DMLT कोर्सची संपूर्ण माहिती DMLT Course Information In Marathi

DMLT Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, 10 वी व 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाले की पुढे काय करावे? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कुठल्या क्षेत्रात आपले भविष्य उज्ज्वल होईल म्हणून सर्वजण पूर्णपणे सल्लामसलत करून नीट विचार करून आपले क्षेत्र ठरवत असतो. चला तर, मी तुमची थोडीशी मदत करते!! आज मी तुम्हाला एक अशा कोर्स बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. तो कोर्स म्हणजे ‘DMLT’.

Dmlt Course Information In Marathi

DMLT कोर्सची संपूर्ण माहिती DMLT Course Information In Marathi

Table of Contents

जर आपण वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर घडवायचा विचार करत असाल किंवा हेल्थकेअर क्षेत्रात करिअर घडविण्यात इच्छुक असाल तर, DMLT हा कोर्स आपण जरूर करावा. आता तुम्हाला मी DMLT या पोस्ट बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे .DMLT हा कोर्स एक पॅरामेडिकल स्वरूपाचा कोर्स आहे. हा कोर्स 2 वर्षाचा असतो. DMLT कोर्स चे पूर्ण नाव ‘डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी’ आहे.या कोर्ससाठी जास्त खर्च नसतो.

विज्ञान शाखेचा कोणताही विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. आजची परिस्थिती पाहता बहुतेक मुले व मुले ही वैद्यकीय क्षेत्रात जाण्यास असेल तर त्यात हा कोर्स केल्यामुळे आपल्याला सहज नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कोणत्याही खासगी किंवा सरकारी रुग्णालयात पॅथॉलॉजी मधील नोकरी मिळते किंवा हेल्थ केअर सेंटर मध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करू शकता .

या कोर्सला डिप्लोमा इन लॅबोरेटरी व डिप्लोमा इन लॅब टेक्नॉलॉजी असे म्हणतात.हा कोर्स म्हणजे वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मधील एक डिप्लोमा आहे .आरोग्य सेवेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. या कोर्समध्ये वैद्यकीय प्रयोगशाळेची संबंधित असलेली सर्व माहिती दिली जाते जेव्हा डॉक्टरांना एखाद्या रुग्णाच्या रोगाचे निदान होत नाही तेव्हा त्याच्या आजाराबद्दल जाणून घेण्यासाठी त्या रुग्णाची पॅथॉलॉजी लॅब मध्ये जाऊन तपासणी करण्यास सांगतात व तपासणी केल्यानंतर जो रिपोर्ट येतो. त्या रिपोर्ट वरून डॉक्टर रोगाचे निदान करतो.

मग, आता तुम्हाला समजले असेल तर हा DMLT कोर्स केल्यामुळे आपण एका प्रकारे वैद्यकीय क्षेत्रात किती महत्त्वाचे स्थान बजावत आहे .या कोर्स मध्ये आपण लॅब टेक्नीशियन याचे शिक्षण घेतो. शरीरातील रक्त, लघवी इत्यादी द्रवपदार्थाची तपासणी करून शरीरातील रोग ओळखण्याचे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाते.

विद्यार्थ्यांना बॉडी फ्लूइड्सच्या परीक्षणाबरोबर थुंकीची चाचणी तसेच शरीरातील रोग शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राबद्दल व उपकरणाबद्दल माहिती दिली जाते. रक्त ,थुंकी,लघवी इत्यादी नमुने यांसारख्या मानवी द्रव्याचे विश्लेषण करणारे हे शास्त्र आहे. या अभ्यासक्रमात विविध रोगांची चाचणी व तपासणी कशी करायची व ते ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दोन वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना बायोकेमिस्ट्री ,पॅथॉलॉजी, ब्लड बँक ,मायक्रो बायोलॉजी यांचे सखोल ज्ञान दिले जाते.

दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतर डीएमएलटी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. हा कोर्स साधारणता एक ,दोन किंवा तीन वर्षाचा असतो. प्रत्येक कॉलेजवर ते अवलंबून असते. काही कॉलेजमध्ये हा कोर्स दोन वर्षाचा असतो. 2 वर्षे हे महाविद्यालय अभ्यासासाठी व पुढील 6 महिने इंटरशिप असते इंटरशिप प्रशिक्षणादरम्यान हॉस्पिटल मध्ये सहा महिने कामाचा अनुभव व सराव घेतला जातो. या प्रशिक्षणामुळे प्रयोगशाळेतील उपकरणे हाताळणे त्यांची माहिती घेणे या कामाचा अनुभव मिळतो.

आता आपण DMLT हा कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता लागते हे पाहुयात.

काही कॉलेजमध्ये हा कोर्स दहावी पास या गुणवत्तेवरही प्रवेश मिळतो. पण त्या विद्यार्थ्यांला दहावी मध्ये 50 % गुण असने अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही बोर्डातील बारावी उत्तीर्ण केलेली असावी. बारावीत विज्ञान विषय असणे आवश्यक आहे. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायन शास्त्र हे विषय महत्त्वाचे आहेत.

काही कॉलेजमध्ये DMLT प्रवेश घ्यायच्या आधी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. परंतु ही प्रक्रिया सगळ्या कॉलेजमध्ये नसून काही ठराविक कॉलेजमध्येच असते. विद्यार्थ्याची वयोमर्यादा ठरलेली असते ती म्हणजे 17 वर्षे असणे आवश्यक आहे. 17 वर्षापेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात नाही. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 45 ते 60 % पर्यंत गुण असले पाहिजेत. मागासवर्गीय व अपंग विद्यार्थ्यांना ही मर्यादा शिथिल आहे.

