Bulbul Bird Information In Marathi अतिशय नाजूक छोटासा मात्र तितकाच आकर्षक असणारा बुलबुल पक्षी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. पिकानोनॉटीडी या कुळातील हा पक्षी अतिशय छोटासा असून, चिमणी व साळुंखि या पक्षांच्या अकरादरम्यान या पक्षाचा आकार असतो. या पक्षाच्या अनेक प्रजाती असून, जगभरात विचार केल्यास या पक्षाच्या तब्बल ९० हजार ते एक लाख प्रजाती आढळून येत असतात.
बुलबुल पक्षाची संपूर्ण माहिती Bulbul Bird Information In Marathi
अतिशय छोट्या शरीराचा मात्र लांब शेपटी असलेला हा पक्षी त्याच्या डोक्यासाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रित्या ओळखला जातो. त्याच्या डोक्यावर असणारे केस जणू काही टोपी घातल्यासारखेच दिसत असतात. सारखीच शरीररचना असल्यामुळे या पक्षातील नर व मादी ओळखणे जरासे कठीण समजले जाते.
यातील नरपक्षी चांगला गात असला, तरी देखील मादी पक्षी गाण्यासाठी असमर्थ असतो. उष्ण कटिबंधीय परिसरामध्ये राहणारे हे पक्षी आफ्रिका आणि आशिया या खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतात. काळा किंवा राखाडी रंगाचा हा पक्षी अतिशय आकर्षक असून, या पक्षाला काही ठिकाणी पाळीव देखील बनवले जात असते.
त्याच्या सौंदर्यासाठी व आवाजासाठी ओळखला जाणारा हा पक्षी वेळप्रसंगी त्याच्या लढण्यासाठी देखील ओळखला जातो. या पक्षाच्या अनेक प्रजाती असल्या, तरी देखील सर्वात प्रसिद्ध प्रजाती म्हणून गुलदुम बुलबुल या प्रजातीला ओळखले जाते. आजच्या भागामध्ये आपण या बुलबुल पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.…
नाव | बुलबुल |
प्रकार | पक्षी |
किंगडम | ऍनिमालिया |
फायलम | कोरडाटा |
वर्ग | एव्हिज |
ऑर्डर | पॅसीरेफॉर्मिस |
उष्ण कटिबंधीय परिसरातील पक्षी असणारा हा बुलबुल अतिशय आकर्षक असून, तो सामाजिक स्वरूपाचा देखील आहे. मुख्यतः कळपामध्ये राहणारा हा पक्षी मानवी वसाहतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतो. त्याचबरोबर झाडाझुडपांवर घरटे करण्यासाठी देखील हा पक्षी ओळखला जात असतो.
नर व मादी दोघेही मिळून गोलाकार वाटीच्या आकाराचे घरटे बनवत असतात. त्यासाठी वाळलेल्या गवताचा वापर केला जात असतो. घरटे तयार झाल्यानंतर आपल्या सवंगड्यांसोबत हे बुलबुल पक्षी घरट्यामध्ये जोडीने राहत असतात. त्यानंतर या घरट्यामध्ये पिल्लांना जन्म देऊन त्यांचे संगोपन देखील केले जात असते.
बुलबुल पक्षाचे खाद्य:
बुलबुल हा पक्षी एक सर्व भक्षी प्रकारातील पक्षी असल्यामुळे तो विविध प्रकारचे अन्न खात असतो. झाडावर राहत असल्यामुळे त्याच्याकडून विविध झाडांची पाने, फळ, इत्यादी गोष्टी खाल्ल्या जात असतात. त्याचबरोबर या झाडावर आढळणारे विविध लहान लहान कीटक, आणि अळ्या यांना खाण्यासाठी देखील हा बुलबुल पक्षी ओळखला जात असतो. मानवी वसाहतींमध्ये आल्यानंतर विविध धान्याचे दाणे देखील या पक्षाकडून खाल्ले जात असतात.
बुलबुल पक्षाची मनोरंजक तथ्य माहिती:
अतिशय छोटा असलेला हा बुलबुल पक्षी तेवढाच मनोरंजक देखील आहे. हा पक्षी अंडी देऊन आपल्या पिल्लांना जन्म देत असतो. यासाठी एका वेळेला या पक्षाकडून मादीच्या माध्यमातून दोन ते तीन अंडी दिली जात असतात. त्यानंतर १४ दिवसांची काळजी घेऊन, या अंड्यातून पिल्ले बाहेर पडत असतात.
- भारतातील सर्वात प्रसिद्ध व ओळखीची बुलबुल पक्षाची प्रजाती म्हणून घटड बुलबुल च्या प्रजातीला ओळखले जात असते.
- बुलबुल पक्षी गात असताना जवळपास २०० वेगवेगळ्या स्विंग्स अंतर्गत तो गाऊ शकत असतो.
- बुलबुल पक्षातील नर आणि मादी दिसण्याला अतिशय सारखेच असतात.
- बुलबुल पक्षाच्या नरालाच केवळ गाणी गाता येत असते. मादी गाणे गाऊ शकत नाही, त्यामुळे या पक्षातील नर व मादी सारखे दिसूनही सहजतेने ओळखले जाऊ शकतात.
- इराण या देशाने बुलबुल पक्षाला आपल्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केलेला आहे.
