जास्वंद फुलाची संपूर्ण माहिती Hibiscus Flower Information In Marathi

Hibiscus Flower Information In Marathi जास्वंद ही वनस्पती फुलझाडी असून आपल्याला भारतामध्ये बऱ्याच घरांच्या सभोवताली दिसून येतात. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती खूप लोकप्रिय आहे. जास्वंदाचे फुल दिसायला सुंदर असून त्यामध्ये विविध रंग आपल्याला दिसून येतात. जसे पांढरा, लाल, पितरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी असं त्यामध्ये प्रकार आढळतात. जास्वंदाचे फुल बाहेरून आकर्षक दिसते. या फुलांकडे मधमाशा फुलपाखरे आणि काही पक्षीही आकर्षित होतात. परंतु हे फुल फार काळ टिकत नसते. पहाटच्या कहाणीही फुल टवटवीत सौंदर्य उधळणारे दिसते तर संध्याकाळी ते मलुल दिसते. तर चला मग जाणून घेऊया जास्वंद या फुलाविषयी सविस्तर माहिती.

Hibiscus Flower Information In Marathi

जास्वंद फुलाची संपूर्ण माहिती Hibiscus Flower Information In Marathi

जास्वंदाची रचना :

जास्वंद या झोपेय वनस्पतीची उंची जास्तीत जास्त 15 फुटापर्यंत असू शकते. तसेच ही झुडूपवर्गीय सदाहरित वनस्पती आहे. जास्वंदाच्या फुलात पाच पाकळ्या असतात. फूल आकाराने मोठे असून पाकळ्या मांसल असतात. पुयुग्म आणि स्त्रीयुग्म हे भाग फुलाच्या मध्यभागी एका दांडीवर असतात. परागकण किडणीच्या आकाराच्या पिशव्यांमध्ये बंदिस्त असतात. या पिशव्या पिवळ्या रंगाच्या असतात. या फुलाच्या मध्यभागी असणाऱ्या दांडीच्या वरच्या बाजूला असतात. आपल्या अनेक रंगांची जास्वंदाची फुले आढळतात.

जास्वंदाच्या पानाचा आकार :

जास्वंदाची पाने गडद हिरव्या रंगाची असून पसरट असतात. पानांचा आकार वेगवेगळा असतो. पानांची कडा दातेरी असते. या पानांचा देखील औषधांमध्ये उपयोग केला जातो. या पानांचा उपयोग केस मजबूत आणि घनदाट होण्यासाठी केला जातो तसेच पानांचा रस आणि काढा अनेक व्याधींवर गुणकारी मानला जातो.

जास्वंदाच्या झाडाला फळे येत नाहीत. फळे नाही त्यामुळे बिया नाहीत. फांद्यांपासून नवीन रोपे तयार करता येतात. जास्वंद अगदी कमी पाण्यात वाढते. ग्रामीण भागातील घराभोवती किंवा शेतीला कुंपण करण्यासाठी या झाडांच्या उपयोग केला जातो किंवा बागांमध्ये देखील ही रोपे लावली जातात.

जास्वंदाची विविध नावे :

जास्वंद या फुलाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जसे की, हरिवल्लभ, जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, संस्कृत मध्ये जपा, अरुणा, जासुम, जवाकुसुम, रोझेला, जमेका सॉरेल, शू-फ्लॉवर, चायना रोज इत्यादी नाव आहे.

जाती व प्रजाती :

जास्वंदाच्या शंभरहून अधिक जाती प्रख्यात असून जास्वंदचे फुल त्याच्या सुंदर दिसणाऱ्या मोठ्या पाकळ्यांमुळे आकर्षित करते. आपल्याला एकेरी, डबल लाल जास्वंद व पांढरा जास्वंद ओळखीच्या आहेत. यातील सफेद जास्वंद दुर्मीळ असली तरी जास्त औषधी गुणधर्म त्यामध्ये आहे. औषधांत कळे, फुले व झाडाचे सालींचा उपयोग करतात. बाजारांत औषधांत वापरण्यासाठी जास्वंदीचे मूळ पिंपळवाळ, अळथी या नावाने मिळते.

धार्मिक महत्त्व :

जास्वंदाचे फुल हे गणपतीला वाहले जाते. तेही लाल भडक अशा रंगाचे फुलच श्री गणेशाला प्रिय आहे. गणपती अथर्वशीर्ष वर्णन केलेले फुलांचे वर्णन जास्वंदाशी तंतोतंत जुळते. म्हणूनच कदाचित जास्वंदाचे फुल गणपतीला वाहत असावेत. त्या व्यतिरिक्त घराच्या सजावटीमध्ये किंवा मंदिराच्या सजावटीमध्ये आपण या फुलांचा उपयोग करू शकतो. विधी कार्यक्रम असेल किंवा देवी देवतांना माला तयार करायचे असेल तर आपण त्यामध्ये देखील या फुलांची सजावट करू शकतो. कारण हे फुल दिसायला अत्यंत सुंदर व टवटवीत असते.

जास्वंदाच्या फुलाचा उपयोग :

जास्वंदाच्या फुलांचा, झाडाचा किंवा सालींचा उपयोग मानवी जीवनात होत असतो. जास्वंदाच्या फुलांमध्ये किंवा झाडांमध्ये जो औषधी गुणधर्म आहे तो खूपच गुणकारी मानला जातो.

जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. जास्वंदीच अर्क घातलेले केशतेल जबाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. शाम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पाना-फुलांच्या अर्काचा समावेश होतो.

इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक म्हणून वापरतात. इराणमधील वैद्य रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य रेचक म्हणूनही उपयोगात आहे.

पोट साफ करण्यासाठी, तर काही देशांमध्ये चक्क भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नानाविध रंग सरबतांसाठी किंवा जाम-जेलीसारख्या उपयोगात नायजेरियात खाद्य पदार्थांमध्येही वापरतात.

काही फुलांचा रंग उकळत्या पाण्यात बाहेर पडतो. मेक्‍सिकोमध्ये तर जास्वंदीच्या वाळलेल्या फुलांपासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार केला जातो.

जास्वदींचा चहा जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन C असते आणि हा जास्वंद च्या सुखावल्या पानापासून बनविला जातो. आफ्रिकेमध्ये कॅन्सर आणि आतड्याच्या आजारांवर वापर केला जातो आणि इराणमध्ये उच्च रक्तदाबावर देखील उपचार म्हणून वापर केला जातो.

जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेला रंग खाद्य पदार्थांमध्ये वापरतात. जास्वंदाच्या झाडाची साल आणि मुळेदेखील औषधात वापरली जातात. मधुमेह नियंत्रणात जास्वंदाच्या फुलांच्या वापरावर संशोधन चालू असून त्याचे निकाल सकारात्मक आहेत.

जास्वंदाची लागवड कशी करावी :

जास्वंदाची लागवड करणे फार असे अवघड गोष्ट नाही. जास्वंदाची लागवड करण्यासाठी आपल्याकडे कुंडी असेल तर कुंडीत किंवा जमिनीवर याची रोपे तयार करू शकतो. जास्वंदीच्या झाडाचे फांदीपासून नवीन रोप तयार करता येते आणि लागवडी नंतर फक्त  सहा महिन्यात छान फुले लागतात.

साधारण माध्यम जाडीची फांदी तोडून तिला दालचिनी पावडर आणि हळद यांच्या मिश्रणामध्ये दोन तीन तास ठेवा. यामुळे झाडाला संसर्ग होत नाही.  नंतर ती फांदी मातीत किंवा पाण्यात रुजविल्यास त्यास मुळे फुटतात आणि निरोगी झाड निर्माण होईल.

जास्वंदाच्या फुल झाडाविषयी घ्यावयाची काळजी.

जास्वंदाच्या झाडाला जेवढा जास्त फांद्या असतात तेवढे जास्त फुले उगवतात. त्यामुळे जास्वंदीला सतत छाटत राहिले पाहिजे म्हणजेच झाडाची उंची न वाढवता झाड डेरेदार तयार होऊन फुले धरतात. तसेच या झाडांना भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते कारण फुले येण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे.

योग्य सूर्यप्रकाशामुळे झाडांची वाढ चांगली होऊन ती अन्न तयार करतात आणि चांगली पुढे त्यांना उगवतात. त्या व्यतिरिक्त आणखीन एक दक्षता घ्यावयाची ती म्हणजे दररोज पाण्याची योग्य प्रमाण ठेवले पाहिजे. पावसाळ्यात पाणी देण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हो इतरांना शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

जास्वंद चे वैज्ञानिक नाव काय आहे?

Hibiscus rosa-sinensis

जास्वंदाचे फुल कसे असते?

जास्वंदीचे फुल दाट झाडीमध्ये लागते. हे एक सुंदर परंतु सुगंधरहित फुल असते. या फुलात पाच किंवा त्यापेक्षा जास्त पाकळ्या असतात. जास्वंदीची फुले लाल, पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी इत्यादी रंगामध्ये असते.

हिबिस्कस फुले कशी वापरायची?

हिबिस्कस चहा म्हणून ओळखले जाणारे खोल गुलाबी रंगाचे ओतणे तयार करण्यासाठी तुम्ही वाळलेले तुकडे गरम पाण्यात भिजवू शकता. साधा, या चहाला एक सूक्ष्म, तिखट आणि फुलांचा स्वाद आहे जो जबरदस्त नाही. इतर पेये आणि डिशेसमध्येही फुले उत्कृष्ट चव-इन्फ्युझर म्हणून काम करतात.

जास्वंदीच्या फुलांचा उपयोग काय?

जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. जास्वंदीच अर्क घातलेले केशतेल जबाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. शाम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पाना-फुलांच्या अर्काचा समावेश होतो. इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक (मूत्रल) म्हणून वापरतात.

हिबिस्कस फ्लॉवर कोणत्या प्रकारचे फुलणे आहे?

सायमोज फुलणे हिबिस्कसमध्ये आढळते.

हिबिस्कसचे दोन प्रकार कोणते आहेत?

हार्डी किंवा बारमाही हिबिस्कस. हिबिस्कसचे दोन मुख्य गट जे आपण आपल्या बागांमध्ये सामान्यतः वाढतो ते उष्णकटिबंधीय हिबिस्कस आणि हार्डी, हिवाळा-हार्डी किंवा बारमाही हिबिस्कस आहेत.

Leave a Comment