शेवंती फुलाची संपूर्ण माहिती Chrysanthemums Flower Information In Marathi

Chrysanthemums Flower Information In Marathi शेवंतीचे फुल जे लोकप्रिय फुल आहे. जे सर्वाना आवडणारे सुंदर फुले आहे. शेवंती वनस्पतीला इंग्रजीमध्ये क्रायसॅन्थेमम मल्टीफोलियम असे म्हणतात. हे वनस्पती आहेत. ते मूळ पूर्व आशिया आणि ईशान्य युरोपमधील आहेत. बहुतेक प्रजाती पूर्व आशियामधून उगम पावतात, आणि विविधतेचे केंद्र चीनमध्ये आहे.  चला तर मग जाणून घेऊया शेवंती या फुला विषयी सविस्तर माहिती.

Chrysanthemums Flower Information In Marathi

शेवंती फुलाची संपूर्ण माहिती Chrysanthemums Flower Information In Marathi

बागायतीच्या असंख्य जाती आणि वाण अस्तित्वात आहेत. ही वनौषधी युक्त बारमाही फुलांची झाडे आहेत. ज्यांच्या फुलांना क्रायसॅन्थेमम्स, मम्स किंवा क्रायसॅन्थ अशा अनेक नावाने संबोधले जाते. आणि शेवंती हे फुल गुलाबानंतर जगातील दुसरे सर्वात सुंदर मानले जाते.

ही सुवासिक फुले हलका गुलाबी, गडद गुलाबी, पिवळा, पांढरा अशा अनेक रंगात येतात. आपण या फुलांना आपल्या सभोवताली लाऊन आपल्या घराची शोभा वाढवली जाते. हिंदू धर्मात हे एक पवित्र फुल मानले जाते. देवाच्या पूजेसाठी तसेच देवाला अर्पण करण्यातसाठी शेवंती फुलाचा उपयोग केला जातो. या फुलाच्या झाडामुळे हवा शुद्ध होते. व आपले आरोग्य चांगले राहते.

शेवंतीची लागवड :

शेवंतीचे फुल हे एक लोकप्रिय फुल मानले जाते. याची लागवड आपण आपल्या घराभोवती सुध्दा करू शकतो. काही भागात शेवंती फुलाची शेती केली जाते. भारतात शेवंती फुलांची लागवड मे ते जून महिन्यात केली जाते. फुलांची लागवड भारतात व्यावसायिक पातळीवर होते. या झाडांना बाजारभाव आणि मागणी चांगली आहे. फुलांचा उपयोग लग्नसमारंभ ,समारंभ आणि इतर विविध कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी केला जातो. महाराष्ट्र तामिळनाडू आणि कर्नाटक ही काही राज्ये आहेत, जी या फुलांची व्यावसायिक लागवड करतात.

शेवंती फुलाचे छोटेसे झुडूप असते, सर्वाना आवडते फुल आहे. या झाडाची उंची हे 2 फूट पर्यत होते. आणि पाने हे साधारपणे 1, 2 इंच असतात. पानाच्या रंग हा हिरवा असतो. आणि मुळे जास्त खोल नसतात. हे सर्वाना आकर्षित करनारे फुल आहे. याचा अनेक प्रजातीमध्ये अलग अलग रंगाची फुलं पाहायला मिळतात. साधारणपणे पांढरे फुल भारतात जास्त प्रमाणात आढळून येतात.

औषधी गुणधर्म:

शेवंती फुल हे एक औषधी वनस्पती मानली जाते. यामुळे अनेक रोग चांगले होतात. त्यापैकी शेवंती फुलाचा चहा पिल्याने उत्तम आरोग्य फायदे आहेत. जसे की तुमची त्वचा बरी होते, आणि तुमच्या मज्जातंतू शांत होतात. तसेच शेवंतीचा उपयोग छातीत दुखणे, डोकेदुखी, ताप आणि उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी केला जातो. यामुळे आपले शरीर हे निरोगी व चांगले राहते.

