कृष्णा नदी विषयी संपूर्ण माहिती Krishna river information in Marathi

Krishna river information in Marathi कृष्णा ही नदी दक्षिण भारतातील एक महत्त्वाची नदी असून ती पश्चिम भारताच्या किनारपट्टीपासून फारच दूर असलेल्या महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वरजवळ पश्चिम घाटांच्या साखळीपासून उगम पावते. हे पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि नंतर सामान्यत: सांगलीमार्गे कर्नाटक राज्याच्या सीमेकडे दक्षिण पूर्व दिशेने वाहताना दिसते. हिंदू धर्मात या नदीलाही महत्त्वाचे स्थान आहे. ती भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. तर चला मग पाहूया या नदी विषयी सविस्तर माहिती.

Krishna River Information In Marathi

कृष्णा नदी विषयी संपूर्ण माहिती Krishna river information in Marathi

कृष्णा खोऱ्याचे क्षेत्रफळ :

कृष्णा नदीचे एकूण क्षेत्रफळ हे वेगवेगळ्या राज्यात विभाजित झालेल्या आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ पाहता 2,58,948 चौरस. किलोमीटर आहे. कृष्णा नदीच्या एकूण क्षेत्रफळांपैकी 28,700 चौ. किलोमीटर क्षेत्र महाराष्ट्रात 1,13,271 चौ. कि.मी. म्हणजे 44% क्षेत्र कर्नाटकात व 76,252 चौ. कि.मी. म्हणजे 29% क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे.

कृष्णा नदीचा उगम व प्रवास :

कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे झाला असून तेथे कृष्णा वेण्णा कोयना गायत्री व सावित्री या नद्यांची देखील उगम झरे दिसतात. या नद्या महाबळेश्वर वरून वेगवेगळ्या आदेशाने वाहत जातात व त्यांना मूळ पाणीपुरवठा मुक्त मोसमी पावसापासूनच मिळतो. महाबळेश्वर येथे दरवर्षी 625 सेंमी. हून अधिक पाऊस पडतो. त्याच्या पूर्वेस 20 किमी. पाचगणी येथे 225 सेंमी., तर 32 किमी. वरील वाई येथे फक्त 60 ते 75 सेंमी. पाऊस पडतो.

महाबळेश्वर डोंगराच्या उत्तरेकडून खाली येऊन कृष्णा आग्नेय व पूर्व दिशांनी वाहू लागते. 10 किमी. वरील धोम येथे धरण बांधले जात आहे. वाई खोऱ्याला समृद्ध करीत कृष्णा वाईच्या आग्नेयीस 37 किमी. वर असलेल्या माहुलीस येते. येथे कृष्णेला वेण्णा नदी मिळते. या ठिकाणावरूनच कृष्णा नदी ही दक्षिण वाहिनी होते. माऊली पासून पन्नास किमी कराड येथे कृष्णा आणि कोयना यांचा संगम आहे.

उपनद्या :

कृष्णा नदीच्या काही उपनद्या आहेत. त्यामध्ये कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी ह्या सातारा जिल्ह्यातील कृष्णाच्या उपनद्या असून वारणा, येरळा, माण, अग्रणी व बोर ह्या सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख उपनद्या आहेत. यापैकी कृष्णा वारणा व एरन्ना नद्या निश्चितपणे पाऊस पडणाऱ्या प्रदेशातूनच वाहत येतात तर कृष्णही सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी नदी असून सांगली जिल्ह्यातील तिचा प्रवाह 130 किलोमीटरचा आहे.

तसेच ती वाळवा, पलूस व मिरज तालुक्यांतून प्रथम पश्चिमेकडून पूर्वेकडे व त्यानंतर आग्नेय दिशेस वाहते.
कृष्णा नदीचे खोरे हा सांगली जिल्ह्यातील सुपीक भाग आहे. या जिल्ह्यातून वाहणाऱ्या वारणा, येरळा, अग्रणी व या प्रमुख उपनद्यांबरोबरच कासेगाव व पेठ या नद्या आणि कटोरा ओढा, वाळू ओढा व खरा ओढा हे प्रमुख प्रवाह कृष्णेला मिळतात.

