डी.टी.एल. कोर्सची संपूर्ण माहिती DTL Course Information In Marathi

DTL Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,कर कायदा हे क्षेत्र बऱ्याच काळापासून समान राहिले आहे.कर कायदा हा भारतीय कायद्याचे व्यवस्थेचा एक भाग आहे .जो सर्व भारतीय नागरिकांना लागू होतो. भारतातील लोकसंख्या जसजशी वाढत आहे तशी तशी या कायद्यातील पदवीधर व व्यावसायिकांची मागणी वाढत आहे .कर काम हे सार्वजनिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातही विस्तारित झाले आहे .

Dtl Course Information In Marathi

डी.टी.एल. कोर्सची संपूर्ण माहिती DTL Course Information In Marathi

कर कायदा हे आता नवीन रोजगार निर्मितीसाठी एक क्षेत्र आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठी आपल्याकडे चांगली नैतिकता व आवड असणे गरजेचे आहे .चला तर मी आज तुम्हाला हा कर कायदा शिकवणारा कोर्स म्हणजे डी.टी.एल.!!!

डी.टी.एल. कोर्से विषयी माहिती सांगणार आहे .आपल्याला माहीतच आहे बऱ्याच लोकांना टॅक्स भरताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी हे लोक सी.ए. किंवा डी.टी.एल. यांचा शोध घेतात की जेणेकरून त्यांच्या मार्फत सहजपणे त्या रिटर्न्स फाईल तयार करू शकतील.

मी आज तुम्हाला डी.टी.एल. या कोर्सची सविस्तरपणे माहिती सांगणार आहे. यामध्ये आपण या कोर्स साठी लागणारी पात्रता निकष, कालावधी ,या कोर्सची फी, या कोर्स मध्ये कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो व हा कोर्स केल्यामुळे आपल्याला उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी!!!

डी.टी.एल. चा लॉंग फॉर्म डिप्लोमा इन टॅक्सेशन लाँ असा आहे .या कोर्स मध्ये आपल्याला कराशी संबंधित सर्व नियम सविस्तरपणे शिकवले जातात. हा एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे .या अभ्यासक्रमात आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर ,आर्थिक लेखा, लेखापरीक्षणाचे सैद्धांतिक व व्यावहारिक ज्ञान याचे शिक्षण दिले जाते.

तसेच जे लोक कर भरतात त्या लोकांना तुम्ही कर संबंधित सल्ला देऊ शकाल व टॅक्स रिटर्न्स फाईल तयार करण्यासाठी मदत करतात. या अभ्यासात आयकर कायद्यातील बदल यासह विविध कायद्यांचा समावेश आहे .हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

ज्या विद्यार्थ्यांना कर आकारणी कशी करायची या कायद्याच्या अभ्याससंबंधीचे कौशल्य याचे शिक्षण घ्यायचे असेल तसेच ज्या विद्यार्थ्यांना कर आकारणी व कायद्याच्या क्षेत्रात पुढील शिक्षण घ्यायचे असेल त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम आहे. डी.टी.एल. हा कोर्स केल्यामुळे तुम्हाला कर आकारणी व त्यांच्याशी संबंधित कायद्यासंबंधीचे ज्ञान वाढवण्यास मदत होते.

तसेच तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात. सरकारी नोकरीसाठी अनेक मार्ग खुले होतात. सरकारी नोकरीतच नाही तर प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

आता आपण डी.टी.एल. या कोर्सला प्रवेश पात्रता कशी आहे हे पाहूयात!!!

या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला पात्रता निकष आहेत. त्यांचे पालन करावे लागते. विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. बारावी बोर्ड परीक्षेत किमान 60 % गुण असणे आवश्यक आहे.

आता आपण या कोर्सच्या प्रवेश प्रक्रिया बाबत माहिती पाहूयात!!!

बहुतेक महाविद्यालयात गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिला जातो. तर काही महाविद्यालयात प्रवेश परीक्षा घेतल्या जातात .या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला IPU CET ही परीक्षा पास करणे हे बंधनकारक आहे .IPU CET ही परीक्षा GGSIPU या विद्यापीठाद्वारे आयोजित केली जाते. जी UGC संलग्न आहे .

ही परीक्षा दिल्यामुळे आपल्याला UG व PG असे दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होते. तसेच काही विद्यापीठे सध्याच्या प्रवेश परीक्षा घेतात तर काही CLAT, AILET, LSAT इत्यादी विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा प्रवेश परीक्षा आहेत. तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरावा लागतो.