आता आपण DMLT या कोर्स मध्ये कोणता अभ्यासक्रम आहे. याची माहिती पाहुयात !!शरीर शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवन शास्त्र हे विषय या कोर्समध्ये शिकवले जातात.

Physiology म्हणजे शरीरविज्ञान यामध्ये आपल्याला विविध महत्वाच्या अवयवांबद्दल शिकवले जाते.

सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे Microbiology मायक्रोबायोलॉजी यामध्ये आपल्याला बॅक्टिओलॉजी, विषाणूशास्त्र, परजीवी विज्ञान, बुरशीचे आणि डाग-दागांबद्दल माहिती दिली जाते जाते.

जीवनशास्त्र म्हणजे Biochemistry जीवशास्त्रात तुम्हाला अजैविक रसायनशास्त्र, द्रावण तयार करणे, सेंद्रिय रसायनशास्त्र, जैवरासायनिक नमुना संग्रह, प्लाझ्माचे पृथक्करण, मूत्र आणि मलची रासायनिक तपासणी याबद्दल शिकवले जाते.
Pathology म्हणजे पॅथॉलॉजी यामध्ये आपल्याला नमुने गोळा करणे, एचबी, आरबीसी गणना, लेबलिंग, अहवाल देणे आणि अहवाल पाठविणे याचे शिक्षण दिले जाते.

DMLT हा कोर्स केल्यानंतर आपल्याला कोठे नोकरी मिळू शकते हे पाहुयात.

DMLT हा कोर्स झाल्यानंतर लॅब टेक्नॉलॉजिस्ट ,लॅब टेक्निशियन किंवा लॅब वर्कर म्हणून नोकरी करू शकता. तसेच कोणत्याही सरकारी व खाजगी दवाखान्यात नोकरी करू शकता. कोणत्याही नर्सिंग होममध्ये लॅब टेक्निशियन म्हणून नोकरी करू शकता किंवा मेडिकल कंपनीत नोकरी करू शकता.

मेडिकल कॉलेजमध्ये ही नोकरीची संधी उपलब्ध होते. तसेच तुम्ही स्वतःचा लॅब ही उघडू शकता. DMLT कोर्स नंतर जर तुम्हाला एखादा पदवीधर कोर्स करायचा असेल तर तुम्ही BMLT हा कोर्स करू शकता. BMLT म्हणजे ‘बॅचलर ऑफ मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी ‘ हा एक पदवीधर कोर्स आहे. बरेच विद्यार्थी DMLT हा कोर्स केल्यानंतर BMLT कोर्स कडे वळतात. तसेच B.SC डिग्री घेऊ शकता.

आता आपण DMLT या कोर्सच्या फी बाबत माहिती घेऊयात.

DMLT या कोर्सची फी साधारणपणे 15000 ते100000 पर्यंत खर्च येतो. तुम्ही ज्या कॉलेजला प्रवेश घेता त्या कॉलेजवर ती फी अवलंबून असते. काही ठिकाणी हे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुद्धा दिले जाते. प्रतिवर्षी तीन 30000 ते 60000 या कोर्सचा खर्च असतो. तर सरकारी कॉलेजमध्ये हा कोर्स 30000 मध्ये पण होऊ शकतो.

DMLT हा कोर्स झाल्यानंतर आपल्याला पगार किती भेटेल हे पाहुयात.

DMLT कोर्स झाल्यानंतर तुम्हाला सरकारी नोकरी लागली तर 25000 ते 30000 पगार सुरुवातीला मिळतो. तसेच खाजगी मध्ये तो 10,000 ते 20000 पर्यंत असतो. लॅब टेक्निशियन चा पगार 12000 ते 14000 पर्यंत असतो. तसेच अनुभवानुसार हा पगार वाढू शकतो .प्रत्येक ठिकाणी DMLT कॉलेज उपलब्ध आहे. परंतु कोणत्याही कॉलेजला प्रवेश घेताना एक गोष्ट नक्की विचारात घ्या. की ते कॉलेज सरकारी मान्यताप्राप्त आहे की नाही ते तपासून पहा. तसेच या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल लाइफ व कॅम्पस प्लेसमेंट असणे आवश्यक आहे.

FAQ’s

DMLT हा कोर्स किती वर्षाचा असतो ?

DMLT हा कोर्स शक्यतो 2 वर्षाचा असतो. शेवटचे 6 महिने इंटरशीप असते. काही कॉलेजमध्ये तो 1 वर्षाचा, 2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा ही असतो. हे कॉलेज वर अवलंबून असते.

DMLT हा कोर्स केल्यानंतर आपण पुढील अभ्यासक्रम करू शकतो का?

हो, DMLT हा कोर्स केल्यानंतर आपण BMLT हा पदवीधर कोर्स करू शकतो. तसेच B.SC डिग्री पण घेऊ शकतो.

DMLT हा कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता लागते?

DMLT हा कोर्स करण्यासाठी दहावी व बारावी बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर आपण हा कोर्स करू शकतो . बारावीत विज्ञान हा विषय असणे महत्त्वाचे आहे.

DMLT या कोर्सची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते ?

DMLT या कोर्सची प्रवेश प्रक्रिया दहावी व बारावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होते.

DMLT हा कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरी कुठे मिळू शकते?

DMLT हा कोर्स केल्यानंतर आपल्याला कोणत्याही सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात नोकरी मिळू शकते. तसेच लॅब टेक्नीशियन,लॅब वर्कर किंवा टेक्नॉलॉजिस्ट म्हणूनही नोकरी मिळू शकते. तसेच मेडिकल कंपनी व मेडिकल कॉलेजमध्ये ही नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.

Leave a Comment