बी फार्मसी कोर्सची संपूर्ण माहिती B.Pharmacy Course Information In Marathi

B.Pharmacy Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्व मुलांना प्रश्न पडतो की, आता बारावी नंतर काय करायचे ?कोणता कोर्स निवडावा? कोणता अभ्यासक्रम निवडावा? की जेणेकरून हा अभ्यासक्रम घेतल्यानंतर त्यातच आपले करिअर योग्य प्रकारे पूर्ण झाले पाहिजे .परिस्थिती पाहता काही मुले ही आपल्या करिअर विषयी व भविष्याविषयी गंभीर असतात. त्यामुळे या अभ्यासक्रमाचा उपयोग आपल्याला आपले भविष्य उज्वल करण्यासाठी व करिअर घडवण्यासाठी होईल. असा कोर्स ते निवडतात. कारण बारावी झाल्यानंतर मुलांसाठी हा करिअर बद्दलचा महत्वाचा टप्पा असतो .

B.pharmacy Course Information In Marathi

बी फार्मसी कोर्सची संपूर्ण माहिती B.Pharmacy Course Information In Marathi

बारावी नंतर बरीच मुले आपल्या पसंतीनुसार पुढील अभ्यासक्रम निवडतात. कारण प्रत्येक मुलाने आपल्यासाठी काहीतरी स्वप्न बघितलेले असते. कोणाला डॉक्टर बनायचे असते! कोणाला वकील! तर कोणाला शिक्षक! बहुतेक मुले ही विज्ञान शाखा घेत असतात. कारण वैद्यकीय क्षेत्रातील कोर्स केल्यामुळे नोकरीच्या संधी भरपूर उपलब्ध असतात.

वैद्यकीय क्षेत्रात असंख्य कोर्स आहेत.  तुम्हाला तर माहीतच आहे की, वैद्यकीय क्षेत्रात असे काही डिग्री कोर्स आहेत.ते म्हणजे डॉक्टर, फार्मसी, अभियांत्रिकी, पॅरा मेडिकल कोर्स. परंतु वैद्यकीय क्षेत्रात असेही काही कोर्से आहेत.जे खूप खर्चिक असतात. मध्यमवर्गीय लोकांना न परवडणारे असतात. परंतु काही अभ्यासक्रम असेही असतात जे कमी खर्चिक असून मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असतात .

आजच्या पोस्ट मध्ये आपण अशाच एका कोर्सची माहिती पाहणार आहोत.जी कोर्स वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. तो म्हणजे ‘बी फार्मसी’ आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला बी फार्मसी म्हणजे काय?बी फार्मसी हा कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?फार्मासिस्ट कोण असतो? त्याची भूमिका काय असते ?त्याचे काय काम असते? बी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या संधी कोठे कोठे उपलब्ध असतील ?बी फार्मसी कोर्सचा कालावधी व हा कोर्स करण्यासाठी किती शुल्क आकारावे लागते .याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आज या पोस्टमध्ये सांगणार आहे.

बी फार्मसी म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते ते एक औषधाचे दुकान कारण बरेचदा असे वाटत असते की, बी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर फक्त आपण औषधाचे दुकान म्हणजे मेडिकल काढू शकतो. तर प्रथम आपला हा गैरसमज दूर करून टाका. कारण बी फार्मसी केल्यानंतर आपण फक्त मेडिकल काढू शकत नाही.

तर या क्षेत्रात बरेच असे पर्याय उपलब्ध आहेत. जसे की बी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर आपण संशोधन क्षेत्रात मोठ्या पदावर काम करू शकतो. तसेच आपण ड्रग इंस्पेक्टर, संशोधन ऑफिसर, मेडिकल ट्रान्सस्क्रीपशन, केमिस्ट, प्रोफेसर, ड्रग थेरपिस्ट अशा वेगवेगळ्या संधी आपल्याला उपलब्ध होत असतात.

संशोधन क्षेत्रातही बी फार्मसी चे खूप मोठे योगदान आहे. आयटी कंपन्या सुद्धा आत्ताच्या परिस्थितीत औषधांच्या निर्मितीकडे वळत आहेत. औषध निर्मितीमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. यावरूनच हे क्षेत्र किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजलेच असेल व या क्षेत्रात आपले करिअर कसे होईल हेही समजले असेल.

बी फार्मसी म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी .हा 4 वर्षाचा अंडरग्रॅजुएट कोर्स आहे .तसेच हा एक पदवीधर कोण आहे .ज्या मुलांना फार्मस्युटीकल मध्ये आपले करिअर करायचे असेल त्यांना बी फार्मसी हा एक चांगला पर्याय आहे. तसेच हेल्थकेअर उद्योगात सामील होण्याची इच्छा असेल तेही हा कोर्स करू शकतात.

बी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर आपण फार्मासिस्ट होण्याव्यतिरिक्त आरोग्य सेवेमध्ये एक वेगळी भूमिका बजावत असतो .तयार केलेली नवीन औषधे उपलब्ध होण्यापूर्वी संशोधन व चाचणी करण्यात फार्मसी ची खरोखरच मोठी भूमिका असते. यामुळे फार्मासिस्ट हा एक प्रकारे हेल्थ केअर इंडस्ट्रीस चा अविभाज्य भाग बनत आहे .या क्षेत्राला उत्तुंग शिखरावर नेत आहे.

औषधाचे संशोधन करणे, मार्केटमध्ये त्या औषधाचा विकास करणे ,उत्पादन व पुरवठा करणे या योगदानाचा फार्मसीचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे बी फार्मसी हा हेल्थकेअर इंडस्ट्रीचा प्रमुख विभाग आहे .फार्मसी कौन्सिलच्या नियमानुसार गुणवत्ता तपासणे व नियंत्रण करणे हे मुख्य उद्दिष्ट असते. फार्मसी क्षेत्र हे हॉस्पिटल /क्लिनिकल फार्मसी, इंडस्ट्रियल फार्मसी व फार्मसी नियामक इत्यादी वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले गेले आहेत .

आता आपण बी फार्मसी कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता निकष लागते हे पाहुयात!!

जर विद्यार्थ्यांना बी फार्मसी हा कोर्स करायचा असेल तर दहावीनंतर विज्ञान शाखेला प्रवेश घेणे गरजेचे असते. हा कोर्स बारावी नंतर केला जातो .बारावी मध्ये विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणिता या विषयांसह  परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये 45 % किंवा 50 % गुण मिळणे आवश्यक आहे.म्हणजे विद्यार्थ्याने PCM ,PCB किंवा PCMB हे ग्रुप बसवणे आवश्यक आहे. विद्यार्थी जर ओपन कॅटेगिरी मध्ये असेल तर ग्रुप मध्ये गुण 150 पेक्षा जास्त असावे लागते व जर तुम्ही रिजेर्व्ह मध्ये असाल तर तुम्हाला ग्रुप मध्ये एकूण गुणांची संख्या 140 पेक्षा जास्त असावी लागते. बी फार्मसी ला प्रवेश घेण्याआधी आपल्याला एक प्रवेश परीक्षा  देणे गरजेचे आहे .

बी फार्मसी कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक निवड प्रक्रिया पार पाडावी लागते व या निवड प्रक्रियेमध्ये प्रवेश परीक्षेसाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये बी फार्मसी ला प्रवेश घेण्यासाठी MH CET ही प्रवेश परीक्षा सर्व कॉलेजमध्ये ग्राह्य धरली जाते. काही खाजगी कॉलेजेस त्यांची वेगळी प्रवेश परीक्षा देखील आयोजित करत असतात.त्या पुढील प्रमाणे.

UPSEE, KCET, GPAT, NEET, BITSAT

ही प्रवेश परीक्षा 200 गुणांची असते. प्रत्येकी एका प्रश्नाला एक गुण असतो. या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.

या  प्रवेश परीक्षा आपण उत्तीर्ण झालो की ,आपल्याला बी फार्मसी च्या ऍडमिशन चा मार्ग मोकळा होतो. प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर बी फार्मसी कोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. ऑनलाइन प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत आपल्याला आपली महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतात. व आपल्याला पाहिजे ते कॉलेज यादीमध्ये समाविष्ट करावी लागतात. या प्रवेश प्रक्रियेत तीन राउंड असतात. पहिल्या राउंडला जर आपल्याला हवे ते कॉलेज मिळाले नाही तर आपण पुढील दोन राउंड ची प्रतीक्षा करू शकतो.

बी फार्मसी हा कोर्स करण्यासाठी 40000 ते 100000 पर्यंत प्रती वर्ष असे शुल्क आकारावे लागते. प्रत्येक कॉलेज नुसार ही वेगवेगळी असू शकते. खाजगी कॉलेजला ही फी जास्त असते. तर सरकारी कॉलेजला फी ही कमी असते.

बी फार्मसी हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थी हे रेगुलर कॉलेजला जाऊ शकतात. तसेच जे विद्यार्थी काम करून शिक्षण करतात व जे विद्यार्थी फी भरण्यास असमर्थ असतात. परंतु त्यांना फार्मास्यूटिकल्समध्ये आपले करिअर करायचे आहे. त्यांच्यासाठी बी फार्मसी दुरुस्त शिक्षण हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. हा कार्यक्रम सुद्धा नियमित कार्यक्रमाप्रमाणे 4 वर्षाचा असतो.

