CMA कोर्सची संपूर्ण माहिती CMA Course Information In Marathi

CMA Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, लागला दहावीचा बारावीचा निकाल आता पुढे काय? असा प्रश्न सर्वच मुलांना पडलेला असेल. प्रत्येक जण याच प्रयत्नात असतो की, कशाप्रकारे आपले करिअर उत्तम प्रकारे होईल जेणेकरून आपले भविष्य उज्वल होईल. याच अनुषंगाने तो वेगवेगळ्या कोर्सचा व अभ्यासक्रमाच्या शोधात असतो.

Cma Course Information In Marathi

CMA कोर्सची संपूर्ण माहिती CMA Course Information In Marathi

काही मुलेही उच्च शिक्षण घेण्यासाठी झटत असतात. कारण उच्च शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे हे आपण सर्वजण जाणतोच!! उच्च शिक्षणाच्या मदतीने प्रत्येक जण आपल्या भविष्यातील उज्ज्वल करियर बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये देण्यात येणाऱ्या बॅचलर आणि मास्टर्स अभ्यासक्रम निवडत असतात.

कारण प्रत्येक मुलाचे एक ध्येय असते की योग्य असा उच्चस्तरीय अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन उज्ज्वल करियर घडवणे.मात्र काही मुले ही अशी असतात की त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे एकच ध्येय असते की, दहावी-बारावी नंतर एखादी नोकरी करून आपल्या घराला हातभार लावणे .

काही मुलेही आपल्या परिस्थितीनुसार उच्च शिक्षणाला प्रवेश घेत असतात. मी आज तुम्हाला अशाच एका व्यवसायिक अभ्यासक्रमाविषयी सांगणार आहे .जो वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल करियर करण्यासाठी योग्य पर्याय आहे. तो कोर्स आहे CMA!!!

CMA  चा लॉंग फॉर्म “कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंट” असा आहे. संसदेच्या कायद्यानुसार कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट कायदा 1959 च्या अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. CMA एक प्रोफेशनल कोर्स आहे .तसेच CMA हा फायनान्स क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभ्यासक्रमा पैकी एक आहे.

CMA हा अभ्यासक्रम वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो. ज्या विद्यार्थ्यांना विविध उद्योग आणि कॉर्पोरेट कार्यांमध्ये काम करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी CMA हा कोर्स अत्यंत उत्कृष्ट पर्याय आहे. CMA या कोर्स मध्ये कॉस्ट व मॅनेजमेंट या विषयांचा अभ्यास घेतला जातो. बरेच लोक ICWAI व  ICMAI सारख्या संज्ञामध्ये गोंधळ घालत असतात.

ICWAI व ICMAI यामध्ये नाव वगळता कोणताही फरक नाही .ICWAI (Institute of cost & works accounts) हे नाव बदलून ICMAI (Institute of cost accounts of India)केले.ICWA  या अभ्यासक्रमाचे नाव CMA कोर्स असे ठेवण्यात आले. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कॉस्ट ऑडिट करण्याची मान्यता मिळते. तसेच CMA या कोर्समध्ये अकाउंटिंग, टॅक्सेशन, ऑडिट फायनान्स, वित्तीय विवरण विश्लेषण, बाह्य आर्थिक अहवाल मूल्यांकन समस्या, कार्यरत भांडवल धोरणे इत्यादी विषयांसंबंधीचा सखोल अभ्यास घेतला जातो.

CMA हा कोर्स करण्यासाठी आपल्याला तीन पायऱ्या पार कराव्या लागतात.

  • CMA Foundation
  • CMA Intermediate
  • CMA Final

CMA फाउंडेशन

CMA फाउंडेशन साठी आपण दहावीनंतर फक्त नाव नोंदवू शकता. परंतु बारावी उत्तीर्ण झाल्याशिवाय आपण CMA     फाउंडेशनला प्रवेश घेऊ शकत नाही म्हणजेच CMA फाउंडेशन करण्यासाठी आपल्याला काही पात्रता निकष पूर्ण कराव्या लागतात विद्यार्थी हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातुन बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच विद्यार्थी हा AICET. किंवा कोणत्याही राज्य तंत्रशिक्षण मंडळ याद्वारे घेण्यात येणारी राष्ट्रीय पदविका परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. ती म्हणजे जूनमध्ये आणि डिसेंबर मध्ये .31 जुलै च्या अगोदर डिसेंबर परीक्षेसाठी तर 31 जानेवारी अगोदर जून परीक्षेसाठी प्रवेश घ्यावा लागतो.

फाउंडेशन साठी तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेऊ शकता. तर ICMAI च्या ऑफिसियल संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन सुद्धा प्रवेश घेऊ शकता. फाउंडेशन परीक्षेसाठी विद्यार्थ्याला 4000 रुपये प्रवेश फी असते.

