Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Story In Marathi एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.
चल रे भोपळया टुणुक टुणुक – मराठी बालकथा Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Story In Marathi
ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.’ कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ‘ वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे गेली .
ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. थोडया दिवसांनी तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की कोल्हा आणि वाघ आपल्याला खाणार आहे . तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला . आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला.
त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ‘ चल रे भोपळया टुणुक टुणुक’. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे थांब!’ आतून म्हातारी म्हणाली ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक’. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला.
थोडं पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे थांब!’ आतून म्हातारी म्हणाली ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला.
पण म्हातारी आतून म्हणाली ‘चल रे भोपळया टुणुक टुणुक!’. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.
भोपळ्यात बसलेली असल्यामुळे सिंह आणि अस्वल तिला ओळखू शकले नाही अशा प्रकारे ती आपल्या घरी सुखरूप आली. अखेर तिच्या युक्तीनेच तिचे प्राण वाचवले आणि सिंह आणि अस्वल तिची वाटच बघत राहिले.
तात्पर्य :- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ !
हे सुद्धा अवश्य वाचा :-