घामाचा पैसा- मराठी बालकथा Ghamacha Paisa Story In Marathi

Ghamacha Paisa Story In Marathi मित्रांनो हि एक बाल कथा आहेत आणि या बालकथा मध्ये सांगितले आहेत कि मेहनत केल्याने त्याचे फळ नेहमीच चांगले मिळत असते.

Ghamacha Paisa Story In Marathi

घामाचा पैसा- मराठी बालकथा Ghamacha Paisa Story In Marathi

रामपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात सर्वात श्रीमंत असा गणूशेट राहत होता. तो खूप धनाढ्य होता. गणूशेटला एक अनिल नावाचा मुलगा होता आणि तो खूप आळशी होता.

घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल.

दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, ‘हे बघ अनिल आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.’

मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींच्या हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला.

दुसर्‍या दिवशी, आईकडून त्याला एक रूपया मिळाला. त्याने तो शेठजींच्या हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला.

तिसर्‍या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम काही मिळेना. पोटात कावळे ओरडायला लागले.

स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. ‘साहेब, इकडे आणा’.
ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. ‘बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?’

शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, ‘बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे.

दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.’

तात्पर्य : स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

प्रमोद तपासे

माझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझे आवडते शिक्षक वर १० ओळी 10 Lines On My Favourite Teacher In Marathi माझी शाळा वर १० ओळी 10 Lines On My School In Marathi