बॉबी देओल यांची संपूर्ण माहिती Bobby Deol Information In Marathi

Bobby Deol Information In Marathi  बॉबी देवल हे हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता आहे. तसेच ते धर्मेंद्र यांचे पुत्र व सनी देवल यांचे भाऊ आहेत. त्यांच्या आईचे नाव प्रकाश कौर असे आहे. बॉबी यांचे खरे नाव विजय सिंह देवल आहे. त्यांनी 1977 साली ‘धरमवीर’ या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून चित्रपटाच्या कारकिर्दीत सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 1995 सालच्या बरसात या हिंदी चित्रपटाद्वारे नायक म्हणून पुन्हा चित्रपट कारकीर्दीत प्रवेश केला. तर चला मग त्यांच्याविषयी माहिती पाहूया.

Bobby Deol Information In Marathi

बॉबी देवल यांची संपूर्ण माहिती Bobby Deol Information In Marathi

जन्म :

बॉबी देवल यांचा जन्म 27 जानेवारी 1967 रोजी अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी प्रकाश कौर यांच्या घरी झाला. चार भावंडांमध्ये बॉबी हे सर्वात लहान आहेत. बॉबी सनि देवल पेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत.

सनी आणि बॉबी यांना एकूण चार बहिणी आहेत. त्यापैकी दोन संख्या व दोन सावत्र बहिणी आहेत. अजेता आणि विजेता हे बॉबीच्या सख्या बहिणी तर ईशा आणि अहाना या सावित्र बहिणी आहेत.

शिक्षण :

बॉबी देवल यांचे शिक्षण प्राथमिक हे मुंबईमध्ये झाले. मेयो कॉलेज अजमेर येथून त्यांनी आपली पदवी पूर्ण केली.

वैयक्तिक जीवन :

बॉबीच्या पत्नीचे नाव तान्या आहे. बॉबीचे वडील धर्मेंद्र यांना तान्या इतकी आवडली की, त्यांनी लगेचच त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला. तान्या आणि बॉबीचे लग्न 1996 मध्ये झाले. तान्या बिझनेस घराण्यातील आहे. तिचे स्वतःचा फर्निचर आणि डेकोरेशनचा बिझनेस आहे. द गुड अर्थ नावाने हा बिझनेस आहे.

अनेक बॉलिवूड स्टार्स आणि बिझनेसमन याचे क्लाइंट आहेत. तान्या डिझायनर म्हणून तिचे काम उत्तम करत आहे. बॉबी आणि तान्याची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. बॉबी एका रेस्टरॉमध्ये मित्रांसोबत चहा पित बसला होता. त्याच रेस्टरॉमध्ये दुसऱ्या टेबलवर तान्या बसली होती.

तिला पाहताच बॉबी तिच्या प्रेमात पडला. बॉबीने लगेचच तिची सर्व माहिती काढली आणि तिला भेटण्यासाठी बोलविले. बॉबी तिला घेऊन त्याच रेस्टॉरंटमध्ये गेला. मग काय दोघांचे आईवडील एकमेकांना भेटले आणि त्यांचे लग्न झाले. या दोघांना दोन मुले आहेत.  त्यांची नावे आर्यमान व धर्म आहे.

चित्रपट प्रवेश :

बॉबी देओल यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत करिअरची सुरूवात एक बाल कलाकार म्हणून धर्मवीर या चित्रपटाद्वारे केली होती.  त्यानंतर त्याच्या कारकिर्दीची खरोखरच सुरुवात 1995 साली बरसात या चित्रपटाने झाली.  या सिनेमात त्याच्यासोबत ट्विंकल खन्ना देखील दिसली होती.

या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर डेब्यू पुरस्कारानेही गौरवण्यात आले.  या चित्रपटाने बॉक्स-ऑफिसवरही चांगली कामगिरी केली होती.  त्यानंतर त्यांनी ग्रुप सोल्जरसारख्या चित्रपटात काम केले.  आपल्या कारकीर्दीत त्याने अनेक चित्रपट केले. पण हिंदी चित्रपटात आपला भाऊ सनी देओल आणि वडील धर्मेंद्र यांना मिळालेले यश त्याला मिळू शकले नाही.

‘बरसात’ पहिला चित्रपट :

बॉबी देओलने ‘बरसात’ या चित्रपटातून लीड हीरो म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात ट्विंकल खन्नासोबत बॉबी रोमान्स करताना दिसला होता. पण बरसात हा त्याचा पहिला चित्रपट नाही.

बॉबीने यापूर्वी बालकलाकार म्हणून पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता. विशेष म्हणजे वडील धर्मेंद्र यांच्याच चित्रपटात त्याला पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली होती. 1977 मध्ये आलेल्या धर्मेंद्र स्टारर ‘धरम-वीर’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते.

‘क्लास ऑफ 83’ :

या वेबफिल्ममधून बॉबी देओलनं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये तो पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला आहे. विजय सिंह असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. बॉबी देओलनं या भूमिकेला पुरेपूर न्याय दिल्याचं सांगत प्रेक्षकांकडून त्याची तारीफ केली जाते. ‘ही भूमिका माझ्या वैयक्तिक आयुष्याच्याही खूप जवळ जाणारी आहे. म्हणूनच विजयचं दुःख मी समजू शकलो.

त्याच्या मनातली खदखद पडद्यावर मांडता आली. एक अभिनेता म्हणून एका साच्यात स्वतःला बांधून घेणं मला पसंत नाही. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला हव्यात असं मला नेहमीच वाटत होत. मध्यंतरीच्या काळात अशा भूमिका माझ्याकडे येत नव्हत्या.

‘क्लास ऑफ 83’ ची संहिता मी पहिल्यांदा वाचली, तेव्हाच विजय सिंह हे माझं पात्र मला खूप आवडलं होतं. ते अगदी माझ्यासाठीच लिहिलं गेलंय असं मला वाटलं. देवानं माझी हाक ऐकली आणि एक अतिशय वास्तवदर्शी व्यक्तिरेखा माझ्या वाट्याला आली. मग या संधीचं सोनं करायचं मी ठरवलं, असं ते बोलले.

बॉबी यांच्याकडे आलिशान महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे बाबीला डीजेची आवड आहे याशिवाय त्यांना सनग्लास च्या कलेक्शनचे सुद्धा खूप आवड आहे.  बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा हाऊसफुल-4 हा चित्रपट आला होता.

त्यानंतर आश्रम नावाच्या वेब सिरीजमध्ये त्याने केलेल्या भूमिकेला मोठी प्रसिद्धी देखील मिळाली होती. ‘काशीपुर वाले बाबा’ या त्याच्या भूमिकेचे मोठं कौतुक करण्यात आलं होतं. यानंतर आता त्याला मोठी लॉटरी लागली असून दाक्षिणात्य चित्रपटामध्ये लवकरच बॉबी काम करणार आहे.

माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, दाक्षिणात्य चित्रपटामध्ये त्याला भूमिका ऑफर झाली आहे. हा चित्रपट खूप भव्यदिव्य असणार असून बाहुबलीच्या समान हा नवीन चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेलं नाही. यामध्ये बॉबी व्हिलनची भूमिका साकारणार असून आश्रमामधील त्याच्या भूमिकेनंतर त्याचे करिअर वेग पकडू शकते.

मागील काही वर्षांपासून  देओल काम मिळत नसल्याने तो मोठ्या पडद्यावर दिसत नव्हता. कोरोनाच्या या संकटात अनेकजण चित्रपटांचे शूटिंग सुरु नसल्याने वेबसीरिजकडे वळले आहेत. याच दरम्यान बॉबी देओल याने आश्रम सिरीजमध्ये केलेल्या बाबाजी या भूमिकेने त्याला मोठी मदत केली. या सीरिजला देखील मोठी प्रसिद्धी मिळाली.

‘आश्रम’ या सुपरहिट वेब सीरिजसाठी बॉबी देओलला 5 व्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. एकेकाळी स्टार असलेल्या बॉबी देओलनेही आपल्या कारकिर्दीतील एक अतिशय वाईट टप्पा पाहिला आहे.

पण 2018 मध्ये ‘रेस 3’ च्या यशानंतर बॉबीने जोरदार पुनरागमन केले आहे. आश्रम वेब सीरिजमध्ये बाबा निरालाच्या भूमिकेसाठी बॉबीला हा पुरस्कार मिळाला आहे. आईसोबत हा जिंकलेला वेळ, बॉबी सध्या त्याच्या आगामी ‘लव्ह हॉस्टेल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

ज्यात विक्रांत मैसी आणि सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणाले. याशिवाय बॉबीला दाक्षिणात्य एका मोठ्या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली. एका मुलाखतीमध्ये बॉबी देओलने सांगितले होते की, माझ्या आश्रम वेब सीरीजमधील काही भाग माझे वडील धर्मेंद्र यांनी बघितले आणि त्यांना ते खूप आवडले होते.

चित्रपटांची नावे :

धर्मवीर, बरसात, प्यार हो गया, गुप्‍त, सोल्जर, दिल लगी, बादल, अजनबी, आशिक, चोर मचाए शोर, हमराज, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, किस्मत, टॅंगो चार्ली, दोस्ती, बरसात, ओम शांती ओम, झूम बराबर झूम, शकलाका बूम बूम, चमकू, हेरॉइन्स, दोस्ताना, सिंग साब द ग्रेट यमला पगला दिवाना 2, प्लेयर्स, थँक्यू, यमला पगला दिवाना.

पुरस्कार :

कबॉबी देवल यांना दादासाहेब फाळके व फिल्म फेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता असे पुरस्कार मिळालेले आहेत.

” ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा”.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-