अशोक सराफ यांची संपूर्ण माहिती Ashok Saraf Information In Marathi

Ashok Saraf Information In Marathi अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही मराठी चित्रपटातील सुपरहिट जोडी आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत.

Ashok Saraf Information In Marathi

अशोक सराफ यांची संपूर्ण माहिती Ashok Saraf Information In Marathi

जन्म :

सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण दक्षिण मुंबईतील चिखलवाडी येथे गेले. त्यांनी डीजीटी विद्यालय मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. अशोक सराफ यांचं लग्न निवेदिता सराफ यांच्यासोबत झाले.

सिनेअभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्य‍ अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा आहे. बॉलिवूडमध्ये, राकेश रोशनच्या 1995 च्या अ‍ॅक्शन थ्रिलर करण अर्जुनमधील मुंशीजी प्रत्येकाच्या लक्षात सर्वात जास्त काळ राहतात. तसेच, येस बॉसमध्ये शाहरुख खानचा मित्र आणि अजय देवगणचा सिंघममधील सहकारी हेड कॉन्स्टेबल म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत ते मामा म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी गायलेलं ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ हे गाणं  अजूनही बालचमूंमध्ये आवडीने ऐकले जाते.

बालपण व शिक्षण :

अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत  झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती.

वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.

वैयक्तिक जीवन :

अशोक सराफ यांच्या बरोबर धूम धडाका आमच्या सारखे आम्हीच, फेका फेकी आणि इतरही बऱ्याच चित्रपटामधे  काम करणाऱ्या देखण्या अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्या बरोबर त्यांचे धागे जुळले.  अशोक सराफ सारख्या दिग्गज अभिनेत्याने घातलेली लग्नाची मागणी निवेदिता जोशी यांनी अगदी आनंदात स्वीकारली आणि त्या निवेदिता सराफ झाल्या. 1990 साली त्यांनी गोव्यामधील एका मंदिरात कुटुंबियांच्या उपस्थित लग्न केले.

या दोघांच्या वयांमध्ये असलेलं बरंच अंतर नंतरच्या आयुष्यात सुद्धा त्यांना कधी आडवं आलं नाही आणि निवेदिता यांनी अशोक मामांना  सर्व सुख दुःखात अगदी उत्तम साथ दिली.  त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक नवीन फुल उमलले ते अनिकेतच्या रूपाने. आपल्या पत्नीच्या सहयोगाने त्यांनी निर्मिती मध्ये सुद्धा पाऊल  ठेवले आणि त्यातूनच जन्माला आलेला चित्रपट म्हणजे एक डाव धोबी पछाड. त्यांचा मुलगा अनिकेत हा एका आचार्याचे  काम करतो. आई आणि वडील हे दोघेही अभिनेते असले तरी अनिकेत हा मात्र चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

कारकीर्द :

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य- चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार, कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली.

ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली.

अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या  शुभमंगल सावधान, आई नंबर वन व पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर अश्या असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.

अनधिकृत या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. मनोमिलननंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय! हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत. पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून ‘टन टना टन’ व काही हिंदी मालिका बनवल्या.

हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दामाद या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. करण अर्जुन, कोयला, येस बॉस, जोडी नं.1 हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट केले.

अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन 2007 येथे विजय केंकरे दिग्दर्शित हे राम कार्डिओग्राम या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकातून सदैव मनोरंजीत केले आहे. अशोक सराफ जी यांनी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला.

मुुुख्यत्वे त्यानी सचिन पिळगांवकर,  लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर काम केले. सचिन पिळगांवकर ह्यांच्या हृदयात अशोक मामांना खुप आदराचे स्थान आहे. आपल्या प्रत्येक सिनेमात अशोक मामांची भुमिका असावी हा त्यांचा लाडका हट्ट असतो आणि तो हट्ट अशोक मामा पूर्ण करतात. अशोक सराफ यांनी मराठी नाटकां तून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या वडिलां चा इलेक्ट्रिक वस्तू आणण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता.

अशोक सराफ यांनी बॅंकेत दहा वर्ष नोकरी केली पण प्रत्यक्षात ते नोकरीवर हजर कमी राहायचे आणि नाटकात जास्त काम करायचे. त्यांची पहिली फिल्मी भूमिका एका विदूषका ची होती. दादा साहेब कोंडके यांच्या पांडू हवालदार या चित्रपटात त्यांनी सखाराम हवालदार या भ्रष्ट हवालदाराच्या भूमिका साकारली. अशोक सराफ यांची अभिनयाची पद्धत ही सीच्युशनाल कॉमेडी स्वरूपाची आहे.

अशोक मामांची एक अनुभवी आणि वरिष्ठ कलाकार या नात्याने राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. जेणेकरून मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसमोर असणारे प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडले जाऊ शकतात.

अशोक सराफ यांना मामा म्हणून ओळखले जाते :

70 च्या काळात कोल्हापूरला एका चित्रपटाचे शूट चालले होते आणि तिथला कॅमेरामन प्रकाश शिंदे होता. तो त्याच्या छोट्या मुलीला बरोबर घेऊन शूटींगला येत असे आणि त्या मुलीला त्याने हा अशोक मामा अशी ओळख करून दिली. थोड्याच दिवसात सेट वरील सर्वच लोक त्यांना मामा म्हणू लागले आणि हळूहळू हेच नाव त्यांना चिकटले आणि ते संपूर्ण इंडस्ट्रीचे मामा झाले.

मराठी चित्रपट :

आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच, आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, भुताचा भाऊ, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, फेका फेकी, एक डाव भुताचा, एक डाव धोबीपछाड, आलटून पालटून, सगळीकडे बोंबाबोंब, साडे माडे तीन, कुंकू घनचक्कर, नवरा माझा नवसाचा चंगु मंगु, अफलातून, वाजवा रे वाजवा शुभ मंगल सावधान, जमलं हो जमलं, गोडीगुलाबी, गडबड घोटाळा, बाळाचे बाप ब्रम्हचारी, खुल्लम खुल्ला, धमाल नाम्याची, संसार, कळत नकळत, पैजेचा विडा बहुरूपी ,धूमधडाका, निशाणी डावा अंगठा, झुंज, टोपी वर टोपी.

हिंदी चित्रपट :

अशोक सराफ यांनी बॉलिवूडमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. सिंघम, प्यार किया तो डरना क्या, गुप्त, कोयला, येस बॉस आणि करण अर्जुन या सिनेमा मध्ये चांगल्या आणि लक्षात राहतील अशा भूमिका निभावल्या. गोविंदा, जॉनी लीव्हर, कादर खान यासारख्या शक्तिशाली कॉमेडी कलाकारांविरूद्धच्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले

पुरस्कार :

  • फिल्मफेअर पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार, व झी गौरव पुरस्कारप्राप्त झालेले आहे.
  • 1977 : राम राम गंगारामचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार.
  • एकूण 5 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले.
  • पांडू हवालदार या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार.
  • सवाई हवालदार या चित्रपटाचा स्क्रीन पुरस्कार
  • भोजपुरी फिल्म पुरस्कार माईका बिटुआ
  • मराठी चित्रपटांसाठी 10 राज्य सरकारचे पुरस्कार
  • महाराष्ट्रेचा आवडता कोन? मधील सर्वोत्कृष्ट कॉमेडियन.

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-