DRDO Information In Marathi कुठलेही राष्ट्र असो त्याची सुरक्षा फार महत्त्वाची असते आणि प्रत्येक देशाने आपल्या सुरक्षेसाठी अनेक यंत्रणा तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये भूजल, नौदल आणि हवाई दल इत्यादी स्थलांचा समावेश होत असतो. अशीच एक संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था म्हणजे डी आर डी ओ होय. या डी आर डी ओ ची स्थापना इसवी सन १९५८ यावर्षी करण्यात आली.
डी आर डी ओ ची संपूर्ण माहिती DRDO Information In Marathi
भारत देशाच्या संरक्षणाबाबतीतल्या क्षमता वाढविणे आणि त्यासाठी संशोधन करणे डीआरडीओ चे मुख्य काम आहे. ज्यामुळे भारताची लष्करी सामर्थ्य वाढविले जाते. ही संस्था भारतीय संरक्षण मंत्रालयाचाच एक स्वतंत्र भाग असून त्यांचे ब्रीदवाक्य बालस्य मुलं विज्ञानम अर्थात विज्ञान हाच शक्तीचा पाया असे आहे.
इंग्रजीमध्ये म्हणाल तर त्यालाच ओरिजिन इज सायन्स असे देखील म्हटले जाते. आज घडीला या डीआरडीओ चे अध्यक्ष समीर व्ही कामत हे आहेत. आजच्या भागामध्ये आपण या डीआरडीओ बद्दल माहिती बघणार आहोत.
नाव | डी आर डी ओ |
प्रकार | संरक्षण क्षेत्रातली एक संस्था |
फुल फॉर्म | डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन |
स्थापना वर्ष | इसवी सन १९५८ |
हेड क्वार्टर | नवी दिल्लीतील डी आर डी ओ भवन |
ब्रीद वाक्य | बलस्य मुलं विज्ञानम |
अध्यक्ष | डॉ. समीर व्ही कामत |
डी आर टी ओ ही राष्ट्रीय स्तरावरील सर्वांना माहित असलेली एक संस्था आहे जी संरक्षणाच्या संशोधनांमध्ये तज्ञ संस्था म्हणून कार्यरत आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन व विकास विभागाचा भाग असणारी ही संस्था सद्यस्थितीमध्ये ५० पेक्षा ही अधिक प्रयोगशाळा धारण करत आहे.
डीआरडीओ द्वारे इलेक्ट्रॉनिक प्रकारची युद्ध प्रणाली आधुनिक स्वरूपाची राहणार आणि इतरही अनेक महत्त्वपूर्ण उपकरणे विकसित केली जात आहेत. आज मीतिला डीआरडीओ ३०००० कर्मचाऱ्यांना रोजगार देत असून त्यातील तब्बल ५००० लोक हे शास्त्रज्ञ आहेत तर उर्वरित २५००० विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ व सहाय्यक कर्मचारी आहेत.
डी आर डी ओ चे काम कसे चालते:
डीआरडीओ हे शस्त्रास्त्र विकसित करण्यामध्ये स्वयंपूर्णता निर्माण करू इच्छित आहे त्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत. हे डीआरडीओ तीनही प्रकारातील लष्करी दलांना आधुनिक शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, एरोनॉटिक्स तंत्रज्ञान, नौदल प्रणाली, संगणक विज्ञान यांसारख्या सुविधा पुरवत आहे. भारत देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत बनविण्यामध्ये या डीआरडीओ चा मोठा वाटा आहे. त्यांनी अनेक आधुनिक प्रकारचे शस्त्रास्त्रे म्हणून देशाला संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण केलेली आहे.
डी आर डी ओ चे ब्रीदवाक्य:
कितीही मोठी संस्था असली तरी देखील त्यांच्या ध्येयानुसार ती विविध ब्रीदवाक्य बनवत असते. असेच ब्रीदवाक्य डीआरडीओ या संस्थेला देखील आहे जे बालस्य मुलं विज्ञान असे असून त्याचा अर्थ विज्ञानाच्या शक्तीचा स्त्रोत असा होतो. सैन्याला अधिक मोठ्या प्रमाणावर मजबूत बनवायचे असेल तर विज्ञानाचा हात धरत प्रगती करण्याखेरीज पर्याय नाही. हेच या ब्रीद वाक्यातून दिसून येते त्यामुळे विज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून डीआरडीओ देशाच्या संरक्षण प्रणालीला बळकटी देण्याचे कार्य करत आहे.
डी आर डी ओ चे मुख्यालय व स्थापना:
नवी दिल्लीमध्ये असणाऱ्या डीआरडीओ इमारतीमध्ये हे मुख्यालय स्थित असून ते राष्ट्रपती भवनाच्या अगदी जवळ आहे. दिल्लीतील महात्मा गांधी मार्गावर या संस्थेची एक प्रयोगशाळा देखील आहे. या डी आर डी ओ ची स्थापना इसवी सन १९५८ मध्ये करण्यात आली होती. सुरुवातीला असणाऱ्या दहा वेगवेगळ्या किरकोळ संरक्षण प्रयोगशाळा मिळून या डीआरडीओ चे गठन करण्यात आलेले आहे. २०२३ मध्ये संपूर्ण देशाने डीआरडीओ चा ६५ वा स्थापन दिवस मोठ्या उत्साहात पार पाडला.
