अरबी समुद्राची संपूर्ण माहिती Arbi Samudra Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Arbi Samudra Information In Marathi महाराष्ट्रातील लोकांचे आवडीचे पर्यटन स्थळ म्हणून कोकणाला ओळखले जाते. आणि कोकण पर्यटन दृष्ट्या इतके प्रसिद्ध होण्यामागे कारणीभूत असलेला घटक म्हणजे अरबी समुद्र होय. अरबी समुद्रामुळे किनारपट्टीवर निर्माण झालेले विविध बीच, आणि पुळणे, त्याचबरोबर मुंबई सारखे काठावर वसलेले सुंदर शहर यामुळे अरबी समुद्राचे महत्व फार आहे.

Arbi Samudra Information In Marathi

अरबी समुद्राची संपूर्ण माहिती Arbi Samudra Information In Marathi

महाराष्ट्राच्या दृष्टीने अरबी समुद्र अतिशय मोलाचा असून, या अरबी समुद्रामध्ये भारताचे काही बेत देखील आहेत. महाराष्ट्र सह भारतातील अनेक नद्यांचे पाणी या अरबी समुद्राला जाऊन मिळत असते, त्यामुळे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा अरबी समुद्र पाकिस्तान सारख्या देशांना देखील खूपच उपयुक्त ठरणार आहे. आजच्या भागामध्ये आपण या अरबी समुद्राबद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत…

नावअरबी समुद्र
प्रकारसमुद्र
क्षेत्रफळ३८,६२,००० चौरस किलोमीटर
कमाल खोली४६५२ मीटर
सर्वाधिक रुंदी२४०० किलोमीटर
मिळणारी सर्वात मोठी नदीसिंधू नदी
काठावरील सर्वात महत्त्वाचे शहरमुंबई

अरबी समुद्राबद्दल भौगोलिक माहिती:

भारताच्या परकीय व्यापार आणि मत्स्य शेती बद्दल अतिशय महत्त्वपूर्ण असणारा समुद्र म्हणून अरबी समुद्राला ओळखले जाते. १ लाख ४१ हजार १३० चौरस मैल क्षेत्रफळावर विस्तारलेला हा अरबी समुद्र अतिशय विशाल असून, महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये या अरबी समुद्राचे दर्शन आपल्याला घडत असते.

पूर्वी तेथे समुद्र व हिंदी महासागर यांच्या दरम्यान जी भूमी होती, त्या ठिकाणी या अरबी समुद्राची निर्मिती झालेली आहे असे सांगितले जाते. हा अरबी समुद्र लाल समुद्राला जोडला जात असतो. ज्या अंतर्गत पर्शियनकल्प व मन्नारचे आखात या अरबी समुद्राच्या दोन महत्त्वाच्या शाखा एकमेकांना जोडल्या जातात, त्याचबरोबर भारताच्या किनारपट्टीचा विचार केल्यास अरबी समुद्रामध्ये मन्नारचे आखात, कच्छचे आखात, आणि खंबायत चे आखात इत्यादी महत्त्वाच्या भूरूपांची निर्मिती झालेली आहे.

ज्याप्रमाणे भारताच्या किनारपट्टीला अरबी समुद्र लागून आहे, त्याचबरोबर पाकिस्तान, सोमालिया, मालदीव, एमन, आणि ओमान यांसारख्या देशांच्या किनारपट्टीवर देखील अरबी समुद्र वसलेला आहे. भारतातील कवरत्ती, कन्याकुमारी, कोवलम, कोल्लम, तिरुअनंतपुरम, कोची, मंगळूर, रत्नागिरी, भरूच, मालवण, भावास्को यांसारख्या अनेक बंदरांनी सुसज्ज असलेला हा अरबी समुद्र भारताच्या निसर्ग सौंदर्याची खान असण्याबरोबरच भारतासाठी साधन संपत्तीचे एक चांगले भांडार म्हणून देखील ओळखला जातो.

अरबी समुद्र आणि व्यापार:

कुठल्याही देशाच्या आर्थिक वाढीसाठी त्या देशातील व्यापार फार महत्त्वाचा ठरत असतो. पूर्वीच्या काळी व्यापार हा जहाजाच्या मार्गे केला जात असे, आणि भारताला उत्तम सागरी किनारा लाभला असल्यामुळे समुद्रमार्गे परकीय व्यापार फार मोठ्या प्रमाणावर चालत असे.

भारतामध्ये येणारा अनेक परकीय व्यापाऱ्यांसह राज्यकर्त्यांनी देखील समुद्री मार्गाने येणेच पसंत केले होते. त्या दृष्टीने हा अरबी समुद्र उपयुक्त असून, आज देखील या अरबी समुद्राच्या मार्गे अनेक प्रकारचे व्यापार चालत असतात. परकीय देशांमध्ये अनेक मालाची ने आन करणे, शेतीमाल निर्यात करणे, किंवा इतर देशांमधील माल आयात करणे, यासाठी मोठ्या प्रमाणावर या अरबी समुद्राचा वापर केला जातो.

अरबी समुद्रावर मुंबई बंदरासारखे एक उत्तम नैसर्गिक बंदर असून, या ठिकाणावरून भारताच्या व्यापारापैकी फार मोठा व्यापार सुरू असतो. आज भारताला अरबी समुद्राचा किनारा लाभला असल्यामुळे, कोकणासह दक्षिण भारतीय राज्यांमधील अनेक लोक मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे अनेक लोकांना रोजगाराचे संधी उपलब्ध झालेली असून, बोटी चालविणे, पर्यटन स्थळांमध्ये कार्य करणे, यांसारख्या अनेक गोष्टींमधून अनेक रोजगार देखील मिळवत आहेत.