CMA फाउंडेशन मध्ये चार पेपर द्यावे लागतात.

  • पेपर 1: अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे
  • पेपर 2: अकाउंटिंगची मूलभूत तत्त्वे
  • पेपर 3: कायदे आणि नीतिशास्त्राची मूलभूत तत्त्वे
  • पेपर 4: व्यवसाय गणित आणि सांख्यिकी मूलभूत

CMA फाउंडेशन पास होण्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्येक पेपरमध्ये 40 गुण असणे आवश्यक आहे म्हणजे चार पेपरचे मिळून 200 गुण मिळवावे लागतात. CMA फाऊंडेशन ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही CMA इंटरमिडीएट साठी प्रवेश घेऊ शकता.

CMA इंटरमीडिएट

CMA इंटरमीडिएट ला प्रवेश घेण्यासाठी दोन पर्याय असतात. ते म्हणजे CMA ला ऍडमिशन घेण्यासाठी बारावी झाल्यानंतरच प्रथम CMA फाउंडेशन करावे लागते. जर विद्यार्थ्याचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तो CMA फाउंडेशन न करता डायरेक्ट  ॲडमिशन घेऊ शकतो.

CMA इंटरमीडिएटला प्रवेश घेण्यासाठी पात्रता  निकष ठरलेली असते. विद्यार्थी हा मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी व बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया द्वारे केलेला फाउंडेशन कोर्स उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला ललित कला व्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

CMA इंटर मध्ये तुम्ही फाउंडेशन सारख्याच वर्षातून दोन वेळा परीक्षा देऊ शकतात. ती म्हणजे जून परीक्षेसाठी तुम्हाला 31 जानेवारी अगोदर प्रवेश घ्यावा लागतो. तर डिसेंबर च्या परीक्षेसाठी 31 जुलै अगोदर प्रवेश घ्यावा लागतो .तुम्हाला CMA इंटर साठी 20000 रुपये फी आहे. ती आपण दोन टप्प्यातही भरू शकतो. पहिल्यांदा 12000 प्रवेश घेण्याच्या वेळी व नंतर 8000 रुपये ती फी तुम्ही जून परीक्षेसाठी तुम्हाला 31 जानेवारी च्या अगोदर भरावी  लागेल तर डिसेंबर परीक्षेसाठी 31 जुलै च्या अगोदर भरावी लागेल.

CMA इंटर परीक्षेत एकूण आठ पेपर असतात जे 2 ग्रुपमध्ये विभागलेले असतात. फाउंडेशन परीक्षे सारखेच इंटर परीक्षेत सुद्धा एक ग्रुप पास होण्यासाठी त्या ग्रुपमध्ये प्रत्येक विषयात 40 गुण म्हणजेच एकूण दोनशे गुण लागतात. CMA इंटर परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला फायनल परीक्षा देण्याअगोदर पंधरा महिन्याची प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजेच आर्टिकल शिप पूर्ण करावी लागते .

त्यानंतरच तुम्ही फायनल परीक्षेसाठी पात्र होत असतात.ICMAI चे सदस्यत्व मिळवण्यासाठी तुम्हाला तीन वर्षांची आर्टिकलशिप पूर्ण करावी लागते .तीन वर्षां पैकी राहिलेली आर्टिकलशिप फायनल परीक्षा पास झाल्यावर करावी लागते. जर तुम्हाला सदस्यत्व पाहिजे नसेल तर तुम्ही फायनल परीक्षा नंतरही डायरेक्ट जॉब सुद्धा करू शकता.

पहिला ग्रुप

  • पेपर 5 आर्थिक लेखा
  • पेपर 6 कायदे, नैतिकता आणि शासन
  • पेपर 7 प्रत्यक्ष कर
  • पेपर 8 खर्च लेखा आणि आर्थिक व्यवस्थापन

दुसरा ग्रुप

  • पेपर 9 ऑपरेशन मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम
  • पेपर 10 खर्च आणि व्यवस्थापन लेखा
  • पेपर 11अप्रत्यक्ष कर
  • पेपर 12 कंपनी अकाउंट्स आणि ऑडिट

CMA  इंटर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही CMA फायनल परीक्षेसाठी पात्र होत असता. CMA फायनल परीक्षेसाठी देखील इंटर परीक्षेप्रमाणे दोन ग्रुप व आठ पेपर असतात .CMA फायनल ची 17000 रुपये असते. ती भरण्याची शेवटची तारीख ही इंटर् फाउंडेशन परीक्षा सारखीच असते.

