डिजिटल मार्केटिंग कोर्सची संपूर्ण माहिती Digital Marketing Course Information In Marathi

Digital Marketing Course Information In Marathi आज पाहायला गेलो तर सारे जग हे डिजिटल युगाने व्यापले आहे. आणि आजकाल सर्व काही डिजिटली होत आहे जसे की ऑनलाईन तिकीट बुकिंग ,ऑनलाइन बँक ट्रान्सफर ,ऑनलाइन शॉपिंग आणि हे सर्व काही या धकाधकीच्या आयुष्यात मानवाच्या नक्कीच खूप फायद्याचे ठरत आहे. सर्व कामे ही कोणाचीही मदत न घेता पूर्ण होऊ शकतात. म्हणूनच आज आपण डिजिटल मार्केटिंग या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

Digital Marketing Course Information In Marathi

डिजिटल मार्केटिंग कोर्सची संपूर्ण माहिती Digital Marketing Course Information In Marathi

बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आजकाल डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात फार रुचि  असल्याचे आपण पाहतो व त्या सर्वांसाठी डिजिटल मार्केटिंग या कोर्स साठी पात्रता या कोर्सचा कालावधी व या कोर्सची फी त्यानंतर करिअरचे पर्याय नोकरी व डिजिटल मार्केटिंग हा कोर्स ऑफर करणाऱ्या सर्व संस्था या कोर्स द्वारे मिळणारा पगार हे सर्व आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

डिजिटल मार्केटिंग ह्या विषयात जर तुम्हाला करिअर करायचे असल्यास तुम्ही डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट असोशिएट म्हणजेच डीएमसीए हा कोर्स करू शकता.

डिजिटल मार्केटिंग कोर्स म्हणजे नक्की काय ?

डिजिटल मार्केटिंग हा आजच्या युगातला सर्वात महत्त्वाचा व सर्वात उपयोगी असा ट्रेडिंग मार्ग आहे. व हे सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच सर्च इंजिन सोशल मीडिया ई-मेल असे बरेच पर्याय हे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. डिजिटल मार्केटिंग या कोर्स द्वारे तुमची मार्केटिंग क्षमता तुम्ही लोकांपर्यंत किती चांगल्या पद्धतीने पोहोचू शकता व ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया द्वारे तुम्ही किती लोकांपर्यंत तुमचे प्रॉडक्ट पोहोचवतात हे सर्व पाहिले जाते.

तुम्ही जर एका कंपनीसाठी काम करत असाल तर त्या कंपनीच्या वेबसाईट द्वारे तुम्ही मार्केटिंग तंत्र विकसित व व्यवस्थापित करण्यात मदत करू शकता डिजिटल मार्केटिंग हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डीएमसीए प्रमाणपत्र मिळते व डी एम सी ए याचा फुल फॉर्म आहे डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट असोसिएट. व बरेचसे विद्यार्थी डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा हा कोर्स देखील करतात.

डिजिटल मार्केटिंग कोर्स साठी पात्रता निकष

  • कुठलाही विद्यार्थी ज्याला डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तो विद्यार्थी डिजिटल मार्केटिंग हा कोर्स करू शकतो आणि प्रमाणपत्र परीक्षा देऊ शकतो.
  • विद्यार्थ्यांकडे डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कौशल्य हवे.
  • डीएमसीए हा अंडरग्रॅज्युएट कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी पास करणे फार आवश्यक आहे.
  • डिजिटल मार्केटिंग या कोर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट करायची असल्यास विद्यार्थ्यांचे प्रमाण पात्र विद्यापीठामुळे जोड दहावी बारावी व ग्रॅज्युएशन पूर्ण असणे फार महत्त्वाचे आहे.

डिजिटल मार्केटिंग या कोर्ससाठी प्रवेश परीक्षा

डिजिटल मार्केटिंग हा कोर्स करण्यासाठी कुठलीही वैयक्तिक प्रवेश परीक्षा नाही व या कोर्ससाठी आवश्यक प्रवेश परीक्षा या एमबीए आणि बीबीए अंतर्गत घेतले जातात खाली डिजिटल मार्केटिंग तसेच बीबीए मार्केटिंग यासाठी महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा दिल्या आहेत.

पोस्ट ग्रॅज्युएट स्तराच्या परीक्षा

  • सी. ए. टी
  • एक्स. ए. टी
  • एस. एन. ए. पी
  • एम. ए. टी
  • सी. एम. ए. टी

अंडरग्रॅज्युएट स्तराच्या परीक्षा

  • डीयू. जात
  • डी. एस. ए. टी
  • एम. पी. ए. टी
  • बी-मॅट
  • पी. ई. एस. एस. ए. टी

डिजिटल मार्केटिंग कोर्स कालावधी

डिजिटल मार्केटिंग कोर्स कालावधी हा तीन महिन्यांचा असतो. या कोर्स कालावधी जास्तीत जास्त तीन ते सहा महिने एवढाच असतो व तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूट द्वारे हा कोर्स करत आहात यावर अवलंबून असते.

डिजिटल मार्केटिंग या कोर्सची फी

डिजिटल मार्केटिंग या कोर्सची फी तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज द्वारे हा कोर्स करत आहात यावर अवलंबून असते. भारतात बऱ्याचशा इन्स्टिट्यूट मध्ये हा कोर्स तुम्ही बारावी नंतर करू शकता. डिजिटल मार्केटिंग या कोर्सची ही जास्तीत जास्त फी 35 हजार रुपये असते.

वेगवेगळ्या संस्थांमध्ये शुल्क हा वेगवेगळे असते.विद्यापीठ खालील दिलेल्या गटांच्या आधारे शुल्क निश्चित करतात

संस्थेचे प्रकार – संस्था जर खाजगी असेल तर शुल्क जास्त असते जर ते गव्हर्मेंट कॉलेज असेल तर शुल्क हे कमी असते.

महाविद्यालयाचे स्थान

महाविद्यालयाचे मानांकन

डिजिटल मार्केटिंग कोर्सेचा अभ्यासक्रम

तुम्ही डिजिटल मार्केटिंग हा कोर्स घेतल्यानंतर तुम्ही कुठले कुठले विषय शिकणार आहत ते पाहूया.

  • इंट्रॉडक्शन टू डिजिटल मार्केटिंग
  • एसइओ ऑप्टिमायझेशन
  • इंट्रोडक्शन टू सी आर एम
  • ई-मेल मार्केटिंग
  • कन्टेन्ट क्रिएशन मॅनेजमेंट अँड प्रोमोशन
  • इंट्रोडक्शन टू वेब ऍनालिटिक्स
  • मोबाईल मार्केटिंग
  • सोशल मीडिया मार्केटिंग
  • डिजिटल मार्केटिंग बजीटिंग प्लॅनिंग अँड फोरकास्ट
  • प्रॉडक्ट मार्केटिंग फेसबुक इंस्टाग्राम गुगल एड्स
  • ऍसिडिटी मार्केटिंग
  • वेबसाईट डाटा

डिजिटल मार्केटिंग कोर्स चे प्रकार

डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट कोर्स

या कोर्समध्ये तुम्हाला टेक्निक्स आणि टूल्सचे बेसिक्स शिकवले जातात. या कोर्स उद्देश म्हणजेच विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग तसेच सर्च इंजिन ऑटिमायझेशन, व्हिडिओ मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, प्लॅनिंग इत्यादी या सर्व विषयांना बद्दल प्रमुख माहिती प्रदान करणे.

डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट कोर्सचा अभ्यासक्रम

  • डिजिटल मार्केटिंग परिचय
  • सोशल मीडिया मार्केटिंग
  • सर्च इंजिन ऑप्टिवायझेशन
  • कन्टेन्ट मार्केटिंग
  • वेब अॅनलिटिक्स
  • वेब डिझाईन इंट्रोडक्शन टू सी आर एम

अंडर ग्रॅज्युएट इन डिजिटल मार्केटिंग कोर्स

बॅचलर स्तरावरील डिजिटल मार्केटिंग ह्या कोर्स मध्ये तुम्हाला मार्केटिंग ऑप्टिमायझेशन याची विविध मूलभूत माहिती दिली जाते.

युजी डिजिटल मार्केटिंग कोर्सचा अभ्यासक्रम

  • एस. इ. ओ फाउंडेशन
  • कंटेंट मार्केटिंग
  • मोबाईल मार्केटिंग
  • पे पर क्लिक
  • कन्वर्जन ऑप्टिमायझेशन
  • मार्केटिंग ऑटोमेशन

पोस्ट ग्रॅज्युएट इन डिजिटल मार्केटिंग कोर्स

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे कळायला नंतर विद्यार्थ्यांना जर या विषयाचा अजून जास्त अभ्यास करायचा असल्यास पोस्ट ग्रॅज्युएट ही पदवी घेतली जाते. पोस्ट ग्रॅज्युएट इन डिजिटल मार्केटिंग साठी तुम्ही एमबीए करू शकता.

पीजी डिजिटल मार्केटिंग कोर्स चा अभ्यासक्रम

  • डिजिटल मार्केटिंग फाउंडेशन
  • कॉम्प्युटर अँड वेबसाईट एनालिसिस
  • वेबसाईट डिझाईन युजिंग वर्डप्रेस
  • कन्टेन्ट प्रमोशन

तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये बीबीए आणि एमबीए हे कोर्स देखील करू शकता.

डिजिटल मार्केटिंग हा कोर्स केल्यानंतर जॉबच्या संधी

जसे की आपण पाहतो प्रत्येक जण आजकाल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग हा पर्याय निवडत आहे. त्यामुळे कंपनीचा आकार हे जास्त महत्त्वाचे नसून ही कंपनी स्टार्टअप असो किंवा टॉप एम एन सी असेल तरीही चालेल.

सर्व कंपन्या पाहायला गेलं तर आज काल ब्रँडिंग वाढवण्यासाठी ऑनलाईन मार्केटिंग आणि इंटरनेट मार्केटिंग किंवा मोबाईल मार्केटिंग या सर्व पद्धत वापरत आहेत. व यामुळे डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट कोर्स ज्यांनी केला आहे त्यांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत.खाली तुम्ही कोणत्या पदासाठी कंपनी मध्ये अर्ज करू शकता ते दिले आहे.

  • एसइओ एक्झिक्युटिव्ह
  • सर्च इंजिन मार्केटर्स
  • सोशल मीडिया मार्केटिंग एक्सपर्ट्स
  • कंटेंट रायटर्स
  • कन्टेन्ट मार्केटिंग मॅनेजर
  • डिजिटल मार्केटिंग मॅनेजर
  • इन बाउंड मार्केटिंग मॅनेजर
  • कन्वर्जन रेट ऑप्टिमायझर

डिजिटल मार्केटिंग हा कोर्स केल्यानंतर किती वेतन कमावू शकता

डिजिटल मार्केटिंग हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला भारतातच नाही तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जॉब करून तुम्ही चांगले वेतन कमावू शकता. डिजिटल मार्केटिंग हा आजकाल सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त निवडला जाणारा पर्याय आहे.म्हणून तुम्ही जर हा कोर्स केलेला असेल तर नक्कीच तुम्ही चांगले वेतन कमावू शकता. डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात फ्रेशर म्हणून लागला तर तुमचा पगार हा दहा हजार ते पंधरा हजार असेल व जसा जसा तुम्हाला अनुभव येत जाईल तुमचा पगार 30 ते 60 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

मात्र तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट कोर्स केला असेल तर तुमचा पगार हा 90 हजार ते एक लाख एवढा असतो. व तुम्ही जर अनुभवी असाल तर तुमचा पगार हा 1 लाख ह्या पेक्षा जास्त असतो.

डिजिटल मार्केटिंग या कोर्ससाठी काही प्रसिद्ध विद्यापीठ

  • आय.एम.आर.आय- इंटरनेट अँड मोबाईल रिसर्च इन्स्टिट्यूट
  • डिजिटल विद्या
  • लर्निंग कॅटलिस्ट
  • डिजिटल अकॅडमी इन इंडिया
  • एड्यूकार्ट
  • वेब नेक्स्ट सोल्युशन्स

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

डिजिटल मार्केटिंग हा कोर्स किती प्रकारचा आहे?

डिजिटल मार्केटिंग या कोर्सेचे तीन प्रकार आहेत सर्टिफिकेट कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आणि अंडरग्रॅज्युएट कोर्स.

डिजिटल मार्केटिंग या कोर्सची फी किती आहे?

डिजिटल मार्केटिंग या कोर्सची फी तुम्ही कोर्स कुठल्या इन्स्टिट्यूट मधून करता यावर अवलंबून असते मात्र या कोर्सची साधारण ही 35 हजार एवढी असते.

डिजिटल मार्केटिंग या कोर्स कालावधी किती आहे?

डिजिटल मार्केटिंग ह्या कोर्सचा कालावधी तीन ते सहा महिने एवढा असतो.

डिजिटल मार्केटिंग हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष काय आहे?

डिजिटल मार्केटिंग हा कोर्स तुम्ही दहावी बारावी झाल्यानंतर देखील करू शकता व तसेच तुम्ही या क्षेत्रामध्ये बॅचलर आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री देखील घेऊ शकता.

1 thought on “डिजिटल मार्केटिंग कोर्सची संपूर्ण माहिती Digital Marketing Course Information In Marathi”

Leave a Comment