हरतालिका तीज व्रताचे महत्त्व Hartalika Teej Information In Marathi

Hartalika Teej Information In Marathi हिंदू धर्मातील महिलांसाठी तसेच कुमारिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक व्रत हे हरतालिका आहे. ग्रामीण भागातील महिला हे व्रत अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पार पाडतात. वेगवेगळ्या ठिकाणी हे व्रत करण्याची वेगवेगळी पद्धत आपल्याला दिसून येते.

Hartalika Teej Information In Marathi

हरतालिका तीज व्रताचे महत्त्व Hartalika Teej Information In Marathi

मात्र पूजा ही सारखीच असते त्या काळात निसर्गातील जे काही फळं फुलं पानं असतील त्या सर्वांचा उपयोग पूजेसाठी केला जातो. व सखी-पार्वती यांचे पिंड स्थापन करून त्यावर १०८ बेलपत्र वाहिली जातात. हरिता म्हणजे जिला नेले आणि आली म्हणजे सखी. पार्वती शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हटले जाते. हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हर गौरी संवादात आली आहे.

शिवपार्वती किंवा उमा महेश्वरी ही जगत माता-पिता म्हणून ओळखले जाते. स्त्रीतत्त्व व पुरुषत्व यांच्या मिळण्यातून विश्वाची निर्मिती झाली आहे. म्हणून आपण या तत्त्वाचे पूजन करतो. आदिशक्तीच्या पूजनातूनच तिचे प्रगटन आपल्यात व्हावे म्हणून आपण तिला प्रार्थना करतो. या भारतामध्ये वाळूचे लिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगा सहित मूर्ती आणून त्याची पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे.

संकल्प सोडा उपचार पूजन सौभाग्यलेणे अर्पण नैवेद्य आरती व कथावाचन असे आहे. हरितालिका हे व्रत भारतभर केले जाते. पार्वती सारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भागात अनेक ब्राह्मण कुमारीका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते. त्या काळात उपलब्ध असणारी नैसर्गिक सर्व फळं, पाने, फुले आणि बेलाचे पाने त्या शिवलिंगावर अर्पण केले जातात. विधवा स्त्री हे व्रत करू शकतात.

हरतालिकेचे महत्व:

हरतालिका हे व्रत अखंड सौभाग्यवती प्राप्त करून देणारे आहे. म्हणून भारतातील स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यासाठी हे व्रत ठेवतात. तसेच कुमारीका मुली आपल्याला चांगला नवरा मिळावा यासाठी हे व्रत ठेवून देवाकडे मागणे मागतात. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हरतालिका हे व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंताना दूर करणारे आहे. शास्त्रात या अमृताबद्दल असे म्हटले जाते की, हे व्रत सर्व पापांपासून मुक्ती देते. शिव-पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे.

निर्जला एकादशी प्रमाणे हरतालिका व्रताच्या दिवशी उपवास पाळण्यात येतो. पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्याच्या हेतूने हे व्रत केले होते. पार्वतीच्या इच्छेची पूर्ती हे याच दिवशी झाली होती. पतीप्रति आपली भावना भक्ती व इच्छित पती मिळावा यासाठी या व्रताचे पालन करण्यात येते. त्यानुसार पती मिळावा यासाठी मुलीही या व्रताचे पालन करतात. दुसऱ्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवून या उपासाची विसर्जन करण्यात येते. व सर्व पूजा विधि चे सामान एखाद्या नदीमध्ये सोडण्यात येते. उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते.

हरतालिका व्रत कसे साजरे करतात:

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका हे व्रत येते. या दिवशी मुली किंवा सुहासणी सुवासिक तेल लावून स्नान करतात. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावतात, रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करतात. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढीगा वरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, जानेफळ, ठेवतात. सर्वप्रथम स्वतःला हळद, कुंकू लावून देवासमोर विधी होतात.

अक्षदा हळद-कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करतात. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ केली जाते. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजा करतात. सर्व प्रथम गणपतीची आणि नंतर महादेव सखी-पार्वतीची पूजा करतात. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करतात.

पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे जवळ रांगोळी, तांदूळ पाण्याचा कलश पंचपात्र निरंजन हळदी, कुंकू, अष्टगंध, कापूर, गुलाल, बुक्का, चंदन व तुपाचा किंवा तेलाच्या दिवा, विड्याची पाने, सुपारी, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर गोड खोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, वस्त्र तसेच फनी, काजळ, काळे मण्याची पोथ आणि आरसा इत्यादी सौभाग्य द्रव्य या व्यतिरिक्त फुले, दुर्वा, तुलसीपत्रे व झाडांची पाने वाहतात. पूजा केल्यावर दुध, दीप, नैवेद्य दाखवून बेलपत्री वाहतात.

हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात, त्याचे क्रम असे आहे बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वाचा भाग, कन्हेर बोर, आंबा, डाळिंब, अशोकाची पाने वाहतात. नंतर मनोभावाने प्रार्थना करतात. कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी सुवासिनींनी अखंड सौभाग्य लाभू दे, अशी प्रार्थना करतात व या व्रताचा उपवास दिवस भर असतो. शक्य नसल्यास फलाहार सुद्धा करतात. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाही. नंतर रात्री झिम्मा फुगडी, टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळतात. जागरण करून हरतालिकेची कथा ऐकतात. भजन म्हणतात तसेच बाराच्या नंतर दही घालून वाटतात. या दिवशी उत्तरपूजा करून विसर्जित करतात. अशाप्रकारे ही पुजा साजरी केली जाते.

हरतालिका विषयी पौराणिक कथा:

हरतालिका या ग्रंथाविषयी कथा आहे. ती म्हणजे हिमाचल पर्वताची मुलगी गौरी ही पार्वती पर्वताची कन्या म्हणून पार्वती देखील म्हणतात. हिला भगवान विष्णूचे मागणे घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले होते. या अर्थ तिने हिमालयाला अतिशय आनंद झाला. त्याने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली. पण पार्वती तर खूप आधीपासून भोळे शंकर याला वर करून बसली होती. मनातल्या मनात तिने महादेवालाच आपला पती मानले होते.  असा तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन.

ती इतक्यावरच ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेली व शिव प्राप्तीसाठी अरण्यात जाऊन घनघोर तपस्या केली. सलग 12 वर्षे केवळ झाडाची पिकलेली पाने खाऊन पार्वतीने तपाचरण केले. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडकडीत उपवास केला, जागरण केले. तिच्या तपाने महादेव प्रसन्न झाले. पार्वतीच्या विनंतीला मान देऊन महादेवांनी पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. हे कथा हरतालिका व्रताची आहे.

आजही हिंदू धर्मातील स्त्रिया व मुली या व्रताचे आचरण करतात व हे व्रत केल्यामुळे त्यांना आनंद प्राप्त होते म्हणून मोठ्या आनंदाने व उत्साहाने हे व्रत करतात. सर्व पापांपासून मुक्ती मिळते. शिवपार्वतीचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या त्यांच्यावर असतो. या व्रतातून मुलींच्या मनात पती कामानेची इच्छा जागृत होते.

“तुम्हाला आमची माहिती हरतालिके विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

प्रमोद तपासे

माझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझे आवडते शिक्षक वर १० ओळी 10 Lines On My Favourite Teacher In Marathi माझी शाळा वर १० ओळी 10 Lines On My School In Marathi