जाणून घ्या बलिप्रतिपदा या सणाचे महत्त्व Balipratipada Festival In Marathi

Balipratipada Festival In Marathi कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बली प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पुरानातील बली बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. बलिप्रतिपदा हा दिवाळीतील पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण मानला जातो.

Balipratipada Festival In Marathi

जाणून घ्या बलिप्रतिपदा या सणाचे महत्त्व Balipratipada Festival In Marathi

पूर्वीच्या काळी गावागावांमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा पाडली जात होती. या सोहळ्यामध्ये गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एकेक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येत असत, ते सर्व पदार्थ देवा समोर ठेवून नैवैद्य दाखवला जाई. मग गावकरी सहभोजन करत असत. या प्रथेच्या पालनातून सामाजिक एकात्मता बंधुभाव वाढीस लागावा असा या मागचा उद्देश आहे.

या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठा हे औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कटकरून जमिनीत म्हणजे पाताळात घातले. बळीला पाताळाची राज्य देऊन विष्णुने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले. बलिप्रतिपदा बळी हा दृष्ट होता. शेतकरी नव्हता तो राजा होता. त्याला विष्णूचा वामन अवताराने मारले शेतकऱ्यांचा राजा बळीराजा आणि श्रीकृष्ण याचा मोठा भाऊ बलराम आहे. बलराम आणि बळी या दोन शब्दात खूप फरक आहे आणि बलराम हे शेतकरी लोकांचे प्रतिनिधित्व करतात.

तर त्यांची हत्यारे सुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहेत. म्हणूनच “इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो” म्हणून अशी एक म्हण रूढ झाली आहे. फक्त बळिराज्यासाठीच आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी घरोघरी सकाळी पाटाभोवती रांगोळी काढतात. दारी रांगोळी काढतात. पत्नी आपल्या पतीला ओवाळणी घालतो. नवनवीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर देतात.

बलिप्रतिपदेच्या महत्त्व :-

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा असतो. या दिवशी बळीची पूजा करतात. राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर देवाची कृपा झाली. त्याने ईश्वरीय कार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा व दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून काही ना काही वाईट कृत्य घडत असतात. परंतु ज्ञान आणि ईश्‍वरी कृपेमुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो. हे यावरून आपल्याला स्पष्ट होते.

म्हणून मनातील वाईट भावना व दुसऱ्या विषयीची वाईट कृत्ये करण्याची भावना ही केवळ ज्ञान आणि देवाच्या कृपेने शक्य आहे. हे आपल्याला यावरून कळते. तसेच श्रीकृष्णाने आजच्या दिवशीच गोवर्धन पूजेची सुरवात केली होती. म्हणजेच निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची हि सुरवात होती. त्यानिमित्त पाडव्याला कृष्ण, गोपिका गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची पुजा सुद्धा केली जाते. म्हणजे आपण निसर्गाला पूजतो यामागेही एक उद्देश आहे की, आपल्याला निसर्ग दररोज काही ना काही देत असतो. त्यातून त्याचे आभार मानणे हा एक त्यामागचा उद्देश आहे.

बलिप्रतिपदा कसा साजरा करतात :-

बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा फुले येतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे रेखाटून मांडून त्या सर्वांची पूजा करतात व मिरवणूक काढतात. ती पर्वत पूजा केली नाही तर कार्तिक मासातील सर्व कृती निष्फळ होतात असे म्हटले जाते. या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर स्त्रिया त्यांच्या पतीला ओवाळतात. दुपारी पक्वान्नांचे भोजन करतात.

दिवाळीतील हाच दिवस प्रमुख समजला जातो. त्या दिवशी लोक नवे वस्त्र भरणे घेऊन दिवस आनंदात घालवतात. त्यादिवशी खेळावे असेही सांगितले आहे. त्यावरून बलिप्रतिपदेला द्यूत प्रतिपदा असेही नाव मिळाले आहे. या तिथीला खेळ खेळले जातात किंवा क्रीडा खेळले जातात. याविषयी आणखीन एक आख्यायिका आहे, की एकदा बलिप्रतिपदेच्या दिवशी शंकराने पार्वतीस द्युत दिवस खेळायला प्रारंभ केला.

शंकर या खेळात सर्वस्व हरला आणि वल्कले परिधान करून गंगातीरी जाण्यासाठी घराबाहेर पडले. कार्तिकेला हे समजल्यावर त्याने त्याच्या पित्याकडून शिकून घेतले आणि पार्वती बरोबर द्यूत खेळून शंकराने हरवलेल्या वस्तू परत मिळवल्या व त्या शंकराला नेऊन दिल्या. त्यानंतर गणेशाने शंकर व कार्तिकी यांच्याबरोबर द्यूत खेळून त्या वस्तू पुनश्च जिंकल्यावर गाईला नेऊन दिल्या. अशा प्रकारे पूर्ण सर्वस्व हरल्यावर शंकर हरिद्वार येथे गेला.

तेथे त्याने विष्णूच्या सूचनेवरून त्र्यक्षविद्या म्हणजे तीन फाषांची विद्या त्यातील भाषांपैकी एका भाषेचे रूप साक्षात विष्णूने धारण केले होते. ही नवी द्युत विद्या घेऊन शंकर घरी आला आणि त्याने पार्वतीला खेळात हरवले. शिवपार्वतीच्या या क्रीडा याची स्मृती म्हणून या दिवशी द्युत खेळण्याची प्रथा पडली. अशाप्रकारे आनंदाने उत्साहाने हा सण साजरा केला जातो.

बलिप्रतिपदा विषयीपौराणिक कथा :-

विषयी एक पौराणिक कथा आहे, की एक बळीराजा होता आणि तो शेतकऱ्यांचा राजा होता. तसेच तो खूप दानशूर प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता. त्यामुळे तो देवापेक्षाही मोठा झाला. लोक देवांच्या आधी बळीचे नाव घेत असत, त्यामुळे देव संतप्त झाले व त्यांनी विष्णू देवाला साकडे घातले विष्णू वामन अवतार धारण करून बळी राजाकडे गेला.

तेव्हा तुला काय हवे आहे. ते बळी राजाने विचारले त्यावर फक्त त्रिपाद भूमी मला हवी आहे. असे वामन अवतार असलेल्या कृष्णाने म्हटले. सर्व काय ते बळीला कडले, परंतू शब्द दिला तो त्याने पाळला आणि त्रिपाद जमीन म्हणून गरजला वामनाने एका पावलात स्वर्ग व्यापला तर दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली, तिसरे पाउल कुठे ठेऊ असे विचारताच बळीने आपले मस्तक पुढे केले आणि विष्णूने त्याला पाताळात गाडले बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने खूप आनंदी झाला.

वामनाने त्याला हाताळाचे राज्य दिले. झाडाचे आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा आहे. म्हणून या दिवशी विक्रम संवतसुरु होते. त्याचबरोबर विष्णूने त्याला आणखीन एक वर दिला की, जो कोणी बलिप्रतिपदेला दीपदान करेल त्याला यमयातना भोगावे लागणार नाहीत.

त्याच्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास राहील. या प्रसंगामुळे माता लक्ष्मीला आपल्या पतीचे खूप कौतुक वाटले, म्हणून तीने पतीचे विष्णूचे ओक्षण केले. त्याला ओवाळले विष्णूने हिरे, माणिक, अलंकार ओवाळणी म्हणून घातलेत. यामुळेच आजही बलिप्रतिपदेला पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि पती-पत्नीला काही भेटवस्तू देत असतो.

“तुम्हाला आमची माहिती बलीप्रतिपदा विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.

Leave a Comment

x