कृष्णा खोऱ्यातील शेती व पिके :

कृष्णा नदीच्या पाण्यांवर शेती हा व्यवसाय केला जातो. त्यामध्ये आंध्र प्रदेशात कृष्णा नदीच्या खोऱ्याला ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळाल्यामुळे अनेक लहान मोठ्या उपनद्यांनी कृष्णा ही जलसमृद्ध झालेली असते. या भागात त्रिभुज प्रदेशामध्ये मुख्य भाताचे पीक घेतले जाते. या प्रदेशात पुराच्या वेळी जिकडेतिकडे पाणीच पाणी होऊन नजर न पोहोचेल एवढे जणू काही एकच भारताचे शेत आपल्याला दिसते.

त्यामध्ये विजयवाडा, बंदर, गुंतुर एलुरू ह्या प्रसिद्ध अशा तांदुळाच्या बाजारपेठा आहेत. मका, राखी, ऊस, ज्वारी, भुईमूग, कापूस, एरंडी, तंबाखू, केळी व भाजीपाला इतर पिके ही इथे घेतली जातात. याव्यतिरिक्त या भागांमध्ये शेतीवर आधारित पशु जसे गुरे, मेंढरे यांची पैदासही मोठ्या प्रमाणात केली जाते.

समुद्रकिनाऱ्यावर व नद्या सरोवरांमधून मासेमारी ही मोठ्या प्रमाणात चालते. आंध्र प्रदेशातील कृष्णाच्या खोऱ्यात उद्योगधंद्यांची वाढ ही वेगाने होत आहे. आंध्र प्रदेशातील कृष्णेच्या खोऱ्यात उद्योगधंद्यांचीही वाढ वेगाने होत आहे. या राज्यातून कृष्णा 720 किमी. वाहते.

कर्नाटक या राज्यांमध्ये कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये पावसाचे प्रमाण हे खूपच बेताचेच आहे. त्यामुळे येथे गहू, ज्वारी, कडधान्य, तंबाखू, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. ज्या भागापर्यंत पाणीपुरवठा होईल त्या भागापर्यंत उसाचे उत्पादनही येथे वाढत आहे कृष्णा नदीची दक्षिणेकडील महत्त्वाची मोठी उपनदी म्हणजे तुंगभद्रा ही आहे. परंतु ती नदी कर्नाटका मधून येते व कर्नाटका बाहेर कृष्णा नदीला मिळते.

कर्नाटक या राज्याला कृष्णा नदी पेक्षाही इथुंग भद्रेचाच पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात होतो व ती अधिक उपयोगी आहे. शिमोगा, चित्रदुर्ग, बिल्लारी, रायपूर या जिल्ह्यातील नद्या तुंगभद्रेलाच पाणीपुरवठा करतात. तसेच मल्हापुरम येथे तुंगभद्रेवर मोठे धरण बांधलेले आहे.

कृष्णा नदीच्या खोऱ्यातील वनस्पती व प्राणी :

कृष्णा नदीच्या खोऱ्यामधील विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसून येतात तसेच वृक्ष ही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामध्ये जांभूळ, सुरंगी, हिरडा, नाग चाफा, फणस अंजनी सावर, शिसव, तमालपत्र, किंजळ, असाणी, कुंभी, कव्हा, चिंच, कवठ, बोर, बेल, बाभूळ, साग, धामण, शिवण, धावडा, ऐन, किनई, खैर इ. वृक्ष आढळून येतात तर काही प्रमाणात औषधी वनस्पती देखील आढळून येतात त्यामध्ये भारंग, वाकेरी, कुडा, वावडिंग, सातवी, घायटी, बेडकी, बिब्बा, बाव्हा, भुईकोहळा इत्यादी आहेत.

