शेवटी व्यापारी म्हणाला, ‘बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस? कष्ट कर पैसे मिळव’.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment