दसरा सणाची संपूर्ण माहिती Dussehra Information In Marathi

Dussehra Information In Marathi दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केले जातात तसेच सोने-चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जातात. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरणे लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.

Dussehra Information In Marathi

दसरा सणाची संपूर्ण माहिती Dussehra Information In Marathi

संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे. म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यासाठी गावाची वेश ओलांडून जात असतात. दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. प्रभुरामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले होते. पांडव ही अज्ञातवासात राहण्याकरिता यावेळी गेले होते, त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर तेथे त्यांनी परत ती शस्त्रे घेतली व त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस आहे.

दसरा म्हणजेच विजयादशमी. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला आपण दसरा सण म्हणून साजरा करतो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर, देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते.

दसरा हा सण शेतीविषयक लोक उत्सव म्हणून साजरा करत होते. कारण त्यावेळी पेरलेल्या शेतातील पहिले धान्य घरात येते. त्यामुळे शेतकरी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. ग्रामीण भागातील शेतकरी हा उत्सव साजरा करताना, शेतातील धान्याचा तुला आपल्या फेट्यात लावण्याची पद्धत ही प्रचलित आहे. काही लोक तर टोपीवर लावतात.

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला गेलेल्या विजया दशमीला शुभ कार्य करतात. नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी देखील या दिवशी केली जाते. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी शुभारंभ केला. पेशवाईमध्ये सुद्धा या सणाचे महत्त्व होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत असत. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत. यालाच सीमा उल्लंघन म्हणतात. विजयादशमी खास विजय मिळवून देणारा दिवस आहे असे मानले जाते.

दसऱ्याचे महत्व:

दसरा या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात, त्या वृक्षाला अस्मंतक असे म्हणतात. या वृक्षाच्या पानांमध्ये औषधी सद्गुण आहे. तो म्हणजे पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा नऊ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासुर राक्षसाचा यादिवशी वध केला असे म्हटले जाते. तर रामाने ही याच दिवशी रावणाचा वध केल्याचे आपल्याला कळते. म्हणून रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तीचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते.

या दिवशी घरोघरी पूजाअर्चना करून शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूचे फुले आणि आंब्याच्या पानांची तोरणे लावली जातात. झेंडूच्या फुलांनी देवघर तसेच देवींना हार लावल्या जातो. व संध्याकाळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन त्यांच्या कुटुंबाला भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ‘सोनं घ्या’ आणि ‘सोन्यासारखे राहा’ असे म्हटले जाते.

आणखी एक महत्त्व म्हणजे साडेतीन मुहूर्तातील एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या चांगल्या गोष्टीचा प्रभाव केला जातो, प्रारंभ केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने विजय केला जातो. शत्रूवर पराक्रमाने तसेच वैऱ्यावर प्रेमाने विजय केला जातो. तसेच कुटुंबातील सर्व मंडळी एकत्रितपणे देवीला आपल्या विजयाची कामना करतात व जीवनात सतत कायम राहण्यासाठी आशीर्वाद मागतात.

दसरा सण कसा साजरा करतात:

दसरा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. दसरा सणाच्या दिवशी घराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची पद्धत आहे. आपट्याची पाने देण्यासाठी एकमेकांच्या घरी सुद्धा काही लोक जातात व त्यांना शुभेच्छा देतात. ही एक जुनी प्रथा आहे आणि आजही ती कायम आहे. या दिवशी विविध पदार्थ सुद्धा घरी केले जातात. या दिवशी असे म्हणतात कि, “दसरा सण मोठा,नाही आनंदाला तोटा.”

विजयादशमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसरा या सणाच्या दिवशी स्त्रिया सोने खरेदी करतात. तसेच घरी असलेले वाहणे, शस्त्रे इत्यादींची झेंडूच्या फुलांनी पूजा करतात. तसेच सर्व कुटुंबातील मंडळी एकत्र येतात व देवीच्या दर्शनाला जातात. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा देत असते, असे म्हटले जाते. संध्याकाळी रावणाच्या प्रतिकृतीच्या धरणाचे कार्यक्रमही आयोजित करतात. अशाप्रकारे दसरा हा सण साजरा केला जातो.

दसरा सणाविषयी पौराणिक कथा:

दसरा विषयी सोने लुटण्याची एक प्रथा आहे. त्याविषयी एक कथा आहे. ती म्हणजे फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. वरतंतू नावाचे एक ऋषी होऊन गेले, त्यांच्याकडे विद्या अभ्यासासाठी खूप शिष्य येत असत. बरेच शिष्य अभ्यास करून मोठे होत. त्यावेळी मानधन किंवा फी देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरु दक्षिणा देत असत. या ऋषीकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूने त्याला घरी जाण्यास परवानगी दिली.

त्याने ऋषींना विचारले, की तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय घेणार? मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? तुम्ही मागाल ती गुरू-दक्षणा मी देईल. मग त्या ऋषीने याची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. परंतु ऋषीने कौत्सला प्रत्येक विद्याबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे १४ विषयाबद्दल ज्ञान दिल्यामुळे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आणावयास सांगितले. ते ऐकून कौत्स गंगावला गेला.

तो रघु राजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्‍वजीत यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरीसुद्धा राजाने कळसाकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याची पानांच्या आकाराची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.

कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू या ऋषीकडे गेला. आणि त्या ऋषीला गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्या घेण्यास नकार दिला आणि १४ कोटी सुवर्णमुद्रा परत नेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितले. अनेकांनी त्या वृक्षांची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता म्हणून त्या दिवसापासून या झाडाची पूजा करून सोन्याची नाणी लुटण्याची प्रथा सुरू झाली असे म्हटले जाते.

याविषयीची आणखीन एक दंतकथा आहे. ती म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशीही आख्यायिका आहे. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण रूपात असलेल्या अर्जुनाने विराटच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले. अशी कथा आढळून येते. यामुळे विजयादशमीला शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करून त्याला औक्षण केले जाते.

अशाप्रकारे दसरा हा सण भारतात विविध ठिकाणी मिठाई वाटून व एकमेकांना, शुभेच्छा देऊन मोठ्या आनंद व उत्साहाने साजरा केला जातो.

“तुम्हाला दसरा सणाविषयीची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल सुद्धा पहा :-

दसरा का साजरा केला जातो?

महिषासुर आणि त्याच्या सैन्याने हैराण केल्यामुळे देवीने या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि १० व्या दिवशी महिषासुराचा अंत केला. त्यामुळे नवरात्रीनंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे; तर प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी, असे म्हटले जाते.


दसरा पूजा घरी कशी करावी?

चौकीवर देवीची मूर्ती ठेवा आणि त्याभोवती पुस्तके लावा. त्यानंतर, दीया आणि अगरबत्ती लावा आणि आपल्या मुलांसह देवीला कुंकुम, हळदी आणि फुले अर्पण करा . दसऱ्याला देशभरात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते.

दसऱ्याचे महत्व काय आहे?

हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. यंदा 24 ऑक्टोबरला दसरा सण साजरा होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले. हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणूनही साजरा केला जातो


दसऱ्याला कोणत्या देवाची पूजा केली जाते?

काही ठिकाणी दसऱ्याला रामाची पूजा केली जाते, तर काही ठिकाणी या पवित्र सणाच्या वेळी दुर्गादेवीची पूजा केली जाते.

Leave a Comment