CMA फायनल साठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याला इंटरमिजिएट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. CMA फायनल परीक्षेचा शेवटचा ग्रुप देण्याआधी पंधरा महिने आर्टिकलशिप पूर्ण करणे आवश्यक असते .फायनल मध्ये दोन ग्रुप आणि प्रत्येक ग्रुपमध्ये चार पेपर असतात.

पहिला ग्रुप

  • पेपर 13- कॉर्पोरेट कायदे आणि अनुपालन
  • पेपर 14- प्रगत आर्थिक व्यवस्थापन
  • पेपर 15- व्यवसाय धोरण आणि धोरणात्मक खर्च व्यवस्थापन
  • पेपर 16- कर व्यवस्थापन आणि सराव

दुसरा ग्रुप

  • पेपर 17- धोरणात्मक कामगिरी व्यवस्थापन
  • पेपर 18- कॉर्पोरेट आर्थिक अहवाल
  • पेपर 19- खर्च आणि व्यवस्थापन ऑडिट
  • पेपर 20- आर्थिक विश्लेषण आणि व्यवसाय मूल्यांकन

CMA या कोर्सचा कालावधी

CMA हा कोर्स भारतात तीन ते चार वर्षाच्या कालावधीत पूर्ण केला जातो. तर USA मध्ये कोर्स पूर्ण करण्यासाठी फक्त सहा महिने लागतात .या कोर्समध्ये 3 स्तर व 20 विषय असतात. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साधारणपणे तीन ते चार वर्षे लागतात.

म्हणजे विद्यार्थ्याला CMA होण्यासाठी फाउंडेशन 6 महिने, इंटरमिजिएट 1 वर्ष व फायनल 1 वर्ष असे अशा पायर्‍या पार कराव्या लागता.CMA या अभ्यासक्रमात

इकॉनॉमिक्स ,अकाउंटन्सी, कॉस्ट आकाउंटिंग, मॅनेजमेंट व्यवस्थापन लेखांकन, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, व्यवसाय मूल्यांकन,कॉर्पोरेट लाँ यांसारख्या विषयासंबंधी असतो.

CMA कोर्स नंतर करिअर पर्याय कोणते?

CMA पूर्ण झाल्यानंतर उमेदवार हा कॉस्ट अकाउंटिंग फ़र्म मध्ये काम करू शकतो किंवा स्वतःची फर्म ही चालू करू शकतो. त्यासोबतच CMA पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध असते. यामध्ये भारतातील मोठ्या कंपन्या आणि PSUS मध्ये मोठ्या प्रमाणावर CMA ला मागणी असते. हे विविध क्षेत्रात काम करू शकतात जसे की,

  • वित्त व्यवस्थापक.
  • आर्थिक विश्लेषक.
  • मुख्य वित्त अधिकारी.
  • आर्थिक नियंत्रक कार्पोरेट कंट्रोल. मुख्य गुंतवणूक अधिकारी.
  • खर्च लेखपाल.

भारतातील फ्रेशर CMA साठी सरासरी पगार वार्षिक सात लाख रुपये आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्याच्या आधारावर ही संख्या वीस लाखापर्यंत ही जाऊ शकते. त्याच्या अनुभवामुळे आणि कौशल्यामुळे CMA साठी त्याच्या पगारावर कोणताही प्रतिबंध येत नाही.

CMA अभ्यासक्रम केल्यामुळे आपल्याला भरपूर फायदे होत असतात. जसे की ,भारतात व परदेशातही विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी आपल्याला मिळते .CMA ला मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग शेत्रात जास्त मागणी आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती देत असते. हा कोर्स केल्यानंतर केवळ उच्च स्तरीय व्यवस्थापन नोकरी व उच्चतम् पगार एवढेच  नाही तर करिअर ची वाढ नोकरी, सुरक्षितता आणि सामाजिक प्रतिष्ठा सुनिश्चित करत असते.

FAQ

CMA म्हणजे काय?

CMA हा भारतातील इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटचा ऑफर केलेला एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. हा  अभ्यासक्रम कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटन्सी व्यवसायाला प्रोत्साहन  आणि नियमन करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला होता.

CMA होण्यासाठी काय करावे लागते?

CMA करण्यासाठी तीन स्तर पार पाडावे लागतात. ते म्हणजे फाउंडेशन, इंटरमिडीएट,फायनल या तीन स्तराना पात्र ठरल्यानंतर तुम्ही CAM होता.

CMA साठी कोणती पात्रता निकष पूर्ण करावी लागते?

ललित कला वगळता इतर कोणत्याही विषयात वरिष्ठ माध्यमिक किंवा पदवी उत्तीर्ण केलेली हवी किंवा ICSI / ICAI च्या इंटेमिडीएटची फौंडेशन उत्तीर्ण केली असेल तर CMA या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकता.

Leave a Comment