बीएड कोर्सची संपूर्ण माहिती B Ed Course Information In Marathi

B Ed Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा कोर्स विषयी माहिती पाहणार आहोत. जो कोर्स केल्यावर आपल्याला शिक्षक ही पदवी मिळते. आपल्या सर्वांच्या आयुष्यात शिक्षक याला महत्त्वाचे स्थान आहे. कारण आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपले चांगले भविष्य घडवणारे कोण असेल! तर, ते असतात शिक्षक !!

B Ed Course Information In Marathi

बीएड कोर्सची संपूर्ण माहिती B Ed Course Information In Marathi

शिक्षक हा आपल्या सगळ्यांच्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. शाळेत मुलांना शिक्षण देणे हे मोलाचे काम शिक्षक करत असतात. घराच्या चार भिंतीतुन आईच्या मायेचा पदर सोडून मुलं शिक्षक यांच्या देखरेखीखाली येत असतात. मुलांची जडणघडण करण्याचे काम शिक्षकांचे असते. लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार करण्याचे श्रेय जसे आईचे असते तसेच ते शिक्षकांचेही असते. तर, आता आपण शिक्षक ही पदवी घेण्यासाठी बीएड व डीएड हे दोन कोर्स असतात. त्यापैकी आपण बीएड. या कोर्सची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

बीएड.ही एक व्यवसायिक पदवी अभ्यासक्रम आहे.

बीएड या कोर्सचा फुल फॉर्म ‘बॅचलर ऑफ एज्युकेशन’ असा आहे. भारतातील सार्वजनिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एनसीटीई ने बी एड सक्तीचे केल्यामुळे बीएड अभ्यासक्रमाच्या मागणी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे व त्या अनुषंगाने या अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. की प्रत्येक उमेदवाराला समान संधी मिळू शकेल.

शिक्षक बनण्यासाठी आपल्याकडे संभाषण, कौशल्य, संघटनेची चांगली जाणीव, संयम, प्रेम, करुणा ,आशावाद ,वचनबद्धता हे कौशल्य आवश्यक आहे.

आता, आपण बीएड. या कोर्स साठी कोणती पात्रता लागते हे पाहूया!

बीएड. प्रवेश प्रक्रिया ही मेरीट बेस किंवा प्रवेश परीक्षा यानुसार असते म्हणजे काही कॉलेज मेरीट च्या आधारे प्रवेश दिला जातो तर काही कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो. प्रवेश कशाप्रकारे द्यायचा आहे जे ज्या त्या कॉलेजवर अवलंबून असते. हा अभ्यासक्रम मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषेत शिकवला जातो व परीक्षादेखील मराठी व इंग्लिश मध्ये देऊ शकतो.

बीएड या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक असते .आपल्याला 50 % गुण असणे आवश्यक आहे. सन 2014 पर्यंत बीएड अभ्यासक्रम हा एक वर्षाचा होता तो आता बंद करण्यात आला आहे.सन 2015 ते 2016पासून हा कोर्स दोन वर्षाचा करण्यात आला असून ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्याला हा कोर्से करता येतो.

2018 पासून हा कोर्स 4 वर्षाचा एकात्मिक बीड अभ्यासक्रमानुसार सुरू करण्यात आला असून .यात बारावीनंतर विद्यार्थी थेट बीए बीएड, बीएस्सी बीएड किंवा बी कॉम बीएड या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. म्हणजेच चार वर्षाचा अभ्यासक्रम असून यामध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी सोबत बीएडची पदवी दिली जाते.

यात विद्यार्थी नियमित अभ्यासाबरोबरच अध्यापनाचे कौशल्य ही शिकवले जाते. 4-वर्षाचा कोर्स हा बारावी पास झाल्यानंतर करता येतो तर 2 वर्षाचा कोर्स हा ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर करता येतो. बीएड. कोर्सला प्रवेश घेण्यासाठी MAH.B.ED CET ही राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा द्यावी लागते. जो विद्यार्थी हा CET परीक्षा देत नाही तो विद्यार्थी बीएड या कोर्ससाठी पात्र ठरत नाही.

