डीएड कोर्सची संपूर्ण माहिती D Ed Course Information In Marathi

D Ed Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर दुसऱ्यांना शिकवण्याची आवड असेल किंवा मुलांना शिकवायची आवड असेल तर तुम्हाला डिएड हा कोर्स खूप चांगला पर्याय आहे तुमच्यासाठी!! चला ,तर मी आज तुम्हाला या डीएड कोर्स विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे.

D Ed Course Information In Marathi

डीएड कोर्सची संपूर्ण माहिती D Ed Course Information In Marathi

Table of Contents

डीएड हा कोर्स असा आहे की जो तुम्हाला कमी वेळेत व कमी खर्चात शिक्षक ही पदवी मिळवून देतो .विशेषतः हा अभ्यासक्रम तुम्हाला शिक्षण व नोकरी या क्षेत्रात सामर्थ्य आणि कौशल्य प्रदान करतो. शिक्षक या पदाला समाजात महत्त्वाचे स्थान आहे. समाजाच्या उन्नतीसाठी योगदान करण्याचे काम शिक्षक हे करत असतात.कारण शिक्षण हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शिक्षक हे असे असतात जे आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याला शिक्षण देऊन सक्षम बनवत असतात.

डीएड हा शिक्षकांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. डिएड हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला शिक्षक ही पदवी मिळते. तुम्हाला इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी या कोर्स नुसार तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी शाळेत शिकवण्याचे काम करू शकता. समाजाला साक्षर करण्याचे मोलाचे काम हे शिक्षक म्हणून आपण करू शकतो. ऋषीने केली नाही शिक्षक होण्यासाठी डीएड व बीएड असे दोन कोर्स असतात. त्यातील आज आपण या डीएड या कोर्स विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आत्ताच्या काळात शिक्षण क्षेत्रात भरपूर प्रमाणात बदल होत आहेत. शिक्षणामध्ये नवीन नवीन डिजिटल साधनांचा वापर केला जात आहे .त्यामुळे शाळांना नव्याने पदवी प्राप्त केलेल्या व आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर करू शकणाऱ्या शिक्षकांची गरज भासत आहे .नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या शिक्षकांची आज गरज आहे.

डीएड या कोर्सचा लॉंग फॉर्म ‘डिप्लोमा इन एज्युकेशन’ असा आहे .हा कोर्स एक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे. प्राथमिक स्तरावरील शिक्षण या कोर्समध्ये आपल्याला मिळते. हा कोर्स शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचा नोकरीभिमुख अभ्यासक्रम आहे. हा कोर्स केल्यामुळे आपण खाजगी, सरकारी प्राथमिक शाळेमध्ये शिकवण्यासाठी सक्षम होत असतो.

या अभ्यासक्रमात प्राथमिक स्तरावरील म्हणजेच प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना शिकविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. शाळेतील मुलांशी मैत्रीपूर्ण पद्धतीने बोलण्याचे व विद्यार्थ्यांना मनोरंजनातून चांगले विषय समजावून सांगण्यासाठी तांत्रिक बाबींचा वापर कसा करायचा याचे शिक्षण दिले जाते.

आता आपण हा डीएड हा कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता लागते हे पाहुयात!!

डीएड या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला बारावी बोर्ड परीक्षा ही 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे महत्त्वाचे असते. हा कोर्स दोन वर्षाचा असतो. हा कोर्स करण्यासाठी मर्यादित कॉलेज व मर्यादित जागा असतात .अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट दिली जाते. डीएड या कोर्सची वयोमर्यादा ठरलेली असते.

ती वयोमर्यादा 17 वर्षे ते 35 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती हा अभ्यासक्रम करू शकतो. हा कोर्स तुम्ही कोणत्याही खासगी व सरकारी कॉलेजमधील करू शकता. खाजगी कॉलेजपेक्षा सरकारी कॉलेजची फी ही कमी असते. प्रत्येक कॉलेजमध्ये डी एड कोर्स करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया ही वेगवेगळी असते.

काही कॉलेजमध्ये बारावीनंतरच्या कौन्सिलिंग फार्ममध्ये प्रवेश करून बारावीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो. बहुतेक कॉलेज मध्ये डीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात व त्या प्रवेश परीक्षेचे मार्क व बारावी बोर्ड चे मार्क गृहीत धरून प्रवेश दिला जातो. प्रवेश परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन भरता येतात.ही प्रवेश परीक्षा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी असते.

डीएड अभ्यासक्रमासाठी पुढील प्रवेश परीक्षा आहेत.

महाराष्ट्र डीएड सीईटी म्हणजे कॉमन एन्ट्रस टेस्ट .ही परीक्षा महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे घेतली जाते. या परीक्षेचा नमुना MCQ किंवा OMR आधारावर असते. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE द्वारे आयोजित केलेली ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा वर्षांतून दोनदा जुलै आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते.

डीएड या कोर्सची फी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळी असते. साधारण 5000 ते 200000 पर्यंत असू शकते. खाजगी कॉलेजमध्ये ही फी जास्त असते तर सरकारी कॉलेजमध्ये ही फी कमी प्रमाणात असते.

आता आपण डीएड या कोर्सच्या अभ्यासक्रमा विषयी माहिती पाहणार आहोत!!

