इंद्रावती नदी विषयी संपूर्ण माहिती Indravati River Information In Marathi

Indravati River Information in Marathi इंद्रावती ही नदी उडीसा, छत्तीसगड व महाराष्ट्र या तीन राज्यातून वाहणारी नदी आहे. तसेच ही नदी आपल्या वाटचालींमध्ये विविध टप्प्यांवर छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमारेषा देखील तयार करते. इंद्रावती नदीला छत्तीसगड राज्यातील बस्तर या जिल्ह्याचा प्राणवायू म्हणूनही ओळखला जातो. कालाहंडी नंबरंगापूर, ओडिशाचा आणि छत्तीसगडचा बस्तर जिल्हा भारतातील सर्वात हिरवाईने नटीला जिल्ह्यांपैकी एक आहे. तर चला मग पाहूया या नदी विषयी सविस्तर माहिती.

Indravati River Information In Marathi

इंद्रावती नदी विषयी संपूर्ण माहिती Indravati River Information in Marathi

इंद्रावती नदीचा उगम :

इंद्रावतीचा उगम कलाहंडी जिल्ह्यातील रामपूर ओडिसा येथे झालेला आहे. तीन प्रवाहांच्या एकत्रीकरणामुळे नदी पश्चिमेकडील मार्गाचा अवलंब करते आणि छत्तीसगड राज्यातील जगदलपुरमध्ये प्रवेश करते. तीन राज्यांच्या सीमेवर गोदावरीशी एकरूप होण्यापूर्वी नदी येथून दक्षिणेकडील मार्गाने पुढे जाते.

नदी प्रवाह :

इंद्रावती नदी मुख्यतः छत्तीसगड राज्यातील बस्तर दंतेवाडा जिल्ह्यातून वाहते. जिल्ह्यातील भद्रकाली येथे इंद्रावती नदी आणि गोदावरी नदीचा संगम आहे. तळ खडकाळ असल्यामुळे त्यात नौकानयन शक्य नाही. या नदीचा प्रवाह सुरुवातीला पश्चिमेकडून नंतर दक्षिणेकडे होतो.

नदीचा बहुतेक भाग नबरंगापूर आणि बस्तरच्या घनदाट जंगलातून जातो. या नदीची एकूण लांबी महाराष्ट्र, छत्तीसगड ओडिशा हे राज्य मिळून 535 किलो मीटर एवढी आहे. तीनही राज्य मिळून एकूण 4,000 चौरस किलोमीटर क्षेत्र या नदीने व्यापलेले आहे. महाराष्ट्रातून या नदीचा प्रवाह 129 किलोमीटर इतका होतो.

इंद्रावती नदीचा इतिहास :

इंद्रावती नदीचा खूप प्राचीन इतिहास असा आहे. या नदीच्या किनाऱ्यावर प्राचीन काळातील अवशेष देखील बऱ्याच प्रमाणात सापडले आहेत. इंद्रावती नदी क्षेत्र हे प्राचीन मानवाचे आश्रयस्थान मानले जाते बस्तरच्या अनेक ठिकाणांवर इंद्रावती नदीच्या किनारी प्रगती काळातील पाषाण उपकरणे देखील मिळत होती. जगदलपुरच्या जवळ स्थित कालीपुर, माटेवाड़ा, घाटलोहंगा, देउरगाव, करंजी, चित्रकोट या क्षेत्रामध्ये पाषाणकाल तर उत्तर पाषाणकालीन उपकरणे मिळतात.

अनेक मानवी समुदाय निवास करतात. इंद्रावती नदी च्या बस्तर प्रवेश क्षेत्रामध्ये भटारा, हल्बा, सवरा, माहरा, पनका, कुम्हार समुदाय, मध्यवर्ती क्षेत्रामध्ये राजा मुरिया, भतारा, माडिया, दंडामी माडिया, हल्बा, मुंडा, कुडुख, केंवट, धाकड़, सुंडी, महारा आदि मध्यवर्ती क्षेत्रापासून संगमापर्यंत माड़िया, दंडामी माड़िया, हल्बा, गोंड, दोरला, परधान, राजगोंड, सुंडी, कोष्ठा, केंवट, राउत, महार, तेलंगा इ. जनसमुदाय निवास करतात. या क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे शेती हे उपजीविकेचे साधन आहे.