बीएड च्या अभ्यासक्रमात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार बदल होणार आहेत. त्यामुळे बी एड अभ्यासक्रम आता ‘एकात्मिक बीएड अभ्यासक्रम’ या नावाने ओळखला जाणार आहे. या नव्याने येणाऱ्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास दिला जाणार आहे.

तसेच अध्यापनाचे विविध कौशल्य आधुनिक पद्धतीने शिकवले जातील. हे अध्यापन कौशल्य शिकवण्यासाठी राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद एक नियमावली तयार करणार आहे. राष्ट्रीय अध्यापक परिषदेने ठरवून दिलेल्या नियमांना धरून एकात्मिक बीएड अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे.

पदवी व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना टिजिटी पदवी मिळते. तर पदव्युत्तर कोर्स करून बीएड पूर्ण केले असेल तर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पीजीटी बनू शकतो.

आता आपण बीएड या कोर्सच्या अभ्यासक्रमाबाबत पाहुयात!!

बीएड स्पेशलायझेशन मध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेतील विषयांचा समावेश होतो तर बॅचलर ऑफ एज्युकेशन प्रोफेशनल कोर्स अभ्यासक्रमांमध्ये बालपण आणि विकास, सर्व समावेशक शाळा तयार करणे ,शिक्षण संसाधन प्रकल्प ,चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असतो.

हा अभ्यासक्रम गतिमान आहे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांनुसार तो बदलतो. विद्यार्थ्यांची कसे वागावे, त्यांना कशा पद्धतीने शिकवावे ,त्यांच्या समस्या कशा सोडवाव्यात, कोणती अध्यापन पद्धत वापरावी, पालकांशी कसे बोलावे, राहणीमान कसे असावे असे व्यक्तिमत्व विकासाचे निगडीत असलेला अभ्यासक्रम या कोर्सेमध्ये शिकवला जातो. बी एड अभ्यासक्रम हा 4 सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो.

पहिल्या सेमिस्टरमध्ये बालपण आणि विकास, संपूर्ण अभ्यासक्रमातील भाषा, शालेय शिक्षण शास्त्र ,समकालीन भारत आणि शिक्षण ,आयसीटी आणि त्याचे उपयोग समजून घेणे ,शाळा एक्सपोजर ,फिल्ड प्रतिबद्धता ऍक्टिव्हिटी यांचा अभ्यास घेतला जातो.

दुसऱ्या सेमिस्टरमध्ये शिकणे आणि शिकवणे, शिकण्यासाठी मूल्यांकन, ज्ञान आणि अभ्यासक्रम ,शाळा संलग्न, कम्युनिटी लिव्हिंग कॅम्प, शालेय शिक्षण शास्त्र विषयी 1 व विषय 2 याचे शिक्षण दिले जाते.

तिसऱ्या सेमिस्टर मध्ये प्री इंटरंशिप, फिल्डसह प्रतिबद्धता इंटरंशिपशी संबंधित कार्य आणि असाइनमेंट
चौथ्या सेमिस्टर मध्ये मजकूर वाचणे आणि प्रतिबिंबित करणे. लिंग, शाळा आणि समाज. शिक्षणातील कला सर्वसमावेशक शाळा तयार करणे .आरोग्य ,योग आणि शारीरिक शिक्षण.फिल्डसह प्रतिबद्धता कार्य आणि असाइन्मेंट याचे शिक्षण दिले जाते.

बीएड हा कोर्स रेगुलर किंवा ओपन डिस्टन्स लर्निंग या माध्यमातून सुद्धा पूर्ण करता येतो. तसेच अनेक वेबसाईटच्या माध्यमातून आपण शोर्ट ऑनलाईन टीचर ट्रेनिंग सर्टफिकेट कोर्स देखील करू शकतो. इडीएक्स, कोर्सेरा,अँली सन इत्यादी वेगवेगळ्या वेबसाईटवर हे अभ्यासक्रम दिले जातात.

ऑनलाइन अभ्यासक्रमाचे शुल्क 3000 ते 17000 च्या दरम्यान असते. काही अभ्यासक्रम मोफत ही दिले जातात. परंतु विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर त्यांना एक ठराविक रक्कम भरावी लागते. बीएड कोर्स साठी कोणतीही वयोमर्यादा नसते परंतु काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना वयोमर्यादा किमान 19 ते 21 अशी ठेवली आहे.