शेवंती फुलामुळे मळमळ होणे थांबते आणि चक्कर येण्याची काळजी घेण्यासाठी देखील वापरले जाते. या फुलात भरपूर जीवनसत्त्वे आढळून येतात. विशेषत: यामध्ये व्हिटॅमिन बी असते, आणि डोळ्यांसाठी खूप चांगले असते.

शेवंती फुलाचे उपयोग :

शेवंती फुलाचा उपयोग लग्न आणि देवीची पूजा यासारख्या विविध सांस्कृतिक आणि धार्मिक समारंभांमध्ये वापरल्या जाणार्‍या लोकप्रिय फुलांपैकी शेवंती फूल आहे. यामुळे देवाला हार केले जातात. तसेच लग्न कार्यात या फुलांचा उपयोग वरमाला करण्यासाठी केला जातो.

शेवंती फुलाचा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुष्पगुच्छ बनवण्यासाठी फुलांच्या उपयोग केला जातो. तसेच व्यवस्थेमध्ये याचा वापर केला जातो. हस्तांदोलन करण्यासाठी याचा वापर केला जातो. शेवंती फुलाचा नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वापरले जाऊ शकते. यामुळे माश्या, डास आणि बीटलसाठी एक तिरस्करणीय एजंट म्हणून कार्य करते. हे फूल घरामध्ये वापरता यामुळे हवा शुद्ध करण्यास मदत करते.

शेवंती फुलाचे पूर्व आशियातील चीन, जपान आणि कोरियामध्ये पांढरे शेवंती संकट, शोक किंवा दुःखाचे प्रतीक म्हणून वापर केला जातो. इतर काही देशांमध्ये ते प्रामाणिकपणाचे प्रतिनिधित्व करतात. शेवंती फुलाचा उपयोग हा इटली, स्पेन, पोलंड, हंगेरी, क्रोएशिया इत्यादी देशात हे फुल मृत्यूचे प्रतीक मानले जाते आणि हे फुल केवळ अंत्यविधीसाठी किंवा कबरीवर वापरले जातात.

प्रजाती :

शेवंती फुलाचे अनेक प्रजाती आढळून येतात. विशेषत: पूर्व आशियामध्ये सामान्य आहेत. जिथे ते सहसा कलेत चित्रित केले जातात, आणि बरेच लोकप्रिय शोभेच्या वस्तू आहेत. यामध्ये पांढरी शेवंतीमध्ये बग्गी, पांढरी रेवडी, स्नो बॉल, ब्युटी, बिरबल सहानी, राजा, कस्तुरबा गांधी, जेट स्नो, शरदशोभा, मिरा हे प्रकार आढळून येतात. तसेच यातील काही प्रजाती भारतात आढळून येतात.

पिवळा शेवंती फुलामध्ये झिप्री, कुंदन, इंदिरा गोल्ड, सोनाली तारा, सुपर जायंट, चंद्रमा, पिवळी रेवडी, सोनाली तारा, यलो गोल्ड हे असे अनेक प्रकारयामध्ये आढळून येतात. लाल शेवंती फुलामध्ये जया, राखी, जुली, रेडगोल्ड, गार्नेट, डायमंड ज्युबली अशा प्रजाती आहेत. तर जांभळा शेवंती फूलामध्ये शरदप्रभा, निलिमा, पिकॉक, महात्मा गांधी, क्लासिक ह्या प्रजाती आढळून येतात. यातील काही प्रजाती आपण आपल्या सभोवताली आढळून येतात.

आधुनिक लागवड केलेले शेवंती फुल त्यांच्या जंगली फुलापेक्षा पेक्षा जास्त शोभिवंत असतात.  फुलांचे डोके विविध स्वरूपात आढळतात, आणि डेझीसारखे किंवा सजावटीचे असू शकतात. जसे की पोम्पन्स किंवा बटणे.  या वंशामध्ये अनेक  संकरित प्रजाती आणि बागायती हेतूंसाठी विकसित केलेल्या हजारो जाती आहेत.  पारंपारिक पिवळ्या व्यतिरिक्त इतर रंग उपलब्ध आहेत.

धार्मिक महत्व :

शेवंतीचे फुल हे हिंदू धर्मात एक पवित्र फुल मानले जाते. यामुळे देवाची पूजा अपूर्ण असते असे मानले जाते. महालक्ष्मी पूजेसाठी शेवंती फुलाचा वापर केला जातो. या फुलाचे हार व वेण्या केल्या जातात. त्या देवीला सजविण्यासाठी वापरल्या जातात. तसेच देवाच्या पूजेसाठी सुध्दा या फुलाचा वापर करतात. मुस्लिम धर्मात या फुलांचा मोठ्या प्रमाणावर केला जातो. माजितमध्ये चादर सोबत फुलाच्या हाराचा उपयोग करतात. इतर धर्मात सुध्दा शेवंती फुलाला महत्व आहे.

आढळून येणारे क्षेत्र :

शेवंती फुलाचे 1000 प्रजाती आहेत. ते पूर्व आशिया तसेच काही युरोपीय देशांमध्ये फ्रान्स, बेल्जियम, इटली, स्पेन, पोलंड, हंगेरी, क्रोएशिया मध्ये आढळून येतात. तसेच भारतात सुध्दा मोठ्या प्रमाणावर फुल आहेत. सर्वात जास्त मोठी बाजारपेठ ही चीन मध्ये आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. भारतातील काही राज्यात याचे उत्पादन घेतले जाते.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

क्रायसॅन्थेमम बियाण्यांपासून वाढू शकतो का?

क्रायसॅन्थेमम बियाणे वाढण्यास सोपे आहे आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर लागवड केलेले फूल आहे. क्रायसॅन्थेममच्या चमकदार रंगांनी भरलेली बाग प्रत्येक माळीचा आनंद आहे.

शेवंती फुलाचे इंग्रजी नाव काय आहे?

शेवंती, क्रायसॅन्थेमम (पिवळा) - वनस्पती.

शेवंतीच्या फुलांची काळजी कशी घ्याल?

शेवंतीच्या रोपांची निगा राखण्यासाठी तिला पूर्ण सूर्यप्रकाश मिळावा, तसेच फुलांच्या हंगामात ती रात्रीच्या प्रकाशाच्या स्रोतापासून दूर ठेवली जाईल याचीही काळजी घेते . पाणी पिण्याची समतोल असणे आवश्यक आहे कारण खूप कमी किंवा जास्त पाण्यामुळे त्रास होऊ लागतो.

शेवंतीची लागवड कधी करतात ?

शेवंतीची लागवड एप्रिल-मे महिन्यात करतात. या लागवडीपासून दसरा-दिवाळी सणांच्या काळात फुले उपलब्ध होतात. या लागवडीसाठी सुरुवातीच्या काळात पाणी उपलब्ध असेल, तरच ही लागवड करता येते. पाण्याची उपलब्धता नसेल, तर जून-जुलैमध्ये लागवड करता येते.

शेवंतीच्या प्रजाती कोणत्या आढळून येतात?

शेवंती फुलाचे अनेक प्रजाती आढळून येतात. विशेषत: पूर्व आशियामध्ये सामान्य आहेत. जिथे ते सहसा कलेत चित्रित केले जातात, आणि बरेच लोकप्रिय शोभेच्या वस्तू आहेत. यामध्ये पांढरी शेवंतीमध्ये बग्गी, पांढरी रेवडी, स्नो बॉल, ब्युटी, बिरबल सहानी, राजा, कस्तुरबा गांधी, जेट स्नो, शरदशोभा, मिरा हे प्रकार आढळून येतात. तसेच यातील काही प्रजाती भारतात आढळून येतात.

Leave a Comment