हा अभ्यासक्रम शिक्षकांना विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र समजण्यासाठी शिक्षित करतो. अभ्यासक्रमात मुख्य संकल्पना समाविष्ट करणारे 4 सेमिस्टर समाविष्ट केले आहेत. डीएड या अभ्यासक्रमात उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षण शैक्षणिक मानसशास्त्र बालविकास आणि शिक्षण अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र माध्यमिक शिक्षण समस्या शिकवण्याच्या पद्धती प्रादेशिक भाषा इंग्रजी भाषा शिकवणे गणित शिकवणे कला शिक्षण शारीरिक शिक्षण सामाजिक विज्ञान शिकवणे सामान्य विज्ञान शिकवणे संस्कृती नेतृत्व आणि बदल पर्यावरण अभ्यासाचे शिक्षण शास्त्रमुलांचे शारीरिक आणि भावनिक आरोग्य याबाबत प्रशिक्षण दिले जाते.

मायक्रोचेटिंग शिकवण्याच्या पद्धती.

 • 1 व 2 सेमिस्टर मध्ये विद्यार्थ्याला उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षण.
 • सामान्य विज्ञान शिक्षण.
 • शैक्षणिक मानसशास्त्र भाषा आणि लवकर साक्षरता समजून घेणे .
 • अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र
 • इंग्रजी भाषा शिकवणे शिकवण्याच्या पद्धती
 • शिक्षक ओळख आणि शालेय संस्कृती याचे प्रशिक्षण दिले जाते.
 • तर 3 व 4 सेमिस्टर मध्ये पर्यावरण अभ्यासाचे शिक्षण शास्त्र माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान
 • इंग्रजी भाषेचे शिक्षणशास्त्र मुलांची शारीरिक आणि भावनिक आरोग्य
 • सर्जनशील नाटक
 • ललित कला आणि शिक्षण माध्यमिक शिक्षण समस्या आणी समस्या कार्य
 • शिक्षण गणित शिकवणे

इंटरंशिप कला शिक्षण शारिरिक शिक्षण इत्यादींचा इत्यादींचे शिक्षण दिले जाते.

आता डीएड हा कोर्स करण्यासाठी आपल्यामध्ये कोणते कौशल्य लागते याची माहिती पाहणार आहोत!!

डीएड हा कोर्स करण्यासाठी आपल्यामध्ये धैर्य कौशल्य, उत्साह, मुलांशी व पालकांशी बोलण्याचे कौशल्य, शैक्षणिक कौशल्य व लवचिकता शिकवण्याची आवड, कल्पना शीलता, व्यवस्थापन तसेच मुलांमध्ये व शिक्षकांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण करण्याचे कौशल्य अशा अनेक प्रकारचे कौशल्य अंगी असणे महत्त्वाचे आहे.

या अभ्यासक्रमात चांगल्या संभाषण कौशल्य ची गरज असते. कारण ज्ञान हे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितले तर त्यांच्या मनात योग्य रित्या ते उमटले जाईल आणि हे तेव्हा शक्य होईल जेव्हा शिक्षकांकडे चांगले संवाद कौशल्य असेल. शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समूपदेशक यांसारख्या नोकऱ्या करताना त्यांच्यामध्ये चांगले संभाषण कौशल्य असते गरजेचे असते.

तसेच सकारात्मक शिक्षण व शिस्तीला चालना देण्यासाठी वर्ग व्यवस्थापनासाठी निर्देशात्मक कौशल्य आवश्यक असते. लोकांना मार्गदर्शन करणे प्रेरणा देणे रचनात्मक अभिप्राय देणे यासाठी नेतृत्व कौशल्य अंगी असणे आवश्यक असते. डीएड डीएड हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण सरकारी किंवा खाजगी शाळेमध्ये नोकरी करू शकतो.

आपण प्राथमिक स्तरावर मुलांना शिक्षक म्हणून शिक्षण देऊ शकतो . ग्रंथपाल म्हणूनही काम करू शकतो. प्राथमिक शिक्षणासाठी लेखक बनू शकतो. विविध संस्थांसाठी लेख,पुस्तके,अहवाल इत्यादी लिहू शकतो. तसेच शिक्षक सहाय्यक म्हणूनही काम करू शकतो. तसेच आपण आपले खाजगी कोचिंग क्लासेस सुरु करु शकतो.

आता आपण डीएड ही पदवी घेऊन शिक्षक झाल्यानंतर किती पगार भेटतो याची माहिती पाहुयात!!

सार्वजनिक शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना खाजगी शाळेत काम करणाऱ्या शिक्षकां पेक्षा जास्त पगार असतो. हा पगार सरासरी प्रतिवर्षी 300000 ते 650000 असतो. अनुभव व कौशल्यानुसार तो वाढत असतो. डिएड ही पदवी मिळाल्यानंतर आपण शिक्षक बनतो. त्यानंतर आपण बीएड, एमएड व पीएचडी अशा पदवीधर अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतो.

FAQ’s

डीएड म्हणजे काय?

डीएड हा एक प्रकारचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे .हा डिप्लोमा केल्यानंतर आपल्याला शिक्षक ही पदवी प्रदान होते.

डीएड हा कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता लागते?

डीएड हा कोर्स करण्यासाठी बारावी बोर्ड परीक्षा 50 % गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते.

डीएड या कोर्सची प्रवेश प्रक्रिया कशी असते?

डीएड या कोर्सला काही कॉलेजमध्ये बारावीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो. तर काही कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते व त्या प्रवेश परीक्षेचे गुण व बारावी बोर्डाचे गुण एकत्रित करुन प्रवेश दिला जातो.

डीएड आणि बीएड या दोन्ही कोर्स मध्ये काय फरक आहे?

डीएड हा एक डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. तर बीएड हा अभ्यासक्रम पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. डीएड पदवी असलेले शिक्षक हे प्राथमिक शाळेचे शिक्षक होण्यास पात्र असतात. तर बीएड पदवी असलेले शिक्षक बारावीपर्यंतचे शालेय शिक्षक बनू शकतात.

Leave a Comment