धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

Dhanatrayodashi In Marathi दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या अगोदरचा सण म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा आहे. धनत्रयोदशीला अनन्य साधारण महत्व आहे. नेहमी घर संपत्ती व ऐश्वर्याने भरभरून रहावं म्हणून हा सण साजरा केला जातो. त्याच्याबद्दल आपल्या मनात असणारे प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.

Dhanatrayodashi In Marathi

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

धनत्रयोदशीला सोने, चांदी, नाणे यांची पूजा केली जाते व आपल्या धनसंपत्तीत उत्तरोत्तर वाढ होत जावी, अशी प्रार्थना केली जाते. धनतेरस अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. धन्वंतरी जयंती म्हणजेच धनतेरस. या दिवशी धातूची वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे असे मानले जाते. सोने, चांदीची वस्तू खरेदी केल्याने घरात धन वैभव आणि सुख समृद्धी येते.

परंतु तुम्ही जर सोने-चांदीचे महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर यावर सुद्धा एक मार्ग आहे. आपण अशा वस्तूंची खरेदी करा की,जसे कि सोन्या, चांदी एवढाच लाभ होईल जसे की, पितळ, तांबे, झाडू, जवस धने इत्यादी. धनत्रयोदशीला पितळची वस्तू खरेदी केल्याने तेवढाच लाभ आपल्याला होतो. म्हणून सोने, चांदी खरेदी खरेदी करू शकत नसल्यास, पितळ या धातूची वस्तू खरेदी केली तरी चालेल. पितळ हा धातू शुभ मानला जातो. म्हणून पितळेच्या वस्तू खरेदी करून त्याची पूजा केल्यासही लक्ष्मी माता प्रसन्न होते.

धनत्रयोदशी चे महत्व :-

धनत्रयोदशी चे महत्व आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवीचा जन्म झाला. धन्वंतरी देवी हे धनाची देवी मानले जाते. म्हणून या दिवशी सोने, चांदी, धन, भांडी यांची सुद्धा पूजा करतात. हिंदूप्रमाणे कार्तिक मास कृष्ण पक्षात धनत्रयोदशी दर वर्षी साजरी करत असतात. या दिवशी उत्तर दिशेला कुबेर आणि धन्वंतरीची पूजा स्थापना करून तुपाचा दिवा उत्तर दिशेला लावला जातो. त्याला पांढऱ्या रंगाची आणि धनवंतरी समोर पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य ठेवला जातो.

घरातील सोन्या-चांदीचे दागिने धान्याची पूजा केली जाते. घराच्या बाहेर राईच्या तेलाचा दिवा लावला जातो. हे करण्यामागे एक महत्त्व आपल्याला दिसून येते, की आपल्या जवळ धनसंपत्ती ऐश्वर्य नेहमी राहावे या उद्देशाने धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते.

धनत्रयोदशी कशी साजरी करतात :-

दिवाळीच्या आधीचा दिवस म्हणजेच घरचे रस असते. त्यालाच धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी तेरा दिवे लावून हा सण साजरा केला जातो. तसेच अंगणातही दिवे लावले जातात. देवघरावर विद्युत रोषणाई केली जाते. त्यामागे हाच उद्देश आहे, की सतत आपल्या आयुष्यामध्ये असेच अशाच प्रकारचे रोषणाई राहावी व कुठल्याही प्रकारची आरोग्य हानी न व्हावी म्हणून ही पूजा केली जाते. या संबंधीच्या अडचणी पासून नेहमी दूर रहावे. हा त्यामागचा उद्देश आहे.

धनतेरसच्या दिवशी सर्वात आधी संध्याकाळी तेरा दिवे प्रज्वलित करून आणि तिजोरीतील कुबेराचे पूजन करतात. नंतर चंदन, धूप, दीप, नैवेद्य याने पूजन झाल्यावर आरती करावी आणि मंत्र, पुष्पांजलीअर्पित करतात. तसेच तेरा दिवे लावत असताना, त्या दिव्याजवळ तेरा कवडया ठेवतात. नंतर या कवड्या घरातील एखाद्या कोपऱ्यात दाबून यांनी अचानक धनलाभ होण्याचे योग बनतात. असा त्यामागे उद्देश आहे.

या दिवशी दिवे घराच्या आत आणि तेरा दिवे घराच्या बाहेर ठेवल्याने घरात दारिद्र आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच कुटुंबातील लोकांसाठी भेट वस्तू, कपडे, इतर वस्तू खरेदी करतात. जर आपल्याकडे धन टिकत नसेल तर पैसा सुद्धा येत नसेल तर या दिवशी धनत्रयोदशीची पूजा करत असतांना साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूचे दान सुद्धा देण्याची प्रथा आहे.

तसेच दारावर येणारे गरजू भिकारी किंवा कोणीही मागणारे आले तर त्याला रिकाम्या हाती पाठवत नसतात. दहा दिवस मोठ्या उत्साहाने व आनंदाने हिंदू महिला साजरा करत असतात. या दिवशी कुठलेही प्रकारचे भांडण न करता मनामध्ये सकारात्मकता ठेवली जाते. आपल्या कामात यश मिळविण्यासाठी इच्छा असलेल्या धनत्रयोदशीच्या दिवशी त्या झाडाची दहाडी तोडावी ज्या झाडावर वटवाघळं बसत असतील, तेथील दहाडी ड्रॉइंग रूममध्ये ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात वृद्धी होते.

तसेच धनवंतरी जन्मोत्सव हे आणखीन एक व्रत करण्यात येते. त्या मागे आयुर्वेदाचे प्रवर्तक असलेला विष्णूचा अवतार धन्वंतरी आहे. धन्वंतरी सर्व विद्यात निष्णात होती. मंत्र, तंत्रातही विशारद होती. त्यांच्या अलौकिक प्रतिभेने औषधींचे सारामृत रूपाने देवांना प्राप्त झाले. त्यामुळे त्या देवांचे वैद्य राज हे पद मिळाले. त्यामुळे संध्याकाळी ईशान्य दिशेकडे तोंड करून धनवंतरीची प्रार्थना केली जाते व दीर्घायुष्य मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते.

पौराणिक कथा :-

धनत्रयोदशी या सणामागे एक पौराणिक कथा आपल्याला दिसून येते. ती म्हणजे की, हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असे ऋषी कडून सांगितले होते. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस आहे. त्या रात्री त्यांची पत्नी त्याला झोपू न देण्याचा बेत आखते. त्याच्या अवतीभवती सोन्या, चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात.

महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या, चांदीने भरून ठेवले होते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला होता. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवले. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव आपल्या यमलोकात परततो. अशाप्रकारे राजकुमार महाराजचा जीव वाचतो.

म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे ही म्हटले जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

तसेच धनत्रयोदशीबद्दल आणखीन एक कथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन याबद्दलची जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले. तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आली. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते किंवा या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

“तुम्हाला आमची माहिती धनत्रयोदशी विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :


धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे?

धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. लोकं या दिवशी सोने, चांदी आणि भांडी खरेदी करतात, या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की धनत्रयोदशीच्या दिवशी दान करणे देखील शुभ मानले जाते. तुम्ही अनेक गोष्टी दान करू शकता ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.


धनत्रयोदशी सणाचा अर्थ काय?

से मानले जाते की नवीन “धन” (संपत्ती) किंवा मौल्यवान धातूपासून बनवलेली काही वस्तू हे नशीबाचे लक्षण आहे . आधुनिक काळात, धनत्रयोदशीला सोने, चांदी आणि इतर धातू, विशेषत: स्वयंपाकघरातील वस्तू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ सण म्हणून ओळखले जाते. या दिवशी उपकरणे आणि ऑटोमोबाईल्सची मोठ्या प्रमाणात खरेदी होते.


धनत्रयोदशीची पूजा कशी केली जाते?

लक्ष्मीला फुले, फळे आणि मिठाई अर्पण करा. त्यानंतर तुम्ही भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीला समर्पित इतर मंत्र किंवा स्तोत्रांचा जप करू शकता. पूजेच्या शेवटी, आरती (प्रकाशित दिवे ओवाळणे) करा. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि मित्रांमध्ये प्रसाद (देवतांना अर्पण केलेले अन्न) वाटप करा.

धनत्रयोदशीला तुम्ही कशाची पूजा करता?

परदोष कालात धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. विधी सुरू होण्याआधी देवीला नवीन कापडाचा तुकडा अर्पण केला जातो, जो उंच मचाणावर असतो आणि कापडाच्या मध्यभागी मूठभर धान्य पसरवले जाते.