डीआरडीओतील अध्यक्ष:
ज्यावेळी डीआरडीओ ची स्थापना करण्यात आली त्यावेळी त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर जी सतीश रेड्डी होते. त्यानंतर अनेक अध्यक्ष बदललेले आणि आज मीतिला डी आर डी ओ च्या अध्यक्षपदाची धुरा डॉक्टर समीर व्ही कामत हे सांभाळत आहेत.
डी आर डी ओ च्या नोकरीमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे?
डी आर डी ओ या संस्थेत दाखल व्हायचे असेल तर तुम्हाला गेट सेट किंवा सीई पी.टी.ए.एम यासारख्या परीक्षांसाठी नोंदणी करून उत्तीर्ण व्हावे लागेल. गेट परीक्षा द्वारे जाताना या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावले जाते. आणि त्या आधारे त्यांची निवड केली जाते तसेच सेट परीक्षेद्वारे जाताना दोन भागात विभागलेली परीक्षा देऊन त्यानंतर मुलाखतीत उपस्थित राहावे लागते.
त्याचप्रकारे सी.इ.पी.टी.ए.एम द्वारे डीआरडीओ मध्ये सहभागी व्हायचे असेल तर सर्वप्रथम एक लेखी परीक्षा द्यावी लागते जी दोन स्तरांची असते यातील पहिल्या श्रेणीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यासच दुसऱ्या श्रेणीची परीक्षा देता येते. अशा रीतीने तुम्ही डीआरटीओच्या नोकरीमध्ये आरामात सहभागी होऊ शकतात.
निष्कर्ष:
देश चालवणे काही सोपे काम नाही इतर सर्व गोष्टींबरोबरच देशाची स्वातंत्रता अबाधित राहावी यासाठी देशाचे संरक्षण करणे देखील फार गरजेचे ठरते. यासाठी विविध प्रकारच्या तलान द्वारे देशाचे संरक्षण केले जाते. आज आपण अशाच एका संरक्षण संस्थेबद्दल अर्थातच डीआरडीओ बाबत माहिती घेतलेली आहे. ज्यामध्ये डीआरडीओ म्हणजे नेमके काय? ते काय काम करते? तसेच डीआरडीओ चे ब्रीद वाक्य, मुख्यालय यांविषयी देखील माहिती घेतली. सोबतच
डीआरडीओच्या स्थापनेबद्दल माहिती मध्ये आपण त्याची स्थापना केव्हा व कोणी केली? डी आर डी ओ द्वारे निर्माण करण्यात आलेले विविध क्षेपणास्त्र, डीआरडीओ मध्ये करिअर करण्यासाठी काय करावे यांसह काही प्रश्न उत्तरे देखील बघितलेली आहे.
FAQ
डीआरडीओ मध्ये मिळालेली नोकरी ही सरकारी नोकरी असते का?
होय नक्कीच डीआरडीओ ही सरकारी नोकरी असून ती भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते.
डीआरडीओ चा फुल फॉर्म काय आहे व त्याला मराठीत काय म्हटले जाते?
डीआरडीओ चा फुल फॉर्म रिसर्च डिपार्टमेंट ऑफ इंडिया असे असून त्याला मराठीत संरक्षण संशोधन व विकास संस्था असे नाव आहे.
डीआरडीओ मध्ये नोकरी करण्याकरिता किमान काय पात्रता आवश्यक असते?
डीआरडीओ मध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळवण्याकरिता सर्वप्रथम गेट किंवा नेट स्कोर आला पाहिजे. तसेच मान्यताप्राप्त विद्यालयातून विज्ञान शाखेच्या बीटेक इन इंजीनियरिंग या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे.
डीआरडीओ काय कार्य करत असते?
मित्रांनो आधुनिक युगामध्ये केवळ युद्ध लढणे महत्त्वाचे नसून त्यासाठी योग्य तंत्रज्ञान वापरणे देखील महत्त्वाचे ठरते. आणि हेच तंत्रज्ञान तयार करण्याचे किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर करून क्षेपणास्त्रे किंवा इतर युद्ध साहित्य विकसित करणे तसेच या क्षेपणास्त्रांचा विकास करणे हे डीआरडीओ चे काम असते.
डीआरडीओ द्वारे विकसित करण्यात आलेल्या काही मुख्य क्षेपणास्त्रांची नावे काय आहेत?
डीआरडीओ यांच्याद्वारे विकसित केल्या गेलेल्या क्षेपणास्त्रांची नावे पृथ्वी अग्नी त्रिशूल आकाश आणि नाग असे आहेत.
आजच्या भागामध्ये आपण डीआरडीओ या संरक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या संस्थेबद्दल माहिती बघितलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा. तसेच डीआरडीओ मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील ही माहिती अवश्य शेअर करा.
धन्यवाद!!!!