ANM कोर्सची संपूर्ण माहिती ANM Course Information In Marathi

ANM Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, दहावी बारावीचा बोर्डाचा निकाल लागला .आता पुढे काय करायचे? असा प्रश्न सर्व मुलांना व पालकांना पडलाच असेल हे नक्की !! प्रत्येक मुलाने व त्याच्या पालकांनी त्याच्या पुढच्या वाटचालीचा नक्कीच काहीतरी निर्णय घेतला असेल किंवा घ्यायचा असेल!! कारण हा टप्पा त्या मुलांसाठी व त्यांच्या पालकांची साठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो कारण येथे त्या मुलाचे करिअर त्याचे भविष्य घडवणार असते .त्यानुसार विचार विनिमय करून मुले ही आपल्या पसंतीनुसार पाहिजे तो अभ्यासक्रम निवडत असतो.

Anm Course Information In Marathi

ANM कोर्सची संपूर्ण माहिती ANM Course Information In Marathi

काही मुले ही आर्ट्स विभागाकडे जातात .तर काही मुलेही कॉमर्स विभागाकडे जातात .तर काही मुले ही विज्ञान विभागाकडे जात असतात. आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला ज्या कोर्सची माहिती सांगणार आहे ती फक्त मुलींसाठी आहे .आता असे का, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. परंतु मी आज ज्या कोर्सची तुम्हाला माहिती सांगणार आहे तो कोर्स फक्त मुलींसाठी आहे. मुले तो कोर्स करू शकत नाही .

तो कोर्स आहे ANM नर्सिंग कोर्स!!!

ANM हा कोर्स करण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते? त्यासाठी कोणते कॉलेज चांगले? ANM कोर्सची फी किती? ANM  हा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या संधी कोठे कोठे उपलब्ध आहेत?  पगार किती? या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला या पोस्टमध्ये देणार आहे.

सध्याची परिस्थिती पाहता वैद्यकीय क्षेत्राला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यापैकी नर्सिंग हे असे क्षेत्र आहे की तेथे आपण विविध प्रकारे रुग्णांची सेवा करू शकतो .आता आपण कोरोना सारख्या महामारीतुन सावरलेलो आहेत. परंतु कोरोनाच्या परिस्थितीत डॉक्टर व नर्स यांना खूप महत्त्व प्राप्त झाले होते व त्या काळात त्यांनी आपली जबाबदारी सुध्दा व्यवस्थितपणे पार पाडलेली आपल्याला दिसलेली आहे. त्यामुळे नर्सिंग हे खूप महत्त्वाचे आणि जास्त मागणी असलेले क्षेत्र निर्माण झालेले आहे.

ANM चा फुल फॉर्म म्हणजेच Auxiliary Nursing Midwifery या कोर्सला मराठीमध्ये “सहाय्यक परिचारिका प्रसूती विद्या अभ्यासक्रम” असे म्हणतात.

ANM हा एक प्रकारचा डिप्लोमा कोर्स आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रशिक्षण दिले जाते जसे की, रुग्णांची सेवा कशी करायची, त्यांची काळजी कशी घ्यायची, उपचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची काळजी कशी घ्यायची ,रुग्णांना वेळेवर औषधोपचार देणे व त्यांची नोंद ठेवणे, लसीकरणाचे काम, ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांना मदत करणे हे शिकवले जाते. तसेच प्रसूतीशास्त्राचे शिक्षण दिले जाते.  ANM  ला साहाय्यक उपचारीका नर्स असेसुद्धा म्हटले जाते.

ANM हा कोर्स कमी वेळेत व कमी खर्चात करून तुम्ही स्वतःसाठी चांगले करिअर करू शकता. ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी ANM  हा कोर्से एक उत्तम पर्याय आहे. भारतामध्ये ANM या अभ्यासक्रमासाठी एकूण 1890 महाविद्यालय आहेत. त्यापैकी 1615 खाजगी तर 275 सरकारी संस्था आहेत.

प्रत्येक कोर्ससाठी काही पात्रता निकष ठरलेल्या असतात. तसेच ANM  हा कोर्स करण्यासाठी काही पात्रता निकष विद्यार्थ्यांना पूर्ण करावी लागतात. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पहिली प्रमुख गोष्ट म्हणजे या अभ्यासक्रमाला फक्त मुलीच प्रवेश घेऊ शकतात. येथे मुलांना प्रवेश घेऊ शकत नाहीत.

कारण हा कोर्स फक्त मुलींसाठी आहे. विद्यार्थी हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्याला बारावी मध्ये 40 ते 50  % गुण असणे आवश्यक आहे. बारावी मध्ये आर्ट्स ,कॉमर्स, सायन्स कोणत्याही शाखेचा विद्यार्थी हा प्रवेश देऊ शकतो. फक्त  बारावीच्या अभ्यासक्रमांमध्ये इंग्रजी हा विषय असणे बंधनकारक आहे.

बहुतांश विद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाला प्रवेश हा बारावीच्या गुणांच्या आधारावर दिला जातो तर काही विद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये MH CET ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. ANM कोर्स साठी वयाची अट सुद्धा दिलेली आहे.

ही वयाची अट किमान वयोमर्यादा 17 वर्षे ते कमाल वयोमर्यादा 35 वर्ष एवढी आहे. तसेच उमेदवार वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असावा .यासाठी मान्यताप्राप्त डॉक्टरकडून घोषित करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते.

