बी.बी.ए. कोर्सची संपूर्ण माहिती BBA Course Information In Marathi

BBA Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,एकदा बारावीचा निकाल लागला की, मुले ही गोंधळून जातात. बारावीनंतर आता काय करायचे? कोणता डिप्लोमा करायचा? कोणता कोर्स करावा? आपले करिअर कोणत्या क्षेत्रात उत्तम प्रकारे होईल? असे अनेक प्रश्न मुलांसमोर असतात .त्यावेळी ते सर्व माहिती पडताळून पाहतात. आपल्या मित्रांबरोबर सल्लामसलत करतात. कारण त्यांच्या आयुष्यातील हा टप्पा त्यांच्या करिअर साठी महत्त्वाचा असतो. या वेळी योग्य निर्णय घेणे हे महत्त्वाचे असते.

Bba Course Information In Marathi

बी.बी.ए. कोर्सची संपूर्ण माहिती BBA Course Information In Marathi

आजच्या युगात शिक्षण क्षेत्रात बरेच काही सुधारात्मक बदल होत चालले आहेत. प्रत्येक कोर्सचा व क्षेत्राचा अभ्यासक्रम हा वेगळा असतो. काही मुलांना नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करावा असे वाटते .नोकरीपेक्षा व्यवसायात काही मुलांना जास्त इंटरेस्ट असतो. आपला एखाद्या व्यवसाय असावा असे त्यांना वाटत असते.

जर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला बी.बी.ए. हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग मी तुम्हाला आज बी.बी.ए. या कोर्स विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे .बी.बी.ए. हा कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता लागते ,प्रवेश प्रक्रिया कशी असते, या कोर्सची फी किती असते, नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतात अशी सर्व प्रकारची माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे.

बी.बी.ए.चा लॉंग फॉर्म ‘बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’ असा होतो. हा एक सर्वात लोकप्रिय असा बॅचलर डिग्री कोर्स आहे. हा कोर्स बारावीनंतर करता येणारा एक व्यावसायिक पदवी कोर्स आहे. भारतात 5000 पेक्षा जास्त बी.बी.ए. महाविद्यालय आहेत .हा कोर्स केल्यानंतर आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो किंवा चांगल्या नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न करू शकतो.

बी.बी.ए. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. तुम्हाला कार्पोरेट सेक्टरमध्ये सहज नोकरी मिळू शकते. तसेच तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करून त्यातही आपले भविष्य आजमाऊ शकता. या कोर्समध्ये आपल्याला व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करायचे हे शिकविले जाते.

व्यवसायाशी संबंधित मार्केटिंग, अकाउंटिंग, विपणन ,अर्थशास्त्र यांचे शिक्षण दिले जाते. या कोर्समध्ये मुलांपेक्षा मुलींचा कल जास्त आहे. कारण या कोर्समध्ये व्यवसायाचे व्यवस्थापन याचे प्रशिक्षण दिले जाते. त्या शिक्षणासाठी शारीरिक श्रमापेक्षा बौद्धिक कौशल्य जास्त लागते. बी.बी.ए. हा कोर्स केल्यामुळे आपल्याला बरेच फायदे होतात. व्यवसायात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बी.बी.ए. हा उत्तम पर्याय आहे. या कोर्समुळे व्यवसायात लागणारे उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यास मदत होते.

व्यवसाय व्यवस्थापन या बद्दल बरेच काही शिकायला मिळते. बी.बी.ए. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही एम.बी.ए.ची पदवी सुद्धा घेऊ शकता. हा बी.बी.ए. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही सरकारी क्षेत्रात किंवा आय.आय.टी.मध्ये ही नोकरी करू शकता. तसेच तुमच्यात एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण होऊन तुमचा व्यक्तिमत्व विकास घडून येतो.

बी.बी.ए.हा कोर्स 3 वर्षाचा असतो. 6 सेमिस्टरमध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला असतो. एका वर्षात 2 सेमिस्टर्स अशी रचना असते. तसेच बी.बी.ए. एल.एल.बी. व इंटिग्रेटेड एम.बी.ए. यांसारखे ड्युअल डिग्री बी.बी.ए. अभ्यासक्रमात आहे. जो 5 वर्षाचा असतो. आता आपण बी.बी.ए. या कोर्ससाठी पात्रता काय असते हे पाहुयात!!!