त्यांच्यासाठी हा एक व्यापारच झालेला आहे. भारताच्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक बंदरांचा देखील समावेश आहे. नैसर्गिक दृष्ट्या अतिशय उत्कृष्ट असलेली अरबी समुद्राची किनारपट्टी अनेक बीच साठी देखील ओळखली जाते.

गोव्यासारख्या ठिकाणी तर अरबी समुद्राचा बीच बघण्याकरिता पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. ज्या अंतर्गत भारताला परकीय चलन तर मिळते, त्याचबरोबर व्यापार देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असतो.

भारतासह इतरही देशांच्या किनारपट्टीला अरबी समुद्र लागून आहे, त्यामुळे त्या देशांच्या व्यापारामध्ये देखील फार मोठा बदल घडवून आला असला, तरी देखील पाकिस्तान सारख्या देशाने या अरबी समुद्राचा फारसा फायदा करून घेतला असे म्हणता येणार नाही. पाकिस्तानने अरबी समुद्रामार्गे भारतावर आक्रमण करण्याचे सोडून, आर्थिक फायदा असा कुठलाही घेतला असे म्हणता येणार नाही.

अरबी समुद्राचे नाव पडण्यामागील कथा:

अगदी पूर्वीपासून अरबी समुद्राला अरबी समुद्र हे नाव होते असे नाही. मात्र या समुद्राला येऊन मिळणारी सर्वात मोठी नदी म्हणून सिंधू नदी ओळखली जाते. या सिंधू नदीच्या नावावरून या समुद्राला सिंधुसागर असे भारतीय नाव पडले होते, मात्र यावेळी भारतामध्ये उर्दू भाषिक तसेच पर्शियन लोक आले.

त्यावेळी त्यांनी या नावाचे पर्शियन भाषेमध्ये भाषांतर केले. जे बहर अल अरब असे ठेवण्यात आले. पुढे एवढे मोठे नाव उच्चारण्याऐवजी अरब समुद्र आणि त्यानंतर त्याचे अपभ्रंश होऊन अरबी समुद्र असे नाव या समुद्राला पडले. काही संशोधकांनी या समुद्राला वेगवेगळे नाव दिलेले असून, ग्रीक देशातील विविध भूगोल शास्त्रज्ञ आणि संशोधक लोकांनी या समुद्राला एरिथ्रियन असे नाव देखील बहाल केलेले आहे.

अरबी समुद्रामध्ये असणारे किनारपट्टीवरील विविध महत्त्वाची बंदरे:

अरबी समुद्राचा किनारपट्टीवर अनेक बेटे असून, त्यामध्ये कांडला बंदर, मुंबई बंदर, जे एन पी टी बंदर, नवे मंगलोर बंदर, मार्मागोवा बंदर, कोचिंग बंदर, आणि रेड्डी बंदर येथील बंदरांचा समावेश होतो.

निष्कर्ष:

आज काल प्रवासासाठी सर्वात जलद व उपयुक्त साधन म्हणून विमानाकडे बघितले जात असले, तरी देखील पूर्वीच्या काळी जल मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. आज घडीला देखील मालवाहतूक करण्याकरिता सर्वात स्वस्त पर्याय म्हणून जलवाहतुकीकडे बघितले जाते.

ज्या देशाला जास्तीत जास्त समुद्रकिनारा लाभलेला असेल, तो देश व्यापाराच्या दृष्टीने अतिशय समृद्ध होत असतो. भारताला देखील मोठा समुद्रकिनारा लाभलेला असून, त्यामध्ये बंगालचा उपसागर व अरबी समुद्र या दोन घटकांचा मोठा सहभाग आहे.

आजच्या भागामध्ये आपण या अरबी समुद्राबद्दल  माहिती बघितली आहे, ज्यामध्ये तुम्हाला अरबी समुद्राची भौगोलिक माहिती, त्याचबरोबर व्यापारी दृष्ट्या महत्त्व, व्यापारी मार्ग, अरबी समुद्राचे नाव पडण्यामागे असणारे कारण, अरबी समुद्रामध्ये चालणारे व्यवसाय, काठावरील विविध महत्त्वाची बंदरे, या गोष्टीबद्दल माहिती मिळाली असेलच.

FAQ

अरबी समुद्र भौगोलिक दृष्ट्या विचार करता कोठे वसलेला आहे?

अरबी समुद्र हा भौगोलिक दृष्ट्या विचार करता ८° ते २५° अक्षवृत्त आणि ५०° ते ७५° रेखावृत्त या दरम्यान वसलेला आहे.

अरबी समुद्राची साधारण रुंदी किती समजली जाते?

अरबी समुद्राची साधारण रुंदी ही २४०० किलोमीटर समजली जाते. मात्र बेटांच्या संदर्भात ही २९०० किलोमीटर इतकी आहे.

ऐतिहासिक दृष्ट्या अरबी समुद्राला कसे महत्त्व प्राप्त झालेले आहे?

परदेशी व्यापारकरिता प्रसिद्ध असलेले अरबी समुद्र, अनेक नैसर्गिक बंदरांचे माहेरघर आहे. या अरबी समुद्राच्या मार्गानेच परकीय व्यापारी भारतामध्ये आले होते.

अरबी समुद्राची जास्तीत जास्त खोली किती समजले जाते?

अरबी समुद्राची साधारण सर्वाधिक खोली ही ४६५२ मीटर इतकी समजली जाते.

अरबी समुद्राला पाणी घेऊन मिळणारी सर्वात मोठी नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते?

अरबी समुद्राला पाणी घेऊन मिळणारी सर्वात मोठी नदी म्हणून सिंधू नदीला ओळखले जाते, जी पाकिस्तान मार्गे अरबी समुद्राला मिळते.

Leave a Comment