Diksha अँप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Diksha Application Information In Marathi

Diksha Application Information In Marathi Diksha अँप्लिकेशन बद्दल माहिती आणि Diksha अँप्लिकेशन कसे वापरावे ? मित्रहो Diksha हे मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयने ५ सप्टेंबर २०१७ ला सुरु केलेले ॲप्लिकेशन आहे, ज्याचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवू शकतात आणि विद्यार्थी यातून शिक्षण घेऊ शकतात. लॉकडाउनच्या काळामध्ये सर्व शिक्षक या एप्लीकेशनचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि विद्यार्थी देखील या एप्लीकेशन चा वापर करून आपले शालेय अभ्यासक्रम शिकत होते. या एप्लीकेशन मध्ये भारतातील सर्व शिक्षण बोर्डासाठीचे अभ्यास आहे.

Diksha Application Information In Marathi

Diksha अँप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Diksha Application Information In Marathi

Diksha एप्लीकेशन मध्ये पहिलीपासून ते बारावी पर्यंत सर्व  शालेय वर्गांचा अभ्यासक्रम आहे. Diksha अप्लिकेशन मध्ये शालेय अभ्यासक्रम हा व्हिडिओच्या माध्यमातून देखील उपलब्ध आहे. हे ॲप्लिकेशन विविध भाषेत उपलब्ध असल्यामुळे आपल्याला  समजणाऱ्या भाषेमध्ये आपण हे ॲप्लिकेशन वापरू शकतो. चला तर मग मित्रहो माहिती करून घेऊया Diksha हे ॲप्लिकेशन कसे वापरावे.

Diksha हे ॲप्लिकेशन कसे सुरु करावे ?

मित्रहो हे ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी सर्वप्रथम ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा,  इन्स्टॉल करण्यासाठी आपण मोबाईल मधील प्ले स्टोअर मध्ये जाऊन तेथे Diksha असे सर्च करा व येणाऱ्या पहिल्या ऍप्लिकेशन ला डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.

Diksha एप्लीकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर आता पुढील दिल्याप्रमाणे स्टेप्स करून हे ॲप्लिकेशन सुरू करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील Diksha हे ॲप्लिकेशन उघडा.
  2. Diksha अप्लीकेशन उघडल्यानंतर तुम्हाला हे ऍप्लिकेशन कोणत्या भाषेत वापरायचे आहे, त्यासाठी भाषा विचारण्यात येईल, तेथे तुम्हाला हवे असलेल्या भाषेवर क्लिक करा आणि खाली असणाऱ्या Continue या पर्यायावर क्लिक करा
  3. Continue या पर्यायावर क्लिक  केल्यावर, तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्ही शिक्षक (Teacher) आहात, विद्यार्थी (Student) आहात की कोणी दुसरे (Other) आहात,  तेथे विद्यार्थी असल्यास Student या पर्यायावर क्लिक करा.
  4. Student पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला तुमचे बोर्ड निवडण्यासाठी सांगितले जाईल, तेथे तुम्ही शिकत असलेल्या  शाळेचे बोर्ड निवडा व Submit या पर्यायवर क्लिक करा.
  5. बोर्ड निवडल्यानंतर आता तुम्हाला तुम्ही शिकत असलेल्या मिडीयम (medium) बद्दल विचारले जाईल तेथे क्लिक करा. तेथे तुम्हाला विविध भाषा दिले असतील, तेथे ज्या भाषेत तुम्ही शिकत आहात ती भाषा निवडा व Submit या पर्यायावर क्लिक करा.
  6. मिडीयम निवडल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या क्लास बद्दल म्हणजे तुम्ही कोणत्या इयतेत आहात हे विचारण्यात येईल तेथे Select class या पर्यायावर क्लिक करा व तुमची क्लास निवडा व खाली असणाऱ्या Submit या पर्यायावर क्लिक करा.
  7. बोर्ड, मिडीयम आणि क्लास निवडून झाल्यानंतर आता खाली असणाऱ्या निळ्या रंगातील Continue या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो आपण दीक्षा हे एप्लीकेशन सुरु करु शकतो.

Diksha एप्लीकेशनवर अकाउंट कसे तयार करायचे ?