परीक्षा मात्र सेमिस्टर नुसार तसेच वार्षिक पद्धतीने घेतली जाते .बी फार्मसी दुरुस्त शिक्षण प्रोग्रामला भारतीय मेडिसिन कौन्सिल ऑफ इंडिया(MCI) आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) यांनी मान्यता दिलेली आहे. बी फार्मसी अभ्यासक्रम हा जगभरातील विज्ञान विद्यार्थ्यांसाठी परवडणारा आणि सहज उपलब्ध होणारा अभ्यासक्रम आहे.

बी फार्मसी दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम देणारी महाविद्यालय पुढील प्रमाणे:-

 • जाधवपूर विद्यापीठ
 • इंपीरियल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट
 • सिक्किम मनिपल विद्यापीठ
 • मध्यप्रदेश भोज विद्यापीठ कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ एमिटी यूनिवर्सिटी

बी फार्मसी या अभ्यासक्रमात उपचारात्मक जीवशास्त्र, औषधशास्त्र ,बायोकेमिस्ट्री, मानवी शरीर शास्त्र व शरीर विज्ञान इत्यादी विषयांचा समावेश असतो .हा अभ्यासक्रम चार वर्षाचा असून आठ सेमिस्टरमध्ये विभागलेला असतो. बी फार्मसी विषयांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, बॅचलर ऑफ फार्मसी कोर्स नियम 2014 अंतर्गत अधिकृत केले आहे.

रासायनिक तंत्रज्ञान संस्था, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी आणि जामिया हमदर्द विद्यापीठ हे भारतातील टॉप बी फार्मसी कॉलेज आहेत.बी फार्मसी परदेशातील महाविद्यालये जसे की ऑक्सफर्ड विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो विद्यार्थ्यांना परदेशातील फार्मास्युटिकल उद्योगात भरभराटीचे करिअर करण्याची संधी देते.

बी फार्मसी अभ्यासक्रम देणारे शीर्ष विद्यापीठे पुढीलप्रमाणे:-

 • रासायनिक तंत्रज्ञान संस्था – [आयसीटी] , मुंबई
 • शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नोलॉजी मॅनेजमेंट – [एसपीपीएसपीटीएम] , मुंबई
 • पूना कॉलेज ऑफ फार्मसी , पुणे
 • बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी – [बीसीपी] , मुंबई
 • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ – [आरटीएमएनयू] , नागपूर
 • भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी , मुंबई येथील डॉ
 • जीएच रायसोनी विद्यापीठ – [जीएचआरयू] , अमरावती
 • वाईबी चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी , औरंगाबाद
 • आरसी पटेल फार्माक्यूटिकल एज्युकेशन RESEARCHण्ड रिसर्च – [आरसीपीआयपीआर] , धुळे
 • डॉ. डीवाय वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च – [डीवायपीआयपीएसआर] पिंपरी , पुणे
 • डॉ. डीवाय वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च – [डीवायपीआयपीएसआर] पिंपरी
 • भारती विद्यापीठची फार्मसी कॉलेज – [बीव्हीसीओपी] , नवी मुंबई
 • भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज – [बीव्हीसीओपी] , कोल्हापूर
 • श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी , नागपूर
 • प्राचार्य केएम कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी – [केएमकेसीपी] , मुंबई
 • मीरची महाराष्ट्र फार्मसी इन्स्टिट्यूट – [एमआयपी] , पुणे

बी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण पुढील अभ्यास करणे निवडू शकतो .जसे की, एम फार्मसी, फार्मडी इ. PharmD अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संशोधन आणि अध्यापनातही करिअर करण्यास मदत करतात.

FAQ:-

बी फार्मसी हा कोर्स किती सेमिस्टर चा असतो?

बी फार्मसी हा अभ्यासक्रम एकूण 8 सेमिस्टर म्हणजे चार शैक्षणिक वर्ष इतका असतो. हा अभ्यासक्रम फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली द्वारे निश्चित केला जातो .

बी फार्मसी कोर्सचा कालावधी हा किती असतो?

बॅचलर ऑफ फार्मसी या कोर्सचा कालावधी हा चार वर्षांचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स असून ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मानवी शरीर शास्त्र आणि औषधांच्या वापरावर प्रशिक्षण दिलं जातं, व जीवघेण्या रोगांसाठी औषधे तयार करण्याचे देखील प्रशिक्षण दिले जाते.

बी फार्मसी साठी जीवशास्त्र हा विषय अनिवार्य आहे का?

बी फार्मसी करण्यासाठी जीवशास्त्र हा विषय अनिवार्य नसतो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment