गौरीपूजन विषयी संपूर्ण माहिती Gauri Pujan In Marathi

Gauri Pujan In Marathi गौरीपूजन हा भारतातील बऱ्याच भागात साजरा केला जाणारा उत्सव आहे. त्यालाच गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते. भाद्रपद महिन्यातील हा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक ठिकाणी गौरी पूजनाच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत. तसेच आजकाल त्यांची पद्धतही बदलली आहे. गौरी म्हणजेच आठ वर्षाची कन्या असेही मानले जाते. गौरी म्हणजे पार्वती, पृथ्वी, पत्नी अर्थ एकच आहे.

Gauri Pujan In Marathi

गौरीपूजन विषयी संपूर्ण माहिती Gauri Pujan In Marathi

लक्ष्मी ही विष्णुपत्नी, महालक्ष्मी ही महादेव पत्नी पार्वती आहे. जी जेष्ठागौरी म्हणून संबोधले जाते. प्रत्येक ठिकाणी गौरीच्या पुजेची ही पद्धत आणि परंपरा वेगवेगळे आहे. बऱ्याच ठिकाणी पाच मडक्यांची उतरंड करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून साडी, चोळी नेसवतात, दाग दागिने घालून त्यांची पूजा करतात. काही घरात धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी १२ धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात.

बाजारात पत्र्याच्या लोखंडी सळ्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कुत्र्यांना साडी नेसवतात. धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटे ठेवतात. गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखवटा ठेवून काही ठिकाणी पूजा केली जाते. तसेच गौराईला तेरड्याची ही गौर असते. आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडणी या पद्धतीत व गौरीच्या रूपात ही आधुनिकता दिसून येते. विविध रूपात अनेक घरात गौरी महालक्ष्मी येतात. बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीची प्रतिमा करून कोणी मातीची बनवतात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्यांची पूजा करतात.

गौरी पूजनाचे महत्व ( Importance Of Gauri Puja In Marathi ):

गौरी पूजनाने आपल्या समाजातील लोकांना एकत्रित आणण्याचे व हा सण साजरा करण्याचे महत्त्व दिसून येते. तसेच सासरी गेलेल्या मुली माहेरी येत असतात हा त्यामागचा उद्देश आहे. महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतील लोक श्रद्धापूर्वक पाळला जातो. तसेच शेती हा प्रमुख व्यवसाय करणाऱ्या घरातून स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात.

गौरी लक्ष्मी मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा आहे. म्हणजे तू जमिनीतून मिळणाऱ्या धान्याची पूजा हाच आहे. काही घरात धान्याची रास म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादीं पैकी 1/2 धान्याचे ढीक करून त्यावर महालक्ष्मीची मुखे सजवली जातात.

गौरी पूर्वा नक्षत्रा वर आल्या तर नव्या नवरीसारखी त्यांचे हौस केले जातात फराळाचे पदार्थ विड्याची पाने सुपारी नारळ सुपारी घेऊन नवी नवी नवरी आसपासच्या घरात वाहन घेऊन जाते त्या निमित्तान त्या निमित्तानं तिच्या ओळखी होतात. गौरींसारखं तिचंही मग कौतुक होतं.

ज्येष्ठा गौरीचे मूख कोथळ्या किंवा आढणीचा वापर करून ज्येष्ठा-कनिष्ठा साकारतात. कोथळ्या मातीच्या किंवा लोखंडाच्या असतात. काही ठिकाणी उभे दोन डबे, त्यावर चरव्या आणि त्यावर महालक्ष्मीचे हात अशी रचना असते. शाडूचे मुखवटे, पितळेचे मुखवटे असे अनेक प्रकार दिसून येतात. प्रदेशानुसार त्यांचा फ

राळही बदलतो. महालक्ष्मींना साड्या नेसविणे, त्यांच्या मीऱ्या छान घालता येणे, जिकिरीचे आणि अर्थातच कौतुकास्पद मानले जाते. या गौरीचा बऱ्याच ठिकाणी चमत्कारही दिसून आलेला आहे. त्यामुळे गौरी पूजन मोठ्या श्रद्धेने भाविक पार पाडत असतात.

गौरी पूजन कसे साजरे केल्या जाते:

गौरी पूजनाचा कार्यक्रम हा तीन दिवसांचा असतो. म्हणून पहिल्या दिवशी त्यांचे आवाहन होते. प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळी पद्धत आहे. घराच्या उंबऱ्यातुन आणतांना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या आहे. त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणतात. त्यावेळी ते चमच्याने ताट किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो.