मित्रहो जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की दीक्षा या ॲप्लिकेशनवर अकाउंट कसे तयार करायचे तर पुढील दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील Diksha हे ॲप्लिकेशन उघडा.
  2. Diksha हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर तुम्ही निवडलेल्या बोर्ड मधील इयत्तेचा अभ्यास समोर दिसेल.
  3. डाव्या बाजूला वरच्या भागात असणाऱ्या तीन आडव्या  रेषांवर क्लिक करा.
  4. तीन आडव्या  रेषांवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय येतील.
  5. समोर येणाऱ्या पर्यायांमध्ये My groups या पर्यायावर क्लिक करा.
  6. My groups या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर log in करण्यासाठी पर्याय येईल,  तेथे खाली असणाऱ्या निळ्या रंगातील log in या पर्यायावर क्लिक करा.
  7. आता तुमच्या समोर पुन्हा Log in असे पर्याय येईल येथील log in हे पर्याय त्यांच्यासाठी आहे ज्यांनि Diksha अँप्लिकेशन वर अकाउंट तयार केले आहे आणि येथे Register here हे सुद्धा पर्याय असेल जे Diksha या अँप्लिकेशन वर अकाउंट तयार करण्यासाठी आहे.
  8. आता रजिस्ट्रेशन करावे लागेल त्या साठी समोर असलेल्या Register here या पर्यायावर क्लिक करा किंवा Diksha अँप्लिकेशन वर अकाउंट तयार करण्यासाठी तुम्ही गुगल अकाऊंट च्या मदतीने देखील Log in करू शकता त्यासाठी खाली असणाऱ्या Sign in with Google या पर्यायावर क्लिक करा आणि तुम्ही लॉग इन होऊन जाल आणि तुमचे diksha अँप्लिकेशन वर अकाउंट तयार होईल.
  9. जर तुम्ही Register here या पर्यायावर क्लिक केलात तर, तुम्हाला registration करण्यासाठी पुढील दिल्याप्रमाणे डिटेल्स विचारले जातील :-

A] जन्म वर्ष Birth year

B] पूर्ण नाव Name

C] मोबाईल नंबर Mobile number

D] ई-मेल ऍड्रेस Email address

E] पासवर्ड Password

वरील दिल्याप्रमाणे सर्व माहिती भरा.

१०] वरीलप्रमाणे सर्व माहिती भरल्यानंतर खाली असणाऱ्या I understand and accept the DIKSHA terms of Use या पर्यायावर क्लिक करा.

११] I understand and accept the DIKSHA terms of Use या पर्यायावर क्लिक केल्यावर खालील असणाऱ्या  निल्या रंगातील Register या पर्यायावर क्लिक करा.

१२] Register या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा इ-मेल अँड्रेस वर ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.

अशाप्रकारे मित्रहो आपण Diksha या अँप्लिकेशनवर अकाउंट तयार करू शकतो.

Diksha अँप्लिकेशन मध्ये Dark mode कसे चालू करायचे ?

मित्रहो Diksha ॲप्लिकेशन मध्ये आपण डार्क मोड देखील चालू करू शकतो, ज्या मुले विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षकांच्या हे ॲप्लिकेशन वापरताना येणारा डोळ्यांवरील ताण कमी होऊ शकतो.

जर तुम्हालाही Diksha ॲप्लिकेशन मध्ये डार्क मोड चालू करायचे असेल तर पुढील दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील Diksha हे ॲप्लिकेशन उघडा.
  2. Diksha हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर तुम्ही निवडलेल्या बोर्ड मधील इयत्तेचा अभ्यास समोर दिसेल.
  3. डाव्या बाजूला वरच्या भागात असणाऱ्या तीन आडव्या  रेषांवर क्लिक करा.
  4. तीन आडव्या  रेषांवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय येतील.
  5. समोर येणाऱ्या पर्यायांमध्ये Dark mode या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे  मित्रहो आपण Diksha  या ॲप्लिकेशन मध्ये डार्क मोड चालू करू शकतो.

Diksha ॲप्लिकेशन मध्ये रोल, बोर्ड, मेडियम, क्लास, सब्जेक्टस कसे बदलायचे ?

