इंटरनेटचे महत्त्व मराठी निबंध Importance Of Internet Eassy In Marathi

Importance Of Internet Eassy In Marathi आजच्या काळामध्ये मोबाईल, लॅपटॉप आणि कम्प्युटर यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे .परंतु त्यांना हे महत्त्व प्राप्त होण्यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे इंटरनेट होय. मोबाईल, कॉम्प्युटर्स आणि लॅपटॉप त्यांना खरे महत्त्व प्राप्त करण्याची किमया ही इंटरनेटने केली आहे. आजच्या काळामध्ये इंटरनेटच्या सुविधांमुळे खूपच वयस्कर होऊन आपला वेळ वाचवण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे.

Importance Of Internet Eassy In Marathi

इंटरनेटचे महत्त्व मराठी निबंध Importance Of Internet Eassy In Marathi

हे इंटरनेट म्हणजे नक्की काय? तर संगणकाद्वारे होणारे संदेशवहन. आज संगणकाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवेश मिळविला आहे कुठलेही काम करायचे असेल तर आपल्याला संगणकाचे आवश्यकता लागते. आणि या संगणकाला अधिक सुलभ करण्याचे व आपले जीवन सोयीस्कर व सुलभ करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे इंटरनेटने केले आहे म्हणून इंटरनेट ला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते.

ऑफिस मध्ये खूप सारे संगणक असल्या ते सर्व संगणक एकमेकांना जोडून त्याचे नेट तयार केली जाते. त्यामुळे हे सर्व संगणक एकमेकांशी संवाद साधू शकतात. जगभरामध्ये जोडलेल्या अशा सर्व जाळी किंवा नेट एकमेकांशी जोडलेले असते त्यांना आपण इंटरनेट असे म्हणतो.

1969 साली इंटरनेट या कल्पनेचा जन्म झाला. सुरुवातीला इंटरनेटचा वापर हा फक्त संदेश वाहण्यासाठी केला जात होता. परंतु जसजसा आधुनिक जगाने प्रगती केली तसा तसा इंटरनेटच्या क्षेत्रात अमुलाग्र असा बदल होत गेला आणि आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण इंटरनेटचा वापर करतो.

व्यवसायाच्या क्षेत्रापासून शिक्षणाच्या शेताच्या प्रत्येक भागामध्ये इंटरनेट वापरले जाते. आज आपल्यासाठी इंटरनेटचे इतके महत्त्वाचे आहे मी जर इंटरनेट थोड्या काळासाठी बंद झाले तर आपले दैनंदिन जीवन सुद्धा बंद होते.

इंटरनेटच्या वापरामुळे बुद्धिमान व्यक्तीना प्रगत राष्ट्रात जाता येऊन तेथील प्रगतीचा उपयोग आपल्या देशासाठी किंवा स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीसाठी करता येऊ शकतो. व्यापाराच्या दृष्टीने तर इंटरनेटचे दुहेरी परिणाम होत आहेत.

जागतिक व्यापारपेठ इंटरनेटच्या मदतीने खोली असल्याने आपला माल सर्व जगभरातील देशांमध्ये पाठवणे शक्य झाले. तसेच पर्यावरण क्षेत्रामध्ये देखील इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावतो. नवनवीन घातक द्रव्ये, त्याचा वापर, पर्यावरणाचे संरक्षण, याचे उपाय व त्या विषयी त्वरित माहिती मिळवणे इंटरनेट मुळे शक्य झाले आहे.

थोडक्यात इंटरनेटने मानवाला आणखीन प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी हातभार लावला आहे. इंटरनेटचा एक दोष म्हणजे त्यात माहितीचा असणारा व न पेलवणारा साठा माहितीच्या समुद्रातून आपल्याला हवी ती माहिती मिळवणे खूप मुश्कील आहे.

त्यामुळे आपल्याला हावी ती माहिती मिळवण्यासाठी विविध प्रकारचे ब्राऊजर्स तयार करण्यात आल्या ज्यांच्या माध्यमातून आपण काही सेकंदांमध्ये आपल्याला हवी ती माहिती प्राप्त करू शकतो.

तसेच इंटरनेटच्या मदतीने आपण करमणुकीचा खेळ, चित्रपट आणि संगीताच्या आदानप्रदान करण्यासाठी इंटरनेटचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात होत आहे.

इंटरनेटच्या मदतीने मध्ये आपण जगभरातील कुठलीही गोष्ट सहजपणे माहिती प्राप्त करून घेऊ शकतो इतकेच नसून इंटरनेटच्या मदतीने आपण मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप यामध्ये वेगवेगळ्या ॲप्स युज करू शकतो. तसेच जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असलेल्या व्यक्तीशी सहज पणे बोलणे त्याच्याशी व्हिडीओ कॉलिंग च्या मार्फत बघणे बोलणे शक्य झाले आहे.

आज इंटरनेटस शिक्षणाच्या क्षेत्रातही आमूलाग्र असे बदल घडवून आणले आहेत. आज विविध क्षेत्रांमध्ये आणि संशोधनांमध्ये झालेले बदल हे देखील इंटरनेटची देणगी आहे. आजच्या काळामध्ये इंटरनेट शिवाय जगणे शक्यच नाही त्यामुळे इंटरनेटचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

इंटरनेटच्याच्या माध्यमातून आपण आपल्या कलागुणांना वाव देऊ शकतो. आज इंटरनेटचा वापर करून कित्येक जण घरबसल्या आपले व्यवसाय देखील करीत आहे. इंटरनेटमुळे आपले जीवन अधिकच सोयीस्कर आणि सोपे झाले आहे. इंटरनेटच्या मदतीने घरबसल्या पैशाची देवाणघेवाण करणे, ऑनलाईन खरेदी करणे, ऑनलाइन खरेदी विक्री, युट्युब सारख्या ॲपच्या मदतीने विविध गोष्टी शिकता येतात.

आज संपूर्ण जगभरामध्ये covid-19 एटीन सारखे महामारी पसरले आहेत यामुळे सगळे व्यवसाय उद्योगधंदे सर्व काळ ठप्प झाले आहेत तरीसुद्धा या काळामध्ये काही लोक इंटरनेटच्या मदतीने आपले व्यवसाय सुरूच ठेवत आहेत एवढेच नसून आजचे शिक्षण इंटरनेटच्या मदतीने ऑनलाईन झाले आहे. जरी संपूर्ण चक बंद असले तरी इंटरनेटची सेवा ही कायमस्वरूपी चालू असल्याने आपले व्यवसाय ऑनलाइन करणे सहज शक्य झाले आहे.

इंटरनेट मुळे आपले ज्ञानभंडार वाढतो. आपल्या नाना मध्ये आणखीन भर पाडण्यासाठी इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावतो. इंटरनेट जन्म जरी संदेशाचे वाहन करण्यासाठी केला असले तरी आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये इंटरनेटला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

आजच्या आधुनिक काळाला आणखीन आधुनिक करण्यासाठी व माणसाचा, देशाचा जगाला प्रगतीपथावर ठेवून देण्यासाठी इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून इंटरनेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment