डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Bhimrao Ambedkar Information In Marathi

Bhimrao Ambedkar Information In Marathi डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अस्पृश्यता, जातीजातीतील भेद नष्ट व्हावे म्हणून अहोरात्र श्रम केले. त्यांचा हा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. या थोर महापुरुषाचा आपण आजही तेवढाच आदर करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती पाहू.

Bhimrao Ambedkar Information In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Bhimrao Ambedkar Information In Marathi

आंबेडकर यांचा जन्म :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल, 1891 मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भिमाबाई असे होते. रामजी व भिमाबाई यांना 1891 पर्यंत 14 अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या व मुलांपैकी बळीराम, आनंदराव व भीमराव ही तीन मुले जगले. भिमराव हे सर्वात लहान चौदावे अपत्य होते. आंबेडकर यांच्या आजोबांचे नाव मालोजी सपकाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ लागले.

त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजी यांच्या घरातील व्यवहारात शुध्द विचाराला आणि शुध्द आचाराला महत्त्वाचे स्थान होते. मालोजीना तीन मुल व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुला नंतर मीराबाई या मुलीचा जन्म झाला होता. 1848 च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजीरावांचे चौथ्या अपत्त होते. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी अभंग पाठ केले होते.

ते रोज ज्ञानेश्वरी वाचत असत. सकाळी स्तोत्रे व भोपाळ या हेमंत सैन्यात शिपाई असताना, सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले व त्याने इंग्रजी भाषा उत्तम रित्या आत्मसात केले. त्यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुटली होती. त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.

बालपण :

रामजी ज्या पलटणीत होते. ती पलटण 1888 मध्ये मध्यप्रदेश मधील मोहोळ येथील लष्करी तळावर आली होती. तेथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला होता. त्यांचे लहानपणीचे नाव भिवा असे होते. त्यांची भीम, भीमा आणि भीमराव ही नावे ही प्रचलित आहेत. आंबेडकर यांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.

1894 मध्ये सुभेदार रामजी सपकाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवर निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्ती परिवारासह राहू लागले. वय लहान असल्यामुळे भीमरावांना शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाही.

नंतर 1896 च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. या वर्षी त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यानंतर काही दिवसांनी भीमा आईचे निधन झाले. त्यावेळी आंबेडकर पाच वर्षांचे होते. त्यानंतर भीमासह अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाई यांनी कठीण परिस्थितीत केले.

शिक्षण :

डॉक्टर आंबेडकर 1904 मध्ये त्यांचे वडील रामजी सपकाळ यांच्यासह मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागेल. मुंबईमध्ये आल्यावर भीमराव हे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले. एलफिस्टन हायस्कूलमध्ये जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला.

शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. त्यांना तहान लागायची तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्याच्या जोडीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम शिपाई करत असत. शिपाई उपलब्ध नसले तर आंबेडकरांना दिवसभर पाण्याविनाच राहावे लागत असे. नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे ‘शिपाई नाही, तर पाणी नाही’ असे वर्णन केले आहे.

दहावीनंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी पूर्ण केली. तसेच बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले. आंबेडकर परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट म्हणजे पी.एचडी पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट पदवी मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. आंबेडकर हे त्यांच्या घरातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.

त्यांनी नोव्हेंबर 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि चीन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी यादरम्यान 1950 च्या दशकात त्यांनी एल.एल.डी आणि डी.लिट दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्राप्त केल्या.

जीवन :

भीमराव शाळेत असतानाच 1906 मध्ये चौदा पंधरा वर्षाचे असताना, भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची 9-10 वर्षीय कन्या रमीबाई उर्फ रमाबाई यांचीशी झाले. एलफिस्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील उच्च जातीच्या मुलापासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत. आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज अठरा तास अभ्यास करत असत.

सन 1960 साली भीमराव एलफिस्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तरं झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकर यांच्या ज्ञाती बांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरवून भीमा रामजी आंबेडकर यांचे कौतुक केले. भीमरावांची हुशारी पाहून विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना 25 रुपये दरमहा शिष्यवृत्ती देण्यास मंजुरी दिली. येथून त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली होती.

आंबेडकरांचे कार्य :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात जनतेसाठी बरीच कार्य केलेली आहेत. भारताचे संविधान तयार करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कृषी व शेतकऱ्यांसाठी त्यांनी समाजव्यवस्थेशी शेतीचा व्यवसाय जोडला. ग्रामीण भागातील जातींवर आधारित समाजव्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शोधले होते. त्यामुळे जातीवर आधारित समाज व्यवस्था बदलायची तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानले पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे.

शेतकरी आर्थिक वृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकांना आर्थिक क्षमतेचा फायदा होईल आणि आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते, म्हणून आर्थिक विषमता जितके कमी होईल तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल असे त्यांना वाटत होते. शेतीसाठी पाणी व जमीन मुख्य घटक आहे. पाण्याशिवाय शेतीचा विकास करणे अशक्य आहे. शेतकऱ्याला स्वच्छ पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याची उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही. हे त्यांनी ब्रिटिश सरकारचे निर्देश आणून दिले.

शेतकऱ्यांसाठी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पहिला संप घडवून आणला होता. हा संप 1928 ते 34 या कालावधीत झरी या गावात झाला. हा संप व सात वर्षे सुरू होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी संघर्ष केले. बाबासाहेबांनी स्त्रीयांसाठी सुद्धा मोलाचे कार्य केल्याचे दिसून येते. त्या काळात स्त्रियांना एवढे महत्त्वाचे स्थान नव्हते परंतु डॉ. आंबेडकर हे स्त्री मुक्तीचे पक्के समर्थक होते. समाजाचे मूल्यमापन हे त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून कळते, म्हणून समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असते.

समग्र पातळीवर केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियांची देखील प्रगती होणे गरजेचे असते. स्त्रियांसाठी त्यांनी 1947 मध्ये कायदे मंत्री असतांना हिंदू संहिता विधेयक म्हणजे हिंदू कोड बिलाच्या प्रस्ताव लोकसभेत मांडून अस्पृश्यतेचे उच्चाटन लग्नासंबंधी स्त्री पुरुष समानता, स्त्रियांसाठी काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसा हक्काचे स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा त्यात समावेश होता.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

हे सुद्धा अवश्य वाचा  :-


बाबासाहेबांना किती भाषा येत होत्या?

आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते.


बाबासाहेबांना किती मुले होते?

३ मुले

आंबेडकरांकडे किती Phds आहेत?

दोन मास्टर्स आणि बार-एट-लॉ व्यतिरिक्त, त्याच्याकडे चार डॉक्टरेट पदवी होती आणि त्याला अनेक युरोपियन भाषा (आणि संस्कृतसह काही भारतीय भाषा) माहित होत्या. त्यांनी पाली भाषेचा शब्दकोश देखील लिहिला आणि अर्थशास्त्रात पीएच.डी.ची पदवी बहाल केलेली दक्षिण आशियातील पहिली व्यक्ती होती.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते?

रामजी

Leave a Comment