मित्रहो  आपन Diksha  एप्लीकेशन मध्ये रोल, बोर्ड, मेडियम, क्लास, सब्जेक्टस आपल्या इच्छेनुसार बदलवू शकतो, यासाठी आपल्याला profile या टॅबमध्ये जावे लागते. जर तुम्हालाही माहिती करून घ्यायचं असेल की हे कसे बदलवायचे तर पुढील  दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील Diksha हे ॲप्लिकेशन उघडा.
  2. Diksha हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर तुम्ही निवडलेल्या बोर्ड मधील इयत्तेचा अभ्यास समोर दिसेल.
  3. आता उजव्या बाजूला खालच्या कोपर्‍यात असणाऱ्या आयकॉन वर क्लिक करा.
  4. उजव्या बाजूला खालच्या कोपर्‍यात असणाऱ्या आयकॉन वर क्लिक गेल्यावर तुमच्यासमोर तुम्ही ॲप्लिकेशन सुरू करताना निवडलेले रोल, बोर्ड, मेडियम, क्लास, सब्जेक्टस समोर दिसेल.
  5. तुमच्यासमोर निवडलेले दिसणारे रोल, बोर्ड, मेडियम, क्लास, सब्जेक्टस त्या समोरील असणाऱ्या निळ्या पर्यायावर क्लिक करून  तुम्ही ते तुम्हाला हवे तसे बदलू शकता.

अशा प्रकारे आपण Diksha या ॲप्लिकेशन वर रोल, बोर्ड, मेडियम, क्लास, सब्जेक्टस बदलू शकतो.

Diksha या ॲप्लिकेशन ग्रुप कसे तयार करायचे ?

मित्रहो Diksha या ॲप्लिकेशन मध्ये आपण ग्रुप्स देखील तयार करू शकतो, त्यामुळे जर तुम्ही शिक्षक असाल तर इतर  शिक्षकांसोबत ग्रुप बनवून तुमची कम्युनिटी तयार करू शकतो  त्याचप्रमाणे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर Diksha या ॲप्लिकेशन  वर ग्रुप तयार करून आपल्या मित्रांसोबत अभ्यास करू शकता व काही अडचणी असल्यास ग्रुपमध्ये आपण विचारू शकतो. आज अनेक जणे Diksha या ॲप्लिकेशनवर अनेक ग्रुप्स तयार करून आपले काम करीत आहेत.

जर तुम्हाला देखील माहिती करून घ्यायचे आहे कि Diksha या ॲप्लिकेशन वर ग्रुप कसे तयार करायचे तर पुढे दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील Diksha हे ॲप्लिकेशन उघडा.
  2. Diksha हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर तुम्ही निवडलेल्या बोर्ड मधील इयत्तेचा अभ्यास समोर दिसेल.
  3. डाव्या बाजूला वरच्या भागात असणाऱ्या तीन आडव्या  रेषांवर क्लिक करा.
  4. तीन आडव्या  रेषांवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय येतील.
  5. समोर येणाऱ्या पर्यायांमध्ये My groups या पर्यायावर क्लिक करा.
  6. My groups या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर log in करण्यासाठी पर्याय येईल,  तेथे खाली असणाऱ्या निळ्या रंगातील log in या पर्यायावर क्लिक करा.
  7. log in पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या Log in with Diksha या पर्यायावर क्लिक करा.
  8. Log in with Diksha या पर्यायावर क्लिक केल्यावर, तेथे तुमचे ईमेल ॲड्रेस किंवा फोन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करण्यासाठी खाली असणाऱ्या Log in या पर्यायावर क्लिक करा.
  9. Log in या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला ग्रुपचे नाव काय ठेवायचे आहे आणि ग्रुप बद्दल थोडी माहिती हे विचारण्यात येईल,  ही सर्व माहिती भरा.
  10. ग्रुपचे नाव आणि ग्रुप बद्दल माहिती भरल्यानंतर खालील असणाऱ्या या I agree to DIKSHA’s group Guidlines पर्यायावर क्लिक करा आणि नंतर निळ्या रंगातील Create group या पर्यायावर क्लिक करा.

याप्रकारे मित्रहो आपण Diksha या एप्लीकेशन वर ग्रुप तयार करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही  या लेखात Diksha या ॲप्लिकेशन  बद्दल खूप सविस्तर माहिती दिली आहे जी तुम्हाला  या ॲप्लिकेशन बद्दल समजण्यास आणि हे ॲप्लिकेशन कसे वापरावे हे समजून घेण्यास मदत करेल.  जर तुम्हाला Diksha या ॲप्लिकेशन  बद्दलचा हा लेख आवडला असेल तर आपल्या शाळेतील मित्रांना शेअर करायला विसरू नका.  तुम्हाला जर या लेखा बाबतीत काही शंका असल्यास खालील असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Leave a Comment