तुम्हाला त्या वेबसाईटवर तुमची सर्व माहिती व तपशील ऑनलाईन भरावी लागेल. नंतर दिलेल्या प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे व बारावीचे गुण हे दोन्ही गुणांच्या आधारे आपल्याला अंतिम प्रवेश दिला जातो. या कोर्सच्या प्रवेश परीक्षेत चार विभाग असतात. ते म्हणजे

  1. सामान्य ज्ञान
  2. इंग्रजी भाषेचे ज्ञान
  3. तार्किक तर्क
  4. परिणामात्मक योग्यता

या परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे या परीक्षेचा अभ्यासक्रम प्रथम नीट समजून घेतला पाहिजे. परीक्षेचा पॅटर्न समजून घेऊन मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका व मॉडेल पेपरचा सराव केला पाहिजे. तुमच्याकडे सर्व विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.  हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून हा अभ्यासक्रम दोन सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे .यामध्ये आपल्याला करप्रणाली, संविधान कायदा, जीएसटी यासारख्या विषयांचा अभ्यास शिकवला जातो.

  1. पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्याला व्यवस्थापकीय लेखा, भारतीय कर आकारणी बद्दल प्राथमिक माहिती, 1961 आयकर कायदा, सबमिशन असाइन्मेंट एक.
  2. दुसऱ्या सेमिस्टर मध्ये आपल्याला प्रत्यक्ष कर ,जीएसटी 1, जीएसटी 2 ,सबमिशन असाइन्मेंट 2 असा अभ्यासक्रम असतो.

डी.टी.एल. या कोर्ससाठी किती शुल्क आकारावे लागते हे पाहुयात!!

डी.टी.एल. या कोर्ससाठी प्रति वर्ष 15000 ते 100000 पर्यंत शुल्क आकारले जाते. प्रत्येक विद्यापीठात हे शुल्क वेगवेगळे असते.

आता हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पगार किती असतो हे पाहूयात!!!

तुम्ही प्रति वर्ष सरासरी 500000 किंवा त्याहीपेक्षा जास्त अधिक पॅकेज ची अपेक्षा करू शकता. तुमचे वेतन हे तुमच्या ज्ञानावर व अनुभवावर अवलंबून असते.

जर आपण नोकरी करत असाल किंवा काही कारणास्तव तुम्हाला नियमित महाविद्यालयात कोर्सला उपस्थित राहणे शक्य नसेल तर तुम्ही दुरुस्त शिक्षणाद्वारे डी.टी.एल. हा कोर्से करू शकता.दूरस्थ अभ्यासक्रम उपलब्ध करणाऱ्या अनेक महाविद्यालय व विद्यापीठ हे दूरस्थ शिक्षणाच्या पर्यायही उपलब्ध करून दिलेला आहे .

या अभ्यासक्रमात तुम्हाला घरबसल्या कोणत्या नामांकित कॉलेजमध्ये या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता व या अभ्यासक्रमाचा अभ्यास करू शकता .आजकाल अनेक विद्यार्थी हे दूरस्थ शिक्षणाद्वारे अभ्यासक्रम शिकत आहे. हा अभ्यासक्रम पत्रव्यवहारात द्वारे होत असतो. जी विद्यापीठे आपल्याला दूरस्थ शिक्षण देतात त्यांची नावे व ते आकारत असलेले शुल्क खालील प्रमाणे:-

  1. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन
    या विद्यापीठाचे शुल्क हे ५,२०० आहे.
  2. सिम्बायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग
    या विद्यापीठाचे शुल्क हे 17000 आहे.
  3. बालाजी लॉ कॉलेज
    या विद्यापीठाचे शुल्क हे 20000 आहे.
  4. अन्नामलाई विद्यापीठ
    या विद्यापीठाचे शुल्क 2,850 आहे.
  5. दूरस्थ शिक्षण संस्था मद्रास विद्यापीठ
    या विद्यापीठाचे शुल्क हे 25000 आहे.

आता आपण डी.टी.एल.हे प्रशिक्षण देणाऱ्या नामांकित कॉलेजची नावे व आकारण्यात येणारे शुल्क पाहुयात!!!

  • सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे
    या शाळेला बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे . युजी आणि पीजी दोन्ही अभ्यासक्रमांना ही शाळा प्रवेश देते .2002 पासून ते सिम्बा योसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ याची संलग्न आहे.याचे शुल्क 27,000 आहे.
  • आयएलएस लॉ कॉलेज, पुणे
    इंडिया टुडे यांच्या मते देशातील 10 टॉप कॉलेजमध्ये या शाळेने पहिला क्रमांक पटकाविला आहे. या महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची मान्यता आहे. याचे
    शुल्क 17,600 आहे.
  • इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स इन हायर एज्युकेशन, भोपाळ
    शुल्क 10,000
  • अरिहंत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे
    शुल्क 20,500
  • श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई
    शुल्क 3,000
  • एलएन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च
    शुल्क 20,000
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
    शुल्क 5,000
  • सिंहगड लॉ कॉलेज, पुणे
    शुल्क 10,767
  • इंडियन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट
    शुल्क 14,900

आता आपण डी.टी.एल. कोर्स ही पदवी घेतल्यानंतर आपल्याला विविध आकर्षक नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.. आपल्या कौशल्यावर व अनुभवावर आपले वेतन अवलंबून असते.

तर आता आपण हा कोर्स केल्यानंतर कोणकोणत्या नोकरीत आपले भविष्य आजमाउ शकतो हे पाहूयात!!

  • कर संग्रहक :- या क्षेत्रात आपली भूमिका ही फिल्ड ऑडिटसाठी जाऊन माहिती गोळा करणे नोंदी ठेवणे आणि आर्थिक माहितीचे मूल्यांकन करणे हे आहे येथे आपल्याला 650000 प्रतिवर्ष वेतन भेटू शकते.
  • कर व्यवस्थापक :- येथे आपण कर दस्तऐवजांची व्यवस्थित तयारी करणे व ते दस्तावेज दाखल करण्यासाठी कर व्यवस्थापक जबाबदार असतात. येथे आपल्याला 1426000 पर्यंत वेतन प्रतिवर्ष मिळू शकते. प्रमाणीत सार्वजनिक लेखापाल येथे आपली भूमिका एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्यांच्या आर्थिक बाबींविषयी योजना आणि पूर्तता करण्यासाठी सल्ला देणे हे आहे. येथे आपल्याला वेतन प्रतिवर्षी 10 लाख पर्यंत मिळू शकते .
  • आर्थिक सल्लागार :- येथे आपली भूमिकाही आपल्या क्लाइंटच्या च्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून त्यांना आपल्या आर्थिक बाबींविषयी सूचना देणे .येथे त्यांचा पगार 500000 पर्यंत प्रति वर्ष असतो .
  • मुख्य वित्त अधिकारी :- येथे आपली भूमिका कंपनीच्या आर्थिक व्यवस्थापन करणे ही असते. आपण कंपनीचे सर्वात वरिष्ठ फायनान्स व एक्झिक्युटिव्ह आहे. येथे आपला पगार 1700000 प्रतिवर्ष असू शकतो.
  • कर विश्लेषक :- स्थानिक, राज्य आणि फेडरल कायद्यांचे पालन करून रिटर्न फाइल करण्यात मदत करणे हे कर विश्लेषकाचे मुख्य काम आहे. येथे आपला पगार 3,40,000 प्रति वर्ष असतो.

FAQ’s:-

डी.टी.एल. चा फुल फॉर्म काय आहे?

डी.टी.एल. चा लॉंग फॉर्म डिप्लोमा इन टॅक्सेशन लाँ असा आहे.

डी.टी.एल. ह्या कोर्स साठी पात्रता निकष काय आहे?

विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. बारावी बोर्ड परीक्षेत किमान 60 % गुण असणे आवश्यक आहे.

डी.टी.एल. ह्या कोर्स साठी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते?

बहुतेक महाविद्यालयात गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिला जातो. तर काही महाविद्यालयात प्रवेश परीक्षा घेतल्या जातात .या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला IPU CET ही परीक्षा पास करणे हे बंधनकारक आहे.

डी.टी.एल. ह्या कोर्स मध्ये कोणता अभ्यासक्रम असतो?

करप्रणाली,प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर,संविधान कायदा, जीएस्टी हे विषय ह्या कोर्स द्वारे शिकवले जातात.

डी.टी.एल. हा कोर्स केल्यानंतर आपण कुठल्या जॉब मिळवू शकतो?

कर संग्राहक ,कर व्यवस्थापक,आर्थिक सल्लागार,मुख्य वित्त अधिकारी,कर विश्लेषक हे जॉब मिळवू शकतो.

Leave a Comment