बी.बी.ए. हा कोर्स विज्ञान, वाणिज्य व कला या कोणत्याही शाखेतील विद्यार्थी करू शकतो. कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बारावीत विद्यार्थ्याला किमान 50 %गुण असले पाहिजेत. काही कॉलेजमध्ये ही टक्केवारी 60% सुद्धा असू शकते.

बी.बी.ए. हा कोर्स करण्यासाठी वयोमर्यादा ठरलेली असते. खुल्या वर्गाला ही वयोमर्यादा 17 ते 22 वर्षे असते .तर अनुसूचित जाती जमातीसाठी ती 17 ते 24 वर्ष आहे.

आता आपण बी.बी.ए. या कोर्सच्या फी विषयी माहिती जाणून घेऊयात!!!

बी.बी.ए. करण्यासाठी भारतात 5000 पेक्षा जास्त महाविद्यालय उपलब्ध आहेत. आपण कोणत्या कॉलेजमधून बी.बी.ए. कोर्स करणार आहे .या कॉलेजवर ती फी अवलंबून असते.खाजगी कॉलेजमध्ये ही फी खूप जास्त असते .खाजगी कॉलेजमध्ये 60000 रुपयापासून ते 400000 पर्यन्त असू शकते. तर सरकारी कॉलेजमध्ये फी ही अतिशय कमी असते .त्यामुळे जास्त करून विद्यार्थी हे सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत असतात.

आता बी.बी.ए. या कोर्सची प्रवेश प्रक्रिया कशी असते हे पाहुयात!!

बी.बी.ए. या कोर्सला प्रवेश बारावीच्या गुणवत्तेवर तसेच प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जातो. तसेच काही कॉलेज हे प्रवेश परीक्षेनंतर गटचर्चा किंवा वैयक्तिक मुलाखती देखील घेतात. यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच प्रवेश परीक्षेचे गुण व बारावीचे गुण या गुणांच्या आधारे उमेदवारांना अंतिम प्रवेश दिला जातो.

आता आपण बी.बी.ए. या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी पुढील प्रवेश परीक्षा आहेत हे पाहूयात!!

• सेट (SET Symbosis Entrance Test) ‘सिम्बॉयसिस इण्टरनॅशनल युनिव्हर्सिटी’ ही बी.बी.ए. प्रवेशासाठी परीक्षा आयोजित करते.
• आय.पी.यु.सी.ई.टी (IPU CET) ही परीक्षा बी.बी.ए. साठी प्रवेश घेण्यासाठी इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी आयोजित करते.
• तसेच DU JAT, IPMAT, CUET, AIMA UGAT ह्या परीक्षा देखील घेतल्या जातात.

बी.बी.ए चे प्रकार

  • पूर्णवेळ
  • अर्धवेळ
  • अंतर पत्रव्यवहार आणि
  • ऑनलाईन ही बी.बी.ए चे प्रकार आहेत.

पूर्णवेळ बीबीए-

पूर्णवेळ बी.बी.ए हा 6 सेमिस्टर मध्ये विभागलेला तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे. भरपूर विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे आकर्षित असतात. या अभ्यासक्रमात मूल्यांकन, इंटरंशिप, अंतिम प्लेसमेंट समाविष्ट असते. याची फी सरासरी तीन लाख ते सहा लाख च्या दरम्यान असते.

अर्धवेळ बी.बी.ए-

ज्या लोकांना या कोर्ससाठी पूर्ण वेळ देता येत नाही जे लोक नोकरी करून शिक्षण घ्यायचे असते त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम असतो पूर्णवेळ बीबीए चे अर्धवेळ बीबीए या अभ्यासक्रमात जास्त फरक नसतो हा कोर्स तीन वर्षाचा असतो अर्धवेळ बीबीएचे वर्ग संध्याकाळी किंवा आठवड्याच्या शेवटी वेळेनुसार ठरवले जातात याचा अभ्यासक्रमाची फी पन्नास हजार ते साठ हजार दरम्यान असते.

अंतर / पत्रव्यवहार बीबीए-

या अभ्यासक्रमात पूर्णवेळ बी.बी.ए सारखा नियमित भौतिक वर्ग नसतात या अभ्यासक्रमात विद्यार्थी दुरुस्त संवाद व पत्रव्यवहारात द्वारे अभ्यास करू शकतात. हा अभ्यासक्रम कमी खर्चिक असून लवचीक आहे. जे विद्यार्थी नियमित बी.बी.ए करू शकत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे.या कोर्सची फी 45 हजार ते 60 हजार रुपये दरम्यान असते.

ऑनलाइन बी.बी.ए-

अलिकडच्या काळात ऑनलाईन बी.बी.ए अभ्यासक्रमाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. वर्च्युअल एज्युकेशन सिस्टीम द्वारे विद्यार्थ्यांना बी.बी.ए चे शिक्षण हे या अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या अभ्यासक्रमात कोण कोणत्याही भौतिक वर्ग व संवाद नाही.

लेक्चर हे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जातात इंटरनेट विविध माध्यमातून अभ्यास व नोट्स शेअर केल्या जातात भारतात सुमारे 50 ऑनलाइन विद्यालय आहेत.या अभ्यासक्रमाची सरासरी 27 ते 40 हजार या दरम्यान असते.

बी.बी.ए च्या अभ्यासक्रमात खालील विषय शिकवले जातात-

  • प्रिंसिपल्स ऑफ़ मैनेजमेंट
  • स्टैटिस्टिक्स
  • ऑपरेशनल रिसर्च
  • मार्केटिंग
  • फाइनेंस
  • एकाउंटिंग
  • बिज़नेस मैथमेटिक्स

तुम्हाला आम्ही कळवत आहोत की BBA चा कोर्स वेगवेगळ्या स्पेशलायझशन सोबत तयार केला आहे. या कोर्से मध्ये तुम्ही तुमच्या इच्छे प्रमाणे विषय निवडून स्पेशलायझशन करू शकता. स्पेशलायझशन करण्यासाठी उपलब्ध असलेले विषय खाली दिले आहे.

  • बैंकिंग एंड इन्शुरन्स
  • टूर एंड ट्रेवल मैनेजमेंट
  • कंप्यूटर एप्लीकेशन
  • फाइनेंस
  • फॉरेन ट्रेड
  • मार्केटिंग
  • हॉटेल मैनेजमेंट
  • एकाउंटिंग

बी.बी.ए हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस किंवा अगदी उत्तम अशी नोकरी देखील मिळवू शकता. बी.बी.ए हा कोर्स केल्यानंतर आपण एम.बी.ए म्हणजेच ‘मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनिसट्रेशन’ देखील करू शकतो. तसेच पी.जी.डी.एम, एम.एम.एस सारख्या पदवी देखील घेऊ शकतो. बी.बी.ए ही पदवी घेतल्यानंतर इतर क्षेत्र जसे की मार्केटिंग चे शिक्षण, फायनॅन्स व सेल्स साठी सरकारी नोकरी हे पर्याय देखील उपलब्ध असतात.

बी.बी.ए नंतरच्या जॉबच्या संधि-

  • बी.बी.ए एन्टरप्रेनुअरशिप
  • फायनॅन्स मॅनेजमेंट
  • अकाऊंट मॅनेजमेंट
  • मानव संसाधन व्यवस्थापन

बी.बी.ए कोर्स करण्यासाठी प्रसिद्ध महाविद्यालयांची यादी खाली दिली आहे-

  • नारसी मोनजी इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,मुंबई.
  • सीमबोईसीस इंस्टीट्यूट ऑफ कम्प्युटर स्टडीज अँड रिसर्च,पुणे.
  • एच.आर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकनॉमिक्स ,मुंबई.
  • मिठिबई कॉलेज ऑफ आर्ट्स,मुंबई.
  • आजींक्य डी.वाय पाटील यूनिवर्सिटी,पुणे.

FAQ’s

बी.बी.ए चा लॉन्ग फॉर्म की आहे?

बी.बी.ए चा फूल फॉर्म बॅचलर इन बिझनेस अॅडमिनिसट्रेशन आहे.

बी.बी.ए ह्या कोर्स ची कालावधी की आहे?

बी.बी.ए हा एक 4 वर्षाचा कोर्स असून 6 सेमिस्टर मध्ये विभागला गेला आहे.

बी.बी.ए ह्या कोर्स चा पॅटर्न की आहे?

बी.बी.ए कोर्स चा पॅटर्न सेमिस्टर पॅटर्न आहे.

बी.बी.ए कोर्स करण्यासाठी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते?

सेट व आय.पी.यू सी.ई.टी ह्या परीक्षा द्याव्या लागतात.

बी.बी.ए कोर्स करण्यासाठी पात्रता काय आहे?

बी.बी.ए हा कोर्स करण्यासाठी 12 उत्तीर्ण असणे महत्वाचे असते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment