D.Pharmacy Course Information In Marathi मित्रांनो नमस्कार, एकदा बारावीचा निकाल हातात पडला की मुलांसमोर करिअर संबंधीचे अनेक प्रश्न व पर्याय डोळ्यासमोर येऊन उभे राहत असतात. वैद्यकीय क्षेत्रात जायचे कि, अभियांत्रिकी क्षेत्र चांगले की, कला शाखेत आपले करिअर करायचे .अशा अनेक प्रश्नांनी मुलेही गोंधळून जातात. या प्रत्येक क्षेत्रात अनेक पर्याय असतात व त्या पर्यायांमधून मुलाला असा पर्याय निवडायचा असतो. की ज्यामध्ये आपले पुढील भविष्यही उज्ज्वल होईल. कारण हा टप्पा त्याच्या आयुष्याचा महत्त्वाच्या निर्णयाचा असतो.
डी. फार्मसी कोर्सची संपूर्ण माहिती D.Pharmacy Course Information In Marathi
प्रत्येक क्षेत्रात करिअर साठी भरपूर पर्याय असतात. परंतु प्रत्येक कोर्सची प्राथमिक माहिती नसल्यामुळे कोणते क्षेत्र निवडायचे हा मोठा निर्णय घेणे खूप कठीण होऊन बसते. प्रत्येक मुलाचे स्वप्न असते की ,आपण असा अभ्यासक्रम निवडावा की जेणेकरून आपले भविष्य हे उज्ज्वल होईल. त्या अनुषंगाने काही मुले ही आपल्या पसंतीनुसार पुढील अभ्यासक्रम निवडतात.
जास्त करून मुलेही वैद्यकीय क्षेत्राकडे वळली आहेत. कारण अलिकडच्या काळात कोरोना सारख्या महामारी मुळे वैद्यकीय क्षेत्राला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. तसे पाहिले तर पूर्वीपासून हे वैद्यकीय क्षेत्र खूप विस्तारलेले आहे. वैद्यकीय क्षेत्रात कोणताही अभ्यासक्रम केला किंवा कोणताही डिप्लोमा किंवा पदवीधर अभ्यासक्रम केला तरी 100% नोकरीची हमी असते.
म्हणून भरपूर मुलेही या वैद्यकीय क्षेत्राकडे वळलेली आपल्याला दिसत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात बरेचसे कोर्स खर्चिक असले तरी काही असे कमी खर्चिक व कमी कालावधी असलेले डिप्लोमा कोर्स आहेत. जे सामान्य कुटुंबातील मुलांना परवडणारे आहेत .आज अशाच एका डिप्लोमा कोर्सची मी तुम्हाला सविस्तर पणे माहिती सांगणार आहे. तो म्हणजे डी फार्मसी!!!
आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला डी फार्मसी म्हणजे काय ?
डी फार्मसी हा कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता निकष लागते? डी फार्मसी कोर्सचा कालावधी किती असतो ?हा कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी कोठे कोठे उपलब्ध होतात.तसेच फार्मासिस्ट कोणाला म्हणतात व त्याचे कार्य काय असते. हे सर्व या पोस्टमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.
डी फार्मसी म्हणजे ‘डिप्लोमा इन फार्मसी’ हा एक दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. ज 4 सेमिस्टर मध्ये विभागलेला आहे. हा एक करिअर ओरिएंटेड प्रोग्रॅम आहे .ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात फार्मसी म्हणून करिअर करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी डी फार्मसी हा एक उत्तम पर्याय आहे.
डी फार्मसी हा कोर्स वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कोर्स आहे. हा कोर्स एक औषधनिर्माण-शास्त्र पदविका कोर्स आहे.तसेच फार्मास्युटिकल सायन्स च्या क्षेत्रात करियर आधारित पदविकेचा अभ्यासक्रम आहे. हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना औषध व औषधनिर्मिती संबंधित मूलभूत संकल्पना सह परिचित करण्यासाठी आहे.
डी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर आपण स्वतःचे मेडिकल सुरू करू शकतो किंवा एखाद्या कंपनीमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करू शकतो. तसेच वैज्ञानिक अधिकारी ,गुणवत्ता विश्लेषक, उत्पादन कार्यकारी इत्यादी मध्ये आपण काम करू शकतो. एक फार्मासिस्ट म्हणून आपण समाजात एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
कारण ते समाजातील लोकांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी योगदानाची मोठी भूमिका बजावत असतात. आरोग्यसेवा ही सतत वाढत जाणारी आणि स्थिर नसलेली कारकीर्द असल्यामुळे डी फार्मसी हा कोर्स करून विद्यार्थी या आरोग्य सेवा करियरमध्ये विकास करू शकतो. डी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर आपण हेल्थकेअर क्षेत्रात आपले करिअर योग्य प्रकारे करू शकतो.