कृष्णा नदीच्या खोऱ्यात ज्याप्रमाणे वनस्पती आढळून येतात. त्याचप्रमाणे काही प्राणी देखील आढळून येतात. त्या प्राण्यांमध्ये सांबर, गवा, वाघ, चित्ता, भेकर, रानडुक्कर, अस्वल, तरस, चितळ, ससा, लांडगा इ. प्राणी अनेक जातीचे सर्प, पक्षी व कीटक आहेत.

कृष्णा खोऱ्यात होणार्‍या पूर आणि दुष्काळाची परिस्थिती :

कृष्णा नदीच्या खोऱ्यात बरेच वनस्पती व शेती योग्य पाणीपुरवठा असला तरीही त्यातील काही ठिकाणी असे आहेत. जेथे दुष्काळ व पूर यांचे परिस्थिती निर्माण होते. त्यामध्ये सोलापूर, पुणे, अहमदनगर, महाराष्ट्राचा उस्मानाबाद प्रदेश, आंध्र प्रदेशाचा रायल सीमा विभाग आणि कर्नाटकातील विजापूर, रायपूर, चित्रदुर्ग, विजापूर शहर या काही भागांमध्ये दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होते.

कृष्णेच्या गळाच्या ठेवीमुळे कृष्णेचा डेल्टा भाग सतत भरलेला असतो. किनारपट्टी भागात चक्रीवादळ व पुराच्या वादळांमुळे झालेला मुसळधार पावसामुळे पुराचा धोका नेहमी सतावत असतो.

प्रदूषण :

कृष्णा नदीच्या आसपास असणारे साखर कारखाने व इतर उद्योग आणि गावचे सांडपाणी यामुळे कृष्णा नदीचे पाणी दूषित झाले असून यामध्ये मासेमृत होण्याच्या घटना सतत घडत असतात.

आपण पाहिले आहे की जुलै 2019 मध्ये नदीतील विषारी रसायनांमुळे असंख्य मासे मृत होऊन नदी काठावरच्या गावात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. तसेच याच काळात पाच वर्षाच्या मोठ्या मगरीचा देखील मासे खाल्ल्यामुळे मृत्यू झाला होता. म्हणजेच कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण झाले आहे.

कृष्णा नदी प्रकल्प :

कृष्णा नदी ही महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यातून वाहत असल्यामुळे प्रत्येक राज्यात अनेक लहान मोठे प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण करण्याचे प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्रातील कोयना प्रकल्प कर्नाटक मधील तुंगभद्रा प्रकल्प व आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर प्रकल्प हे विशेष मोठे प्रकल्प या नदीवर आपल्याला दिसतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-


कृष्णा नदीचे महत्त्व काय?

खोऱ्यातील लोकांसाठी कृष्णा नदीला खूप महत्त्व आहे. ही भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि जलसाठ्याच्या क्षमतेमध्ये सातव्या क्रमांकाचे नदीचे खोरे आहे . कृष्णा नदीचे खोरे सुमारे 400 दशलक्ष लोकांचे घर आहे आणि हा एक कृषी-आधारित प्रदेश आहे.


कृष्णा नदी किती जिल्ह्यातून वाहते?

नदीचा उगम सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेत झाला आहे. ती कृष्णा नदीला मिळण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून पूर्वेकडे वाहते. त्यानंतर दूधगंगा कर्नाटक व महाराष्ट्राच्या सिमेवरुन वाहत जाऊन बेळगाव जिल्ह्यातील एकरुंबे गावाजवळ उजव्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडून कृष्णा नदीला मिळते.


कृष्णा नदीची लांबी किती?

१,४०० किमी (८७० मैल)


कृष्णा नदीचे नाव कसे पडले?

 कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्या, पावसाचे नमुने आणि भारतातील त्यांचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व यावर लक्ष केंद्रित करतो. पवित्र आणि पवित्र कृष्णा नदीचे नाव भगवान श्रीकृष्णाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे . पूर्वी ही नदी किस्तना म्हणून ओळखली जात होती. हे भारताच्या दक्षिण-मध्य भागात वसलेले आहे.

1 thought on “कृष्णा नदी विषयी संपूर्ण माहिती Krishna river information in Marathi”

Leave a Comment