आता आपल्याला ANM या कोर्सचा कालावधी किती आहे

असा प्रश्न पडला असेल तर ANM या कोर्सचा कालावधी हा दोन वर्षाचा आहे. या दोन वर्षांमध्ये वैद्यकीय विषयाशी संबंधित अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते .या दोन वर्षात पहिल्या 18 महिन्यात प्रात्यक्षिक आणि थेरि याचे शिक्षण दिले जाते. तर मागील सहा महिन्यात इंटरंशिप केली जाते. इंटरंशिपचा अनुभव हा कॉलेजशी संलग्न असलेल्या हॉस्पिटलमधून दिला जातो.

आता ANM हा कोर्स करण्यासाठी आपल्याला किती शुल्क आकारावे लागते हे पाहुयात!!

ANM या कोर्सची फी ही खाजगी कॉलेज पेक्षा सरकारी कॉलेजला खूप कमी प्रमाणात असते. काही सरकारी कॉलेजमध्ये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शुल्कही भरावे लागत नाही. तर सर्वसाधारण जातीतील विद्यार्थ्यांना कमी फी भरावी लागते.ही फी  5000 ते 10000 च्या दरम्यान असते. खाजगी महाविद्यालयाच्या फी बाबत बोलायचे झाले तर प्रत्येक विद्यालयात हे वेगवेगळे शुल्क असते. सरासरी एक वर्षाची फी ही सुमारे 50000 ते 200000 पर्यंत असते.

ANM या कोर्सच्या अभ्यासक्रमाबद्दल माहीती पाहूयात!!!

मानवी शरीर रचना, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, मानसशास्त्र, जीवशास्त्रात ,समाजशास्त्र, वर्तणूक शास्त्र, नर्सिंग ची मूलभूत तत्वे इत्यादी विषय या  ANM या अभ्यासक्रमाच्या  अंतर्गत येत असतात.

पहिल्या वर्षीचा अभ्यासक्रम

  • बाल आरोग्य नर्सिंग
  • आरोग्य प्रोत्साहन
  • प्राथमिक आरोग्य सेवा नर्सिंग समुदाय आरोग्य नर्सिंग

दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम मिडवायफरी

  • आरोग्य केंद्र व्यवस्थापन

ANM कोर्स केल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्या म्हणजे डॉक्टरांच्या गैरहजेरीत रुग्णांची काळजी घेणे. रुग्णांना वेळोवेळी औषध देणे. रुग्णांची नोंद ठेवणे हे सर्वात महत्वाचे काम ANM नर्सचे असते .

तसेच उपचारादरम्यान आणि ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना मदत करणे व उपचारात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या देखभाल व काळजी घेणे .रुग्णांची व्यवस्थित नोंद ठेवणे म्हणजे रुग्णांना दाखल करण्यात आणि त्या रुग्णाला डिस्चार्ज करण्यास मदत होते.

ANM हा कोर्स केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या नोकरीच्या संधी

ANM हा कोर्स केल्यानंतर आपण कोणत्याही सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात नर्स म्हणून काम करू शकतो. सरकारच्या विविध क्षेत्रांमध्ये परिचारिकांच्या जागा निघतात. तेथे आपण अर्ज करून नोकरी मिळवू शकतो.

ग्रामीण आरोग्य केंद्र, नर्सिंग होम, चिकित्सालय, एनजीओ, वृद्धाश्रम ,शैक्षणिक संस्था, वैद्यकीय महाविद्यालय इत्यादी ठिकाणीही आपण नोकरी करू शकतो .याशिवाय ICU नर्स, होम नर्स, मिलिटरी नर्स, नर्सिंग असिस्टंट अशा विविध पदांवर देखील काम करू शकतो.

ANM हा कोर्स केल्यानंतर आपण पुढील अभ्यासक्रमाला सुद्धा प्रवेश घेऊ शकतो. जसे की, नर्सिंग मध्ये बीएससी, बीएससी ऑनर्स इन नर्सिंग,पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग.हे काही बॅचलर डिग्री नर्सिंग कोर्स आहेत. ANM हा कोर्स केल्या नंतर तुम्ही हा उच्च अभ्यासक्रम करू शकता.

ANM नर्सिंग पगार

सुरुवातीला हा पगार 10000 ते 20000 पर्यंत असतो. नंतर तिच्या अनुभवानुसार तो पगार वाढत जातो. सरकारी रुग्णालयात नोकरी केली तर जास्त पगार मिळतो.

ANM हा अभ्यासक्रम देणारे शीर्ष विद्यालय पुढील प्रमाणे

  • भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे
  • सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग
  • सिंबोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग
  • तेहमी ग्रँड इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन पुणे
  • साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंग
  • धारेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग
  • सेंट. अँडेर्व कॉलेज ऑफ नर्सिंग

ANM या कोर्से विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ANM चा लॉंग फॉर्म काय आहे?

Auxiliary Nursing Midwifery.

ANM हा कोर्स कोण करू शकते?

ANM हा अभ्यासक्रम फक्त मुलींसाठी तयार केलेला अभ्यासक्रम आहे .मुले या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकत नाही.

ANM हा कोर्से कोणत्या प्रकारचा आहे?

ANM हा कोर्स एक डिप्लोमा कोर्स असून ज्याद्वारे सहाय्यक परिचारीका आपण होऊ शकतो.म्हणून या कोर्सला मराठीत "सहाय्यक परिचारिका प्रसूती विद्या अभ्यासक्रम" असे म्हणतात.

ANM हा कोर्स किती कालावधीचा असतो ?

ANM हा कोर्स दोन वर्षाचा असतो. पहिले 18 महिने हे प्रात्यक्षिक व थेरपीसाठी असतात व शेवटचे सहा महिने हे इंटरंशिप साठी असतात. शेवटच्या सहा महिने इंटर्नशिप मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजच्या संलग्न हॉस्पिटल मध्ये अनुभव दिला जातो.

Leave a Comment