मूर्ती स्थापन झाल्यावर त्याची जागा समृद्धी सर्व गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे. तिथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा होते. आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य बेसन, लाडू, करंजी, शेव, पापडी, चकली याचा नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरण पोळी, ज्वारीच्या पिठाची, आंबील, अंबाडीची भाजी सोळा भाज्यांचा एकत्र नैवद्य सर्व पदार्थांचा देवीला दाखवतात.

तसेच शेंगदाणे आणि डाळीची चटणी, पंचामृत, पटवला घालून केलेली ताकाची कढी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, लोणचे इत्यादी सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात व महाराष्ट्रात काही ठिकाणी सायंकाळी महिलांच्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ही केला जातो. तसेच यावेळी जागरणही करण्याची परंपरा आपल्याला दिसून येते. तसेच विविध प्रकारची झिम्मा-फुगडी आणि स्त्रिया खेळ खेळतात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी लक्ष्मीचे विसर्जन करतात.

त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पडतात. त्या सुद्धा हळदीकुंकू, सुकामेवा, बेलपत्र, फुले झेंडूची पाने, काशी फळाचे फुल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पडतात. त्यामध्ये हळदीकुंकू रेशीम सूत झेंडूची पाने, काशी फळाचे फूल महत्त्वाच्या वस्तू असतात. नदीवर किंवा गोटे असलेल्या नदीत गौरीचे विसर्जन करण्यात येते व तेथील थोडी माती घरी आणून आपल्या घरात शिंपडतात व घरात समृद्धी नांदो झाडाझुडपासून, कीटकांपासून संरक्षण होते अशीही समजूत आहे.

गौरी पूजन विषयी पौराणिक कथा:

गौरीपूजन विषयी एक पौराणिक कथा आपल्याला दिसून येते. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया लक्ष्मी, महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य वाढावे, यासाठी तिची प्रार्थना केली. आपल्या पतीला राक्षसांपासून वाचवावे. यासाठीही त्या स्त्रियांनी गौरीला आवाहन केले व त्यांच्या हाकेला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला. शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.

महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने हे सौभाग्य स्त्रियांना मिळाले. म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौराईची पूजा करू लागल्या. वेगवेगळ्या प्रांतात नैवद्य दाखवण्याची ही पद्धत वेगवेगळी असते. दक्षिण भारतात भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो. बरेच दिवस चालतो. प्रत्येक गावात गौरीची एक पिठाचे प्रतिमा सकारून तिला मखरात बसवून तिला पुजतात. तिची रस्त्यावरून मिरवणूकही काढतात.

अशाप्रकारे हिंदु धर्मातील स्त्रिया मोठ्या उत्साहाने व आनंदाने हा गौरीपूजन करतात.

“तुम्हाला आमची माहिती गौरीपूजन विषयी संपूर्ण माहिती Gauri Pujan In Marathi याविषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :


गौरी पूजन म्हणजे काय?

गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.


गौरी गणपतीचा इतिहास काय आहे?

गौरी हा गणेशाची आई पार्वतीचा अवतार आहे . मात्र, महाराष्ट्रात गौरी ही गणेशाची बहीण असल्याचे मानले जाते. तिच्या भावाप्रमाणेच, माँ गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, आनंद आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते. खरे तर गौरी स्थापना ही मां गौरीच्या दोन मूर्तींनी केली जाते.

गणेश चतुर्थीच्या वेळी गौरी पूजन का केले जाते?

अनेक प्रादेशिक संस्कृतींमध्ये, गौरीला गणेशाच्या बहिणी मानले जाते – ज्येष्ठा आणि कनिष्ट, ज्या त्याला शोधत आल्या आहेत . गौरी देवीच्या दोन मूर्ती घरी आणल्या जातात आणि लोक विस्तृत विधींनी त्यांची पूजा करतात. काही लोक गौरीला देवी पार्वतीचे रूप मानतात, भगवान गणेशाची आई.


गौरी पूजा का केली जाते?

सर्व विवाहित हिंदू स्त्रिया आनंदी वैवाहिक जीवनासाठी देवी गौरीला उपवास करतात आणि प्रार्थना करतात तर अविवाहित स्त्रिया आदर्श पती मिळविण्यासाठी देवी गौरीचा आशीर्वाद घेतात. ते पार्वतीच्या सुवर्ण चित्राची पूजा करतात. काही लोक हळद आणि मातीचा वापर करून मूर्ती तयार करतात तर काही भक्त बाजारातून खरेदी करतात.