बी.एस.डब्ल्यू. कोर्सची संपूर्ण माहिती BSW Course Information In Marathi

BSW Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, लहानपणापासून काही लोकांच्या मनात समाजसेवेची इच्छा रुजलेली असते. समाजासाठी काही करण्याची फार इच्छा असते .परंतु करिअर करण्याच्या नादात ते राहून जात असते. प्रत्येक जण आपले चांगले भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर चला मग!! आज मी तुम्हाला अशाच एका कोर्स विषयी माहिती सांगणार आहे .हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समाजसेवेची इच्छा पूर्ण करता येईल व उत्पन्नाचे एक चांगले साधनही उपलब्ध होईल. या कोर्सचे नाव आहे बी.एस.डब्ल्यू. कोर्स!!!

B.s.w. Course Information In Marathi

बी.एस.डब्ल्यू. कोर्सची संपूर्ण माहिती BSW Course Information In Marathi

Table of Contents

हा कोर्स एक सामाजिक कार्याशी निगडित अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे . तसेच तो एक प्रोफेशनल डिग्री कोर्स आहे. या कोर्सचा मुख्य उद्देश हा सामाजिक सेवा व समाजामध्ये चांगल्या गोष्टी बनवण्यासाठी शिक्षण प्रदान करणे हा असतो. समाजात चांगल्या रीतीने समाजाचे कल्याण करण्यासाठी व्यवस्थेचे आणि परिस्थितीची देखील समज असणे गरजेचे असते.

हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी बी.एस.डब्ल्यू. चा अभ्यासक्रम आहे. आजच्या काळात सामाजिक कार्य सर्वात वेगवान असे आहे. बी.एस.डब्ल्यू. हा कोर्स समाज कार्यासाठी एक व्यापक पाया देत असतात. ही पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ज्ञान व कौशल्य प्राप्त होते.

चला तर आता मी तुम्हाला बी.एस.डब्ल्यू. या कोर्स विषयी माहिती सांगणार आहे. बी.एस.डब्ल्यू. चा लॉंग फॉर्म “बॅचलर ऑफ सोशल वर्क” असा आहे. म्हणजेच एक प्रकारची सामाजिक कार्य पदवी आहे. या कोर्स केल्यामुळे विद्यार्थी समाजासाठी चांगले काम करून स्वतःचे भविष्य ही चांगले घडवत आहे. समाजात एक प्रकारची ओळख निर्माण करण्यासाठी या कोर्सचा आपल्याला फायदा होतो. बी.एस.डब्ल्यू.हा एक ग्रॅज्युएशन पदवी कोर्स आहे.

तसेच हा एक व्यावसायिक कोर्स सुद्धा मानला जातो. हा कोर्स आपण बारावी झाल्यानंतर करू शकतो. या अभ्यासक्रमात समाजाचे कल्याण कशा प्रकारे केले जाऊ शकते याचे ज्ञान दिले जाते. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था म्हणजे एन.जी.ओ. कशा चालवल्या जातात, त्यांची कामे कशी असतात इत्यादी गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात.

तसेच समाजातील समस्यांची ही जाणीव करून दिली जाते. समाजातील लोकांना तुम्ही कशी मदत करू शकता या गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जातात. आपल्या देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक समस्यांबद्दल आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सामाजिक कल्याणकारी संस्था बद्दल देखील माहिती दिली जाते.

या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये समाज कल्याणाची भावना रुजवणे आणि प्रत्येकाला समाजकल्याण याची सर्व माहिती उपलब्ध करुन देणे हा असतो. आता आपण बी.एस.डब्ल्यू. हा कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता लागते हे पाहुयात!!!बी.एस.डब्ल्यू.हा एक ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स आहे .हा कोर्स करण्यासाठी आपल्याला कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

कोणत्याही शाखेतून असली तरीही चालेल. तुम्हाला बारावीच्या परीक्षेत किमान 50% गुण मिळणे आवश्यक आहे. जो विद्यार्थी सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा कोणत्याही संबंधित क्षेत्राची संबंधित असेल त्याला सामान्यतः बी.एस.डब्ल्यू. हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असे विशेष गुण असणे आवश्यक आहे.

जसे की, तो ज्या भागात काम करणार आहे त्या भागातील सामाजिक समस्यांची जाणीव, लक्षपूर्वक ऐकण्याचे कौशल्य, लोकांशी संपर्क करून बोलण्याचे कौशल्य, सहनशीलता, समन्वय साधण्याची क्षमता ,सम उपचार, लोकांच्या भावना समजून येण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कौशल्य. एखादि व्यक्ती जर काही गोष्टींनी दुखी असेल तर त्याची समजूत घालून त्याचे मन वळवण्याचे कौशल्य असले पाहिजे .

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्यांचा उपयोग करून समाजातील विविध प्रकारे त्रस्त असलेल्या व्यक्तींना म्हणजेच मानसिक रित्या असंतुलित व्यक्ती ,एड्स ने आजार ग्रस्त व्यक्ती ,घरेलू किंवा इतर अत्याचाराने पिडीत असलेल्या व्यक्ती, दारिद्र रेषेखालील समाज ,बेघर व्यक्ती अशा विविध घटकांना योग्य ती मदत करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे.

आता आपण बी.एस.डब्ल्यू. या कोर्सला प्रवेश कसा घेता येतो हे पाहुयात!!!

या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी दोन मार्ग असतात. प्रथम म्हणजे तुम्ही तुमच्या बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश घेऊ शकता व दुसरा म्हणजे तुम्ही एन्ट्रास एक्झाम देऊन प्रवेश मिळवू शकता. हा प्रवेश कॉलेजवर अवलंबून असतो. काही कॉलेजमध्ये बारावीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो. तर काही कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो. या कोर्ससाठी वयोमर्यादा ठरवलेली असते. उमेदवाराचे वय 17 वर्षापेक्षा जास्त असावे.

या कोर्सचा कालावधी 3 वर्षांचा असतो. हा अभ्यासक्रम 6 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे .प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर असतात. बी.एस.डब्ल्यू. हा कोर्स इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. बी.एस.डब्ल्यू.या कोर्समध्ये प्रामुख्याने तीन प्रमुख भाग असतात फाउंडेशन कोर्स,ऐच्छिक कोर्स व फिल्डवर्क कोर्स.

या कोर्सची फी साधारणत 6000 ते 10000 प्रति वर्षी अशी असते. आपण जर खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर ती जास्त असते .तसेच सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर आपल्याला ही फीज कमी प्रमाणात द्यावी लागते.

आता आपण बी.एस.डब्ल्यू. या कोर्सच्या अभ्यासक्रमाविषयी पाहूयात!!!

बी.एस.डब्ल्यू.या कोर्स मध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये पुढील विषय शिकवले जातात.

 • सामाजिक कार्याचा परिचय
 • कौटुंबिक शिक्षणाचा परिचय.
 • एचआयव्ही/एड्सचा परिचय
 • संवादासह सामाजिक कार्यात हस्तक्षेप.
 • पदार्थ दुरुपयोग
 • समुपदेशन
 • संस्थेसह सामाजिक कार्यात हस्तक्षेप
 • मानवता आणि सामाजिक विज्ञान
 • सामाजिक वास्तव समजून घेण्याची पद्धत

दुसऱ्या सेमिस्टर मध्ये पुढील अभ्यासक्रम घेतला जातो.

 • सामाजिक कार्याची मूलभूत आणि आणीबाणी
 • विज्ञान आणि तंत्रज्ञान
 • सामाजिक मानसशास्त्राच्या मूलभूत संकल्पना
 • मानवी वर्तनाची मानसशास्त्र संकल्पना
 • सामाजिक कार्यात मानसशास्त्राची प्रासंगिकता
 • सामाजिक कार्याचा परिचय
 • फील्ड काम
 • सामाजिक समस्या आणि सेवा
 • समकालीन सामाजिक समस्या आणि सामाजिक संरक्षण

तिसऱ्या वर्षाच्या सेमिस्टरमध्ये पुढील अभ्यासक्रम शिकवला जातो.

 • समुदाय आणि संस्थेतील वर्तमान समस्या
 • सामाजिक कार्यात दृष्टीकोन
 • महिला सक्षमीकरण.
 • लैंगिक आरोग्य शिक्षण
 • पदार्थाचा दुरुपयोग, प्रासंगिकता आणि परिणामांची तथ्यात्मक माहिती
 • संज्ञानात्मक आणि मनोविश्लेषणात्मक तंत्रे
 • NGO ची भूमिका
 • धोरणांच्या हस्तक्षेपासाठी WWE कौशल्ये आणि क्षमता
 • कौटुंबिक जीवनात संस्कृती आणि सामाजिक मूल्य

बी.एस.डब्ल्यू. चा अभ्यासक्रम पूर्णवेळ किंवा अर्धवेळ म्हणजेच दुरुस्त शिक्षण पद्धतीने उपलब्ध असतो. तर काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ही शिकवला जातो. ज्या उमेदवारांना ठराविक तास व वेळ देता येत नाही त्यांच्यासाठी या पद्धती उपलब्ध आहेत. या ऑनलाइन शिक्षणात व पाठ्यपुस्तकातील शिक्षणात विशेष असा फरक नसतो.

बी.एस.डब्ल्यू. चा अभ्यासक्रम आपल्याला ऑनलाईन मधूनही करता येतो. बी.एस.डब्ल्यू. ही ऑनलाईन पदवी प्रदान करणारी बहुतेक महाविद्यालय ही परदेशात आहेत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेऊन बी.एस.डब्ल्यू. ची पदवी पूर्ण करण्याची संधी मिळते.