आता मला तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बाब सांगायची आहे ती म्हणजे ,बी फार्मसी व डी फार्मसी या दोन्ही कोर्से मध्ये काय फरक आहे!!
डी फार्मसी डी फार्मसी व बी फार्मसी हे दोन्ही कोर्स जरी समान वाटत असले तरी या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे डी फार्मसी हा बारावी नंतर केला जाणारा दोन वर्षाचा कोर्स असतो तर बी फार्मसी हा बारावी नंतर केला जाणारा चार वर्षाचा कोर्स आहे
आता आपण जाणून घेऊयात की डी फार्मसी हा कोर्स करण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते विद्यार्थ्याला सायन्स या शाखेतून बारावी मधून 50 टक्के गुणांनी पास होणे आवश्यक आहे विद्यार्थी जर एससी एसटी ओबीसी या कॅटेगिरी मधील असेल तर 45 टक्के गुणांनी सुद्धा ऍडमिशन मिळते.
डी फार्मसी या कोर्ससाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते काही विद्यापीठ व कॉलेज ही परीक्षा न देता सुद्धा गुणवत्ता आधारावरती प्रवेश देतात प्रवेश प्रक्रिया या दोन प्रकारच्या असतात स्टेट एंट्रन्स एक्झाम म्हणजेच राज्य प्रवेश परीक्षा व विद्यापीठ प्रवेश परीक्षा म्हणजेच युनिव्हर्सिटी एंट्रन्स एक्झाम.
प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे–
- दहावी बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- प्रवेश परीक्षा गुणपत्रिका
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो.
डी फार्मसी साठी अभ्यासाचे विषय
प्रथम वर्ष
- औषध निर्माण शास्त्र 1
- आरोग्य शिक्षण आणि सामुदाय फार्मसी
- बायो केमिस्ट्री
- फार्मसीटीकल केमिस्ट्री 1
- ह्युमन अनातोमी फिजिओलॉजी
द्वितीय वर्ष
- हॉस्पिटल क्लीनिकल फार्मसी फार्मासिटिक्स 2
- फार्मासिटिकल केमिस्ट्री 2
- फार्मकोलॉजी
- टॉक्सिकॉलॉजी
- ड्रग स्टोअर बिझनेस मॅनेजमेंट
- औषधोपचार न्यायशास्त्र
डी फार्मसी या कोर्सची फी
डी फार्मसी या कोर्सची फी ही साधारण दहा हजार ते एक लाख ही वार्षिक फी आहे.
डी फार्मसी केल्यानंतर करिअरच्या संधी
- हा कोर्स झाल्यानंतर आपण बॅचलर इन फार्मसी म्हणजेच बी फार्म ह्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश करू शकतो.
- औषध सल्लागार व औषध सहाय्यक या पदांवर आपण जॉब देखील करू शकतो.
- स्वतःचे मेडिकल टाकू शकतो.
- आपल्याला शासकीय दवाखाने किंवा आरोग्य विभागात देखील नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
हा कोर्स करण्यासाठी महाराष्ट्रातील उत्कृष्ट कॉलेज
- पुणे कॉलेज ऑफ फार्मसी,पुणे
- शासकीय फार्मसी कॉलेज,औरंगाबाद
- इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी,पुणे
- सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, सोलापूर
- सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हिंगोली
FAQ:-
डी फार्मसी हा कोर्स करण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते?
कमीत कमी बारावीत तुम्हाला 50 टक्के गुणांसह भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र किंवा गणित या विषयांमध्ये पास व्हावे लागते.
डी फार्मसी हा कोर्स किती वर्षांचा असतो?
डी फार्मसी हा कोर्स दोन वर्षांचा असतो.
डी फार्मसी हा कोर्स आपल्याला कुठल्या जॉबच्या संधी उपलब्ध करून देतो?
डी फार्मसी केल्यानंतर आपण मास्टर्स किंवा बॅचलर कोर्सेस घेऊ शकतो व आपण स्वतःचे मेडिकल देखील टाकू शकतो किंवा शासकीय रुग्णालयात जॉब देखील करू शकतो.
डी फार्मसी केल्यानंतर मला किती पगार मिळू शकतो?
हे तुम्ही कुठे व कोणत्या विभागात काम करता यावर आधारित असते सरासरी 3.5 लक्ष ते दहा लक्ष प्रति वर्ष एवढे तुम्ही कमावू शकता.