या बीएड कोर्ससाठी 20000 ते 100000 पर्यंत खर्च येतो. प्रत्येक कॉलेज नुसार ही फी अवलंबून असते.

आता आपण बीएड ही पदवी घेतल्यानंतर आपल्याला नोकरीची संधी कोठे कोठे आहे हे पाहुयात!!

शिक्षक ही पदवी पूर्ण केल्यानंतर आपण खाजगी किंवा सरकारी शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करू शकतो. तसेच एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून काम करू शकतो. समाजाला साक्षर बनवू शकतो. स्वतःच्या ज्ञानात भर घालू शकतो. इतरांना शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करू शकतो. तसेच आपण आपले खाजगी कोचिंग क्लास सुरू करू शकतो.

तसेच बीएड पदवीधरांना शैक्षणिक संस्था व विविध क्षेत्रांमध्ये नोकरी दिली जाते. तसेच शिक्षक लेखक-प्रकाशक, सल्लागार, समूह उपदेशक आणि प्रशासकीय पदे जसे की प्राचार्य ,उपप्राचार्य मुख्याध्यापक ,मुख्याध्यापिका इत्यादी म्हणून नियुक्त केले जाते.

आता आपण शिक्षक झाल्यानंतर पगार किती भेटतो हे पाहुयात !!

बीएड ही पदवी संपादन केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे पगार मिळू शकतो. बॅचलर ऑफ एज्युकेशन चा पगार व्यक्तीच्या कौशल्यावर अवलंबून असतो प्राथमिक शाळेतील शिक्षकांना वर्षाला 760000 पगार मिळतो.

बीएड हा कोर्स केल्यानंतर तुम्ही पुढील अभ्यासक्रमाला सुद्धा प्रवेश घेऊ शकता. पीजी अभ्यासक्रमाच्या उच्चशिक्षणासाठी जाऊ शकता. एम.एड. मास्टर ऑफ एज्युकेशन किंवा पीएचडी सारखे शिक्षण घेऊ शकता.

FAQ’s :-

बीएड कोर्स म्हणजे काय?

बीएड एक व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे.पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीएड प्रवेश घेऊ शकता. ज्यांना शिक्षक ही पदवी घ्यायची आहे त्यांना हा कोर्स करावा लागतो.

बीएड या कोर्से साठी वयोमर्यादा किती असते?

बीएड कोर्स करण्यासाठी वयाची अट नसते. पण काही विद्यापीठे वयाची अट 19 ते 21 अशी ठेवतात.

बीएड या कोर्सचा कालावधी किती असतो?

बीएड या कोर्सचा कालावधी बारावीनंतर 4 वर्षाचा असतो. तर ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षाचा असतो.

बीएड हा एक चांगला करिअर पर्याय आहे का?

हो, बीएड हा एक चांगला करिअर पर्याय आहे. कारण बीएड कोर्स केल्यानंतर आपल्याला शिक्षक ही एक पदवी मिळते. शिक्षकाला समाजात महत्त्वाचे व मानाचे स्थान असते. तसेच अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. शिक्षक यांना पगारही खूप चांगला असतो.

बीएड कोर्स केल्यानंतर शिक्षक यांना किती पगार दिला जातो?

प्राथमिक शाळेतील शिक्षकांना 760000 वार्षिक पगार असतो. तसेच खाजगी शाळेत ही वार्षिक पगार 35000 पर्यंत जातो.अनुभव व कौशल्य या नुसार पगार वाढत जातो.

बीएड झाल्यानंतर सरकारी नोकरी करू शकतो का?

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बीएड ही पदवी मिळाल्यानंतर CET,UPTET,OTED या सारख्या TET परीक्षा देणे बंधनकारक असते. ही परीक्षा दिली नाही तर आपण सरकारी नोकरीस अपात्र ठरतो.

3 thoughts on “बीएड कोर्सची संपूर्ण माहिती B Ed Course Information In Marathi”

Leave a Comment