- बुलबुल पक्षांमध्ये हंगामी स्वरूपाचे प्रजनन आढळून येत असते, ज्या अंतर्गत बुलबुल पक्षाची मादी जून ते सप्टेंबर दरम्यान अंडी देत असते.
- बुलबुल या पक्षाचा साधारण रंग काळसर तपकिरी असला तरी देखील विविध रंगाच्या छटा त्याच्या वेगवेगळ्या अवयवांवर आढळून येत असतात, आणि त्याच अंतर्गत या पक्षाच्या विविध प्रजाती देखील पडत असतात.
बुलबुल हा पक्षी कोणत्या ठिकाणी राहतो, त्याच प्रकारे त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना कोणत्या प्रकारची रंगछटा प्राप्त झालेली आहे, यानुसार त्याचे विविध प्रकार पडत असतात. त्यातील सात प्रकार हे भारतामध्ये प्रमुख समजले जातात. यातील काही पक्षांना मानेला वेगळा रंग प्राप्त असतो, तर काहींच्या डोक्यावर वेगळ्या रंगाची छटा दिसून येत असते, काहींची शेपटी तर काहींच्या गळ्याभोवतीचा भाग वेगवेगळ्या रंगात असतो. यातील एका प्रजातीला तर अगदी लाल रंगाच्या मिशा देखील दिसून येत असतात. त्यामुळे या विविध गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर त्यांचे विविध प्रकार पडत असतात.
निष्कर्ष:
बुलबुल म्हटलं की आपल्याला अतिशय छोटा व गाणारा पक्षी आठवत असतो. मात्र या पक्षाचे वैशिष्ट्य असे सांगता येते, की जो पक्षी गात असतो तो केवळ नर बुलबुल पक्षी असतो. यातील मादी बुलबुल पक्षी गाण्यासाठी असमर्थ समजले जाते. नर मादी समान दिसत असले, तरी देखील त्यांच्या गाण्याच्या सवयीवरून त्यांना ओळखले जाऊ शकते.
अतिशय आकर्षक रंगांमध्ये आणि छोट्या आकारामध्ये असलेला हा पक्षी खूपच उत्तम स्वरूपाचा असून, उष्णकटिबंधीय परिसरामध्ये राहण्यासाठी हा पक्षी ओळखला जातो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर हा पक्षी मानवी वसाहतीमध्ये किंवा झाडाझुडपांमध्ये देखील दिसून येत असतो.
हा पक्षी आपल्या पिल्लांसाठी घरट्याची देखील निर्मिती करत असतो. यासाठी तो कोरड्या गवताचा वापर करत असतो. वाटीच्या आकाराचे गोलाकार घरटे बनवल्यानंतर नर व मादी बुलबुल या घरट्यामध्ये राहतात, व आपल्या पिल्लांना जन्म देत असतात. सर्वभक्षी प्रकारातील हा प्राणी अळ्या, कीटक,पाने, फळे, इत्यादी गोष्टी खाण्यासाठी ओळखला जात असतो.
आजच्या भागामध्ये आपण या गुलबुल पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून, या पक्षाच्या राहण्याचे ठिकाण, या पक्षाला आवश्यक असणारे खाद्य, या पक्षाचे भारतामध्ये आढळणारे विविध सात प्रकार, त्याचे केले जाणारे वर्गीकरण बघण्याबरोबरच या पक्षाविषयी काही मनोरंजक तथ्य माहिती देखील जाणून घेतलेली आहे.
FAQ
बुलबुल हा पक्षी कोणत्या परिसरामध्ये राहणे पसंत करत असतो?
बुलबुल हा पक्षी एक उष्णकटिबंधीय परिसरामध्ये राहणारा पक्षी असून, त्याला मानवी वसाहतीसह झाडाझुडपांमध्ये देखील बघितले जाऊ शकते.
बुलबुल या पक्षाच्या नर व मादी मधील काय वैशिष्ट्य सांगता येईल?
बुलबुल या पक्षामधील नर आणि मादी हे पक्षी दिसायला अतिशय समान किंवा सारखे असतात. मात्र यातील केवळ नर पक्षी गाऊ शकतो, त्यामुळे या पक्षांना ओळखणे सोयीचे होत असते.
बुलबुल या पक्षाची संख्या कोणत्या खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येत असते?
काळसर राखाडी रंगाचा हा पक्षी मुख्यतः आफ्रिका आणि अशा या खंडामध्ये मोठ्या संख्येने आढळून येत असतो.
भारतामध्ये बुलबुल या पक्षाचे कोणते मुख्य प्रकार आढळून येत असतात?
बुलबुल या पक्षाचे संपूर्ण भारतभर सात प्रकार आढळतात. ज्यामध्ये हिमालय बुलबुल, रेड वेंटेड बुलबुल, येल्लो थ्रोटेड बुलबुल, फ्लेम थ्रोटेड बुलबुल, व्हाइट इयर बुलबुल, व्हाईट ब्रोड बुलबुल, आणि ब्लॅक क्रेस्टेड बुलबुल इत्यादी प्रजातींचा समावेश होतो.
बुलबुल प्रजातीचे साधारण आयुष्यमान आणि वजन किती असते?
बुलबुल ही प्रजाती साधारणपणे १० ते ११ वर्षांचे आयुष्यमान जगत असते. त्याचबरोबर तिचे वजन अंदाजे २५ ते ४५ ग्रॅम पर्यंत असते.