बी.एस.डब्ल्यू. ऑनलाइन विविध परदेशातील महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे जसे की,

 • बेमिडजी स्टेट युनिव्हर्सिटी,
 • ब्रँडमन युनिव्हर्सिटी,
 • ब्रेशिया युनिव्हर्सिटी,
 • ब्रायर क्लिफ युनिव्हर्सिटी,
 • कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी इ.

बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमातील दुरुस्त शिक्षण हा एक अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम 3 वर्षाचा असतो. पत्रव्यवहार अभ्यासक्रम असून ज्यांना इग्नू व अन्नमलाई विद्यापीठ यासारखी विद्यालय बी.एस.डब्ल्यू. दुरस्थ अभ्यासक्रम देतात. या मध्ये वयाची अट नसते. या परीक्षा ऑनलाइन संस्थेने ठरवलेल्या परीक्षा केंद्रावर घेतल्या जातात. बी.एस.डब्ल्यू. चा अभ्यासक्रमाचा कालावधी किमान 3 वर्षे असतो व जास्तीत जास्त 5 वर्षाचा कालावधी असतो. दूरस्थ शिक्षण मंडळ DEB व UGC द्वारे मान्यताप्राप्त आहेत.

बीएसडब्ल्यू केल्यानंतर आपण पुढील अभ्यासक्रम घेऊ शकता. आपण एम.एस.डब्ल्यू.म्हणजे ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. किंवा एखाद्या विषयात डिप्लोमा करू शकतो. तसेच एम.ए. करू शकतो.. तसेच NGO मॅनेजमेंटमध्ये पीजी डिप्लोमा करू शकतो किंवा सामाजिक कार्यात एमफील करू शकता तसेच पीएचडी करू शकता.

बी.एस.डब्ल्यू. हा कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी कोठे कोठे उपलब्ध होतात हे पाहुयात!!!

आपण एक प्रकारे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करू शकतो. ते ज्या संस्थेत काम करतात. त्या संस्थेत संपर्क साधणाऱ्या ग्राहकांची समुपदेशन करणे ,प्रकरणांचा पाठपुरावा करणे व त्यांच्याशी संस्थेच्या वतीने योग्य प्रकारे समन्वय साधणे . तसेच एक सामाजिक शिक्षक म्हणून काम करू शकतो.

समाजाशी निगडीत समस्यांशी संबंधित कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करणे .सार्वजनिक समस्यांचे निराकरण करणे. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे महत्त्व व गरजू लोकांना कशी मदत करावी हे शिकवावे. पालक व विद्यार्थी यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे .तसेच संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निराकरण करण्यासाठी कर्मचारी पालक व शिक्षक यांच्या समवेत सल्लामसलत करणे.

तसेच आपण एका आरोग्य सेवा कर्मचारी म्हणूनही काम करू शकतो.जे रुग्ण मनोरुग्ण असतात. त्यांच्याशी योग्य समन्वय साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य प्रकारे मदत करण्यासाठी रुग्णांच्या भावनिक, परस्पर सामाजिक व पर्यावरणीय गरजांचे मूल्यांकन करून हे आरोग्य सेवा कर्मचारी कार्यकर्ते मानसिक उपचार केंद्र व रुग्णालयात काम करतात.

तसेच बाल व कौटुंबिक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही काम करू शकतो. समाजात कुटुंब हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. दुर्बल घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करणे. कुटुंबात असलेल्या समस्या सोडविण्यासाठी व आधार देण्याचे काम आपण करू शकतो.

तसेच आपण प्रमुख समुपदेशक, प्रकल्प समन्वयक, व्यवस्थापक ,समुदाय विकास कार्यकर्ता ,सल्लागार कार्यकर्ता, धर्मादाय अधिकारी अशी अनेक कामे करू शकतो. तसेच आपण बी.एस.डब्ल्यू हा कोर्स केल्यानंतर आपले .स्वतःचे NGO उघडू शकतो.

FAQ’s

बी.एस.डब्ल्यू. म्हणजे काय?

बी.एस.डब्ल्यू.म्हणजे 'बॅचलर ऑफ सोशल वर्क'.हा कोर्स एक ग्रॅज्युएशन तसाच व्यवसायिक असा कोर्स आहे. हा कोर्स समाजाशी निगडीत असा कोर्स आहे.

बी.एस.डब्ल्यू.व एम.एस.डब्ल्यू. यातील फरक काय?

बीएसडब्ल्यू हा कोर्स आपल्याला बारावी झाल्यानंतर करता येतो. तर एम.एस.डब्ल्यू. हा कोर्स करण्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करावे लागते.

बी.एस.डब्ल्यू. कोर्सची फी किती आहे?

बी.एस.डब्ल्यू. कोर्स ची फी साधारणता 6000 ते 10000 प्रती वर्षी असते. सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये हि फिज खूपच कमी असते. तर खाजगी शिक्षण संस्थेमध्ये ही फिज खूप जास्त असते.

बी.एस.डब्ल्यू हा कोर्स केल्यानंतर पगार किती असतो?

भारतामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना साधारणतः पगार 100000 ते 200000 प्रती वर्षी असते.

Leave a Comment