आयशा टाकिया यांची संपूर्ण माहिती Ayesha Takia Information In Marathi

Ayesha Takia Information In Marathi आयशा टाकिया ही एक भारतीय अभिनेत्री आहे. जी बॉलिवूड हिंदी चित्रपटांमध्ये दिसते. तिने टार्झन वंडर कारमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, यासाठी त्यांनी 2004 मध्ये फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार जिंकला.  तिच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये दौर 2006 चा समावेश आहे. ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वांटेड 2009 चा स्क्रीन पुरस्कार मिळाला. आयशा टाकिया यांचे नाव बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. ज्यांचे हास्य मोहक मानले जाते.

Ayesha Takia Information In Marathi

आयशा टाकिया यांची संपूर्ण माहिती Ayesha Takia Information In Marathi

जन्म :

आयशा टाकियाचा जन्म 10 एप्रिल 1986 रोजी चेंबूर, मुंबई येथे झाला आणि तिचे वडील गुजराती हिंदू आणि आई एक एंग्लो मुस्लिम महिला आहेत.

बालपण :

आयशाला लहानपणापासूनच बॉलिवूडचं प्रचंड आकर्षण होतं. त्यामुळं तिनं शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. लक्षवेधी बाब म्हणजे आयशा केवळ 15 वर्षांची होती. त्यावेळी एका जॅकेट तयार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी मॉडलिंग करण्याची ऑफर तिला मिळाली होती.

तिने देखील ही ऑफर स्विकारली. 2001 साली या कामासाठी तिला तब्बल 3 कोटी रुपयांचं मानधन मिळाले होते. वयाच्या 15 वर्षीच कोट्यवधींची मालकीण झाली म्हणून आयशा त्यावेळी चर्चेत होती.

शिक्षण :

आयशा टाकियाने चेंबूरमधील सेंट अँथनी गर्ल्स स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

वैयक्तिक जीवन :

सन 2000 पासून आयशा टाकियाचा लूक खूप बदलला आहे.  जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर, आयशाच्या ओठ, जबडाची ओळ, भुवया आणि कपाळावर शस्त्रक्रिया झाली.  वयाच्या 23 व्या वर्षी आयशाने सपा नेते अबू आझमीचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केले.

आयेशा आणि फरहानने लग्नापूर्वी 4 वर्ष एकमेकांना डेट केले होते. बर्‍याच लोकांनी आयेशाच्या लग्नाच्या निर्णयाला चुकीचे म्हटले होते. चाहत्यांचे म्हणणे होते की, आयशाने असे करिअर सोडून इतक्यात लग्न करू नये. पण आयेशाने तिला जे उचित वाटले तेच केले.

यानंतर या दोघांना वर्ष 2013 मध्ये मिखाईल आझमी नावाचा मुलगा झाला. फरहान आझमीशी लग्न करून आयशा टाकियाने चित्रपटांच्या जगातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पण थोड्या वेळाने आयशाला असे वाटू लागले की, तिची हक्काची जागा हिंदी चित्रपटसृष्टीत आहे.

आयशाने चित्रपटात काम केले पाहिजे हे फरहान आझमीने कधीच मान्य केले नाही.  यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि घटस्फोटापर्यंत प्रेमाची गंतव्य स्थान गाठली होती, परंतु परस्पर समंजसपणामुळे दोघांनी घटस्फोटाचा निर्णय बदलला.

चित्रपट करियर :

आयशा टाकियाने आपल्या करिअरची सुरुवात शाहिद कपूरबरोबर कॉम्प्लानच्या एका जाहिरातीमध्ये केली.  आजही लोक तिला कॉम्प्लेन गर्ल या नावाने ओळखतात.  वयाच्या पंधराव्या वर्षी आयशाने फाल्गुनी पाठकच्या अल्बममध्ये काम करून बरीच लोकप्रियता मिळवली, पण डीजे अकीलच्या अल्बममध्ये काम केल्यानंतरच तिला बॉलिवूडमध्ये प्रवेशाचे तिकीटही मिळाले.

आयशाने अभय देओलबरोबर ‘सोचा ना था’ हा चित्रपट साइन केला होता, परंतु काही कारणास्तव हा चित्रपट ‘टार्झन द वंडर’ चित्रपटाआधी स्क्रीनवर प्रदर्शित होऊ शकला नाही, ज्यामुळे टार्झन द वंडर कार तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. आयशाला या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारही मिळाला होता.

आयेशाने नागेश कुकनूर दिग्दर्शित  द्वार चित्रपटात विधवेची गंभीर भूमिका साकारून तिच्या समीक्षकांची आणि चाहत्यांची मने जिंकली. हिंदी चित्रपटांशिवाय आयशा टाकिया यांनी तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.

आयशा टाकियाने वांटेड या चित्रपटात सलमान खानसोबत काम करून बॉलिवूड स्टार यादीमध्ये प्रवेश केला होता. समाजवादी पक्षाचे प्रमुख सदस्य अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याच्याशी लग्न झाले.  फरहान आझमी आयेशासाठी फार भाग्यवान ठरला नाही. कारण लग्नानंतर 2011 साली आलेला पाठशाला हा चित्रपट आयशाच्या फिल्मी करिअरचा फ्लॉप चित्रपट ठरला.

त्यांना ‘वांटेड’ या चित्रपटामधून बरीच प्रसिद्धी मिळाली.  या चित्रपटात ती दबंग सलमान खान सोबत दिसली होती.  बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता.  आयशाने 2004 मध्ये ‘टार्झन द वंडर कार’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.  चित्रपटात तिच्या सौंदर्याबद्दल आणि हॉटनेसबद्दल बरीच चर्चा झाली.

लग्न :

आयशाने 2009 मध्ये रेस्टॉरंट मालक आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केले.  लग्नानंतर अभिनेत्रीने स्वत: ला चित्रपटांपासून दूर केले. लग्नानंतर आयशाने वर्ष 2013 मध्ये मुलाला जन्म दिला.

2010 मध्ये जेव्हा ते भिवंडीमधून समाजवादी पक्षाकडून पोटनिवडणुकीसाठी उभे होते तेव्हा त्यांची संपत्ती 16 कोटी रुपये एवढी होती. पुढे 2014 मध्ये त्याने लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई येथून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती 64 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.

गेल्या महिन्यातच फरहान यांनी मोठ्या धुमधडाक्यात वर्सोवा येथे ‘कोयला’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले होते. यामध्ये कासिफ खान त्याचे भागीदार होते. मात्र ज्या जागेवर हे रेस्टॉरंट सुरू केले होते, ती जागा अभिनेता सोनू सूद याच्या मालकीची होती.

सोनू सूदने जागा रिकामी करण्याचे सांगितले होते. कारण सोनूला या जागेचे भाडे दिले जात नव्हते. त्याचबरोबर जे चेक दिले होते ते देखील बाउंस झाले होते. अखेर कोयला रेस्टॉरंट बंद करावे लागले. हे रेस्टॉरंट बंद झाल्याने आझमी खूपच दु:खी झाले होते.

चेहऱ्याची शस्त्रक्रिया :

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या चेहर्‍याची शस्त्रक्रिया केली आहे. काहींची शस्त्रक्रिया ही खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाली आहे, तर काहींच्या बाबतीत त्यांचा चेहरा बराच खराब झाल्याचे दिसून आले आहे. अशा अभिनेत्रींना फार मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

आता यामध्ये बॉलिवूडची एक सुंदर अभिनेत्री आयशा टाकिया हिचेही नाव सामील झाले आहे. आयशाने तिच्या ओठांची शस्त्रक्रिया केली होती, ज्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तिने पोस्ट केले आहेत. आयशाने जी ओठांची सर्जरी करून घेतली आहे. ती पूर्णपणे फसलेली असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे तिचा चेहरा खूपच वेगळा दिसत आहे.

हॉलिवूड स्टार एंजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी बर्‍याच अभिनेत्रींनी त्यांच्या ओठांची शस्त्रक्रिया केली आहे. असे दिसून येत आहे की, आयशालाही तसेच काहीसे करायचे होते मात्र आता ती चेष्टेचा विषय ठरली आहे. याआधीही आयशा तिच्या चेहऱ्याच्या सर्जरीमुळे ट्रोल झाली होती. त्यावेळी तिच्या चेहऱ्याचा आकार इतका बदलला होता की, तिला ओळखणेही कठीण झाले होते.

एकामागून एक अनेक ब्यूटी सर्जरी केल्या मात्र प्रत्येक सर्जरीगणीक तिचं सौंदर्य कमी होत गेले. परिणामी एक वेळ अशीही आली जेव्हा प्रेक्षक तिला चेटकीण म्हणून चिडवू लागले. प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळं अखेर आयशाला चित्रपट मिळणं थांबले. सध्या ती बॉलिवूड आणि मॉडलिंगपासून दूर आपल्या पतीसोबत दुबईमध्ये राहात आहे.

पुरस्कार :

टारझन वन द कार, वांटेड, दिल मांगे मोरे मध्ये फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित केले. तिच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये दौर 2006 च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि वांटेड 2009 चा स्क्रीन पुरस्कार मिळाला.

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-