इंद्रायणी नदी खोऱ्यातील प्राणी वनस्पती जीवन :

इंद्रावती खोऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचा वास आहे. मासे, खेकडे, मगर या प्रदेशामध्ये जास्तप्रमाणात आढळून येतात तर इंद्रावती नदीमध्ये बोध माशांची ही एक जात आहे. ती बस्तरची शार्क या नावाने प्रसिद्ध असून या माशाचे वजन 150 किलो असते.

येथील जंगलांमध्ये वाघ, सिंह, अस्वल, हरीण, निलगाय, मोर, ससे अशा अनेक वन्य प्राण्यांचा समावेश होतो तर प्राण्यांबरोबर अनेक जातींचे पक्षी देखील येथे पाहायला मिळतात. येथील जंगलांमध्ये अनेक प्रकारची वृक्ष आहेत. त्यामध्ये तेंदु, शीशा, साल, आंबा अशा प्रकारची आहेत.

नदीचे सामाजिक महत्त्व :

बस्तरच्या लोकांचा इंद्रावती नदीवर धार्मिक श्रद्धा असून भक्तीचे ते एक प्रतीक आहे असे ते मानतात. छत्तीसगडमधील जगदलपूर शहर या नदीच्या मुखावर वसलेले आहे. हे एक प्रमुख सांस्कृतिक आणि हस्तकला केंद्र आहे. या क्षेत्रामध्ये इंद्रावती नदीमुळे पाऊस हा चांगल्या प्रमाणात होत असून जमिनीच्या सुपीकतेमुळे शेती ही चांगल्या प्रकारे होते. तसेच मासेमारी हा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात केला जातो.

इंद्रावती नदीच्या उपनद्या :

इंद्रावती या नदीला प्रमुख उपनद्या आहेत. त्यामध्ये नाला, कांदबिंधा नाला, चंद्रगिरी नाला, गोलागर नाला, पोरागड नाला, कापूर नाला, मुराण नदी, बांगिरी नाला, तेलंगी नाला, पार्लिजोरी नाला, तुरी नाला, चौरीजोरी नाला, दाराह नाला. नदी, मोदंग नदी, पदरीकुंडीजोरी नदी, जौरा नदी आणि भास्केल नदी. इंद्रावतीच्या उजव्या काठावरील महत्त्वाच्या उपनद्या भास्केल, बोर्डिंग, नारंगी, निंब्रा, कोत्री आणि बांदिया आहेत. नंदीराज ही महत्त्वाची डाव्या तीराची उपनदी आहे.

इंद्रावती नदीवरील धरण :

या नदीवर जे धरण बांधण्यात आले आहे, ते इंद्रावती धरण किंवा अप्पर इंद्रावती जलविद्युत प्रकल्प मुखीगुडा त्याच्याजवळ बांधले आहे. कालाहंडी हे भारतातील तसेच आशियातील सर्वात मोठे धरण आहे. हे पूर्व भारतातील सर्वात मोठे धरण आहे. जे 600MW वीज निर्मिती करते. उर्ध्व इंद्रावती प्रकल्पामध्ये इंद्रावती नदीचे पाणी तिच्या वरच्या भागातील महानदी खोऱ्यात वीज निर्मिती आणि सिंचनासाठी वळवण्याची कल्पना आहे.

नदी विषयी आकर्षण :

इंद्रावती या नदीवर भारतातील सर्वात मोठा धबधबा असून तो पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. येथे इंद्रावती नदी 90 फूट उंचीवरून धबधब्याच्या स्वरूपात येते. मासेमारी, नौकाविहार आणि पोहण्याच्या सुविधाही येथे पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. हा धबधबा कॅनडाच्या नायगारा फॉल्स नंतर जगातील दुसरा सर्वात मोठा धबधबा मानला जातो. येथून 10 किमी अंतरावर नारायणपाल मंदिर आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

इंद्रावती नदीच्या उपनद्या कोणत्या?

भास्केल नदी, नारंगी नदी, निंब्रा नदी, कोत्री नदी आणि बांदिया नदी 

इंद्रावती ही गोदावरीची उपनदी आहे का?

इंद्रावती नदी ही मध्य भारतातील गोदावरी नदीची उपनदी आहे 


इंद्रावती कुठे आहे?

 भारताच्या छत्तीसगड राज्यातील विजापूर जिल्ह्यात 


इंद्रावती धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

ओडिशा 

Leave a Comment